शिक्षकदिनाच्या आठवणी

Submitted by र।हुल on 4 September, 2017 - 11:02

मित्रांनो, आपण शाळेत, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्या 'शिक्षकदिना'च्या उपक्रमात नक्कीच सहभाग नोंदविला असणार. आपल्यापैकी अनेकांच्या या दिवसाच्या काही खास संस्मरणीय आठवणी असतील. आपल्या मायबोलीवरील विद्यार्थी आणि शिक्षक यांना आपल्या 'त्या' संस्मरणीय आठवणींना ऊजाळा देता यावा म्हणून हा धागाप्रपंच.
मायबोलीवर अशा प्रकारचा धागा आहे किंवा नाही माहीत नाही. जरी असेल तरी या धाग्यावर नवमायबोलीकरांना लिहीता येईल. Happy

शिक्षकदिनानिमित्त मायबोलीवरील सर्व शिक्षक आणि विद्यार्थीमित्रांना शुभेच्छा!!!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दहावीला असताना चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवलं होतं..
मस्त अनुभव होता..
साडी सांभाळताना नाकीनऊ येत होते पण मज्जा सुध्दा आली.
फक्त एक तासच घेणार होते पण पुढचा शिक्षक अर्थात माझाच मित्र अचानक मुख्याध्यापक(एक दिवसाचा)
झाल्याने सगळे तास मीच घेतले..
अजूनही शाळेत गेली की त्या वर्गातील मुलांना भेटते..
ते आता आठवीला आहेत ती.
मराठी माध्यमातील बरीच मुले कमी होती तेव्हा, आता जास्त विद्यार्थी बघून बरं वाटतं.

कऊ, छान आठवण आणि अनुभव.
साडी सांभाळताना नाकीनऊ येत होते>>> Lol
यावरून एक आठवलं पण ह्या धाग्याचा तो विषय नाही. नंतर कधी कट्ट्यावर सांगेल.. Lol

माझ्या शाळेत शिक्षकदिनाच्या दिवशी नववी च्या मुलीना शिक्षीका बनण्याची संधी असे.त्या दिवशी वर्गावर जाऊन तास घ्यायचे.साडी नेसायची वगैरे गंमत असायची.अगदी शिपाई काकांचा ही रोल कोणीतरी उंच मुलगी करत असेमग ४ ते ६ आभार प्रदर्शन आनि चहाचा कार्यक्रम असायचा.प्रत्येक वर्षी नवीन विषय असायचा.आनि त्यावर भाषण व्हायची.स्टेजवर खर्या बाईसोबत ,त्या दिवसापुरत्या झालेल्या शिक्षिका(विद्यार्थीनी),मुख्याध्यापिका,पर्यवेक्षिका ,वगैरे सगळे बसलेले असायचे..मज्जा असायची.मुख्याध्यापिका झालेली विद्यार्थीनी एटीत राउंड घ्यायची.आमचेच ज्युनिअर्स आम्हांला फुले,कॅडबरी वगैरे द्यायचे.खुप सुंदर आठवणी आहेत ह्या.

आज दिसला हा धागा!
त्या दिवशी दिसला असता, तर नक्की लिहिलं असतं...

मी दहावीला असताना शिक्षकांनी संप केला. तो ५४ दिवस चालला होता. शाळेच्या हेडमास्तरानी शाळा चालू ठेवायचा निर्णय घेतला. १० वीतल्या सगळ्या हुशार मुला/मुलींना शिक्षक नेमले. पुढचे ५४ दिवस मी आणि इतर बरीच मुलं मास्तर होऊन वर्ग चालवत होतो. कधी इंग्रजी, कधी गणित, कधी मराठी असे वाट्टेल ते विषय शिकवायचो. हेडमास्तर (श्री. अणावकर गुरूजी) शाळेत फेरफटका मारून लक्ष ठेवायचे. त्यामुळे वर्गातली मुलं देखील शांतपणे बसून ऐकून घेत. एकदा तर काही विद्यार्थी/शिक्षकानी खडू फेकाफेकी केल्याने त्याना कामावरून बडतर्फ केलं होतं. त्यामुळे शिक्षकदिन तर सोडाच मला दोन महिने शिक्षक होण्याची संधी मिळाली.

