राजस सध्या प्लेग्रूप (प्रायव्हेट प्लेग्रूप) मध्ये आहे. सध्या तरी ज्या प्लेग्रूप मध्ये आहे तिथेच नर्सरीसाठी कंटिन्यू करूया असे ठरवितो आहोत. साईड बाय साईड कल्याणमधल्या शाळांची माहिती काढणे चालू केले आहे (बोर्ड कुठले, फी स्ट्रक्चर काय, स्कूल बस ची फॅसिलिटी वै. वै.).
ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल च्या प्रीस्कूल्स ची चेन खूप फेमस आहे असे ऐकले आहे. प्रीस्कूल च्या यशानंतर त्यांनी आता प्रायमरी आणि हायस्कूल या प्रांतातही शाळांचा विस्तार करायला सुरुवात केल्याचे दिसते.
गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. परंतु या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई भाटवडेकर व संस्थेच्या देखभालीतील काही मुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत! या भेटीचा हा वृत्तांत व अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलाय!
स्थळ : पुण्यातील सुप्रसिद्ध बी. एम. सी. सी. कॉलेजचे टाटा सभागृह. सकाळची वेळ. खच्चून भरलेल्या सभागृहातील तरुण विद्यार्थिनींमध्ये उत्सुकता, कुतूहल व कार्यक्रम सुरू होण्याअगोदरची अस्वस्थ चुळबूळ. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते. पांढरे टी-शर्ट व निळ्या जीन्स या वेशातील तरतरीत कॉलेज कन्या मायक्रोफोनचा व मंचाचा ताबा घेतात. समोरील श्वेतपटावर सरकणार्या अतिशय नाजूक व संवेदनशील विषयावर आधारित चित्रांसोबत दिल्या जाणार्या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच सभागृहातील अस्वस्थ चुळबूळ थांबते व सार्या श्रोत्या तरुणी - स्त्रिया बघता बघता कार्यक्रमाच्या विषयात समरस होऊन जातात...
अनुज बिडवेसंबंधीची बातमी मी गेले काही दिवस फॉलो करते आहे.
त्या घटनेतलं कारुण्य दुर्लक्षित करायचं नाहीच. पण तरीही परदेशात राहून शिक्षण घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दलचे इतर अनेक विचार डोक्यात घोळतायत. माझा मुलगा येत्या चार वर्षांत पदवीधर होईल. त्यापश्चात त्याच्यापुढेही परदेशी शिक्षणाचा पर्याय खुला होईलच. त्यामुळे तर सध्या त्या बातमीशी, संबंधित तपशीलांशी मी अधिक रिलेट होते आहे.
प्रारण संवेदक उपकरणे१ मुख्यतः दोन प्रकारची असतात.
१. दर-मापक उपकरणे आणि
२. व्यक्तिगत मात्रा-मापक उपकरणे.
किरणोत्सार पाहताही येत नाही आणि अनुभवताही येत नाही. मात्र त्याचा स्वास्थ्यावर हानीकारक प्रभाव पडतो. म्हणून, किरणोत्सारी क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तींची देखभाल करणे अत्यंत आवश्यक असते. ह्या देखभालीच्या साह्याने प्रत्येक व्यक्तीस मिळणार्या मात्रेची नोंद ठेवली जाते, ज्यामुळे हे सुनिश्चित करणे शक्य होते, की कोणत्याही कर्मचार्यास निर्धारित मात्रेपेक्षा जास्त मात्रा मिळू नये. किरणोत्सार देखभाल अनेक प्रकारे केली जाते.
१. व्यक्तीगत अवशोषित किरणोत्सार मात्रेचे मापन
२. किरणोत्सारी क्षेत्रातील किरणोत्साराचे मापन
जेव्हा किरणोत्सार एखाद्या माध्यमातून जात असतो तेव्हा त्या माध्यमाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मूलकीकरण होते किंवा ते माध्यम उत्तेजित अवस्थेत पोहोचते. सजीवांमध्ये हे मूलकीकरण किंवा ही उत्तेजना, शरीराचे अनेक कण जसे की प्रथिने, न्यूक्लिक आम्ल इत्यादींना नष्ट करते. हे सर्व कण शरीराकरता अत्यंत महत्वाचे असतात. म्हणून किरणोत्सार, सजीवांच्या शरीरांसाठी धोकादायक असतो. अल्फा आणि बीटा किरणे माध्यमास प्रत्यक्षरीत्या मूलकित करतात.
किरणोत्सार आपल्या सभोवार पसरलेला आहे. एका सामान्य माणसाला सगळ्या स्त्रोतांकडून मिळणारा किरणोत्साराचा संसर्ग जर १००% धरला, तर त्यातला किती संसर्ग कशापासून आपणास होत असतो ते खाली दिलेले आहे.
१. घरेः आपल्याला मिळणार्या किरणोत्साराचा ५५% हिस्सा रेडॉनद्वारे मिळतो. रेडॉन हा एक वायू आहे जो जमिनीतील नैसर्गिक युरेनियमपासून उत्पन्न होतो. रेडॉन जो घरांतून दडलेला असतो.
२. शुश्रुषालयेः आपल्याला मिळणार्या किरणोत्सारापैकी सुमारे १५% किरणोत्सार वैद्यकीय आणि दंत-क्ष-किरणचिकित्सेतून मिळतो.
कोणत्याही पदार्थातून उत्स्फूर्तपणे निघणार्या ऊर्जेला किंवा कणांना उत्सर्जन म्हणतात. किरणोत्सारी पदार्थांमुळे होणारे उत्सर्जन प्रामुख्याने ३ प्रकारचे असते. अल्फा, बीटा आणि गॅमा. ह्या उत्सर्जनास अणुकेंद्रकीय उत्सर्जन म्हणतात. कारण ते अणूंच्या गर्भातून उगम पावत असते. अल्फा कण म्हणजे हेलियमचे अणुकेंद्रक (nucleus) असते, तर बीटा कण म्हणजे ऋणक किंवा विजक (electron) असतात. काही जड अणू विद्युतभार रहित कण उत्सर्जित करतात, ते म्हणजे विरक्तक (neutrons) असतात.
प्रारणे म्हणजे किरणे
प्रारणे म्हणजे किरणे. मग ती जम्बुपार (अल्ट्रा-व्हायोलेट) किरणे असोत, दृश्य प्रकाशाची असोत, अथवा अवरक्त (इन्फ्रारेड, उष्णतेची) असोत. ह्या सगळ्या किरणांशी तर आपण चिरपरिचित आहोतच. ह्या किरणांत असते वस्तूच्या रंग-रूपा-बाबतची माहिती आणि हो, सोबतच असते प्रखर ऊर्जा. ह्या सगळ्यांचे स्वरूप असते विद्युत-चुंबकीय लहरींचे. स्त्रोत, बहुधा असतो सूर्य. अर्थातच चंद्र, तारे व अन्य अवकाशीय वस्तूही आपल्याला प्रारणे पाठवतच असतात. हल्ली आपण वैद्यकीय उपयोगांमुळे, क्ष-किरणांनाही चांगलेच ओळखतो. ती तर आणखीनच प्रखर असतात. मनुष्यदेहात केवळ हाडांनीच अडतात.