शाळा
देवी सरस्वतीचे...
मंदिर असते...
शाळा!
जीवनी ज्ञानार्जनाचा...
श्रीगणेशा करते...
शाळा!
नियमांची आखून चौकट...
शिस्त लावते...
शाळा!
सुभाषितांतील देऊन शिकवण...
संस्कार करते...
शाळा!
राष्ट्रगीत अन् झेंडावंदन...
देशभक्ती मनीची दृढ करते...
शाळा!
कधी कट्टी, कधी बट्टी...
सवंगड्यांचा मेळा असते...
शाळा!
करिता दंगामस्ती... खोड्या...
शिक्षा जरी करते... सुधारण्याची संधी देते....
शाळा!
गायन, नृत्य... नाटक, चित्रकला...
बीज कलेचे मनी रुजवते...
शाळा!
सराव खेळ, कवायतींचा ...
लढण्याचे बळ... देते ...
शाळा!
विषय अवघड...करून सोपे...
अभ्यासाची गोडी...लावते...
शाळा!
नाना परीक्षा,स्पर्धा विषयांच्या...
जिंकण्याची जिद्द... जागवते...
शाळा!
करून सुदृढ तन,मन मुलांचे...
उज्ज्वल भविष्याचा... पाया रचते...
शाळा!
आठवणींचा...
अमृत भरला... घडा असते...
शाळा!
करू वंदन श्रीगणेशाला!
करू वंदन देवी शारदेला!
करू वंदन शाळेला!
करू वंदन शिक्षकांना!
घेऊ वसा ज्ञानार्जनाचा!
- दवबिंदू