तेव्हा शाळेला जावं लागायचं...
अभ्यास वगैरे पण असायचा, पण आम्हाला काही चिमणीच्या वगैरे उजेडात अभ्यास करायची गरज पडली नाही, कारण गावात आधीच लाईट आली होती..!
त्यामुळे "आम्ही चिमणीच्या उजेडात अभ्यास करून
आयुष्यात असे असे झेंडे लावले!" ह्याप्रकारचे चमकदार डायलॉग वेळप्रसंगी मारता येत नाहीत, याची आज मोठीच हळहळ वाटते.
तर जन्मदाते म्हणाले की, ''सगळीच पोरं जातेत तर तू बी जात जा शाळेला. हितं बसून उगंच पांदीवगळीतनं खेकडी मारत फिरण्याबगर तरी दुसरं काय करनार हैस तू?''
ह्या बिनतोड सवालाला माझ्याकडे ठोस असं उत्तर नव्हतं त्यावेळी, म्हणून मग जावं लागलं.
ग्लास्गो येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या शिक्षण पध्दती बद्दल माहिती हवी आहे.
'मी उदास झालो' असं नका लिहू. आम्हाला थेट उदास करा. ती उदासी डायरेक्ट पोचवा आमच्यापर्यंत. तुम्ही उदास
झालात ही नुसती 'माहिती' घेऊन आम्ही काय करू त्याचं..! उदास व्हायची इच्छा आहे आमची आणि तुम्ही हसवताय..!
हे बरं नाही..
हल्ली हे असं फारच व्हायला लागलंय.. म्हणजे समजा
पुस्तकं घ्यायला गेल्यावर नेहमीच्या सवयीनं एखादं पान
उघडून अधलामधला पॅराग्राफ चाळला आणि असलं एखादं टुकार वाक्य दिसलं की अर्ध्या सेकंदात पुस्तक मिटून
जागच्या जागी जातं आणि मानसिक प्रतिक्रिया, शेरेबाजी चालू होते...शिवाय कुजकं हसू येतं ते वेगळंच...
आज माझ्या भावा बहिणींच्या वय वर्षे सात ते दहा वयोगटातील मुलांना व्हाट्सएप व्हिडीओ कॉल वर एकत्र करून एक खेळ खेळलो. मी त्यांना वेगवेगळे टास्क द्यायचे आणि त्यांनी ते करून दाखवायचे. काही टास्क असे की जो पहिला करून दाखवेल त्याला एक पॉईंट तर काही टास्क असे की जो जो पूर्ण करून दाखवेल त्या सर्वांना एक एक पॉईंट.
घरात बसून बसून कंटाळलेल्या मुलांनी पण त्यात उत्साहाने भाग घेतला आणि माझ्यातल्या शिक्षकाला एक अनुभव मिळाला.
१) मी २००८ - २००९ ला मुलीसाठी नवी मुंबईत शाळा शोधत होतो
एक ठरले होते कि मराठी माध्यमात घालायचे नाही - त्याचे प्रॉब्लेम मी आणि बायकोने पूर्ण अनुभवले होते आणि त्यामुळे हे तर नक्की होते .
आता इंग्लिश माध्यम हे बाकी ठिकाणी नवीन असले तरी मी मुंबईत ते पण पश्चिम उपनगरात राहिलो होतो आणि त्यामुळे आसपासचे सर्व इंग्लिश माध्यमात होते त्यामुळे त्याचा फायदा पाहिला होता
सरकारने पाचव्या ईयत्तेपर्यंत ऑनलाइन क्लासेस घेऊ नयेत, असे सांगितले असतानाही, खाजगी शाळांचे
ऑनलाइन क्लासेस सर्रास सुरू आहेत. अगदी नर्सरी चे सुध्दा.
माझा मुलगा तिसरीत आहे.
पाल्य शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरत नसतानाही शाळा पुर्ण फि भरा असं म्हणत आहे.
ऑनलाइन क्लासेस लहान मुलांसाठी वेळेचा अपव्यय आहे.इतकी लहान मुले ऑनलाइन शाळेतून खरच काही शिकताएत का?
इतकी फि भरणे गरजेचे आहे का?शाळा फि मधे कनसेशन द्यायलाही तयार नाहीए.
तुमच्या inputs आणि मतांचा आदर आहे.
शाळा
देवी सरस्वतीचे...
मंदिर असते...
शाळा!
जीवनी ज्ञानार्जनाचा...
श्रीगणेशा करते...
शाळा!
नियमांची आखून चौकट...
शिस्त लावते...
शाळा!
सुभाषितांतील देऊन शिकवण...
संस्कार करते...
शाळा!
राष्ट्रगीत अन् झेंडावंदन...
देशभक्ती मनीची दृढ करते...
शाळा!
कधी कट्टी, कधी बट्टी...
सवंगड्यांचा मेळा असते...
शाळा!
करिता दंगामस्ती... खोड्या...
शिक्षा जरी करते... सुधारण्याची संधी देते....
शाळा!
गायन, नृत्य... नाटक, चित्रकला...
बीज कलेचे मनी रुजवते...
शाळा!
..........पागेचे दिवस...........
नमस्कार मंडळी,
ही यादी अतिच लांब असल्याने रुनी potter या आय डी ने स्वतंत्र धागा काढावा ही विनंती केली, आणखी काही जणांना पण बुकमार्क करणे सोपे होईल म्हणून वेगळा धागा काढला आहे.
सध्या या सगळ्या लिंक्स मोफत उपलब्ध आहेत, नंतर मात्र काही काहीच रहातील. पण पालकांना नंतरही उपयोग होईल.
तुम्हाला ही यापेक्षा वेगळे काही सापडले तर प्रतिसादात शेअर करा. पिलवंडांची काळजी घ्या. Hugs and kisses to your kiddos.
.