फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध
Submitted by जागोमोहनप्यारे on 5 November, 2011 - 05:14
फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :
यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.