अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<<<अमेरिकेतील इतर प्रोसेसेस प्रमाणे ते कन्सिस्टंट आहे.>>>
कंसिस्टंट?!
हे काय मधेच काढलेत? अहो २०१७ पासून अमेरिकेत ड्रेन द स्वांप चालू आहे. अमेरिकेतल्या ज्या गोष्टी ट्रंप ला आवडत नाहीत त्या सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत. त्यात ओल्याबरोबर सुकेहि जळणार तसे सत्य, शिस्त, सभ्यता, परंपरा, कायदा हे सगळे काढून टाकून तिथे ट्रंप म्हणेल तसे करायचे. त्यासाठीच त्याला निवडून दिले आहे ना?

म्हणजे बायडनला नुसती नावाकरता प्रेसिडेंसी मिळणार आहे.
Submitted by मुकुंद on 5 November, 2020 - 00:55 >> हो मुकुंद असेच होणार बहुधा, किमान पुढची दोनेक वर्षे तरी.
खासकरून जज बॅरेट च्या अपॉईंटमेंट दरम्यान मॅकॉनल आणि शुमर मधले वितुष्ट ज्या ईंटेसिंटीने समोर आले आहे त्यावरून तर डेम्स ना ईंच ईंच लढवतांना नाकी नऊ येणार आहेत.

मुकुंद,
डेमोक्रॅटसना सिनेटमधे अजून दोन सीटस मिळाल्या (आणि बायडन प्रेसिडेंट झाला) तर कमलाबाई टायब्रेकर ठरतील. सिनेट डेम्सच्या ताब्यात येईल (असं माझं विशफुल थिंकींग आहे Wink ).

तात्यांनी फेरमतमोजणी करवली आणि लाल काऊंटिजमध्ये जिंकणारे तात्याच अचानक त्या फेरमतमोजणीमुळे हराया लागले , तर बेक्कार धमाल येईल. तेवढेच फुकटचे मनोरंजण!! Wink
आयला हा प्रतिसाद आहे - ६६६ नंबरचा म्हणजे सैतानाचा नंबर. याचा अर्थ तात्या देवमाणुसच आहे आणि अशी इच्छा करणे हे सैतानीपणाचे लक्षण आहे. वाह वाह!! ऐका ऐका युनिव्हर्स प्रत्यक्ष तात्यांच्या बाजूने आहे Wink

शेवटी म्हातारबाबांचा राज्याभिषेक होणार असं दिसतंय. त्याचे वय पाहता तो एकाच टर्म नीट सांभाळेल कि नाही याची खात्री वाटत नाही. परंतु तो तात्यांचे काही नियम नक्की बदलेल आणि त्यातच त्याचा वेळ जाणार त्यामुळे अमेरिकी जनतेचं काय भलं होणार देवाचं जाणे. याचा परिणाम अमेरिका भारत संबंधावर देखील नक्कीच होणार कारण कमला बाई पाक धार्जिण्या आहेत.
इथे काहींनी दंगे धोपे होतील अशी भीती व्यक्त केली आहे परंतु परिस्थिती फार काही बिघडणार नाही ... ३-४ शहरात थोडी जाळपोळ होईल आणि मग सगळे शांत...

>>>>शेवटी म्हातारबाबांचा राज्याभिषेक होणार असं दिसतंय. त्याचे वय पाहता तो एकाच टर्म नीट सांभाळेल कि नाही याची खात्री वाटत नाही.>>>> तसाही तात्या काही तरणाबांड वगैरे नाही लोल. पण हां ही इज अ टफ कुकी!! कोरोना ला फाईट देउन एवढे दौरे, सभा, भाषणं , डिबेटस. मानलं ब्वॉ. ७४ साल के बूढे या ७४ साल के जवान Wink
नक्की डाबर च्यवनप्राश खातो तो.

प्रेसिडेंशिअल रेस अटितटीची चालली असताना लोक विसरले आहेत की हाउस व सेनेट रेसेस मधे डेमॉक्रॅटीक पार्टीने खुपच मार खाल्ला आहे खासकरुन ज्याप्रमाणे हाउस स्पिकर नॅन्सी पलोसी निवडणुकीच्या आधी आत्मविश्वासाने बोलत होती की हाउसमधली त्यांची मेजॉरीटी ते टेक्सास व फ्लोरिडामधे अजुन हाउस सिट्स पिक अप करुन वाढवणार आहेत .. कसल काय...नुसते विशफुल व अरोगंट थिंकींग होते तिचे. मेजॉरीटी अजुन वाढवायच्या ऐवजी स्वतःच्याच १०-१२ सिट्स गमावुन बसले डेमॉक्रॅट्स... व कशीबशी बहुतेक ते मेजॉरीटी राखुन अब्रु राखतील.

