.
.
मला पुन्हा लहान व्हायचंय
पाटी पेन्सिल आणि दप्तर मिळवाचंय
गेट समोरून बोरकुटही खायचंय
आज मला पुन्हा लहान व्हायचंय
अबादुबी आणि विषामृत खेळायचंय
पुन्हा एकदा डब्बा ऐस्पैस मांडायचंय
सुरपारंब्याचे मस्त झोके घ्यायचंय
मला खरंच पुन्हा लहान व्हायचंय
सायकल कैची चालवून क्लासला जायचंय
फाउंटन पेनाने व्याकरण गिरवायचंय
सनावळ चुकली तर छडीचा मारही खायचाय
मला खरंच पुन्हा लहान व्हायचंय
बाजूच्या बाकाला च्युइंगम चिकटावायचंय
जमलेच तर समोरच्याला शेपुट लावायचंय
सरांची पाठ वळली की रॉकेट उड़वायचंय
मला आज मनापासून लहान व्हायचंय ....!
― अंबज्ञ
__________________________
वर उल्लेख केलेला काळ नव्वदच्या दशकातील असल्याने नविन पिढीला त्यातील कित्येक गोष्टी माहीत नसल्या तरी त्या त्या वयोगटाच्या सर्वाना आपला बालपणाचा काळ म्हणजे कायम हवेहवेसे आणि न संपणारे एक स्वप्न असते. त्यामुळे विस्तार भयास्तव काही गोष्टी इच्छा असुनही ईथे मांडता आल्या नाहीत त्यांना आपण आजच्या दिवशी आठवणीतुन नक्कीच उजाळा देवू शकतो.
धन्यवाद
बालदिन विशेष
बालदिन विशेष

मस्त कविता. बालपणीचा काळ आठवला
वाह..सुंदर कविता!!
वाह..सुंदर कविता!!
धन्यवाद गार्गी आणि अक्षय
धन्यवाद गार्गी आणि अक्षय
छान कविता
छान कविता
छान कविता
छान कविता
छोट्या छोट्या कारणांमुळे
छोट्या छोट्या कारणांमुळे होणारी कट्टी बट्टी आठवली...
पंडितजी, परी आणि पद्म
पंडितजी, परी आणि पद्म सर्वांचे मनापासून आभार
बोरकुट!! का नांव काढलं हो
बोरकुट!! का नांव काढलं हो बोरकुटाचं!!? हातावर घेऊन मी जिभेच्या टोकाने चाटायचो आणि ट्टॉक् आवाज काढायचो.
आणि फाउंटन पेन माझा फेवरेट. मी मोत्यासारखे अक्षर गिरवायचो.
कविता वाचून माझे बालपण आठवले.
धन्यवाद सचिनजी
धन्यवाद सचिनजी
बोरकूट आठवलं, अगदी फिकट आकाशी
बोरकूट आठवलं, अगदी फिकट आकाशी कलरच्या पिशवीसकट! मस्त आवडली कविता..
धन्यवाद राहुल
धन्यवाद राहुल