अंडी घालण्यासाठी कासवं किनार्यावर येतात आणि अंडी घालून समुद्रात परत जातात. अंडी शाबूत राहिली, तर त्यांतून पिल्लं बाहेर येतात आणि आपापली समुद्रात जातात.
घटस्फोटीत जानकी. तिचा ड्रायव्हर यदू. कासवांची पिल्लं वाचावीत म्हणून धडपडणारे दत्ताभाऊ. बाबल्या. रस्त्यावर वाढलेला परशू. स्वतःत हरवलेला तो अनामिक तरुण.
त्या तरुणाची वेदना समजून घेणारी, एकमेकांशी काहीही नातं नसणारी ही माणसं आणि अलिप्त, अहिंसक कासवं.
***
भारतातल्या ग्रामीण भागात राहणार्यांना रोजगार मिळावा, त्यांना स्वयंपूर्ण होता यावं, या हेतूनं डॉ. मणिभाई देसाई यांनी 'बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केली. आज ही संस्था शेती, नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थापन, पशुधनाचं व्यवस्थापन आणि संवर्धन, जलव्यवस्थापन अशा अनेक पर्यायांच्या मदतीनं रोजगार-निर्मिती करते.
'बायफ' भारतातल्या सोळा राज्यांमध्ये कार्यरत असून सुमारे एक लाख खेड्यांमधल्या पन्नास लाखांहून अधिक भूमिहीन आणि परिघाबाहेर जगणार्या कुटुंबांना या संस्थेनं मदतीचा हात दिला आहे.