माबोची सर्च सुविधा सध्या काम करत नसल्याने आणि मुलांचे संगोपन/ माहिती हवी आहे या विषयातली असंख्य पाने चाळण्यासाठी वेळ आणि संयम नसल्याने हा नवीन धागा.
सध्या आमची गाडी आयुष्यातली जन्म, शिक्षण, नोकरी, लग्न अशी महत्वाची स्टेशन पार करून मुलांच्या शाळा या अतिमहत्त्वाच्या स्टेशन वर अडकली आहे. बाकी सर्व पालकांप्रमाणे आम्ही पण ही शाळा की ती शाळा या विषयावर तासंतास शिक्षणतज्ञ असल्यासारखे निष्फळ चर्चा करत आहोत.
सविनय नमस्कार,
मातृभाषा शिक्षणाचं जगभर निर्विवाद सिद्ध झालेलं महत्व, महाराष्ट्रातील मराठी शाळांचं संवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून, मोठ्या प्रमाणावर पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळांचंही एक महासंमेलन मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेलं आहे. २३-२४ डिसेंबर २०१७ रोजी, मुंबई येथे हे ऐतिहासिक महासंमेलन होईल.
.
.
मला पुन्हा लहान व्हायचंय
पाटी पेन्सिल आणि दप्तर मिळवाचंय
गेट समोरून बोरकुटही खायचंय
आज मला पुन्हा लहान व्हायचंय
अबादुबी आणि विषामृत खेळायचंय
पुन्हा एकदा डब्बा ऐस्पैस मांडायचंय
सुरपारंब्याचे मस्त झोके घ्यायचंय
मला खरंच पुन्हा लहान व्हायचंय
काल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,"झोप आता सकाळी उठत नाहीस". काही वेळाने म्हणाला,"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. ". म्हटलं,"मग?". म्हणे,"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही." त्याला विचारलं,"तू घरी आणलं होतंस का?". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं.
कंपास पेटी
**********************
आज सकाळी स्कूलबसला अगदी धावत पळत पोचलो. गाडीतून उतरून स्वनिक धावत पळत बसमध्ये जाऊन बसला. त्याची धावपळ बघून जरा वाईट वाटलं. या लहानग्या वयात दप्तर घेऊन असं पळापळ करायला लागते पाहून कसंतरी झालं. सकाळपासून डोक्यात तेच चित्र होतं. काहीतरी लिहिण्याचा विचार होता पण १० वर्षांपूर्वी माझ्या ब्लॉगवर लिहिलेली ही पोस्ट आठवली. इथल्या वाचकांना वाचण्यासाठी पोस्ट करत आहे. बरेचसे संदर्भ १० वर्षे जुने आहेत. सध्या आपल्याकडे बस आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अजूनच दुर्दैवी घटना घडत आहेत आणि संकटे वाढत आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. आता पुरती जुनी पोस्ट.
मित्रांनो, आपण शाळेत, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्या 'शिक्षकदिना'च्या उपक्रमात नक्कीच सहभाग नोंदविला असणार. आपल्यापैकी अनेकांच्या या दिवसाच्या काही खास संस्मरणीय आठवणी असतील. आपल्या मायबोलीवरील विद्यार्थी आणि शिक्षक यांना आपल्या 'त्या' संस्मरणीय आठवणींना ऊजाळा देता यावा म्हणून हा धागाप्रपंच.
मायबोलीवर अशा प्रकारचा धागा आहे किंवा नाही माहीत नाही. जरी असेल तरी या धाग्यावर नवमायबोलीकरांना लिहीता येईल.