उन्हाळी भटकंती - माथेरान (२), आंबेगाव ते वन ट्री हिल पॉइंट.
उन्हाळी भटकंती - माथेरान (२),आंबेगाव ते वन ट्री हिल पॉइंट माथेरान.
(२०१९-०५-२९)
उन्हाळी भटकंती - माथेरान (२),आंबेगाव ते वन ट्री हिल पॉइंट माथेरान.
(२०१९-०५-२९)
उन्हाळी भटकंती - माथेरान
कर्जत ( बोरगाव ) ते माथेरान ( रामबाग पॅाइंट. )
उन्हाळी भटकंती म्हटली की माथेरानचे नाव सर्वात पुढे असते. सातआठ वाटा आहेत, जाताना चालत आणि येताना बस /टॅक्सी. कितीही वेळा गेलो तरी कंटाळा येत नाही किंवा अरे हे एकदा झाले आहे पुन्हा कशाला असं वाटत नाही. फक्त यावेळी कोणती वाट एवढाच विचार.
‘माथेरान’ व्हाया ‘गारबेट’ आणि ‘असालची वाट’
जुन्या जिवलग मित्रांसोबत ट्रेक ठरला. जवळपास मार्च २००९ नंतर आता योग जुळून आला! थोडक्यात यांचे पुनरागमन म्हणावे लागेल, त्या दृष्टीने ट्रेक रूट ही तसाच हवा. प्रवासाची वेळ, अंतर, गर्दी, अतिरिक्त तंगडतोड, या सर्व बाबींना फाटा देत निवांत रमणीय असं काही तरी हवे होते. यावर माझ्याकडे तरी सध्याची परिस्थिती पाहता माथेरानला पर्याय नव्हता.
‘माथेरान’ व्हाया ‘बीटराईस क्लिफ’ आणि ‘माधवजी पॉईंट’
गेल्या वर्षी सरत्या पावसात केलेल्या अलेक्झांडर रामबाग ट्रेक नंतर खाटवण मधून माथेरानला जाणाऱ्या वाटा खुणावत होत्या. मधल्या काळात माथेरानचे दोन ट्रेक चार वेगळ्या वाटेने झाले. खाटवण मधील बीटराईस क्लिफची वाट माधवजी पॉईंटला जोडायची असा मनसुबा होता. तसेही भोरप्या नाळेच्या ट्रेक नंतर तीन आठवडे होऊन गेले तरी कुठे जाणे झाले नव्हते. घरातली छोटी मोठी कामं, लग्न कार्य, नातेवाईक, मित्रमंडळी यातच सारे विकेंड जात होते. साहजिकच खाण्यापिण्याची चंगळ यात वजन दोन ते तीन किलोने वाढलं.
पावसाच्या सरी नभातून बरसू लागल्या की ओल्या मातीचा सुगंध दरवळतो... गार वारे वाहू लागतात.. मातकट पिवळ्या रंगाचे रान आता गर्द हिरवे होउन जाते.. झाडं-फुले अगदी टवटवीत दिसू लागतात.. वाहत्या पाण्याचा खळखळाट सुरु होतो.. !! निसर्ग जणू आनंदाने सर्व सृष्टीला या वर्षाउत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी विनवू लागतो... !
पावसाच्या सरी नभातून बरसू लागल्या की निसर्गाची ही विनवणी आमच्या मनापर्यंत पोहोचते.. डोंगरदर्या-गडकिल्ले डोळ्यासमोर दिसू लागतात... सॅक तयार ठेवूनच सवंगडयांना हाक दिली जाते... 'चल जाऊ' म्हटलं की मन चिंब करण्याच्या आतुरतेने पावलं डोंगराच्या दिशेने वळतात.. !
सध्या घरी पुण्याला बहिण आणि तिची मुलगी आली आहे. आई आणि पुतणी अशा ह्या चौघीजणी बाहेर भटकंतीची योजना आखत आहेत. तर इथे विचारावेसे वाटते..
...पुण्याहून ह्या दिवसात अर्थात नोव्हेंबर मधे माथेरानला गेले तर बरे पडेल की महाबळेश्वर आणि पाचगणी एकत्र गेलेले बरे पडेल? शिवाय राहण्यासाठी चांगले हॉटेल? आणि काही डुज आणि डोन्ट डु सारख्या सुचना आवडतील. काय काय बघण्यासारखे आहे, त्या भागातले काही खाण्यासारखे आहे ह्याचीही माहिती हवी आहे. पुतणी ह्या तिन्ही ठिकाणी गेली आहे तेंव्हा तिला अनुभव आहे. पण तरीही माबोकरांचे अनुभव आणि मतं नेहमीप्रमाणे उपयोगी पडतील. धन्यवाद जनहो.
निर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या तरी येथे केवळ मिनी ट्रेनच जाऊ शकते. बाकी प्रवास घोडा व पायी यांच्याद्वारेच करावा लागतो. अशा माथेरानला दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या रविवारी गेलो. त्या विषयी...