शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता.
मध्ये मी मित्राबरोबर त्याच्या लवकर रिटायरमेंट बद्दल चर्चा केली आणि त्यावेळी त्याने सध्या जीवनशैलीसाठी साधारण दोघांसाठी २०-२५ हजार रुपये खर्च येतो असे सांगितले होते. थोडेसे खोदून विचारल्यावर कळले के साधारण १० हजार अतिमूलभूत गोष्टींसाठी, ५ हजार मूलभूत गोष्टींसाठी आणि आणि वरचे ५-१० हजार चैनीसाठी आणि इतर खर्चांसाठी असे कळले. आत्यंतिक मूलभूत गोष्टींमध्ये रोटी, कपडा, वीजबिल, सोसायटी मेंटेनेनन्स, गॅस, मोबाईल यांचा समावेश होता. (घर लोन फ्री होते त्यामुळे त्याच्यासाठी समावेश नाही) तसेच मूलभूत गोष्टींमध्ये घरकामासाठी बाई, शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
माझा एक IT मधला मित्र आहे. वय वर्षे ४५. पुण्यामध्ये नामांकित ITकंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. परंतु नोकरीमधील अनिश्चितता, कामाचा ताण, कामातून आधी मिळत असलेला परंतु हळूहळू कमी होत गेलेला रस या सर्व कारणांमुळे वेळेआधीच निवृत्तीचा विचार करतोय. योग्य वेळी IT मध्ये योग्य ठिकाणी असल्यामुळे बऱ्यापैकी माया जमवली आहे. onsite आणि नोकरीमधील बढती वेळेवर मिळत गेल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्याची पत्नी देखील साधारण तेवढ्याच वयाची आहे. गृहिणी आहे. दुर्दैवाने मूलबाळ नाही.
आजकाल अर्थव्यवस्था गाळात चालल्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येतायेत. लोक या बद्दल फार काही बोलताना दिसत नाही. टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांवर भारतात आज काल बऱ्यापैकी सरकारचं नियंत्रण असल्यामुळे क्वचित कुठेतरी एखादी बातमी येते. मायबोलीवर समाजाच्या विविध स्तरांवर काम करणारे लोक आहेत. तुमचे या आर्थिक मंदीविषयी काय विचार आहे आणि ह्यातून बाहेर येण्यासाठी सरकारला काय करावे लागेल? आणि महत्वाचे म्हणजे वैयक्तिक रित्या या मंदीतून वाचण्यासाठी तुम्ही काय प्लांनिंग करत आहेत?
बाकी मंदीला काँग्रेस किंवा भाजप जबाबदार आहे ह्या छाप चर्चा होऊ नये अशी माफक अपेक्षा.
शेअर मार्केटशी मैत्री.........
अर्थाचा अनर्थ
प्रत्येक जीव जंतू आणि प्राण्यांकडून काहीतरी शिकावं अशी आपली संस्कृती सांगते. ही गुंतवणूकीची कला आपण कोणत्या प्राण्या पासून घेतली काय माहीत! कदाचित ते श्रेय मुंग्याना आणि मधमाशाना जात असावे. पोर कमवायला लागलं की वडीलांचा पहीला सल्ला असतो की “चार पैसे गाठीला ठेव रे! सगळे उधळून टाकू नको.” हे गाठीला ठेवलेले पैसे परत नक्की कधी गाठ पडणार अशा माझ्या प्रश्नावर पिताश्रीनी मला बरंच अनाकलनीय लांबलचक उत्तर दिले होते. उत्तराची एकंदरीत लांबी रूंदी पाहता आणि खोली न समजता मी सगळं मान्य करून टाकलं होतं.
कार्यालयाच्या पाठीमागे
सगळे व्यवहारात व्यस्त
अन रांगेमधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"
सगळंच झालय फार महाग
काय राहिलंय स्वस्त
तरीही सगळे आनंदात
हो त्यांचंच चाललंय मस्त
अन रांगेमधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"
शासक आमचे आरामात
त्यांनी पैसा केला फस्त
पोलीस धाडलेत वेशीबाहेर
गावात चोरांचीच गस्त
अन गावामधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"
शेअर मार्केट च्या तुंबाडच्या विहिरीत स्टोक , इंडेक्स असे अनेक हस्तर कमरेला पैशाच्या थैल्या लावून पडलेले असतात,
तर आपण तयारीत राहायचे , ग्राफवर दोन इंडिकेटर लावून घ्यायचे,
1 फ्रेकटर चावस बॅंडस
यात एक वरची लाईन असते व एक खालची लाईन असते , हस्तर यांच्या दरम्यान फिरत असतो, आपल्या सोयीने दोन रंग घ्यावेत