बंधन

गारूड

Submitted by आर्त on 21 April, 2021 - 03:29

गारूड

कोणी स्तुती उधळली, कोणी चिडून गेले,
बदनाम नाव सारे, अंती करून गेले.

सुखदुःख वाटण्याला आतुर हरेक होता,
का एकटेपणा मग, माथी लिहून गेले?

गगनात एकटी मी आले कलून विरले,
बाकी हसत मुखाने तारे बनून गेले.

ओळख जुनीच अपुली, मजला पटून गेली,
माझ्यात का तुलाही काही दिसून गेले?

हसणे खट्याळ होते, मथितार्थ काय होता?
कळण्या उशीर झाला, क्षण ते सरून गेले.

बघते तुलाच दुरुनी, वाटे समीप यावे,
बंधन परंपरेचे, मज थांबवून गेले.

नभ आसवात न्हाले, ते ही भिजून ओले,
गडगडत विरहगीते, ते ऐकवून गेले.

विषय: 

यौवन

Submitted by आर्त on 13 March, 2021 - 05:28

पाप पुण्या पल्याड, दिलेस कैक वेडेपण
इतका न कधी प्यायलो, न कधी गायलो भजन.

हर्षात उबदार उन्हे, दुःखात नयन बरसात,
अशा नित्य श्रावणात, माझ्या मनाचे मंथन.

जादू तुझी की क्लृप्ती, का हीच देवभक्ती,
तु सोडून गेलीस तरी, न सुटले तुझे चिंतन.

अजब तुझे हे नियम, तु केलेले जे, ते प्रेम,
मी केले तर माझ्या चारित्र्यावर लांछन.

मी माणुसकी शोधत, ठोठावले दार दार,
कुणाची गावभर धिंड, कुणाचे मनोरंजन.

पुन्हा चाललीस तु, मागे सोडून आठवण,
जमल्यास दे परत, माझे सरलेले यौवन.

विषय: 

बंधन

Submitted by राजेंद्र देवी on 6 May, 2020 - 12:42

बंधन

करून तुझ्या हृदयाची चोरी
उजळ माथ्याने फिरतो आहे
तुला भेटण्यासाठी
रात्रं दिवस झुरतो आहे

रोज पाहून वाट उपवनी
पाहतो ताटवे फुलांचे
ऐकतो मी भ्रमर गाणी
मरगळलेल्या आयुष्यात
मिळवतो मी संजिवनी

बस कर आता स्वप्नात येणे
वेळ झाली आयुष्यात येणे
चुकवून टाक नक्षत्रांचे देणे
गुंतवून टाक विवाह बंधनाने

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

बंधन

Submitted by सुमुक्ता on 6 December, 2016 - 06:30

विद्यापीठाच्या तिच्या छोटेखानी क्वार्टरचे कुलूप उघडून मेधा आत आली. कपडे बदलून कॉफीचा एक मग घेऊन ती तिच्या स्टडी मध्ये आली. पण आज तिचं मन कामात लागणार नव्हतं. मग तशीच उठून बाल्कनी मध्ये जाऊन उभी राहिली. अजूनही संधीप्रकाश होता पण दूरवर विद्यापीठातील काही इमारतींचे दिवे हळूहळू लुकलुकयाला लागले होते. अशा कातर वातावरणात तिचे मन उदासीने आणखीनच भरून गेले. खरेतर आज तिच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केल्याबद्दल मिळणारा भारतातील मानाचा भटनागर पुरस्कार तिला मिळणार अशी ई-मेल तिला आज सकाळीच मिळाली होती.

बंधन

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 30 September, 2014 - 06:40

रविवारची दुपार, त्यात मे महिना.. खूपच उकडत होत, जेवण उरकून झालेल, त्यामुळे घरातले पुरूष मंडळी आणि मुले बाहेर अंगणात , मोकळ्या हवेत बसले होते. मोकळी हवा कसली कोन्डत हवा- चाळीच्या लांबसडक वाटेमधली (चार पावलात समोरच्या घराच दुसर दार) तरीही बसलेले सगळे शांत...दर रविवारी फिरकणारे कुल्फीवाले काका आले. २० वर्षापासूनचा त्यांचा व्यवसाय हा एरिया आणि इथले लोक अगदी तोंडपाठ झाले होते त्यांना, "कुल्फी.... गारेगार कुल्फी" लगेच ऑर्डर घेऊन काका कुल्फी बनवायला बसले सुद्धा आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या गप्पा सुरु झाल्या... बोलता बोलता मधेच त्यांनी प्रश्न केला,"स्वराज दादाच लग्न झाल का हो?"

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बंधन