अदृश्य धागा....
अदृश्य धागा...
सगळे एका माळेतील मणी होतो ...
कधी भावंड म्हणून,
कधी शाळासोबती म्हणून,
कधी शेजारी म्हणून,
कधी सहकारी म्हणून.
काळाच्या ओघात,
रोजच्या व्यापात,
गाठ माळेची सुटली...
मणी विखुरले...
काही इथे, काही तिथे,
काही सातासमुद्रापलिकडे.
सोशल मिडिया जणू ...
अदृश्य धागा...
विखुरलेल्या मण्यांना,
एकत्र सांधणारा.
भेटतात इथे पुन्हा,
हरवलेले सगेसोयरे...
अनोळखी झालेले,
ओळखीचे चेहरे.
पडतात गाठी
इथे नव्याने...
जुळतात धागे
काही जुनेच नव्याने.