संगणक महाविद्यालय पुणे विद्यापीठ सोडताना भारत सरकारने एक CLASS (Computer Literacy and School... ) उपक्रम सुरु केला होता. पुणे आणि आजूबाजुच्या भागातून बरेच शिक्षक / शिक्षिका आले होते. आणि मी Instructor होतो. त्यात मिरजेकडच्या एका शाळेतल्या शिक्षकाना इंग्रजी अजिबात समजायचे नाही. ते दिवसभर एका कोपर्‍यात बसून ऐकायचे. संध्याकाळी मग माझ्या खोलीवर येऊन 'आज काय शिकवलं हो?' असं म्हणत परत माझ्याकडून सगळं शिकवून घ्यायचे. कॉलेजमधे असताना मी अगदीच बावळट होतो, आणि कपडेही कसेतरी घालायचो. माझ्या बरोबर असलेले Instructor व्यवस्थीत यायचे. तरी तिथे आलेल्या एका विद्यार्थी बाईनी एकदा असा Imotional Drama
केला की मला काही कळेनाच. त्या बाई चांगल्या मोठ्या होत्या (त्यांना शाळकरी मुलं होती). पण एक दिवस मी त्यांच्या वर्गावर शिकवायला नव्हतो म्हणुन त्या मला शोधायला आल्या. मग मला बाहेर नेऊन बर्‍याच वैयक्तिक गोष्टी सांगायला लागल्या. त्या दिवशी त्या बाई मला 'I love you , चल आपण पळून जाऊ' असं म्हणायच्या शिल्लक होत्या. बरं हे मला का सांगताहेत तेच मला कळले नाही.

पुढे आयुष्यात पुन्हा एकदा अशी संधी मिळाली ती दिल्लीला आर्मी ऑफिसर लोकांना DBaseIII शिकवताना. मी २१ वर्षांचा होतो आणि समोर विद्यार्थी म्हणजे ४५/५० वयाचे हे मोठ्ट्या मिश्या असलेले मेजर, कर्नल वगैरे. ते तीन वाजता वर्गात यायचे. मग मी त्यांना तासभर लेक्चर द्यायचो. त्यांच्याकडे बघून एक आदरयुक्त भीती वाटायची. चार वाजता बरोब्बर त्यांचे ऑर्डर्ली यायचे. मग ते साहेबांचा चहा ओतुन त्यांच्या हातात द्यायचे. त्यातला कोणीतरी स्वतःच्या ऑर्डर्लीला माझा चहा करायला सांगायचा. तो ऑर्डर्ली म्हणजे आपल्या सैन्यातला जवान असायचा. तो आपल्यासाठी चहा करतोय हे बघून लाज वाटायची (माझे वडिल विमानदळात असल्याने लष्करी Hirarchy म्हणजे काय ते माहित होतं) तरी एक जवान आपल्यासाठी चहा करणार हे पटायचं नाही. बरं, साहेबांपुढे त्याला 'तू नको, मी करतो' म्हटलं तरी तो ऐकायचा नाही. मग साहेबमजकूर शांतपणे चहा पिऊन परत माझ्यासमोर विद्यार्थी व्हायचे.
(आता कळले असेल मी शिजणे ऐवजी शिकणे हा शब्द का वापरतो ते... )

'I love you , चल आपण पळून जाऊ' >> Lol
समोर विद्यार्थी म्हणजे ४५/५० वयाचे हे मोठ्ट्या मिश्या असलेले मेजर, कर्नल वगैरे.>>> भारीच आहेत तुमचे अनुभव Happy