Submitted by हर्ट on 18 November, 2015 - 04:06
सध्या घरी पुण्याला बहिण आणि तिची मुलगी आली आहे. आई आणि पुतणी अशा ह्या चौघीजणी बाहेर भटकंतीची योजना आखत आहेत. तर इथे विचारावेसे वाटते..
...पुण्याहून ह्या दिवसात अर्थात नोव्हेंबर मधे माथेरानला गेले तर बरे पडेल की महाबळेश्वर आणि पाचगणी एकत्र गेलेले बरे पडेल? शिवाय राहण्यासाठी चांगले हॉटेल? आणि काही डुज आणि डोन्ट डु सारख्या सुचना आवडतील. काय काय बघण्यासारखे आहे, त्या भागातले काही खाण्यासारखे आहे ह्याचीही माहिती हवी आहे. पुतणी ह्या तिन्ही ठिकाणी गेली आहे तेंव्हा तिला अनुभव आहे. पण तरीही माबोकरांचे अनुभव आणि मतं नेहमीप्रमाणे उपयोगी पडतील. धन्यवाद जनहो.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुणे आणि हिवाळ्याबद्दल कल्पना
पुणे आणि हिवाळ्याबद्दल कल्पना नाही,
पण माझ्यासाठी महाबळेश्वर आधी माथेरान फेव्हरेट !
ऋ, काय काय करतोस तिथे जाऊन,
ऋ, काय काय करतोस तिथे जाऊन, काय खावे वगैरे लिहि ना मस्त. तुझी शैली फार वेल्हाळ असते. मागे तू ब्रेड्स आणि कपड्यांबद्दल काय सुरेख वर्णन केले होतेस.
तुम्हाला कोकण बघायचे होते ना?
तुम्हाला कोकण बघायचे होते ना?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मी कुठे जात आहे. घरचे जात
मी कुठे जात आहे. घरचे जात आहेत. मी देशाबाहेर आहे सध्या. कोकण फिरायला एक आठवडा हाताशी असेल तेंव्हा जाणार आहे.
ओह ओके. कोकणात जायला हिवाळा
ओह ओके. कोकणात जायला हिवाळा चांगला आहे.
महाबळेश्वर - मंदीर, वेण्णा
महाबळेश्वर - मंदीर, वेण्णा लेक, मॅप्रो गार्डन
वाई- स्वदेशचं शूटिंग झालं तो वाडा, ढोल्या गणपतीचं मंदीर
वाई त्याभागात आहे हे नव्हतं
वाई त्याभागात आहे हे नव्हतं माहिती. धन्यवाद रिया. स्वदेशचा तो वाडा मस्त होता.. आहे म्हणजे
चेरी वगैरे मिळेल का ह्या दिवसात तिथे?
चेरीचं माहीत नाही पण तिथलं
चेरीचं माहीत नाही पण तिथलं मुख्य आकर्षण म्हणजे स्ट्रॉबेरीज.
मला हिवाळ्यात महाबळेश्वरला जायला आवडतं. माथेरानमधे कधी हिवाळ्यात गेलेले नाही त्यामुळे नो कमेंट्स
माथेरन पेक्शा महाबळेश्वर खुप
माथेरन पेक्शा महाबळेश्वर खुप आवडेल घरच्याना. पैसे वसुल होतात.
https://www.ixigo.com/which-a
https://www.ixigo.com/which-are-the-famous-non-veg-restaurants-in-mahaba...
Which are the famous non veg restaurants in Mahabaleshwar?
माथेरान ला जोडून असे काहीच
माथेरान ला जोडून असे काहीच नाही, त्यामूळे तिथे खाणे पिणे सगळे मुंबई स्टाईलचेच. नुसते भटकायला छान आहे. वाहने नसतात त्यामूळे घोडा किंवा घोडागाडी हाच पर्याय. नेरळपासून चढणही जमण्यासारखी आहे, गाडीरस्ताच आहे. पण वयस्कर माणसांना जड जाईल. सड्या किंवा तरुण माणसांना माथेरान चांगले. आईला महाबळेश्वर आवडेल. तिथून प्रतापगडही जवळ आहे आणि रोप वे चालू असल्याने रायगडही करता येईल.
