शिक्षण

ऊर्जेचे अंतरंग-१९: किरणोत्साराचे प्रभाव आणि त्यांचे मापन

Submitted by नरेंद्र गोळे on 21 December, 2011 - 06:23

जेव्हा किरणोत्सार एखाद्या माध्यमातून जात असतो तेव्हा त्या माध्यमाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मूलकीकरण होते किंवा ते माध्यम उत्तेजित अवस्थेत पोहोचते. सजीवांमध्ये हे मूलकीकरण किंवा ही उत्तेजना, शरीराचे अनेक कण जसे की प्रथिने, न्यूक्लिक आम्ल इत्यादींना नष्ट करते. हे सर्व कण शरीराकरता अत्यंत महत्वाचे असतात. म्हणून किरणोत्सार, सजीवांच्या शरीरांसाठी धोकादायक असतो. अल्फा आणि बीटा किरणे माध्यमास प्रत्यक्षरीत्या मूलकित करतात.

ऊर्जेचे अंतरंग-१८: सर्वव्यापी किरणोत्सार

Submitted by नरेंद्र गोळे on 16 December, 2011 - 00:22

किरणोत्सार आपल्या सभोवार पसरलेला आहे. एका सामान्य माणसाला सगळ्या स्त्रोतांकडून मिळणारा किरणोत्साराचा संसर्ग जर १००% धरला, तर त्यातला किती संसर्ग कशापासून आपणास होत असतो ते खाली दिलेले आहे.

१. घरेः आपल्याला मिळणार्‍या किरणोत्साराचा ५५% हिस्सा रेडॉनद्वारे मिळतो. रेडॉन हा एक वायू आहे जो जमिनीतील नैसर्गिक युरेनियमपासून उत्पन्न होतो. रेडॉन जो घरांतून दडलेला असतो.

२. शुश्रुषालयेः आपल्याला मिळणार्‍या किरणोत्सारापैकी सुमारे १५% किरणोत्सार वैद्यकीय आणि दंत-क्ष-किरणचिकित्सेतून मिळतो.

शब्दखुणा: 

ऊर्जेचे अंतरंग-१७: किरणोत्सार, विश्वकिरणे आणि मूलकीकरण

Submitted by नरेंद्र गोळे on 31 October, 2011 - 08:35

कोणत्याही पदार्थातून उत्स्फूर्तपणे निघणार्‍या ऊर्जेला किंवा कणांना उत्सर्जन म्हणतात. किरणोत्सारी पदार्थांमुळे होणारे उत्सर्जन प्रामुख्याने ३ प्रकारचे असते. अल्फा, बीटा आणि गॅमा. ह्या उत्सर्जनास अणुकेंद्रकीय उत्सर्जन म्हणतात. कारण ते अणूंच्या गर्भातून उगम पावत असते. अल्फा कण म्हणजे हेलियमचे अणुकेंद्रक (nucleus) असते, तर बीटा कण म्हणजे ऋणक किंवा विजक (electron) असतात. काही जड अणू विद्युतभार रहित कण उत्सर्जित करतात, ते म्हणजे विरक्तक (neutrons) असतात.

ऊर्जेचे अंतरंग-१६: प्रारणे आणि अणूची संरचना

Submitted by नरेंद्र गोळे on 28 October, 2011 - 23:15

प्रारणे म्हणजे किरणे

प्रारणे म्हणजे किरणे. मग ती जम्बुपार (अल्ट्रा-व्हायोलेट) किरणे असोत, दृश्य प्रकाशाची असोत, अथवा अवरक्त (इन्फ्रारेड, उष्णतेची) असोत. ह्या सगळ्या किरणांशी तर आपण चिरपरिचित आहोतच. ह्या किरणांत असते वस्तूच्या रंग-रूपा-बाबतची माहिती आणि हो, सोबतच असते प्रखर ऊर्जा. ह्या सगळ्यांचे स्वरूप असते विद्युत-चुंबकीय लहरींचे. स्त्रोत, बहुधा असतो सूर्य. अर्थातच चंद्र, तारे व अन्य अवकाशीय वस्तूही आपल्याला प्रारणे पाठवतच असतात. हल्ली आपण वैद्यकीय उपयोगांमुळे, क्ष-किरणांनाही चांगलेच ओळखतो. ती तर आणखीनच प्रखर असतात. मनुष्यदेहात केवळ हाडांनीच अडतात.

