एकटेपणा
गारूड
गारूड
कोणी स्तुती उधळली, कोणी चिडून गेले,
बदनाम नाव सारे, अंती करून गेले.
सुखदुःख वाटण्याला आतुर हरेक होता,
का एकटेपणा मग, माथी लिहून गेले?
गगनात एकटी मी आले कलून विरले,
बाकी हसत मुखाने तारे बनून गेले.
ओळख जुनीच अपुली, मजला पटून गेली,
माझ्यात का तुलाही काही दिसून गेले?
हसणे खट्याळ होते, मथितार्थ काय होता?
कळण्या उशीर झाला, क्षण ते सरून गेले.
बघते तुलाच दुरुनी, वाटे समीप यावे,
बंधन परंपरेचे, मज थांबवून गेले.
नभ आसवात न्हाले, ते ही भिजून ओले,
गडगडत विरहगीते, ते ऐकवून गेले.
एकटेपणा
एकटेपणा
सवय होतीच मला एकटेपणाची,
नव्हे कदाचित आवडच होती त्याची..!
नव्हते कोणी माझे अन् मीही नव्हतो कोणाचा,
खरंतर अभिमान होता मला माझ्या एकटेपणाचा..!
उंच, निरभ्र आकाशात स्वच्छंदीपणे,
मुक्त विहार करणाऱ्या गरुडासम, एकटा होतो मी..!
लहान लहान टेकड्यांच्या सहवासात,
उंच हिमालयाच्या शिखरासम, एकटा होतो मी..!
उंचावरुन गर्दीकडे पाहताना, ती कधी हवीहवीशी नाही वाटली,
होतो जरी एकटा, तरी एकटेपणाची भिती नव्हती वाटली..!
पण एकदा वाटले, पाहुया तरी गर्दी कशी असते..
उतरलो खाली, मिसळलो गर्दीत, ती ही काही वाईट नसते..!
एकटे अजूनही
सुरुवातीच्या काळात त्यांच्यात प्रचंड प्रेम होतं, पण जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांचं प्रेम ओसरत गेलं,आणि शेवटी फक्त सोडून जाता येत नाही (कर्तव्य)म्हणून एकत्र राहावं लागतंय आणि अजूनही दोघांना आशा आहे की सगळं ठीक होईल
आयुष्य साथ राहिले,
पण एकटे अजूनही.
बांधून घेत राहिले
अन एकटे अजूनही
दोघात खेळ मांडला
एकास एक भांडला
ना दूर जाता जाहले
बघ एकटे अजूनही
वेदना दोघांस होती
सारखी अन शांत होती
साथी बनून सोसले
तरी एकटे अजूनही