नॉर्डिक देशांशी जवळीक
Submitted by पराग१२२६३ on 7 May, 2022 - 01:56
भारत आणि नॉर्डिक देशांदरम्यानची दुसरी शिखर परिषद 4 मे 2022 ला डॅनिश राजधानी कोपनहेगनमध्ये पार पडली. त्यामध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन, आईसलँडच्या पंतप्रधान कतरिना जोकोब्सदोतीर, नॉर्वेजियन पंतप्रधान जोनास गेर स्चोर, स्वीडिश पंतप्रधान मॅग्डालिना अँडरसन आणि फिनिश पंतप्रधान सॅना मरीन सहभागी झाले होते. कोव्हिड-19 च्या संकटानंतर आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणणे, हवामान बदल, शाश्वत विकास, नवोन्मेष, डिजिटलीकरण, हरित आणि स्वच्छ विकास याबाबत सहकार्य वृद्धिंगत करण्यावर या परिषदेत चर्चा करण्यात आली.
शब्दखुणा: