Submitted by गिरिश देशमुख on 1 December, 2010 - 00:11
साद तुझी प्रीतीला
आज हवी होती ...
साथ तुझी साथीला
आज हवी होती ...
तगमगता दीप मी
तू तेजाळ मशाल
ज्योत तुझी वातीला
आज हवी होती ...
जगण्याचे ऋण हे
फिटता श्रमलो मी
खैरात तुझी रातीला
आज हवी होती ...
बीज ते सृजनाचे
मनी कसे रुजेना
ओल तुझी मातीला
आज हवी होती ...
छेडीता ते सूर तू
आस मनी जागते
साद तूझी प्रीतीला
आज हवी होती....
गुलमोहर:
शेअर करा
छानच कविता वाचताना माझ्या
छानच कविता
वाचताना माझ्या मनातील एक विषय लिहीला गेला
http://www.maayboli.com/node/21570
मनाची तगमग जाणवतेय.
मनाची तगमग जाणवतेय.
सुंदर ! <<बीज ते सृजनाचे मनी
सुंदर !
<<बीज ते सृजनाचे
मनी कसे रुजेना
ओल तुझी मातीला
आज हवी होती ...>>....हे खूप आवडले.
रुणुझुणू, उल्हासजी, वर्षा
रुणुझुणू, उल्हासजी, वर्षा अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद !
वर्षा_म, >>>वाचताना माझ्या
वर्षा_म,
>>>वाचताना माझ्या मनातील एक विषय लिहीला गेला >>>
ज्योत से ज्योत जलाते चलो,
काव्य गंगा बहाते चलो ....
सगळीच कविता आवडली. >>ज्योत
सगळीच कविता आवडली.
>>ज्योत तुझी वातीला
आज हवी होती ...
विशेष आवडलेल्या ओळ
खूप खूप आवडली.
खूप खूप आवडली.