ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. दुपारचे तीन वाजत आले होते. ऑपरेशन्स झालेल्या पेशंट्सना रिकव्हरी रूममध्ये हलवलं जात होतं. त्यांना दोन तासांनंतर बघून मगच घरी जावं की रजिस्ट्रारला कळवायला सांगावं, अशा विचारांत अंजली तिच्या केबीनकडे वळली. नर्सने चहा मागवून ठेवला होता. चहाचा घोट घेत तिने पर्समधून मोबाईल काढला. मोहना आणि शालिनी दोघींचेही मिस्ड कॉल्स दिसत होते. शालिनीचा कॉल आधी आलेला असला तरीही ती मोहनालाच आधी फोन करणार होती. त्यांच्या मैत्रीला तडा जाऊन आता एक वर्ष होत आलं होतं.
"हाय" त्या ओळखीच्या आवाजाने चमकून तिने दरवाज्याकडे पाहिलं. अपूर्वाला पाहून ती चकितच झाली. "अपूर्वा, तू इथे? सगळं ठीक आहे ना?" तिने काळजीने विचारलं.
"खरं म्हणजे ठीक नाहीये. ठीक असताना कोणी डॉक्टरकडे कशाला येईल?" अपूर्वाने हसत हसत म्हटलं.
"ते ही खरंच. अगं पण घरी यायचस, बोल काय म्हणतेस?" अंजलीने विचारलं.
"आमची न्यूज तुझ्या कानावर आली की नाही?"क्षणभर विचार करून अंजली म्हणाली, "हो, आई म्हणाली की तुझं आणि तुषारचं पटत नाहीये म्हणून"
"फ्री आहेस का बोलायला?"..... मनस्वीने विचारलं.
"हो बोल. सगळं आटपलंय . रात्र झालीये इथे. तू घरी चाललीयेस का?" अंजली
"हो" मनस्वी म्हणाली. दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती.
"ब्लूटूथ वर बोलतेयस ना, ड्राईव्ह करताना हातात नको घेऊ हं फोन !" अंजली.
"हो ग. ब्लूटूथवरच बोलतेय. ऐक ना. स्वप्नीलचा मेसेज आलाय व्हॉट्स अँपवर." मनस्वीला पाल्हाळ लावायची सवयच नव्हती. डायरेक्ट मुद्द्यावर! "स्वप्नील आठवतो ना? माझ्याबरोबर इंजिनीरिंगला होता" तिने थोडं बिचकत विचारलं.
"मनस्वीचा फोन आला होता आज" आई अंजलीला म्हणाली, "तिचे फोटो बघितले का विचारत होती. मलासुद्धा म्हणाली की काकू तू फेसबुक , इंस्टाग्राम जॉईन कर"
"मग करायचा का अकाउंट ओपन?"अंजलीने सिरियसली विचारलं. "वेडी आहेस की काय! मला काय गरज? मषला कोणाशी बोलायचं असलं, की मी सरळ जाऊन भेटते, किंवा फोन करते. इंटरनेट वगैरेची गरजच नाही लागली आमच्या पिढीला."
"पण तुझ्या अगदी लहानपणच्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या फेसबुकवर तर छान नाही वाटणार तुला?" अंजलीने विचारलं.
"आई, मोहना आणि शालिनी बरेच दिवस म्हणतायत भेटूया म्हणून. या शनिवारी जाऊन येऊ? तू रियाला बघशील?" अंजलीने आईला विचारलं. आई होच म्हणणार आहे हे माहीत असलं तरीही रियाची जबाबदारी आजीवर टाकण्याआधी अंजली नेहेमी आजीची परवानगी घेत असे. आजीची आणि रियाचीसुद्धा!