काही कामानिमित्त मागील गुरुवारी कामशेतला जावे लागले. काम कधी होईल याची कल्पना नव्हती. एवढ्या लांब जाणार असल्याने कुठेतरी फेरफटका करावा असे मनात होते. पुणे जिल्ह्यात विशेष करून कामशेत मळवली परिसरात अशा काही लेण्या आहेत. पूर्वी (आताही) किल्यांवर भटकंती करायला मला खूप आवडायचे. गडांवर हिंडताना तेथील परिसरातील या लेण्या पाहण्याचा योग आला होता. तेव्हा हिंडताना या लेण्या कोणी कोरल्या, त्याचे प्रयोजन काय असेल असे अनेक प्रश्न पडायचे. त्या विषयी थोडा बहुत अभ्यास ही केला. भाजे, कार्ला व बेडसे लेणी या त्यापैकीच काही. दुपारी १ पर्यंत काम संपले. वेळ मिळाला.
मोरधन – कावनई – कपिलधारा तीर्थ – त्रिंगलवाडी (लेणी व दुर्ग):: एका दिवसात!!
सह्याद्रीत भटकंतीमध्ये आपली सोबत करतात - इतिहासाची स्मरणं अन् या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा! कधी प्राचीन सागरी बंदरं, जुन्या व्यापारी वाटा, कोकण व देश या भूभागांना जोडणा-या घाटवाटा; तर कधी संरक्षणार्थ बांधलेले दुर्ग/किल्ले, विश्रामासाठी अन् धर्मप्रसारासाठी कोरलेली लेणी हे सारं आपण समजून घेऊ लागतो. निसर्गाशी जुळवून घेताना जीवनसंस्कृती कशी विकसित होत गेली असेल, याचा अंदाज बांधू लागतो. विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा एका ‘अपरिचित, पण अफलातून’ कोरीव लेण्यांच्या रूपानं आम्हांला कश्या गवसल्या, त्याची ही कथा!
भाग३.लेण्यांपाशी पोहोचलो तेंव्हा बारा वाजले होते .हे सर्व १७-१८विहार आहेत ,एका चिंचोळ्या धोकादायक पायवाटेने जोडलेले आहेत .पावसाळ्यात येथे अपघात झाले आहेत .एक विहार फारच मोठा आहे .येथे स्वातंत्र्यवीर वासुदेव बळवंत फडके यांनी काही दिवस आसरा घेतलेला तशी तेथे पाटी आहे . विहारांच्या खिडक्यांवर नालाच्या आकाराचे शिल्प आहे ,एक मातीचा स्तुप आहे पण बुध्दाची मुर्ती कोठेही नाही . याचा अर्थ लेण्यांचा काळ इ .स .पूर्व दुसऱ्या शतकातील हीनयान काळातला .कार्ले , भाजे अथवा बेडसाच्याही अगोदरचा .दोन तीन टाकी होती पण पाणी आटलेले .दगड ठिसूळ आहे आणि बरीच पडझड झालेली आहे .थोडा वेळ आराम करून दीड वाजता परत फिरलो .
ठाणाळे लेणी .मागच्या आठवड्यात १-२ मार्च २०१३ ला तेलबैला करून लेण्याच्या मार्गे ठाणाळे गावात येणार होतो .एका गाववाल्याने टॉवरजवळून खाली जाणारी वाघजाई घाटाची वाट दाखवली .ही वाट चांगली मळलेली आहे .टॉवर खालच्याच डोंगराच्या पुढे आलेल्या पोटात तेलबैलाच्या जवळपास तीन चतुर्थाँश उंचीवर ही लेणी आहेत .वाघजाई वाट सोडून डावीकडे वळलो ,स्पष्ट असा काही मार्ग दिसेना .ओढ्याच्यानाळेतून उतरलो पण कड्यावरच यायचो .तीन लिटर पाणी असल्यामुळे काही काळजी नव्हती .एक तास गेला तरी लेणी दिसेनात.
मागच्या पडझड झालेली आहे .थोडा वेळ आराम करून दीड वाजता परत फिरलो .