हार्ड डिस्क मधला डेटा रिगेन करण्याबाबत
WD ची पोर्टेबल हार्डडिस्क मी २ ते ३ वर्षांपूर्वी खरेदी केली.. माझी चिंता सुरु झाली ती येत्या दोन तीन आठवड्यापासुन.. झालं असं कि मी नेहमीप्रमाणे हार्ड डिस्क लावून मुव्ही सुरु केला आणि अर्ध्यात तो एक अचानक अटकला. वेगवेगळ्या प्लेअर मधे सुरु करुनही तीच गत.. कंटाळून दुसरा मुव्ही सुरु केला तरी तेच. शेवटी लॅपटॉप मधे कॉपी करुन मग पहावा अस ठरवलं तर तो कॉपी व्हायला तयार नाही.. त्यानंतर तर आता ती हार्डडिस्क लोकेट होणचं बंद झालयं ..