पँडॅमिक रिलिफ पॅकेज ट्रंपबरोबर निगोशिएट करताना नॅन्सी पलोसीने अडमुठेपणा दाखवुन ती बोलणी फिसकटवली.. ट्रंप १.८ ट्रिलिअन देत होता व गरिबांना प्रत्येकी १२०० डॉलर्स पण द्यायला तयार होता.. पण ही अडुनच बसली... २.१ ट्रिलिअन्स डॉलरसाठी.. त्यामुळे बोलणी फिसकटली व गरीबांना १२०० डॉलर मिळाले नाहीत. मग त्या चिडलेल्या गरीबांनी बरोबर फटका दिला डेमॉक्रॅटीक पार्टीला.. इलेक्शनमधे.. सेनेटर्सच्या रेसेस मधे पण व हाउस रेसेस मधे पण!

बहुतेक नॅन्सी पलोसीला त्यामुळे स्पिकर च्या जॉबवरुन पदच्युत करतील.. फॉर डिस्मल शोइंग इन द इलेक्शन बाय द पार्टी अँड फेलींग टु निगोशिएट अ सक्सेसफुल कोरोना रिलिफ पॅकेज फॉर पुअर्स!

अंजली.. जॉर्जिया रन ऑफ मधे कदाचित केली लॉफ्लर व डेव्हिड पर्ड्यु.. दोघेही हरण्याची जरुर शक्यता आहे.

कारण त्या दोघांनी फेब्रुआरी- मार्चमधे ... त्यांच्या सेनेटर पदाचा गैरवापर करुन.. पँडॅमिक न्युज बाहेर पडायच्या आधी..ती न्युज त्यांना क्लोज डोअर हाय लेव्हल मिटींगमधे..समजल्याबरोबर.. त्यांनी धडाधड आपले स्टॉक विकले व पुढच्या काही दिवसात झालेल्या स्टॉक मार्केट कार्नेजपासुन स्वतःचे मिलिअन्स ऑफ डॉलर्स डुबण्यापासुन वाचवले. तितकेच नाही..पण मास्क्स, क्लोरॉक्स, ग्लोव्ह्स कंपनीत पैसा गुंतवुन खोर्‍याने पैसे कमवले. दॅट इस सो अनएथिकल!

सो.. तुझे विशफुल थिंकिंग खरे होउ शकते.. Happy

मुकुंद, नॅन्सी मुळे गरिबांना पैसे मिळाले नाही वाचून फॉक्स मराठीत चालू झालं काय वाटलं.
जॉर्जिया, पेन साठी फिंगर्स क्रॉस.

With all due respect I have starting to agree with मुकुंद. दुसरी बाजू नेहमी पाहावी लागणारे. आता कुठले नवे टॅक्स पाडणार तेही आहे नं? Long term problems short term solutions and vice versa. Reading with all eyes open. Happy

मुकुंद, पर्ड्यु ची रेस रनॉफ मधे जाईल कि नाही सांगणे अजुनही औघड आहे. जॉर्जिया च्या नियमांप्रमाणे कोणालाही कमितकमी ५०% मतं मिळाली नाहीत तर रेस रनॉफ मधे जाते. पर्ड्यु आत्ता ४९.८% आहे आणि मतमोजणी चालू आहे. पन जरी रनॉफ मधे गेली तरी तेव्हा ऑसॉफ ला खुप औघड आहे त्यावेळेला तेवढ्या मतदारांना बाहेर पडायला लावणं. आणि लॉफलरला खुपच सोपं जाईल जिंकणं. कारण कॉलिन्स ची सगळी मतं तिला मिळतील.
पण हे मात्र खरं कि कित्येक स्टेट असेम्ब्लीज, गवर्नर हाउसेस, हा. ऑ. री., ह्या वेळेला री. नी फ्लिप केल्या. लोकांना त्याच्या पॉलिसीज आवडतात पण तो नाही हे स्पष्ट झाले असे म्हणता येईल का?

