तुंबाड भाग 2 : रेंको , फ्रेकटर चावस बॅंडस, डे ट्रेडिंग

Submitted by BLACKCAT on 7 February, 2019 - 06:37

शेअर मार्केट च्या तुंबाडच्या विहिरीत स्टोक , इंडेक्स असे अनेक हस्तर कमरेला पैशाच्या थैल्या लावून पडलेले असतात,

तर आपण तयारीत राहायचे , ग्राफवर दोन इंडिकेटर लावून घ्यायचे,
1 फ्रेकटर चावस बॅंडस
यात एक वरची लाईन असते व एक खालची लाईन असते , हस्तर यांच्या दरम्यान फिरत असतो, आपल्या सोयीने दोन रंग घ्यावेत

2. शेर प्राईस चा ग्राफ
ह्यासाठी रेंको चार्ट लावावा, ह्यात हिरव्या व लाल रंगाचे छोटे छोटे आयत तयार होतात , हस्तर वर उडाला की हिरवा ग्राफ , हस्तर खाली आला की लाल ग्राफ
हे दोन्ही मिळून आपले रिंगण आखून घ्यावे
बुलीश -
1. खालच्या लाईनच्या जवळ लाल आयत हिरवा होणे व वरच्या दिशेकडे वाटचाल
2. हिरवा आयत वरची लाईन मोडून वर जाणे
बेरिष
1. वरच्या लाईनला तोडून लाल आयत खाली येणे व खालच्या दिशेने वाटचाल
2. लाल आयत खालची लाईन सोडून खाली उतरणे
पोझिशन घेऊन दोन चार ठोकळे झाले की नाणी गोळा करून दोर धरावा.
यात स्विंगही करता येईल , पण फुल डे बसावे लागेल,
मी ACC , short करून प्रॉफिट घेतले, सलग दोन दिवस.

Screenshot_2019-02-07-12-31-07.pngScreenshot_2019-02-07-12-38-10.png

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

3m चार्ट वर सुपरट्रेंड (१४,२) बऱ्या पैकी सिग्नल देतो.
आणि vwap व rsi(१४) सुद्धा असू द्यावेत.
परंतु पोजिशन लवकरात लवकर क्लोज करण्याचे बघावे. नाही तर हस्तर खाऊन टाकेन.

साधारणपणे १ वाजून १० मिनिटांनी ७२६५ ला buy सिग्नल मिळाला. ७२५० चा stoploss घेऊन पोजिशन २ वाजून १० मिनिटांपर्यंत ७३२० ला जाताना दिसत आहे. साधारणपणे ५०-५५ points चा profit=३५००रुपये

पूर्वी करत होतो, परंतु सध्याच्या कंपनीच्या पॉलिसीत डे ट्रेडिंग बसत नाही, म्हणून तूर्तास विराम.

हस्तरची उपमा आवडली. आणि शब्दशः खरी आहे. तुम्ही उल्लेखलेले इंडिकेटर्स कधी वापरले नाहीत. हे स्टॉक्स वर चालतात की इंडेक्सवर पण ?

3m चार्ट वर सुपरट्रेंड (१४,२) बऱ्या पैकी सिग्नल देतो. << 3m चार्ट म्हणजे ? ३ मि ?

सगळ्यावर चालतो , स्टोक , इंडेक्स , कमोडिटी.

शक्यतो चार अंकी शेअर घ्या , त्यात 20-40 रु हालचाल असते , पाच रु आरामात मिळतात , उदा ACC , HDFC , kotak bank , LT, HDFC bank, Asian paint.

