यौवन

Submitted by आर्त on 13 March, 2021 - 05:28

पाप पुण्या पल्याड, दिलेस कैक वेडेपण
इतका न कधी प्यायलो, न कधी गायलो भजन.

हर्षात उबदार उन्हे, दुःखात नयन बरसात,
अशा नित्य श्रावणात, माझ्या मनाचे मंथन.

जादू तुझी की क्लृप्ती, का हीच देवभक्ती,
तु सोडून गेलीस तरी, न सुटले तुझे चिंतन.

अजब तुझे हे नियम, तु केलेले जे, ते प्रेम,
मी केले तर माझ्या चारित्र्यावर लांछन.

मी माणुसकी शोधत, ठोठावले दार दार,
कुणाची गावभर धिंड, कुणाचे मनोरंजन.

पुन्हा चाललीस तु, मागे सोडून आठवण,
जमल्यास दे परत, माझे सरलेले यौवन.

प्रेम लाभले अगाध, भीती विरहाची अधिक,
तोड-जोडण्याचे खेळ, ते अक्षय चिरंतन.

नेहमी जुळत नाही, तरी पाहिजे प्रयत्न,
निभावलं तर नशीब, नाहीतर म्हणू प्राक्तन.

ठेवतो मी शाश्वत, नातं तोडण्याची रीत,
पिंजऱ्याने दिली साथ, मी तोडले बंधन.

- आर्त. १२.०३.२०२१

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults