उपयुक्त संगणक प्रणाली

चांगली संगणक डायरी सुचवा!

Submitted by पारिजाता on 2 February, 2015 - 04:24

रोज ऑफिसमधे वापरता येतील अशी लॅपटॉप वर चालणारी ई डायरी सॉफ्टवेअर्स कुणी वापरली आहेत का? कुठली चांगली? आणि खरंच उपयोग होतो का? विन ७ साठी सांगितल्यास अजून बरे.

एच पी लेसरजेट १०१० प्रिंटर विंडोज् ७ ऑपरेटिंग सिस्टीमवर वापरणे

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 19 January, 2015 - 05:37

माझ्याकडे २००५ साली खरेदी केलेला एचपी चा लेसरजेट १०१० प्रिंटर आहे. पुर्वी हा प्रिंटर विन्डोज् एक्सपी कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) वर वापरला आहे. आता कार्यप्रणालीत बदल झाला असून संगणकावर विन्डोज् ७ ही कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) कार्यरत आहे.

परतोनि पाहे - एक काल्पनिका

Submitted by वीणा सुरू on 24 December, 2014 - 06:24

पूर्वी मोठ्या आकाराचे सेल फोन होते. किंमत सोळा हजाराच्या पुढे होती. खूप श्रीमंत लोकांकडेच ते होते.
इनकमिंग आठ रुपये आणि आउटगोईंग सोळा रुपये असे काहीसे चार्जेस होते असं अंधूकसं आठवतंय. त्या काळी तो फोन स्टेटस सिंबॉल म्हणून काही लोक जवळ बाळगत. तर इतरांना त्यांचा हेवा वाटत असे. मोबाईल क्रांती वगैरे काही तरी बोललं जायचं. चार चौघात हा फोन वाजला की लोकांना तो फोन दिसेल अशा पद्धतीने बाहेर काढून त्यावर बोलण्यात त्या सेलधारी व्यक्तीला कोण गुदगुल्या होत असतील ना ? इतरांकडे हा फोन नाही आपल्याकडेच आहे ही भावना त्याला इतरांपेक्षा वेगळं समजायला लावत असेल.

फायदा आणि तोटा

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 20 December, 2014 - 02:58

मराठी स्त्रियांचं इंटरनेटवर प्रमाण कमी का? ( http://www.maayboli.com/node/33327 ) या ३_१४ अदिती यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया स्वरूप सदर ले़खन करीत आहे. प्रतिक्रिया तिथेच देता आली असती परंतु दोन कारणांमुळे स्वतंत्र ले़ख लिहीत आहे.

१. अदिती यांच्या मूळ ले़खापेक्षा माझा प्रतिसाद लांबलचक होण्याची शक्यता आहे.
२. मूळ ले़खात मांडलेल्या मुद्यांव्यतिरिक्त इतरही काही मुद्यांचा विचार करायचा असल्याने तिथे प्रतिसाद दिल्यास त्यावर "भरकटलेला" असा शेरा येऊ शकतो.

सोप्या पद्धतीने मराठीत लेखन (भाग २ - युबंटू लाईव्ह सीडी)

Submitted by shantanuo on 28 November, 2014 - 08:41

माझा "सोप्या पद्धतीने मराठीत लेखन" हा लेख ज्यांनी वाचला असेल त्यांना मराठीत स्पेल चेक, अ‍ॅटो करेक्ट वगैरे कसे वापरायचे ते लक्षात आलेच असेल.

http://www.maayboli.com/node/39752

पण त्यासाठी कितीतरी सॉफ्ट्वेअर टाकावी लागतात. कॉन्फ्युगरेशन शिकावे लागते. हाताशी विंडोजची सिडी असावी लागते. विंडोजमध्ये मराठीत टाईप करायचे असेल तर किती सव्य / अपसव्य करावे लागतात ते इथे पहा.

