भारत आणि नॉर्डिक देशांदरम्यानची दुसरी शिखर परिषद 4 मे 2022 ला डॅनिश राजधानी कोपनहेगनमध्ये पार पडली. त्यामध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन, आईसलँडच्या पंतप्रधान कतरिना जोकोब्सदोतीर, नॉर्वेजियन पंतप्रधान जोनास गेर स्चोर, स्वीडिश पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन आणि फिनिश पंतप्रधान सॅना मरीन सहभागी झाले होते. कोव्हिड-19 च्या संकटानंतर आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणणे, हवामान बदल, शाश्वत विकास, नवोन्मेष, डिजिटलीकरण, हरित आणि स्वच्छ विकास याबाबत सहकार्य वृद्धिंगत करण्यावर या परिषदेत चर्चा करण्यात आली.
दक्षिण प्रशांत महासागरातील सोलोमॉन द्विपेनं (Solomon Islands) अलीकडेच चीनबरोबर एक सुरक्षाविषयक करार केला आहे. या कराराचा तपशील फुटल्यावर वाढलेल्या चिंतेमुळे वॉशिंग्टन, कॅनबेरा, वेलिंग्टनहून वेगाने हालचाली होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेने आपल्या आशियाविषयक अधिकाऱ्यांना तिकडे पाठवले आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका (AUKUS) संधीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या नव्या हालचाली आहेत.
रशिया युक्रेनवर हल्ला करेल वाटू लागल्यावर आणि प्रत्यक्ष हल्ला केल्यावर अनेक पश्विमी राष्टांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध घातल्यावर अनेक बातमीपत्रांत/ रेडिओवर हे असे लादलेले आर्थिक निर्बंध कधीच काम करत नाहीत पासून निर्बंधं घालून हवे ते करुन घ्यायचे असेल तर ते कशा प्रकारचे निर्बंध हवे याबद्द्ल अनेच चर्चा, मतमतांतरे ऐकली.
ते निर्बंध काय आहेत आणि त्यांचे परिणाम काय अपेक्षित आहेत आणि ते कसे होत आहेत याची ढोबळ यादी आणि चर्चा करायला हा धागा.
नमस्कार,
आजकाल आपले वेगवेगळ्या बँकेत खाती असतात. क्रेडिट कार्ड्स असतात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण खर्च करतो, कुठे गुंतवणूक करतो. तर तुम्ही हे सगळे प्रत्येक महिन्याला कसे नोंदून ठेवता? अॅप वापरता की एक्सेल वगैरे वापरता? अॅप असेल तर त्याची सुरक्षितता कशी पाहता?
या विषयाबद्दल अजूनही काही माहिती असेल तर सांगा प्लीज.
निर्मला काकू अर्थसंकल्प सांगायला उठल्या की पोटात गोळा येतो. जुन्या संकल्पना नवीन वेष्टनात गुंडाळून त्या जनतेसमोर ठेवण्यात त्यांचा हात धरणारे कोणीच नाही. धर्मद्वेषी अफूची भांग न घेतलेले काही जागते नागरीक आधी आपली अरुणने जेब लुटली असं म्हणायचे परंतू भांग चढलेले त्यांना हुसकावून लावायचे. जे(ब लु)टलींनंतर निर्मला काकू आल्या. आधीच जेब लुटली गेली असल्याने जनतेच्या मालकीचेच स्थावर-जंगम विकून अन त्यानंतर जनतेच्याच दातांना कोरून पोट भरण्याचे कसब त्यांनी महत्प्रयासाने अंगी बाणवले. सराईत पाकीटमाराप्रमाणे जनतेच्या खिशाला चाट मारण्याचे कौशल्य गेल्या ७ वर्षांत चढत्या क्रमाने विकसीत होत आलेले आहे.
जेव्हा पर्यावरणाच्या प्रश्नांची जाणीव झाली तेव्हा अर्थात पहिला काही काळ कार्बन फूटप्रिंट, प्रदूषण, एनर्जी फुटप्रिंट वगैरे संकल्पना समजून घेणे आणि जगात चालू असलेल्या विविध पातळीवरच्या उपायांनी भारावून जाणे यात गेला. त्यातही तंत्रज्ञानातील प्रगती ही फारच भुरळ पाडणारी! मग electric वाहने, वेगवेगळ्या बॅटरीज, सर्व प्रकारची सौरउर्जेवर चालणारी उपकरणे, बायोगॅस, रिसायकलिंग सर्वांविषयी वाचलं, ऐकलं, चर्चा केली. मग इकॉलॉजीच्या कोर्समध्ये निसर्गाविषयी, त्याच्या विविध परिसंस्थांविषयी माहिती, वाचन, त्यांचा अभ्यास हे घडलं.
ATM सेंटर ला जागा भाडेतत्वावर कशी द्यावी??
दुसरे घर (सेकंड होम) घेताय ? तेही कर्ज काढून ? एकदा हे वाचाच !
मला मान्य आहे की ही पोस्ट वाचून तुम्हास मी शेखचिल्ली आहे की काय अशी शंका येईल. पण जे घडलाय ते मी इथे सांगितलंय. मला तुम्ही क्रिटिसिझ करू शकता. पण ते करताना , मी या प्रकरणात खूप मनस्ताप भोगलाय हे समजून घ्या. मी घेतलेला निर्णय कदाचित तुम्हास पटणार नाही , पण मी तो घेतलाय, कारण मी त्या निर्णयाबाबत कन्व्हिन्स्ड आहे. पण मी तुमच्या मताचा सन्मान करतो. मी केलेल्या चुका दुसर्याने करू नये इतकाच माझा उद्देश आहे.