बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी
आमच्या गावात एका डॉक्टरांकडे बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी आहे.
१. काश्यपसंहिता, भैषज्यरत्नावली यांचा आधार
२. सुवर्णभस्मयुक्त गाईचे तूप, ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी, अश्वगंधा, पिप्पली व इतर औषधींचा वापर
३. हे औषध कोणत्याही महिन्याच्या पुष्य नक्षत्रादिवशी सुरु करावे.
४. वयोगट : जन्मजात बालक ते १२ वर्षे
कुणाला याबाबत माहिती आहे का? या औषधाचे नेमके फायदे काय आहेत?
प्रारण संवेदक उपकरणे१ मुख्यतः दोन प्रकारची असतात.
१. दर-मापक उपकरणे आणि
२. व्यक्तिगत मात्रा-मापक उपकरणे.
किरणोत्सार पाहताही येत नाही आणि अनुभवताही येत नाही. मात्र त्याचा स्वास्थ्यावर हानीकारक प्रभाव पडतो. म्हणून, किरणोत्सारी क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तींची देखभाल करणे अत्यंत आवश्यक असते. ह्या देखभालीच्या साह्याने प्रत्येक व्यक्तीस मिळणार्या मात्रेची नोंद ठेवली जाते, ज्यामुळे हे सुनिश्चित करणे शक्य होते, की कोणत्याही कर्मचार्यास निर्धारित मात्रेपेक्षा जास्त मात्रा मिळू नये. किरणोत्सार देखभाल अनेक प्रकारे केली जाते.
१. व्यक्तीगत अवशोषित किरणोत्सार मात्रेचे मापन
२. किरणोत्सारी क्षेत्रातील किरणोत्साराचे मापन
नमस्कार,
मला रक्तदाब मोजण्यासाठी घरगुती डिजिटल यंत्र घ्यायचं आहं. फ्लिपकार्टवर बरेच पर्याय दिसले. कोणत्या कंपनीचं यंत्र अचूक वाचन दाखवणारं आणि टिकाऊ असते, याची कृपया माहिती द्या. धन्यवाद.
जेव्हा किरणोत्सार एखाद्या माध्यमातून जात असतो तेव्हा त्या माध्यमाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मूलकीकरण होते किंवा ते माध्यम उत्तेजित अवस्थेत पोहोचते. सजीवांमध्ये हे मूलकीकरण किंवा ही उत्तेजना, शरीराचे अनेक कण जसे की प्रथिने, न्यूक्लिक आम्ल इत्यादींना नष्ट करते. हे सर्व कण शरीराकरता अत्यंत महत्वाचे असतात. म्हणून किरणोत्सार, सजीवांच्या शरीरांसाठी धोकादायक असतो. अल्फा आणि बीटा किरणे माध्यमास प्रत्यक्षरीत्या मूलकित करतात.
किरणोत्सार आपल्या सभोवार पसरलेला आहे. एका सामान्य माणसाला सगळ्या स्त्रोतांकडून मिळणारा किरणोत्साराचा संसर्ग जर १००% धरला, तर त्यातला किती संसर्ग कशापासून आपणास होत असतो ते खाली दिलेले आहे.
१. घरेः आपल्याला मिळणार्या किरणोत्साराचा ५५% हिस्सा रेडॉनद्वारे मिळतो. रेडॉन हा एक वायू आहे जो जमिनीतील नैसर्गिक युरेनियमपासून उत्पन्न होतो. रेडॉन जो घरांतून दडलेला असतो.
२. शुश्रुषालयेः आपल्याला मिळणार्या किरणोत्सारापैकी सुमारे १५% किरणोत्सार वैद्यकीय आणि दंत-क्ष-किरणचिकित्सेतून मिळतो.
माझा मुलगा सव्वा वर्षा चा आहे, काल त्याला doc कडे नेल होत तर त्यानि iron n calcium deficiency सांगितल आहे, त्यासाठी औषध पन दिली आहेत. पण आहारातुन iron n calcium n vitamin d level वाढवण्यासाठी काय देता येइल??
पंच महाभुत,
आपण पंचमहाभुतां बद्द्ल ऐकतो की सर्व सजिव व नि र्जिवांचे अधिष्ठान ही पंचमहाभुत आहेत.
ह्या विषयाला ईतके पदर आहेत की एकच पदर उलगडत न्यायलाच आयुष्य पुरणार नाही.
हस्तमुद्रा ही भारताची खुप प्राचिन व सर्वात महत्वाची देणगी आहे व ह्या हस्तमुद्रा ही पंचमहाभुता वर आधारीत असतात.
आज आपण पंच महाभुताचे हाताच्या बोटातील आधिष्ठान बघू !
हाताच्या पाच बोटा पैकी प्रत्येक बोटाला एका पंच महाभुताचे आधिष्ठान असते.
उदा. हाताचा आंगठा म्हणजे अग्नी महाभुत, प्रथमा म्हणजे वायु.
नमस्कार
माझ्या एका सहका-याच्या मुलाला बोलताना अडखळण्याची समस्या आहे. तो आता १० वर्षांचा आहे. कुणाला पुण्यात यासाठी कुठे उपचार होऊ शकतील हे माहीत असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. अनुभव दिले तर बरंच होईल..
नेटवर माहीती मिळतेय.. पण लोकांचे अनुभव महत्वाचे आहेत असं वाटल्याने इथं प्रश्न विचारला आहे. मुंबईत सुद्धा चालू शकेल.