भाग३.लेण्यांपाशी पोहोचलो तेंव्हा बारा वाजले होते .हे सर्व १७-१८विहार आहेत ,एका चिंचोळ्या धोकादायक पायवाटेने जोडलेले आहेत .पावसाळ्यात येथे अपघात झाले आहेत .एक विहार फारच मोठा आहे .येथे स्वातंत्र्यवीर वासुदेव बळवंत फडके यांनी काही दिवस आसरा घेतलेला तशी तेथे पाटी आहे . विहारांच्या खिडक्यांवर नालाच्या आकाराचे शिल्प आहे ,एक मातीचा स्तुप आहे पण बुध्दाची मुर्ती कोठेही नाही . याचा अर्थ लेण्यांचा काळ इ .स .पूर्व दुसऱ्या शतकातील हीनयान काळातला .कार्ले , भाजे अथवा बेडसाच्याही अगोदरचा .दोन तीन टाकी होती पण पाणी आटलेले .दगड ठिसूळ आहे आणि बरीच पडझड झालेली आहे .थोडा वेळ आराम करून दीड वाजता परत फिरलो . वाटेत खळग्यातले पाणी भरून घेतले . मला वाटत होते तिथे चुकलोच अर्धा तास वाया गेला आणि चारची ठाणे बस पाच मिनीटांसाठी अगदि वेळेवर निघून गेली .मग नाडसूर पर्यँत चालत गेलो . टेंपोने पालीला साडेसहाला आलो .पालीला पोहोचल्यावर लक्षात आले चष्मा नाडसूरला नाक्यावर राहीला .परत न जाता शेवटच्या सवासातच्या रोहा पुणे बसने खोपोली गावात स्टे. जवळ साडेआठ व ९.४१च्या लोकलने ११.०० ला डोंबिवली .८मार्च२०१३ .
ठाणाळे लेणी भाग ३
Submitted by Srd on 12 March, 2013 - 05:58
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटु कुठे आहेत? माहिती एकाच
फोटु कुठे आहेत? माहिती एकाच भागात दिली असती तरी चालली असती, कारण एकच paragraph दिसतो आहे. srd अजून लिहा पण बाकी ट्रेक बाफ जर बघीतलेत तर तुम्हालाही तुमचा वृत्तांत फोटोसहीत टाकता येईल.
झ्ब्बु घ्या
झ्ब्बु घ्या![IMG_3103.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33450/IMG_3103.jpg)