>>लोकांना त्याच्या पॉलिसीज आवडतात पण तो नाही हे स्पष्ट झाले असे म्हणता येईल का?<<
सम गेट इट राइट फर्स्ट टाय्म, सम डोंट; अँड द रेस्ट गेट इट इवेंचुअली. सूनर ऑर लेटर, पिपल आर कमिंग टु देर सेंसेस... Wink

पुण्यातल्या रिक्षांच्या मागे पहा - "हे असेच चालायचे" !
तर कशाला वितंडवाद?
रिपब्लिकन नेहेमी टॅक्स कमी करतात. आमच्या राज्यात ख्रिस्टि व्हिटमनने राज्याचे इन्कम टॅक्स कमी केले त्यामुळे राज्यातर्फे शहरांना मिळणारी मदत. रस्ते दुरुस्ति वगैरेचे बजेट एकदम कमी केले. पण सेल्स टॅक्स वाढवला, प्रॉपर्टी टॅक्स वाढला. त्यामुळे शेवटी सगळ्यांचेच टॅक्सेस वाढले!
पण तेव्हढी अक्कल कोठली आली लोकांना.
लहान मुलाला जसे लॉलीपॉप देतो म्हंटल्यावर लगेच मागे येतात तसे कुठल्यातरी एला मुद्द्याला धरून कधी या पार्टीच्या मागे तर कधी त्या पार्टीच्या मागे धावतात. घोषणाबाजीला भुलतात. शेवटी खरेच लॉलीपॉप नाही मिळाला तर नंतर दुसर्‍या कुठल्यातरी मुद्द्याला धरून दुसरीकडे धावतात.
लोक फुक्कट स्वतः किती शहाणे आहोत ते दाखवायला टीव्हीवर, वर्तमानपत्रात तावातावाने पॉलिसि वगैरे शब्द वापरून आपाअपसात भांडतात.
सामान्य लोकांनी (ज्यांनी कितीहि बोंब मारली तरीहि ढिम्म फरक पडत नाही )खाली मुंडी घालून आपले काम करावे, पैसे मिळवावे नि गप्प गंमत बघत बसावे.

श्री ठाणेदार won the 3rd District of Michigan as a democrat with 93 per cent of the total votes. २०१८ मधे ते गवर्नर पदाची निवडणुक लढले होते. ठाणेदार यान्चे अभिनन्दन.

अमित.. नाही रे बाबा.. फॉक्स काय आणी सी एन एन काय.. आपल्याला स्वतःचे काही विचार व मत असलीच पाहीजेत...

आपण अगदी सगळेच जे ऐकतो .. मग ते डावे विचार असु देत नाही तर उजवे.. ते सगळेच आंधळ्यासारखे बिलिव्ह करत राहीलो तर... बघत आहेस ना ...सबंध अमेरिकेत काय चाललय ते?..... डावे व उजवे.. असे २ एको चेंबर्स निर्माण झाले आहेत. कोणीच दुसर्‍याचे थोडेसुद्धा ऐकुन घेत नाहूत... किंबहुना... प्रयत्नच करत नाहीत किंवा त्या दोन्ही पक्षातल्या लोकांना एकमेकांचा आवाजच ऐकु येत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या ब्लाईंड फॉलोअर्समधे प्रचंड दरी (व हेट्रेड) निर्माण झाली आहे.

दोन्ही पार्टीची माणसे.. सारासार विचार न करता.. आपल तेच खरे असा हेकेखोरपणा दाखवुन वागत राहीले तर सिव्हिल वॉर फार दुर नाही राहणार.

ट्रंपसारख्या माणसाने.. या डीप डिव्हिजनला व्यवस्थित खत पाणी घातले व स्वतःचा स्वार्थ पुर्ण केला. तश्या पार्टिसनशिपनने व हेट्रेडने आधीच अंध झालेल्या त्याच्या ब्लाइंड फॉलोअर्सना त्याने दुसर्‍या बाजुचे इतके बुजगावणे दाखवले.. की ते सगळे सोशलिस्ट काय आहेत.. ते ऑल्मोस्ट देशाला कम्युनिझमच्या खाइत लोटणार काय आहेत ..सोशलाइझ्ड मेडिसीन आणले आहे काय... ते सगळे लॉ आणी ऑर्डरच्या विरुद्ध आहेत.. डेमॉक्रॅट्स जर सत्तेत आले तर अख्य्या अमेरिकेतले सगळे पोलीस दल ते बरखास्त करणार आहेत व सगळे पोलिस घरी बसवण्यात येतील.. सगळे डेमॉक्रॅट्स कसे अ‍ॅनार्चिस्ट आहेत..ते सगळे सबंध अमेरिका देश इल्लिगल इमिग्रंट्सने भरवुन टाकणार आहेत.. त्या पक्षाला सपोर्ट करणार्‍या बायका.. ( व डॉक्टर्स.) .... मजा म्हणुन.. विनाकारण..उठसुठ.. अ‍ॅबॉर्शन करायला उत्सुक कश्या/ कसे आहेत.. .. तो पक्ष जर सत्तेत आला तर प्रत्येकाच्या घरात घुसुन... त्यांच्या बंदुका कश्या कॉन्फिस्केट करण्यात येतील...असे व अश्या बर्‍याच गोष्टींची..काय जे वाटेल त्याची...भिती दाखवुन...त्यांना बिथरवुन टाकायला...त्याच्यासारख्या माणसाला एकदम सोप्पे गेले.

