सावली
सावली !!!
उन्हाचा गाव
डिजिटल सावली
डिजिटल सावली
काळी सावळी असली म्हणून काय झाले?
माझे, माझ्या सावलीवर बेहद्द प्रेम आहे.
कारण तीची-माझी पक्की सोयरीक आहे.
बर्या-वाईट दिवसात, रात्री-बेरात्रीही.
माझ्या मनात वादळ घोंघावते,
त्याच्या लाटा तीच्या अंगावर खळाळतात.
आमच्यातील अनुबंध कालातीत आहेत,
वादी-संवादी सुरांची जोडी जशी पुरातन आहे.
आताशा मात्र तीचे अगदीच बिनसलेय,
सारखी फुंरगटून बसते, चिड-चीड करते.
तीला कुरंगी रहायचा कंटाळा आलाय,
एव्हढेच नव्हे, तीला आता डिजिटल व्हायचेय.
"ब्लक अँड व्हाईटचा जमाना गेला,
त्यालाहि एक जमाना झाला," म्हणते.
कुणीतरी आपल्यावर लादलेला बेरंग झुगारून
स्त्रीलिंगी सावली
स्त्रीलिंगी सावली
मी तर पुरुषासारखा पुरुष,
मग माझी सावली का बाईमाणूस?
नि:संकोच नग्न ती पूर्ण सदोदित,
मग का नाही करत कधी उद्दिपीत?
अंगाखांद्यावरून माझ्या, तीचा मुक्त वावर
तरी कशी ती कोरडी, स्पर्शानिराळी?
विकारहीन, उडालेला अत्तराचा फाया,
चैतन्यहीन चेतना, तिची चंचल काया.
माझे म्हणून जे जे अभिमानी आभास,
एकूण एकाचे ती नकारात्मक प्रश्नचिन्ह.
माझी स्त्रीलिंगी सावली
माझ्या पौरुषाचा नकारडंका?
की व्याकरणाने लिंगवलेला निर्हेतुक अपवाद?
की गूढ, गहन, अर्थाची अगम्य टोचणी?
बापू.
डिजिटल सावली
डिजिटल सावली
काळी सावळी असली म्हणून काय झालं?
माझं, माझ्या सावलीवर बेहद्द प्रेम आहे.
कारण तीची-माझी पक्की सोयरीक आहे.
बर्या-वाईट दिवसात, रात्री-बेरात्रीही
माझ्या मनात वादळ घोंगावतं,
त्याच्या लाटा तीच्या अंगावर खळाळतात.
मी कधीमधी खंतावतो तेंव्हा
ती हताश सुस्कारे सोडते.
आमच्यातील अनुबंध कालातीत आहेत,
वादी-संवादी सुरांच्या जोडी इतके पुरातन..
आताशा मात्र तीचं अगदीच बिनसलंय,
सारखी फुरंगटून बसते, चिड-चीड करते.
तीला कुरंगी रहायचा कंटाळा आलाय,
एव्हढंच नव्हे, तीला आता डिजिटल व्हायचंय.
"ब्लक अॅन्ड व्हाईटचा जमाना गेला,
लोचट सावली
लोचट सावली
विस्मरणाच्या खाईत विसर्जित केलेली,
एकेका आठवणीची एकेक लोचट सावली.
दूर लोटली,बळेच ढकलली, हाकलली.
तरी तिची निगरगट्ट सवय नाही सुटली.
एखाद्या कोपर्यावर परिचित,
ऊपटतेच अनाहूत अवचित.
एखाद्या गाफिल वळणावर
बसते, दबा धरून,श्वास रोखून.
आणि गोचिडासारखी चिकटतेच
पुन:पुन्हा येऊन.
शेवटी सावलीच ती, तिचे काय चुकले?
प्रसन्गावधान तिला कधी कुणी शिकवले?
रोमांच किंवा हुरहूर, तिला काय माहीत?
कसे व्हावे तिने तरी, व्याकूळ किंवा पुलकीत?
बापू.
लोचट सावली
लोचट सावली
विस्मरणाच्या खाईत विसर्जित केलेली,
एकेका आठवणीची एकेक लोचट सावली.
दूर लोटली,बळेच ढकलली, हाकलली.
तरी तिची निगरगट्ट सवय नाही सुटली.
एखाद्या कोपर्यावर परिचित,
ऊपटतेच अनाहूत अवचित.
एखाद्या गाफिल वळणावर
बसते, दबा धरून,श्वास रोखून.
आणि गोचिडासारखी चिकटतेच
पुन:पुन्हा येऊन.
शेवटी सावलीच ती, तिचे काय चुकले?
प्रसन्गावधान तिला कधी कुणी शिकवले?
रोमांच किंवा हुरहूर, तिला काय माहीत?
कसे व्हावे तिने तरी, व्याकूळ किंवा पुलकीत?
बापू.
काळी सावली
माझी एक जुनीच कविता, थोडी घासून-पुसून
काळी सावली
घासून-पुसून लख्ख केलेत तुमचे सगळे दिवे,
जळकी चिरगुटे झटकलीत माझ्या अंगणात.
काजळ-राशी उन्मत्त, जेंव्हा आढ्याकडे धावल्या,
तीच तर झाली पुढे, आणि आकांताने झगडली?
कधी काळी निथळले, माझ्याही अंगातून विखार,
रंध्रा-रंध्रातून व्यायली पिवळ्या सापांची पिल्ले.
तेंव्हाही तीनेच नाही का, आपला पदर कसला,
कवटाळले, टिपले, पचवले ते कुट्ट अंगार?
माहीत असूनही बाबांनो, चांगले तुम्हाला सारे,
खुशाल विचारता, माझी सावली काळी का बरे?
बापू
हे काय होते ..?
जे स्पर्श आपलंसं
गालांस होत होते,
माझ्याच आसवांचे
अलवार हात होते ...!
मज सोबतीस 'ती' ही
होती हवी म्हणुनी
माझे नी सावलीचे
घरटे उन्हात होते ...!
माझी वरात ज्यांनी
खांद्यावरुन नेली
मारेकर्यांत माझ्या
त्यांचेच हात होते ...!
माझ्या मनातले ते
अंधार दाटलेले
वणव्यात आठवांच्या
उजळुन जात होते ...!
गेले उडुन पक्षी
नभ मोकळे, भकास
हे कोणत्या दिशेचे
वारे वहात होते ...?