ठाणाळे लेणी भाग २

Submitted by Srd on 12 March, 2013 - 05:53

ठाणाळे लेणी .मागच्या आठवड्यात १-२ मार्च २०१३ ला तेलबैला करून लेण्याच्या मार्गे ठाणाळे गावात येणार होतो .एका गाववाल्याने टॉवरजवळून खाली जाणारी वाघजाई घाटाची वाट दाखवली .ही वाट चांगली मळलेली आहे .टॉवर खालच्याच डोंगराच्या पुढे आलेल्या पोटात तेलबैलाच्या जवळपास तीन चतुर्थाँश उंचीवर ही लेणी आहेत .वाघजाई वाट सोडून डावीकडे वळलो ,स्पष्ट असा काही मार्ग दिसेना .ओढ्याच्यानाळेतून उतरलो पण कड्यावरच यायचो .तीन लिटर पाणी असल्यामुळे काही काळजी नव्हती .एक तास गेला तरी लेणी दिसेनात. ऊन चढू लागले मग मागे फिरून वाघजाईनेच येऊ लागलो ,ठाणाळे गावाचा कातकरी पाडा तरी दिसत राहातो .दिडशे मिटर ऊंचीवर आलो असेन येथे पाण्याची दोन टाकी उघड्यावरच आहेत .पाणी होते .हात पाय धुतले डोक्यावर थोडे ओतले .गारवा आला . बाजूलाच कातळात कोरलेल्या पायऱ्‍यांवरून एक वाट पुन: डोंगरात जाताना दिसली . पण या ऊंचीवर लेण्या नाहीत त्यामुळे तिकडे न जाता खाली गावात पोहोचलो .पुन: एकदा येऊन ठाणाळे गावातून फक्त लेणी पाहून परत जायचे असं ठरवलं . येथे ठाणे (६.१५) ते ठाणाळे (१०.००) ,दुपारी चार ठाणे ,आणि संध्या६.४५ पाली बस येतात . सकाळी डोंबिवलीहून सवापाचची पनवेल बसने निघालो .सवा सहाला पनवेलला गेलो . ठाण्याहून येणारी ठाणाळे बस सवासातला मिळाली .पाली साडे नऊ .पुन: पावणे दहाला निघून सवादहाला ठाणाळे गावात आलो . हीच बस रेल्वेने नागोठाणेला(८.३०) येऊन रिक्शाने पालीला आल्यासही मिळते .अथवा पहिल्या खोपोली रेने खोपोली (७.१५)पुढे शिळ फाट्यावर आठ वाजता धरता येईल .ठाणाळे गावात शाळेच्या ऊजवीकडच्या घरांमागून मागच्या ओढ्यात उतरलो .ओढा ओलांडून पलिकडच्या टेपावर आलो .पावसाळ्यात ओढा पार करता येत नाही . गावातून रस्त्यानेच पुढे जायचे आणि पुलावरून इकडे यायचे . येथे वाट ओढ्याला उजवीकडे ठेऊन हळूहळू चढते .मातीचीच आहे कुठेही धोकादायक खडक चढावा लागत नाही .परंतु परत येताना चुकीच्या ठिकाणी वळल्यास आपण दुसऱ्‍याच डोंगरात जातो .त्यामुळे जाता जाता तीन तीन दगडांची लगोरी करत गेलो .एकदा का १५० मिटर्सच्यावर गेलो कि मग धोका नाही . २५०मि .ला एक ओढा लागला .खळग्यांत पाणी होते .पुढे डावीकडचा आणि उजवीकडचा डोंगर एकत्र येतात . येथे डावीकडे वर जायचे कि अर्धा तासाने लेणी दिसायला लागतात . पश्र्चिमाभिमुख आहेत ..लेण्यांपाशी पोहोचलो तेंव्हा बारा वाजले होते .हे सर्व १७-१८विहार आहेत ,एका चिंचोळ्या धोकादायक पायवाटेने जोडलेले आहेत .पावसाळ्यात येथे अपघात झाले आहेत .एक विहार फारच मोठा आहे .येथे स्वातंत्र्यवीर वासुदेव बळवंत फडके यांनी काही दिवस आसरा घेतलेला तशी तेथे पाटी आहे . विहारांच्या खिडक्यांवर नालाच्या आकाराचे शिल्प आहे ,एक मातीचा स्तुप आहे पण बुध्दाची मुर्ती कोठेही नाही . याचा अर्थ लेण्यांचा काळ इ .स .पूर्व दुसऱ्‍या शतकातील हीनयान काळातला .कार्ले , भाजे अथवा बेडसाच्याही अगोदरचा .दोन तीन टाकी होती पण पाणी आटलेले .दगड ठिसूळ आहे आणि बरीच पडझड झालेली आहे .थोडा वेळ आराम करून दीड वाजता परत फिरलो . वाटेत खळग्यातले पाणी भरून घेतले . मला वाटत होते तिथे चुकलोच अर्धा तास वाया गेला आणि चारची ठाणे बस पाच मिनीटांसाठी अगदि वेळेवर निघून गेली .मग नाडसूर पर्यँत चालत गेलो . टेंपोने पालीला साडेसहाला आलो .पालीला पोहोचल्यावर लक्षात आले चष्मा नाडसूरला नाक्यावर राहीला .परत न जाता शेवटच्या सवासातच्या रोहा पुणे बसने खोपोली गावात स्टे. जवळ साडेआठ व ९.४१च्या लोकलने ११.०० ला डोंबिवली .८मार्च२०१३ .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users