"तुम्ही दोघांनी जर पटपट खाल्लं तरच पार्कमधे जायचंय, नाहीतर नाही" तिने नेहेमीप्रमाणे मुलांनी लवकर खावं म्हणून सांगितलं. आर्यन आणि विहान वय वर्ष पाच आणि तीन, दोघांनी आईची धमकी कितपत गंभीर आहे याचा अंदाज घेतला. आर्यनने पहिला घास तोंडात टाकला आणि "आय डोन्ट लाईक डोसा" म्हणून तोंड वाकडं केलं. विहानने तर भरवलेला घास तोंडातून फू फू करून बाहेर काढला. "त्यांना नकोय तर जाऊदे ना कॉर्नफ्लेक्स खाऊ दे त्यांना" नवर्याचा एक्स्पर्ट ओपिनियन! तोही मुलांसमोरच! तिला सुचेना की आता आधी मुलांना ओरडावं की नवर्यावर चिडावं ! "आपल्या पोटातल्या गुड बॅक्टरीयासाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात.
"हाय" त्या ओळखीच्या आवाजाने चमकून तिने दरवाज्याकडे पाहिलं. अपूर्वाला पाहून ती चकितच झाली. "अपूर्वा, तू इथे? सगळं ठीक आहे ना?" तिने काळजीने विचारलं.
"खरं म्हणजे ठीक नाहीये. ठीक असताना कोणी डॉक्टरकडे कशाला येईल?" अपूर्वाने हसत हसत म्हटलं.
"ते ही खरंच. अगं पण घरी यायचस, बोल काय म्हणतेस?" अंजलीने विचारलं.
"आमची न्यूज तुझ्या कानावर आली की नाही?"क्षणभर विचार करून अंजली म्हणाली, "हो, आई म्हणाली की तुझं आणि तुषारचं पटत नाहीये म्हणून"
नेहेमीप्रमाणे आज कट्टयावर सगळे जमले होते खरे पण आज रोजच्या सारखं बिलकुल वाटत नव्हतं. खामकरांची उणीव सर्वांनाच जाणवत होती. शेवटी रेगे म्हणाले, "खामकर नाही तर एकदम चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय" "हो ना, बिचाऱ्यांची मुलाशी शेवटची भेट झाली असती तर बरं झालं असतं." एक निश्वास सोडून कर्वे म्हणाले. "हे तुम्हाला वाटतंय हो. त्यांच्या मुलाला काही आहे का त्याचं! म्हातार्या आईवडलांना सोडून खुशाल अमेरिकेला जाऊन बसायचं. इकडे म्हातारा म्हातारी असले काय आणि नसले काय, यांचे राजाराणीचे संसार चालू!" देशपांडे संतापून म्हणाले.
दादरसारख्या बिझी ठिकाणी त्या क्लीनिकचा पत्ता शोधणं थोडं अवघडच होतं पण शेवटी ती तिथे पोहोचली.
"पण ते सायकियाट्रिस्ट आहेत की सायकॉलॉजिस्ट ?" अंजली नाना सबबी शोधत होती. "तुझ्या बाबांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे हीच त्यांची डिग्री समज" बाबांच्या या बोलण्यावर आता काही उत्तरच नव्हतं. "प्लासिबो इफेक्ट (मनाच्या समाधानासाठी केल्या जाणार्या, खरंतर औषध नसलेल्या, अश्या गोष्टी) मेडिसिनसुद्धा मान्य करतंच ना!" अशी अंजलीने स्वतःच्या मनाची समजूत घातली आणि हो ना करत ती डॉक्टर दीक्षितांना भेटायला तयार झाली.
"फ्री आहेस का बोलायला?"..... मनस्वीने विचारलं.
"हो बोल. सगळं आटपलंय . रात्र झालीये इथे. तू घरी चाललीयेस का?" अंजली
"हो" मनस्वी म्हणाली. दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती.
"ब्लूटूथ वर बोलतेयस ना, ड्राईव्ह करताना हातात नको घेऊ हं फोन !" अंजली.
"हो ग. ब्लूटूथवरच बोलतेय. ऐक ना. स्वप्नीलचा मेसेज आलाय व्हॉट्स अँपवर." मनस्वीला पाल्हाळ लावायची सवयच नव्हती. डायरेक्ट मुद्द्यावर! "स्वप्नील आठवतो ना? माझ्याबरोबर इंजिनीरिंगला होता" तिने थोडं बिचकत विचारलं.
स्पोर्ट्स डे म्हटलं की माझं मन भूतकाळात जातं. मला माझ्या पार्ल्याच्या शाळेतले स्पोर्ट्स डे आठवतात.... रनिंग रेस, चमचागोटी, रिले अशा शर्यती आणि त्यानंतर विजेत्यांना लाकडी पोडियमवर उभं राहून मेडल.... अजूनही सगळं माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं.
"मनस्वीचा फोन आला होता आज" आई अंजलीला म्हणाली, "तिचे फोटो बघितले का विचारत होती. मलासुद्धा म्हणाली की काकू तू फेसबुक , इंस्टाग्राम जॉईन कर"
"मग करायचा का अकाउंट ओपन?"अंजलीने सिरियसली विचारलं. "वेडी आहेस की काय! मला काय गरज? मषला कोणाशी बोलायचं असलं, की मी सरळ जाऊन भेटते, किंवा फोन करते. इंटरनेट वगैरेची गरजच नाही लागली आमच्या पिढीला."
"पण तुझ्या अगदी लहानपणच्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या फेसबुकवर तर छान नाही वाटणार तुला?" अंजलीने विचारलं.
नोकरीवाली बायको हवी
पण नोकरी इतकीच असावी
की घरच्या पुरुषावर स्वयंपाकाची
पाळी कध्धी ना यावी
सुशिक्षित बायको हवी
पण इतकी शिकलेली नसावी
की सरळसरळ तिची मतं
ठामपणे सांगत असावी
शांत सुसंस्कृत असावी
पण इतकीही चांगली नसावी
की चारचौघांत माझ्यापेक्षा
तीच उठून दिसावी
पुरोगामी विचारांचा तो बायकोशी चांगला वागतो.
चांगला वागतो हे सुद्धा चार चार वेळा सुनवतो.
जगाला फसवतो, तिला फसवतो
की स्वतःलाच फसवतो .........
आता निघालं पाहिजे म्हणजे थोडा वेळ फ्रेश होऊन नाईटसाठी येता येईल" मनगटावरच्या घड्याळाकडे पाहून तिच्या मनात विचार आला. नेहेमीप्रमाणे वॉर्डमधल्या नर्सला सगळ्या सूचना देऊन ती निघाली. गाडी तिने ए ऐवजी बी विंगकडे वळवली. आशिषचं असं झाल्यानंतर अंजलीचे आईवडील तिच्याच सोसायटीमध्ये राहायला आले होते. अंजलीच्या मुलीची, रियाची सगळी काळजी ते घेत होते. रियालाही आजी आजोबांबरोबर राहायला आवडत होतं. सगळं सोयीचं असलं तरीही मुलीकडे आपण पुरेसं लक्ष देत नाही आहोत या विचाराने अंजलीला फार अपराधी वाटत असे. आशिषचं दुःख विसरण्यासाठी तिने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. आणि तिचा पेशाही तसाच होता.