बरेच दिवसांपासून मनात होते की वाशीच्या मिनी सी शोअर बद्दल चार शब्द लिहावेत. तिथले चार फोटो माबोकरांशी शेअर करावेत. पण प्रत्यक्षात हा विचार अंमलात आणायला गेलो तर चार हजार शब्दांत आणि चारशे फोटोतही न मावणारा विषय आहे तो. कारण त्या जागेशी एक वेगळेच नाते आहे.
जवळपास सहा वर्षांपुर्वी मी जेव्हा मुंबई सोडून नवी मुंबईकर व्हायचा निर्णय घेतला तेव्हा तो ईतका कठीण होता की मला थेट सारे पाश तोडणे जमलेच नाही. नवी मुंबईत मालकीचे घर घेणे शक्य असूनही मी भाड्याच्या घरात राहायचे ठरवले. आधी आपल्याला हे शहर जमते का बघूया. न जमल्यास गड्या आपली मुंबईच बरी असा त्यामागे विचार होता.
काल आमचे लाईट बिल आले
फक्त रुपये २१ हजार ७५० फक्त
- वाशी, नवी मुंबई
आज सकाळीच आंघोळ करून तक्रार करायला गेलो.
तर हि भली मोठी रांग !
सोशल डिस्टंसिंगच्या आईशीची तैशी...
तक्रारीची रांग वेगळी आहे का बघायला पुढे गेलो. तर आत गेलेली एक बाई बडबडत बाहेर आली...
"काही फायदा नाही रांगेत उभा राहायचा. जे आलेय ते बिल आधी भरा मग आम्ही ॲडजस्ट करू असे म्हणताहेत"
हे ऐकून रांगेतल्या एका बाईच्या अंगतले त्राणच गेले. तिने तिथेच बसकन मारली. म्हणाली, कुठून भरू? साठ हजार रुपये बिल आलेय...
शनिवारची संध्याकाळ, सात-साडेसातचा सुमार, नेहमीपेक्षा बरीच रिकामी ट्रेन. हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन रिकामी, की ट्रेन रिकामी असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. पण खिडक्या बंद करूनही सुरसुरत आत शिरत होता. किंबहुना बारीकश्या फटीतून तीरासारखा अंगावर झेपावत होता. कसलाही आवाज न करता. जे चार चौदा सहप्रवासी होते त्यांची वार्याचा विरुद्ध दिशेला बसायला मारामारी चालू होती. कसलेही भांडण न करता. निदान उबेसाठी म्हणून कोणाच्या तरी सोबतीची गरज यावेळी भासते तसे माझ्याबरोबर कोणी नव्हते.
मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.