६ ऑक्टोबरला 'कासव' प्रदर्शित झाला, तेव्हा त्या आठवड्यात एकूण सात मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानं आणि अगोदरचे चित्रपट सुरू असल्यानं 'कासव'ला मुंबईत आणि इतरत्र चित्रपटगृहं मिळू शकली नव्हती.
पुण्यात आणि इतरत्र 'कासव'ला प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीमुळे आता दुसर्या आठवड्यात 'कासव' ५१ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
सातत्यानं सकस, दर्जेदार चित्रपटांची निर्मिती - दिग्दर्शन करणार्या सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांचा 'कासव' हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.
२०१६ सालाचा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार 'कासव'ला मिळाला आहे.
या चित्रपटाबद्दल सांगत आहेत सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर.
Submitted by चिनूक्स on 29 September, 2017 - 09:03
उत्तम, प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक आणि नट म्हणून आलोक राजवाडेची ख्याती आहे. फोर्ब्सच्या 'थर्टी अंडर थर्टी' या यादीत झळकलेल्या आलोकला 'कासव'मधल्या अभिनयासाठी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय चित्रपट-महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं.
'कासव' ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. त्या निमिताने आलोक त्याच्या नाट्यसृष्टीतल्या पदार्पणाबद्दल सांगतोय.
Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 September, 2017 - 08:25
सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.
'कासव'ची पहिली झलक -
सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती डॉ. मोहन आगाशे व विचित्र निर्मिती यांची आहे.
इरावती हर्षे, अलोक राजवाडे, किशोर कदम, संतोष रेडकर, ओंकार घाडी आणि डॉ. मोहन आगाशे
'कासव' या डॉ. मोहन आगाशे निर्मित आणि सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित चित्रपटास नुकताच सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
'कासव' या चित्रपटाचं संगीत - पार्श्वसंगीत साकेत कानेटकर यांचं आहे. 'कासव'मध्ये दोन गाणी आहेत. ती सुनील सुकथनकर यांनी लिहिली असून सायली खरे व अलोक राजवाडे यांनी गायली आहेत.
१. 'लेहर समंदर'
गीत - सुनील सुकथनकर
संगीत - साकेत कानेटकर
स्वर - सायली खरे
७ एप्रिल हा दिवस जगभरात 'जागतिक आरोग्य दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य संस्थेनं 'नैराश्य', म्हणजे 'डिप्रेशन' या आजारावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. आणि म्हणून या वर्षीची संकल्पना आहे - 'चला बोलूया - नैराश्य टाळूया' ('Depression– Let’s talk').