भाग३.लेण्यांपाशी पोहोचलो तेंव्हा बारा वाजले होते .हे सर्व १७-१८विहार आहेत ,एका चिंचोळ्या धोकादायक पायवाटेने जोडलेले आहेत .पावसाळ्यात येथे अपघात झाले आहेत .एक विहार फारच मोठा आहे .येथे स्वातंत्र्यवीर वासुदेव बळवंत फडके यांनी काही दिवस आसरा घेतलेला तशी तेथे पाटी आहे . विहारांच्या खिडक्यांवर नालाच्या आकाराचे शिल्प आहे ,एक मातीचा स्तुप आहे पण बुध्दाची मुर्ती कोठेही नाही . याचा अर्थ लेण्यांचा काळ इ .स .पूर्व दुसऱ्या शतकातील हीनयान काळातला .कार्ले , भाजे अथवा बेडसाच्याही अगोदरचा .दोन तीन टाकी होती पण पाणी आटलेले .दगड ठिसूळ आहे आणि बरीच पडझड झालेली आहे .थोडा वेळ आराम करून दीड वाजता परत फिरलो .
ठाणाळे लेणी .मागच्या आठवड्यात १-२ मार्च २०१३ ला तेलबैला करून लेण्याच्या मार्गे ठाणाळे गावात येणार होतो .एका गाववाल्याने टॉवरजवळून खाली जाणारी वाघजाई घाटाची वाट दाखवली .ही वाट चांगली मळलेली आहे .टॉवर खालच्याच डोंगराच्या पुढे आलेल्या पोटात तेलबैलाच्या जवळपास तीन चतुर्थाँश उंचीवर ही लेणी आहेत .वाघजाई वाट सोडून डावीकडे वळलो ,स्पष्ट असा काही मार्ग दिसेना .ओढ्याच्यानाळेतून उतरलो पण कड्यावरच यायचो .तीन लिटर पाणी असल्यामुळे काही काळजी नव्हती .एक तास गेला तरी लेणी दिसेनात.
मागच्या पडझड झालेली आहे .थोडा वेळ आराम करून दीड वाजता परत फिरलो .
वाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली! (पूर्वार्ध)
रात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझप्रमाणे वाजत होता. साडेसहापर्यंत मी आणि कोंबडा दोघेच बहुधा जागे होतो. दार उघडले आणि बाहेर धुक्याशी भेट झाली -
हा ट्रेक ध्यानीमनीही नसताना अवचित घडला! करायचा होता वेगळाच, आणि झाला वेगळाच! पण सह्याद्रीमधल्या एका सुंदर आडवाटेची ही भ्रमंती आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचे नाही! शनिवार-रविवार मोकळे मिळत आहेत अशी शक्यता दिसायला लागली आणि लगेच सूरजला फोन लावला. अट्टल ट्रेकर्स लोकांना सोबत ट्रेक करायला ओळखी लागत नाहीत, कंफर्ट नावाचा प्रकार लागत नाही.. समान आवड जुळली की निघाले सॅक पाठीवर टाकून!