मज्जाखेळ [3-5]/[5-7]: ताल/ ठेक्यांचा खेळ

Submitted by सावली on 3 October, 2011 - 23:13

हा खेळ मी इथल्या लेकीच्या डे केअर मधे पाहिला. तिथे दर आठवड्याला एकदा अर्धा पाऊण तास यासाठी ठरलेला असतो. आम्ही घरी अजुन तरी कधी खेळलेलो नाही पण एकुणात मलाच खुप मजा येते पहायला. खरतर मी तीला घ्यायला जाते तेव्हा नुकतीच याची सुरुवात झालेली असते. मग मी पुर्णवेळ थांबुन बघते. शक्य होईल तेव्हा असे घरी खेळायचे आहे. इथे माझ्या नोट्स साठी टाकतेय. पण इथेही कुणाला करुन बघता येईल. साधारण संगित खुर्ची सारखेच पण अजुन जास्त प्रकार आहेत.
कुणाला अजुन काही प्रयोग करायचे असतील, गंमती इथे देण्यासारख्या असतील तर इथे नक्की द्या.

विषय: 

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

Submitted by अभय आर्वीकर on 26 September, 2011 - 01:03

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

मुलांसाठी उपयुक्त अ‍ॅप्स

Submitted by मेधा on 14 September, 2011 - 09:44

आयपॅडच्या अ‍ॅपस्टोअरमधे शैक्षणिक या प्रकाराखाली हजारो अ‍ॅप्स दिसतात व त्यात रोज भर पडत असते. ज्यांनी अशा प्रकारची अ‍ॅप्स वापरली आहेत, त्यांनी आपापले अनुभव इथे लिहिले, रेकमेंडेशन लिहिले तर इतरांना त्या माहितीचा उपयोग होईल.

विषय: 

"मैत्र जिवांचे" सामाजिक संस्था : गणेशोत्सवानिमीत्त उपक्रम

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 August, 2011 - 02:38
तारीख/वेळ: 
18 August, 2011 - 14:30 to 31 August, 2011 - 02:30
ठिकाण/पत्ता: 
महाराष्ट्र

प्रिय मायबोलीकर,

"मैत्र जिवांचे"या आपल्या सामाजिक संस्थेचे उद्घाटन झाल्याला बराचसा अवधी उलटला आहे. संस्थेच्या पुढील उपक्रमाबद्दल विचारणा करण्यासाठी आम्हाला अनेक उत्साही मायबोलीकरांचे दुरध्वनी येत असतात. अनेक जण आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने संस्थेच्या कार्याला हातभार लावायचा प्रयत्न करताहेत.

प्रांत/गाव: 

ऊर्जेचे अंतरंग-१५: फ्लेमिंग यांचे नियम

Submitted by नरेंद्र गोळे on 17 August, 2011 - 07:57

चुंबकीय क्षेत्र आणि विद्युतक्षेत्र यांत घनिष्ट संबंध असल्याचे खूपच पूर्वीपासून लक्षात आलेले आहे. एका क्षेत्रात कुठलेही बदल घडत असल्यास ते दुसर्‍या क्षेत्रास जन्म देतात असेही आढळून आले. या नव्या क्षेत्राच्या निर्मितीची दिशा निश्चित करणारा अभ्यास फ्लेमिंग यांनी केला होता.

आयआयटी स्वप्न - वास्तव

Submitted by मंजूताई on 2 August, 2011 - 02:56

जुलै महिना म्हणजे पालक व विद्यार्थ्यांसाठी धावपळीचा. अकरावी, अभियांत्रिकी, आयआयटी,वैद्यकीय, परदेशी उच्चशिक्षण अश्या अनेक प्रवेश प्रकिया करण्यात काही यशस्वी पालक-विद्यार्थी दंग आहेत तर आता पुढे काय? हा प्रश्नाने त्रस्त झालेले हताश पालक-विद्यार्थी आहेत. असे हताश पालक आपण केलेल्या कष्टाचा,खर्चाचा, वेळेचा त्याबदलात आपल्या पदरात काय पडले ह्याचा हिशोब मांडत बसले आहेत. मोठं ध्येय असणे हा नक्कीच गुन्हा ठरत नाही. आपल्या पाल्याने उच्च शिक्षित असावं, खूप पैसा कमवावा हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं आणि असावंही.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - शिक्षण