आरोग्य

घोरासुराचं आख्यान की काळसर्पाचा विळखा?

Submitted by अजय on 18 November, 2011 - 15:59

असं वाटतं झोप झाल्यावर?? की मी अजून स्वप्नात आहे !!?>

२० ऑक्टोबर २०११ ची सकाळ मी कधीही विसरू शकणार नाही.

कारण पूर्ण झोप झाल्यावर कसं वाटतं ते मी पहिल्यांदाच अनुभवलं. किंवा कदाचित पूर्वी अनुभवलं असेल तर ते इतक्या वर्षांपूर्वी असावं की मला आठवतच नाहीये. मला सध्या १० वर्षांनी तरूण झाल्यासारखं वाटतंय. यातला प्रत्येक शब्द खरा आहे. ही काल्पनिक कथा नाही तर एक वैद्यकिय सत्यकथा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

आयुर्वेदोक्त पंचकर्म

Submitted by तोषवी on 16 November, 2011 - 21:51

सध्या प्रसारमाध्यमातून आयुर्वेद आणि पंचकर्म याबाबत इतकी जाहीरातबाजी होत आहे की पुष्कळजणाना पंचकर्म करून घेण्याची इच्छा असते.ह्याला पंचकर्मानेच आराम वाटला म्हणून मलाही करायचय अस म्हणणारे ही भेटतात. पाचही कर्म करायची असतील तर किती वेळ लागेल असही काही विचारतात.
यासाठीच आता पंचकर्म म्हणजे काय , ते नेमके का, कधी, कशासाठी,कोणाला करतात ते पाहू.

पंचकर्म म्हणजे काय?
हा आयुर्वेदीय शोधन चिकित्सा प्रकार आहे.

आयुर्वेदात चिकित्सेचे महत्वाचे दोन प्रकार १)शमन आणि २) शोधन

पंचकर्म

Submitted by जाईजुई on 15 November, 2011 - 10:56

मला गेल्या वर्षपासून शरीरातले टॉक्सिन्स फार वाढल्याचे जाणवत आहे.

ह्या भारत मुक्कामात पंचकर्म करून बघायचे मनात आहे.

त्याबद्दल कोणाला माहिती आणि स्वानुभव आहेत का? माझ्या (बाळबोध) शंका पुढिलप्रमाणे -
१. पंचकर्म करण्यापूर्वी नाडीपरिक्षा करावी काय?
२. वेगवेगळ्या समस्या असल्यास वेगळ्या प्रकारची कर्मे/तेल्/औषधे असे काही असते का?
३. (आधीपासूनच सरभटलेल्या) हार्मोन्सवर पंचकर्माने परिणाम होतो काय?
४. इतर स्वाथ्य चाचण्या (साखर्/रक्त/लघवी/रक्तदाब तत्सम)पंचकर्माच्या पूर्वी केल्यास व नंतर केल्यास येणार्‍या रिझल्ट्समध्ये काही फरक असतो का?

विषय: 

हृदयविकाराचे अवतरण

Submitted by नरेंद्र गोळे on 9 November, 2011 - 20:02

हृदयविकारास मूक, प्रगतीशील आणि प्राणघातक विकार समजतात. मूक, या अर्थाने की खूप बळावेपर्यंत त्याची स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. तो बळावत राहतो. प्रगती करत राहतो. या अर्थाने तो प्रगतीशील असतो. कधी कधी हृदयशूळ जाणवू लागतो. कधी कधी अचानक हृदयाघात होतो. क्वचित जीवही जातो. मग तो प्राणघातक असल्याची आपली खात्री पटते. मात्र सूप्तपणे तो प्रगतीशील असतो, तेव्हा कधी कधी अचानकच काही त्रास जाणवू लागतो आणि मग तो विकार उघड होतो. याआधी ज्यांना ज्यांना असा त्रास झाला होता, तेव्हा तो काय स्वरूपात व्यक्त झाला, हे जर आपण पाहिले, त्याची व्यवस्थित नोंद करून ठेवली, तर त्या त्या लक्षणांनी आपण सावध होऊ शकतो.

विषय: 

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध

Submitted by जागोमोहनप्यारे on 5 November, 2011 - 05:14

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. Proud डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.

मोव्हेंबरः पुरुषस्वास्थ्यासाठीचा जागतिक उपक्रम

Submitted by अजय on 27 October, 2011 - 00:04

ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरूकता यावी म्हणून जगभर गुलाबी रिबीनीची चळवळ सुरु झाली आणि जगभरच्या स्त्रियांना त्या उपक्रमानं एकत्र आणलं. पुरुषांच्याही स्वास्थ्याबद्दल असं काही असावं, पुरुषांमधे त्याबद्दल जागरुकता यावी म्हणून १९९९ मधे ऑस्ट्रेलियात या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला प्रोस्टेट कॅन्सर आणि डीप्रेशन यासाठी मुख्यत: ही चळवळ होती. २०१० मधे टेस्टीक्युलर कॅन्सरशी निगडित उपक्रमाला यात सामावून घेऊन पुरुषस्वास्थ्याबद्दल सर्वांगीण विचार करणारी चळवळ असं त्याचं रुप बदललं.

मिशा + नोव्हेंबर = मोव्हेंबर (Moustache + November = Movember)

विषय: 

गर्भसन्स्कार

Submitted by मी मानसी on 23 October, 2011 - 12:24

मी सहा महिन्याची प्रेग्ननन्ट आहे .पण बेड रेस्ट वर आहे. ह्या परिस्थितीत किन्वा सामान्य वेळी आपण कोणत्या विशेश गोश्टी करु शकतो येणार्या बाळासाथी?
मी चान्गले music , मन्त्र वगैरे एइकते पण अजुन काय करता येईल का?

प्रांत/गाव: 

तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?

ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.

कॅन्सर रुग्णाच्या मुलांसाठी केअर पॅकेज

Submitted by स्वाती२ on 24 September, 2011 - 11:26

माझ्या नवर्‍याच्या प्लॅन्टमधे काम करणारा एक कामगार शेवटच्या स्टेजचा थायरॉईड कॅन्सर रुग्ण आहे. त्याच्या १४-१६ वयोगटातील मुलांसाठी आणि पत्नीसाठी केअर पॅकेज पाठवायचे आहे. तेव्हा काय गोष्टी द्याव्यात? तसेच रुग्णासाठी काय द्यावे?

विषय: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य