चार वर्षात त्याने जे काही रिझनेबल कन्झरव्हेटिव्ह रिपब्लिकन्स होते.. त्यांना अश्या प्रोपोगांडाने पुर्ण बदलवुन टाकले.. व रिपब्लिकन पार्टी हायजॅक करुन.. तिला ट्रंप पार्टी बनवायची किमया केली.. किंबहुना करु शकला.. आणी आपण या निवडणुकीत बघीतले की अमेरिकेतल्या जवळज अर्ध्या पॉप्युलेशनने अश्या माणसाला आपले मत दिले ...का? कारण.. कारण आधीच अमेरिकेत.. ओव्हर्ट नसले तरी.. कोव्हर्ट रेसिझम व कोव्हर्ट क्लासिझम..... अंडर द सरफेस.. व्यवस्थित चालु आहे.. कोणी कितीही डिनाय केल तरी धिस इज अ फॅक्ट! ट्रंपने त्याच्यावरचे ....वर सांगीतलेल्या गोष्टींची भिती दाखवुन.. झाकण उघडले.. इतकेच...

म्हणुनच मग मुर्ख पोलस्टर्स कांट गेट इट राइट.. मेनी पिपल ओपनली डु नॉट से ऑर अ‍ॅडमिट दॅट.. दे आर ट्रंप सपोर्टर्स... दे मे नॉट लाइक द गाय.. बट दे डेफिनेटली नॉट ओन्ली लाइक हिज रिपब्लिकन आयडियाज बट दे लव्ह हिज रेसीस्ट अजेंडा टु!...व्हिच ही अन-अपोलोजिटिकली अँड ओपनली एम्ब्रेसेस! दोज रेसिस्ट पिपल फाउंड अ ओपन व्हॉइस फॉर देम .. इन द व्हाइट हाउस.. दे लव्ह हिम! मग त्याकरता वर सांगीतलेल्या भितीच्या बुजगावण्यामुळे घाबरुन जाउन ते त्याच्या १०० फॉल्ट्स्कडे दुर्लक्ष करायलाही तयार आहेत.. म्हणुनच मग इव्हँजिलिकल ख्रिश्चन्ससुद्धा.. त्याचे “.. तो अ‍ॅट्रॅक्टिव्ह तरुण बायकांना.. जवळ ओढुन.. त्यांची.. पु... ग्रॅब करुन किस करतो”... असे दुर्गुण माफ करु शकतात किंवा करतात.

आता दुसरी बाजु.. डेमॉक्रॅट्ससुद्धा काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. त्यांची बेसिक फिलॉसॉफी की समाजातल्या गरीब वर्गाला मदत करायला हवी.. ती चांगली आहे.. पण त्याही पार्टीतली एक्स्ट्रिम लोक.. त्या फिलॉसॉफीच्या नावाखाली.. फिस्कल रिसपॉन्सिबिलीटी बर्‍याच वेळेला विसरुन जातात. त्यांचे लिबरल प्लान्स मग बिग गव्हर्मेंटला कारणीभुत होतात.

मग त्या वर्गाला खुष करायला सँक्च्युअरी सिटीज निर्माण करा.. इल्लिगल इमिग्रेशनच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करा.. जॉब करायला इंसेंटिव्ह देण्याऐवजी नेहमीपेक्षा देतात त्यापेक्षा ६०० डॉलर्स जास्त दर आठवड्याला..जॉब गेलेल्या लोकांना द्या.. मेडीकेड एक्स्पान्शन करा ... या आणी अश्या बर्‍याच गोष्टी ते राबवतात. त्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासाख्या व ऑब्जेक्शन घेण्यासारख्या आहेत.

