सुरुवातीच्या काळात त्यांच्यात प्रचंड प्रेम होतं, पण जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांचं प्रेम ओसरत गेलं,आणि शेवटी फक्त सोडून जाता येत नाही (कर्तव्य)म्हणून एकत्र राहावं लागतंय आणि अजूनही दोघांना आशा आहे की सगळं ठीक होईल
आयुष्य साथ राहिले,
पण एकटे अजूनही.
बांधून घेत राहिले
अन एकटे अजूनही
दोघात खेळ मांडला
एकास एक भांडला
ना दूर जाता जाहले
बघ एकटे अजूनही
वेदना दोघांस होती
सारखी अन शांत होती
साथी बनून सोसले
तरी एकटे अजूनही
सोडलीस ना माझी साथ,
झटकलास ना माझा हात,
गेलीस ना मला सोडुन,
शेवटच्या नाजुक क्षणात...
क्षणभंगूर प्रेम माझे
क्षण सोनेरी प्रेमाचे
आठवनीच्या गाण्याचे
गाणे तूटलेल्या माझ्या ह्रदयाचे...
आयुष्याच्या वाटेवरती
मागे फिरून पाहताना
आपल्याच पावलांच्या
पाऊलखुणा अस्पष्ट दिसाव्यात
साथ तुझी कधीच सुटलेली
तरी तुझ्या असण्याचा भास
अजूनही जरूर व्हावा
तुझ्या साथीत व्यतित
केलेल्या चांगल्या क्षणांना
त्या एका वाईट क्षणाचाच
कलंक का लागावा ??
हात घेउनी हातात
वाट चाललो कितीक
स्मरे आजही सुगंध
मेंदी खुललेला हात
उन्हातानात फिरलो
चांदण्यातही फिरलो
हात असाच हातात
नाही कधी दुरावलो
थोडे गोड थोडे कटू
किती आठवावे क्षण
खांद्यावर पाठीवर
हात निवाराया व्रण
हात गुंफले हातात
मन गुंतले मनात
दोन पायी एकवाट
सूर- ताल एकसाथ
एकटाच हालताना
हाता जाणवे पोकळी
सखे पुन्हा कधी भेटी
पुन्हा कधी हातमिठी.......
साथ दे साथ दे अशी साथ दे
निद्रिस्त समाजाला जागृत करून मात दे
साथ दे साथ दे अशी साथ दे
निर्बलतेला तू मदतीचा हात दे
साथ दे साथ दे अशी साथ दे
फुत्कारणार्या सर्पालाही त्याची कात दे
साथ दे साथ दे अशी साथ दे
अशक्त वृद्धालाही त्याचे दात दे
साथ दे साथ दे अशी साथ दे
आशेच्या नव्या किरणांना जननारी एक गर्भार रात दे !!!!
साद तुझी प्रीतीला
आज हवी होती ...
साथ तुझी साथीला
आज हवी होती ...
तगमगता दीप मी
तू तेजाळ मशाल
ज्योत तुझी वातीला
आज हवी होती ...
जगण्याचे ऋण हे
फिटता श्रमलो मी
खैरात तुझी रातीला
आज हवी होती ...
बीज ते सृजनाचे
मनी कसे रुजेना
ओल तुझी मातीला
आज हवी होती ...
छेडीता ते सूर तू
आस मनी जागते
साद तूझी प्रीतीला
आज हवी होती....