आज माझ्या भावा बहिणींच्या वय वर्षे सात ते दहा वयोगटातील मुलांना व्हाट्सएप व्हिडीओ कॉल वर एकत्र करून एक खेळ खेळलो. मी त्यांना वेगवेगळे टास्क द्यायचे आणि त्यांनी ते करून दाखवायचे. काही टास्क असे की जो पहिला करून दाखवेल त्याला एक पॉईंट तर काही टास्क असे की जो जो पूर्ण करून दाखवेल त्या सर्वांना एक एक पॉईंट.
घरात बसून बसून कंटाळलेल्या मुलांनी पण त्यात उत्साहाने भाग घेतला आणि माझ्यातल्या शिक्षकाला एक अनुभव मिळाला.
उदाहरणादाखल त्यातले काही टास्क देतोय
१. घरातल्या विविध कामांसाठी लागणाऱ्या काही विशिष्ठ वस्तू पटकन शोधून काढून कॅमेऱ्यावर दाखवायच्या
२. पटकन कागदावर सांगितलेले चित्र काढायचे किंवा शब्द लिहायचा
३. हात व्यवस्थित कसे धुवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवायचे
४. पट्टी घेऊन आपल्या घरातील डायनिंग टेबलची रुंदी मोजून दाखवायची
५. अंड्याची जाडी (परीघ) मोजून दाखवायची!
ज्या चुरशीने सर्वांनी या टास्क करण्यामध्ये भाग घेतला त्यावरून त्यांच्या हे लक्षात आले नव्हते की आपण खरं तर 'अभ्यास' करतोय! एरवी पाढे म्हणायला टंगळ मंगळ करणारी माझी दुसरीत असणारी भाची, १५ सेंटीमीटर लांबीच्या पट्टीने टेबलची रुंदी मोजताना १५ चा पाढा आठवून आठवून म्हणत होती! रुंदी सेंटीमीटर मध्ये मोजल्यावर मिलिमीटर मध्ये कसे मोजायचे ते सांगायला मला फारसे कष्ट पडले नाहीत!
खरी मजा आली ती अंड्याची जाडी (परीघ) कशी मोजायची ते विचारल्यावर.. पट्टीने काही नीट मोजता येणार नाही हे लक्षात आल्यावर भाची ने सोपा मार्ग पत्करला.." हॅलो गुगल" वाला!! आजकाल डोक्याला ताण न देता "How" ने सुरू होणारे सारे प्रश्न गुगल ला विचारण्याचा प्रकार लहान मुलांमध्ये सर्रास पहायला मिळतोय!
मराठी माध्यमातून शिकणारी माझी गोव्याची भाची गुगल ला मराठी समजणार नाही म्हणून हिंदीतून विचारती झाली, " हॅलो गुगल, अंडेका जाडी कैसे मोजनेका?"
गुगलने पण इमानेइतबारे "आवो सिखाऊ तुम्हे अंडे का फंडा" हे गाणे उत्तर म्हणून दिल्यावर तिच्या लक्षात आले की याचे उत्तर गुगल कडे नाही!
मग पुढची दहा मिनिटे माझी दोरा घेऊन अंड्याची जाडी कशी मोजू शकतो याचे प्रॅक्टिकल करून घेण्यात गेली आणि त्या दरम्यान कितीतरी गोष्टी तिला शिकता आल्या आणि मला नकळत शिकविता पण आल्या! साधे उदाहरण द्यायचे झाले तर मी जेव्हा घरात कुठे दोरा मिळतोय का बघ असे सांगितले तेव्हा 'दोरा' म्हणजे काय यावर गाडी अडकली ! त्यावर आज्जी ज्याने कपडे शिवते तो दोरा असे बोलल्यावर तिनेच मला विचारले की तुला 'सूत' म्हणायचंय का? कोंकणी मध्ये धाग्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'सूत' या शब्दाची मलाच गंमत वाटली ! मग तिला, यालाच 'दोरा', 'धागा' किंवा :थ्रेड' म्हणतात हे पण शिकविता आले! त्यानंतर मग दोरा गुंडाळणे, त्यावर मार्कर ने मार्किंग करणे आणि शेवटी पट्टी वापरून दोऱ्याची लांबी मोजणे हे झाले.
हे सगळे शिकणे मुलांचे अनाहूत पणे होत गेले. खरे तर शिक्षकाची भूमिका ही अशीच रहायला हवी.. मुलांसाठी शिकणे सुलभ करून देणाऱ्याची..यालाच शिक्षक केंद्रित शिक्षणाकडून विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीकडे जाणे म्हणतात.
या सगळ्या ऍक्टिव्हिटीचे फलित म्हणजे उद्या पुन्हा आपण हा खेळ खेळू अशी आलेली डिमांड!
अरे वाह मस्त आयड्या आहेत...
अरे वाह मस्त आयड्या आहेत...
हे भारी होते
आमच्याकडेही मी असेच शिकवायला प्रयत्न करतो पोरांना. अश्या आयड्या अजून शेअर होतील धाग्यावर तर घरीही हे खेळ करता येतील.
बाकी अंडे का फंडा गाणे
" हॅलो गुगल, अंडेका जाडी कैसे
" हॅलो गुगल, अंडेका जाडी कैसे मोजनेका?" >>
मस्त प्रयोग.. आमच्या घरी Taboo गेम फार हिट आहे.. माझ्या भाचे कंपनीला फार फार आवडतो हा गेम.. गेल्या महिन्यात Zoom कॅालमधे आम्ही हा गेम खेळलो होतो..
ह्यात शब्द ओळखायचा असतो..पण कोणतीही ॲक्शन न करता व दिलेल्या लिस्टमधल्या शब्दांचा वापर न करता तुम्हाला तुमच्या टीम मेंबर्सना हा शब्द ओळखण्यासाठी योग्य प्रकारे त्या गोष्टीचे वर्णन करून सांगावे लागते.. साधारण charades च्या अगदी विरूद्ध.. मुलांची व त्यांच्या बरोबर आपलीही vocabulary सुधारते
छान धागा. Taboo गेम पण मस्तच.
छान धागा.
Taboo गेम पण मस्तच.
मस्त आयडीया आहे
मस्त आयडीया आहे
मस्त खेळ आहेत.
मस्त खेळ आहेत.
खूपच मस्त... मी माझ्या
खूपच मस्त... मी माझ्या मुलांच्या friend circle मध्ये हे नक्की try करणार आहे.