धन्यवाद दिनेशदा. रायगड आम्ही
धन्यवाद दिनेशदा.
रायगड आम्ही केले आहे. रोप-वे घेऊनच गडावर गेलो होतो.
आणि रोप वे चालू असल्याने
आणि रोप वे चालू असल्याने रायगडही करता येईल.>>>>??
रायगड महाबळेश्वर जवळ आहे? मला वाटतं गाडीने दोन अडीच तासांचा रस्ता आहे ना?
सड्या किंवा तरुण माणसांना
सड्या किंवा तरुण माणसांना माथेरान चांगले >> दिनेशदा बरोबर आहे. भरपूर पायी फिरण्याकरता उत्तम.
त्यापेक्षा महाबळेश्वर जास्ती आवडेल. मला तरी बरेच पॉइंट्स बघायला आवडतात. गर्दी असते पण सह्याद्रीतल्या दर्यांचे मस्त दर्शन होते. प्रतापगड जवळ आहे महाबळेश्वरच्या.
दिनेश.यांच्याशी सहमत.
दिनेश.यांच्याशी सहमत. पांचगणी,अथवा वाई येथे राहिल्यास थोडे स्वस्तही पडेल.अर्थात मला तेथील हॉटेल्स माहीत नाहीत.मी महाबळेश्वरला राहिले होते.तेथून परतताना ही माहिती मिळाली.
महाबाळेश्वरचे निरनिराळे पाँईट्स, महाबळेश्वर मंदिर, वेण्णा लेक,प्रतापगड ,वाईच्या ढोल्या गणपतीचं मंदिर हे सारे मस्त आहे.
मलबेरी,स्ट्रॉबेरी, अहा! मलाच आता जावंसं वाटायला लागलं.
जमल्यास भल्या पहाटे आणि
जमल्यास भल्या पहाटे आणि संध्याकाळी फिरा.... दुपारी मस्त हॉटेलातला एसी लावून झोपा काढा!
माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी
माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी हिवाळ्यात जाण्याच्या मागे काय कारण आहे ?
पण वयस्कर माणसांना जड जाईल.
पण वयस्कर माणसांना जड जाईल. सड्या किंवा तरुण माणसांना माथेरान चांगले.
>>>>
याच्याशी सहमत बी, म्हणूनच माझ्यासाठी असे लिहिले. आपण सोय-गैरसोय बघता आईला महाबळेश्वरलाच नेणे उत्तम यात शंका नाही.
माथेरानला गाड्या दूर पायथ्याशीच सोडाव्या लागतात. त्यामुळे त्यांच्या प्रदूषणापासूनही मुक्ती मिळते.
महाबळेश्वरच्या तुलनेत गर्दी कमी असते, शांतताही लाभते.
खाण्याची चंगळ महाबळेश्वरला जास्त होईल हे नक्की. स्ट्रॉबेरीज आणि मकई पॅटीस हे असे पदार्थ आहेत की निव्वळ ते खाण्यासाठी महाबळेश्वरला जावे.
पॉईंट्स दोन्हीकडे चांगले, तरी माझी पर्सनल चॉईस माथेरान आहे,
पण मला सर्वात जास्त आवडतात ते माथेरानचे रस्ते .. मित्र मैत्रीणींना घेऊन त्यावर चालायची आपलीच एक मजा आहे.
तसेच नेरळपासून माथेरान मिनी ट्रेन एक वेगळीच ट्रीप आहे.
दुपारी मस्त हॉटेलातला एसी
दुपारी मस्त हॉटेलातला एसी लावून झोपा काढा!
<<
हिवाळ्यात?
माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी
माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी हिवाळ्यात जाण्याच्या मागे काय कारण आहे ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
कारण ती थंद हवेची ठिकाणे आहेत. हिवाळ्यात आणखी थंड होत असतील. आणखी मजा
बी, डिटेल विपु केलीय. बाकि
बी,
डिटेल विपु केलीय. बाकि हा धागा आहेच हॉटेल्सच्या माहितीसाठी : http://www.maayboli.com/node/16690
हिवाळ्यात? >> हो,
हिवाळ्यात?
>>
हो, महाबळेश्वरतरी दुपारी गरम असते. हिवाळ्यातही.
दीमा, इतक्यात महाबळेश्वरला
दीमा, इतक्यात महाबळेश्वरला गेलेला दिसत नाही वाटत!
मलाही हिवाळ्यात सायबेरिया
मलाही हिवाळ्यात सायबेरिया किंवा अंटार्क्टिका इथे जायचे आहे. वेगळा धागा काढण्यापेक्षा इथेच माहीती द्यावी हात लांब करून..
वयोमानानुसार लक्षात राहणार
वयोमानानुसार लक्षात राहणार नाही म्हणून दुस-या धाग्याचा विषय पण इथेच लिहीतो.
उन्हाळ्यात पुणे ते चेन्नई बरे की पुणे ते नागपूर आणि अमरावती !
<<मलाही हिवाळ्यात सायबेरिया
<<मलाही हिवाळ्यात सायबेरिया किंवा अंटार्क्टिका इथे जायचे आहे. वेगळा धागा काढण्यापेक्षा इथेच माहीती द्यावी हात लांब करून..>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
---- कॅनडात या... मी जिथे रहातो त्या भागात हिवाळ्यात ३० से. तर आरामात मिळेल, क्वचित २-६ दिवस -४० से. मिळेल. थोडे वर गेल्यास (North ) आर्टिक्ट खुपच जवळच आहे. छान गारवा एन्जॉय कराल.
वाई च्या परिसरात धोम धरण
वाई च्या परिसरात धोम धरण व त्याजवळ धोम मंदीर अप्रतिम आहे
बी, चुकुनही महाबळेश्वार हॉटेल
बी, चुकुनही महाबळेश्वार हॉटेल वर राहू नका
लुटले गेल्याचीच फिलिंग येते खर तर
)
इतके रेट्स आहेत
महाबळेश्वर ला सॅव्हॉय विलेज
महाबळेश्वर ला सॅव्हॉय विलेज हॉटेल आवडलं होतं, हाय्फाय नाही पण ज्याला राहणे हा एक उद्देश पाळून बाकी भटकंती करायचे असेल त्यासाठी चांगले.
वर्किंग डेज ला गेल्यास सर्व ठिकाणी गर्दी कमी मिळेल.
रिया, महाबळेश्वर हे अत्यंत
रिया, महाबळेश्वर हे अत्यंत सेफ टुरिन्ग आहे. तिथे चोरटे, भामटे नाहीत. बिनधास्तपणे फिरता येत .तसेच हॉटेलमधला नोकरवर्ग टॅक्सीवाले हे स्थानिक गरीब लोक असल्याने बनवान्बनवीचे प्रकार नाहीत. महाबळेश्वरचे टूरिस्ट्स हे प्रामुख्याने गुजराती लोक असतात. गाड्यांचे नम्बर जर पाहिले तरी लक्षात येते. या मंडळींची पैसा खर्चायची तयारी असते. त्यामुळे अगदी पहिल्यापासून महाबळेश्वरचे टूरिंग हे कॉस्टलीच आहे. लोनावळा आंबोलीसार खे मूड खराब करणारे दारूडे टुरिस्ट तिथे आढळत नाहीत. महाबळेश्वर हे निसर्ग एन्जॉय करण्याची जागा आहे. तसेच ती पायी करणे शक्य नाही. फोर व्हीलरमधे मजा येत नाही. ती खरी टू व्हीलरवरून फिरण्याची जागा आहे. जवळ्जवळ दीडशे चौ किमीचा प्रदेश आहे... महाबळेश्वरची ट्रिप ही वॅल्यू फॉर मनी असतेच.
Pages