शीर्षक :- सावली
कशी उन्हात सावली
जशी ममतेची माया
कधी कळेल कुणाला
अशी शीतल ही छाया
बाप बाप माझा असा
राब राबतो शेतात
त्याचं कष्टाचं जगणं
जातो भिजून घामात
माया वात्सल्याचा झरा
वाहे सुखी संसारात
लागे बापाचं काळीज
जशी नदी सागरात
अहोरात्र कष्टकरी
बाप माझा शेतकरी
त्याच्या मेहनती मुळे
मिळे सुखानं भाकरी
धरी नांगर शेतात
नसे काहीच पायात
पाय भरतं काट्यानं
तरी नांगर ओढत
उन्हातल्या सावलीला
कसा मायेचा पाझर
तसं बापाचं वागणं
घरा दारात वावर
शीर्षक :- बळीराजा
कष्ट करीतो उन्हात काळ्या मातीत राबतो
बळीराजा तू माझा रं आत्महत्या का करितो
काळ्या मातीत फुटतो त्याच्या कष्टाचा अंकुर
रान फुलवितो सारं मनगटी बळावर
तेव्हा तुझ्या चेहऱ्याला साज घामाचा चढतो
जरी मातीच्या या भिंती त्यात मायेची हो ऊब
कष्टकरी बळीराजा त्याची किमया हो खुब
बीज पेरून आनंदी जसं सोनं पिकवीतो
ओला पडला दुष्काळ होई पिकांवर हानी
कधी काळी पाहिलेल्या फिरे स्वप्नांवर पाणी
लेणं कुंकुवाचं माझं धनी सुखात राहो दे
हॅलो! अरे काका कुठायंस? १५ मिनिटं झाली मला येऊन इथे!
"आलो आलो.अगदी दारात कॅफेच्या."
"हं बोल अमित काय घ्यायचं? मस्त आयरिश कॉफी घेऊया? छान मिळते इथे!"
"मागव तुला काय हवं ते.पण आधी इथं का बोलवलंयस ते सांग!आधीच सकाळच्या प्रकरणामुळे माझं डोकं फिरलंय!"
"हो हो सांगतो.धीर धर! ते फिरलेलं डोकंच ताळ्यावर आणण्यासाठी तुला बोलवलंय इथे!"
"म्हणजे?"
कार्यालयाच्या पाठीमागे
सगळे व्यवहारात व्यस्त
अन रांगेमधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"
सगळंच झालय फार महाग
काय राहिलंय स्वस्त
तरीही सगळे आनंदात
हो त्यांचंच चाललंय मस्त
अन रांगेमधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"
शासक आमचे आरामात
त्यांनी पैसा केला फस्त
पोलीस धाडलेत वेशीबाहेर
गावात चोरांचीच गस्त
अन गावामधल्या आम्हाला
सांगा "तसलं काही नसतं"