कंटेंट डिलिवरी नेटवर्क सर्विसेस (CDN Services) बद्दल माहिती हवी आहे

Submitted by वैजयन्ती on 17 November, 2014 - 01:43

आम्ही ऑनलाइन PMP Certification ट्रेनिंगसाठी वेबसाइट तयार करत आहोत.
ट्रेनिंगचे विडिओ आणि इतर साहित्य ठेवणे / आमच्या साइटवर चांगल्या वेगाने डिलिवर होणे यासाठी कंटेंट डिलिवरी नेटवर्क (CDN Services) सर्विसेस वापरायचा विचार आहे. या सर्विसेस बद्दल आणि सप्लायर्स बद्दल काही माहिती नाही. या सर्विसेस बद्दल माहिती मिळवणे हा या धाग्याचा उद्देश आहे.
अशा सर्विसेस बद्दल माहिती असेल किंवा वर उल्लेख केलेल्या वेबसाइटसाठी कोणाच्या काही सूचना असतील तर जरूर सांगा.

मदत/ माहिती हवी आहे

Submitted by रश्मी. on 11 September, 2014 - 07:29

हॅलो मला एक मदत हवी आहे. माझ्या मैत्रिणी च्या भावाने, जो सन्गणक शिकत आहे,नवीन हार्ड डिस्क बसवण्याकरता जुन्या हार्ड डिस्क मधुन बॅक अप घ्यायला सुरुवात केली. पण काही कारणामुळे जुन्या डिस्क मधल्या बर्‍याचश्या फाईल्स/ डॉक्युमेन्ट्स उडुन गेले. जे होत असते.

दुर्दैवाने त्यातली गाणी आणी काही नवीन गोष्टी तो सिडी वर कॉपी करायचा विसरला. त्याने नेटवरुन सर्च केला, पण काही समजत नाहीये.

याला काही उपाय आहे का? की जेणे करुन त्याला त्या फाईल्स परत बघता येतील?

ऑनलाईन गझल प्रोसेसर

Submitted by ब्रह्मांड आठवले on 20 June, 2014 - 01:01

ऑनलाईन गझलेचा प्रोसेसर उपलब्ध आहे. या यंत्रात वरून शब्द आणि इतर आवश्यक जिन्नसा घातल्या असता गझल तयार होते. वापरण्यास अत्यंत सोपा, युझर फ्रेण्डली अशा या प्रोसेसरच्या सहाय्याने आपल्या उत्पादनाचा वेग वाढवून बाजारात सर्वत्र आपल्या मालाचा बोलबाला करता येतो.

gajhal.jpg

शब्दखुणा: 

वन व्हर्जन ऑफ ट्रूथ - मतदार यादी कशी तयार करावी?

Submitted by केदार on 24 April, 2014 - 02:28

फार गाजावाजा करून आधार कार्ड योजना आणली गेली, तीत अनेक घोळ झाले पण सध्याच्या घडीला आधार कार्ड डिबी हा एकच डिबी असा आहे ज्यात व्यक्तीचे नाव, जन्म दिनांक , पत्ता, बायोमेट्रिक्स आणि फोटो हे सर्व आपल्याला मिळेल.

एक्सेल , पीडीएफ फाइल्सचे प्रिंटिंग वननोटवर जाणे (नकोय)

Submitted by भरत. on 2 March, 2014 - 23:18

अनेकांचे सल्ले धुडकावून मी विन्डोज ७ आणि ऑफिस होम & स्टुडन्ट २०१० यांच्या अधिकृत प्रती विकत घेऊन त्यांची माझ्या संगणकात प्राणप्रतिष्ठा केली ( Installed). हे करताना प्रिंटर संगणकाला जोडलेला नव्हता. यथावकाश प्रिंटरही जोडून घेतला. (प्रिंटर नेहमी जोडलेला नसतो. जेव्हा गरज असते तेव्हाच जोडला जातो.)

आता काहीही प्रिंट करताना ते सरळ प्रिंट न होता वननोट २०१० कडे जाऊन त्याची एक प्रिंट फाइल बनू लागली.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - उपयुक्त संगणक प्रणाली