अर्थकारण
अर्थसंकल्प २०२१-२२ : काय आले काय गेले
अर्थमंत्रीण निर्मला सितारामण यांनी त्यांच्या पठडीतील जनतेची गठडी वळणारा अर्थसंकल्प आज सकाळी लोकसभेत मांडायला सुरुवात केली. सितारामण यांच्या डोक्यावरील केसांना नसलेला डाय अन २ खासदारांमध्ये लावण्यात आलेले काचेचे पार्टिशन याव्यतिरिक्त काहीही फरक गेल्यावेळच्या अन यावेळच्या अर्थसंकल्पात प्रथमदर्शनी तरी दिसला नाही. बाकी कोरोनाच्या नावावर बिल फाडून मागील अर्थसंकल्पात योजलेल्या कल्पना हवेत विरल्याचे अर्थमंत्रीण बाईंनी सांगितले अन उरलेल्या सरकारी कंपन्या, अस्थापना विकायला काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले.
यादी सुधारायला,वाढवायला मदत करा.
मित्रहो ही यादी एका करिअरविषयक समुहात द्यायची आहे. कृपया सुधारायला, वाढवायला मदत करावी
-----------------------------------------------------------------
भारतात चांगला बाजारभाव असणारी वैयक्तिक कौशल्ये
अर्णव गोस्वामी व्हाट्सप डीकोडेड : सत्य की थोतांड ?
नरसोबाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतडी काढावी तशा थाटात अर्णव गोस्वामीचे व्हॅटसप मुंबई पोलिसांनी फाडून काढले आहे , त्यात अनेक गोष्टी उघड होत आहेत
मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे दिवाळे वाजवले ह्याचा कबुली जबाब अर्णव गोस्वामीने 2019 ला दिला होता त्याच्या व्हॅटसप मध्ये.
इतरही काही स्क्रीन शॉट सर्वत्र फिरत आहेत
उदा.
प्रीतम शाह यांना न्याय मिळेल का?
अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारी राहणाऱ्या प्रीतम शाह यांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे.
डिडरोट इफेक्ट (Diderot Effect)
ही १७६५ सालची गोष्ट. डेनिस डिडरोट आतापर्यंत ५२ वर्षाचा झाला होता. त्याने खूप जास्त पुस्तके वाचलेली होती आणि जणू त्याची लायब्ररीच त्याच्याकडे होती. तरी त्याने त्याचे पूर्ण आयुष्य गरिबीत काढलेले होते. त्याच्या मुलीच्या लग्नासाठीसुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते.
एकेदिवशी रशियाची त्यावेळेची राणी कँथरीनला डिडरोटच्या ह्या गरिबीबद्दल माहित झाले. तिने डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच ५० हजार डॉलर्स किंवा आताचे जवळपास साडेतीन करोड रुपये डिडरोटला देऊ केले. आणि डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला.
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?
हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे
या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?
मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते.
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा- मित-‘अ’ गट
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - २०२०
गट-अ
वय - ९ वर्षं
घरापासून मिळणारे उत्पन्न
समजा 18 लाख गुंतवणुक करुन मी 2003 मधे एक घर/फ्लॅट घेतला . त्याची आज 2020 मधे त्याची बाजारभावाने किंमत 1 कोटी आहे. त्याचे आज मिळणारे घरभाडे 20 हजार आहे तर मी केलेल्या गुंतवणुकीचा घरभाडे रुपात मिळणारा हा परतावा खरेदी केलेल्या 18 लाखावर धरायचा की आत्ताच्या 1 कोटीवर? तेव्हाच्या 18 लाखाची किंमत आता 1 कोटी झाली यात माझे काहीच कर्तुत्व नाही. हा मला मिळालेला लाभ आहे. अशा वेळी घर विकलेले फायदेशीर की भाड्याने तसेच देत राहणे फायदेशीर? गुंतवणूकीचे अर्थशास्त्र काय सांगते?
तेलुगू सिनेमे चालतात कसे?
तेलंगणा आणि आंध्रात बिगबजेट तेलुगू सिनेमे इतके कसे चालतात? म्हणजे तमिळनाडूत हिंदी भाषा शाळेत शिकवली जात नाही शिवाय तिथे हिंदीला मोठा विरोधही आहे त्यामुळे तमिळनाडूत हिंदी सिनेमे क्वचित बघितले जातात; पण तेलंगणा आणि आंध्रमधे हिंदी समजणारी जनता बहुसंख्य आहे.उर्दूभाषिक मुस्लिम लोकसंख्याही बरीच आहे. शिवाय तेलंगणा आणि आंध्रमधल्या शाळेतही हिंदी शिकवतात.मग असं असूनही बॉलिवूडच्या सिनेमांनी तेलुगू सिनेमांचं मार्केट कसं कमी केलं नाही?