कॅनव्हास

Submitted by मन्या ऽ on 29 August, 2019 - 09:47

कॅनव्हास

रंगेबेरंगी दुनिया
चौफेर ;
आपले रंग कोणते
ओळखावे कसे?
आपले रंग
ते निवडावे कसे?

रंगेबेरंगी दुनिया
चौफेर ;
त्या रंगात एकरुप
व्हायचे ते कसे?

एकरुप झाल्यावर
स्वतःच स्वतःला
ओळखायचे ते कसे?
आपले रुप-गुण
दाखवावे ते कसे?

प्रश्न आहेत असे
अनेक ;
त्यांस उत्तर
ते द्यायलाच हवे?
कि काही प्रश्न
हे अनुत्तरीतच बरे?

आपले रंग हे
आपणच निवडावे
या रंगेबेरंगी दुनियेची
फिकिर सोडुन
सारी बंधने झुगारुन;
आपली वेगळी
दुनिया मांडावी
अस्तित्वाच्या या
कॅनव्हासवर
आपलीच चित्रे
रेखाटावीत!!!

(Dipti Bhagat)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्तित्वाच्या या
कॅनव्हासवर
आपलीच चित्रे
रेखाटावीत!!! >> मस्तच.