आता हे लिहायलाच पाहिजे, असं काही हातघाईवर आलेलं प्रकरण नाहीये.
पण उगीच आपला चाळा म्हणून एखाद्या प्रेषितासारखं अद्भुत काही आपोआप येतंय का ओंजळीत, हे चेक करून बघावं म्हणून बसलोय.
समोर खिडकीची आयताकृती फ्रेम.
फ्रेमच्या पलीकडच्या बाजूला आकाश,त्याखाली झाडं, मोकळा रस्ता, बिल्डिंग्ज आहेत.
थोडावेळ बिल्डिंग्जच्या कोपऱ्यावर, थोडावेळ झाडांच्या फांद्यांवर वेळ काढणारे पक्षी आहेत.
वरती ऊंच घारींचे शांत लयीतले हालते एकमेकींना छेडणारे काळसर पुंजके आहेत.
कधी दिसतातय कधी नाहीत.
त्यांचं त्यांचं चाललंय आपलं.
कॅनव्हास आयुष्याचा
पाटीवर गिरवलेली अक्षरे ती,
चुकली की पुसता यायची.
बोल बोबडे भीती नव्हती,
माय तेवढी सावरून घ्यायची.
वाटलं थोडं मोठं व्हावं,
बालपण मागे सुटत होतं.
किशोर स्वप्ने मनही वेडं,
वादळा सम वाहवत नेतं.
काळ मग खडतर तारुण्याचा,
चुकण्याची का सोय होती?
कॅनव्हास रंगीत अपेक्षांचा,
रेखाटनाची ही मुभा नव्हती.
कॅनव्हास एक अन स्वप्नं भारी,
हो!वार्धक्याची पुसट तयारी,
रंग मोजके पण हौसच सारी,
मग उरते ती जवाबदारी..
@गजानन बाठे
कॅनव्हास
रंगेबेरंगी दुनिया
चौफेर ;
आपले रंग कोणते
ओळखावे कसे?
आपले रंग
ते निवडावे कसे?
रंगेबेरंगी दुनिया
चौफेर ;
त्या रंगात एकरुप
व्हायचे ते कसे?
एकरुप झाल्यावर
स्वतःच स्वतःला
ओळखायचे ते कसे?
आपले रुप-गुण
दाखवावे ते कसे?
प्रश्न आहेत असे
अनेक ;
त्यांस उत्तर
ते द्यायलाच हवे?
कि काही प्रश्न
हे अनुत्तरीतच बरे?
अक्रेलिक ऑन कॅनव्हास. मूळ आकार ८ * १०.