माझे एफ एन ओ अजून सुरू झाले नाही ,कमोडिटी पण नाही, पण ग्राफ सगळ्यांचे दिसतात. सध्या cash मार्केट 100 शेरवरच सुरू आहे , इंडेक्सचे ग्राफ लावून त्याच्या कोल पुटवर करणे , हेही जमेल , पण मला कैश बरे वाटत आहे,

स्टोप्लॉस वगैरे वापरण्याची गरज पडली नाही .

zeroda मध्ये 60 डे चॅलेंज असा एक कॉलम आहे , तिथे आपली प्रगती दिसते ,

3 मिनिट ग्राफ आहे

माझा मागच्या आठवड्यात 67k प्रॉफिट आहे. मी रोज हस्तरची कॉलर पकडून त्याला उलटा करतो आणि पैशांचा पाऊस पाडतो. 9.30 वाजले की गुहेत उतरतो. 10.30 वाजेपर्यंत बाहेर येतो कधी जास्त वेळ लागला तर 11 11.30 त्याच्यापुढे नाही. ट्रेल केला तर 3 पर्यंत पण थांबतो पण स्टॉप लॉस शिफ्ट करून जास्त लक्ष नाही देत. मस्त मजा येते.

ते फायर्स वेब मस्त आहे, एकदा का तुमच्या बाजूने शेअर झुकला की ट्रेल करायचा, फ्रॉफिट किती झालाय ते चार्ट वरच समजतं तसंच तुम्हाला स्टॉप लॉस शिफ्ट करायचा असेल तर ती स्टॉप लॉसची दांडी उचलून वर खाली कुठे पाहिजे तिथे शिफ्ट करायची

Moving averages वापरतो पण त्यांचा वापर फक्त रेफरन्स साठी होतो, मी जास्त करून सपोर्ट रेझीस्टंट यांचा वापर करून एन्ट्री घेतो. स्टॉक सिलेक्शन डेली कँडल वर करतो, आणि एन्ट्री 5 नाहीतर 15 मिनिटाच्या कँडलवर करतो.

हो होऊ शकते, फक्त तुमचा सेल्फ कंट्रोल आणि पेशन्स पाहिजे, तुम्ही ठरवा दिवसाला एक अमुक रकमेचा लॉस मी घेऊ शकतो.तुम्ही ठरवलं की दिवसात मी 500 रुपयांचा लॉस घेऊ शकतो, तर जेव्हा तुमचा लॉस 500 रूपये होईल तेव्हा तुम्ही ताबडतोब ट्रेडींग थांबवली पाहीजे. पाचशे रुपयांचा लॉस झालाय आपण अजून एक शेअर घेऊ आणि लॉस घालवून टाकू असा विचार मनात आला तर ते सगळ्यात धोकादायक आहे, तसेच जर एखादा शेअर तुम्ही घेतलेल्या किमतीपासून 0.5% move झाला तर तुम्हाला त्या शेअर मध्ये लॉस होता कामा नये.

मी सुरवात केली तेव्हा खूप घाबरायचो मोठी रक्कम गुंतवायला, फक्त 1 qty शेअर घ्यायचो, आता मोठी रक्कम गुंतवतो, 28 नोव्हेंबर 2018 ते आतापर्यंत मी रोज ट्रेडिंग करतोय आणि या कालावधीत फक्त 5 ते 6 दिवस मला लॉस झालाय बाकी सगळे दिवस मी प्रॉफिट मध्ये आहे.

माझ्यामते रोज रोज ट्रेड करण्याची गरज नाही. इंडिकेटर जेव्हा स्ट्रॉंग सिग्नल देतील, तेव्हा पोसिशन घ्या आणि प्रॉफिट मिळाल्यावर किंवा स्टॉप लॉस ट्रिगर झाल्यावर एक्सिट करा

Yacha photo takla tar samjayla madata hoil....Zerodha chya KITE madhe prayatn karun pahila pan option milat nahiye. Maf kara..marathi type karta yet nahi mhanun ase lihit aahe...lavkarch shiken...

तुम्ही सगळे जे काही बोललात ते माझ्यासाठी ग्रीक आणि लॅटिन होतं. पण मला फार इच्छा आहे शेअर्सच्या जगाची माहिती करून चिरीमिरी कमवायची आणि गमवायची सुद्धा. कुठून सुरुवात करावी? मी काही एक रक्कम फक्त यासाठी रिझर्व्ह केली आहे की जेव्हा आयुष्यात वेळ मिळेल तेव्हा शेअर्सच्या उचापती करत बसायच्या.