आणी नॅन्सी पलोसी व निगोशिएन्स बाबत.. तिला वाटत होते की स्टिम्युलस बिल अडकवुन ठेवले तर निवडणुकीत ट्रंपला त्याचा फटका बसेल... कदाचित ट्रंप हरला तर ते खरेही होइल... पण लोकांनी हे विसरु नये की तिच्या पक्षालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. कदाचित त्यामुळेच तिच्या पक्षाला सेनेट मेजॉरीटी मिळु शकली नाही असेही म्हणता येइल. त्यामुळे बायडन जरी प्रेसिडेंट झाला तरी सेनेट रिपब्लिकन्सकडेच राहील्यामुळे आता .. तिला पाहीजे होते तसे.स्टिम्युलस पॅकेज मिळणे जवळजवळ अशक्यच होउन बसले आहे. कारण ट्रंप जर हरला तर मिच मॅकॉनल अँड रिपब्लिकन पार्टी विल हॅव्ह नो अ‍ॅपिटाइट नॉर एनी डिझायर टु गो अलाँग विथ अ बिग स्टिम्युलस पॅकेज.. इन फॅक्ट आजच.. परत एकदा... मिच मॅकॉनल बोलला... की ही अगेन थिंक्स.. नो बिग स्टिम्युलस इज निडेड..

म्हणजे आता नॅन्सी पलोसी अँड डेमॉक्रेटिक पार्टी विल हॅव्ह टु किस गुड बाय टु देअर विश ऑफ २.१ ट्रिलिअन डॉलर्स.. इन फॅक्ट.. इफ ट्रंप लुजेस.. व्हिच लुक्स लाइक अ मोस्ट लाइकली आउटकम.. अवर बाय अवर... शि कॅन किस गुड बाय टु इव्हन गेटींग अ स्टिम्युलस ऑफ १.८ ट्रिलिअन डॉलर्स.. व्हिच शि वॉज गेटींग बिफोर द इलेक्शन!

मग आत सांग.. मी आधीच्या पोस्टमधे तिच्याबद्दल जे काही बोललो त्यात काय चुकीचे बोललो?

Very nice post above मुकुन्द.
श्री. ठाणेदार यांचे अभिनंदन. Happy

<<रिपब्लिकन पार्टी हायजॅक करुन.. तिला ट्रंप पार्टी बनवायची किमया केली.. किंबहुना करु शकला.. आणी आपण या निवडणुकीत बघीतले की अमेरिकेतल्या जवळज अर्ध्या पॉप्युलेशनने अश्या माणसाला आपले मत दिले .>>
मुकुंद, पण बर्याच डाउन बॅलट रेसेस मधे, रिपब्लिकन कँडिडेट्स ना ट्रंप पेक्षा जास्ती मतं मिळालीयेत. उदा. जॉर्जिया मधे त्याला आत्ता २.४५४ मि मतं आहेत तर पर्ड्यु ला २.४५५ मि मतं आहेत. म्हणजे बर्याच रजिस्टर्ड रिपब्लिकन मतदारानी वरती बायडन सिलेक्ट करून खाली पर्ड्यु सिलेक्ट केलय, म्हणुनच मि वरती म्हटल्या प्रमाणे, लोकांना रि. पोलिसीज आवडतात पण तो माणूस म्हणून आवडत नाही. पण असो, देर आये दुरुस्त आये....

अभिनंदन बायडन!
४६ प्रेसिडेंड ऑफ अमेरीका!

>>बट दे डेफिनेटली नॉट ओन्ली लाइक हिज रिपब्लिकन आयडियाज बट दे लव्ह हिज रेसीस्ट अजेंडा टु!<<
मुकुंद, डेम्सच्या पॉलिसिज्/अजेंडा ज्या तु वर मांडल्या आहेस ते हिमनगाचं टोक आहे. त्यांनी डेमक्रटिक सोशलायझेशनच घेतलेलं अवसान इफेक्टिव असतं तर आतापर्यंत अमेरिकेत डिस्पॅरिटि दिसलीच नसती. कारण ती निवडणुकांपुरती आहे/असते, तो एक स्ट्रटिजिक जेरीमँडरिंगचा* प्रकार आहे हे गेल्या काहि वर्षांच्या निवडणुक (चेक द प्रिसिंक्ट्स व्हेर डेम्स गॉट विक्टरी) निकालांतुन स्पष्ट होतंय. तर ते असो...

आता, तुझ्या वरच्या विधाना बाबत. रेगन नंतर जिओपी मधे प्रेसिडेंशियल म्हणावं असं नेत्रुत्व पुढे आलंच नाहि. पार्टि कंझरवेटिव तत्वावर ठाम असुनहि बेसिक मुल्य पायदळी तुडवत झालेली पहाताना, आणि ते थांबवणारं नेत्रुत्व दिसण्याची चिन्हं दिसत नसताना ट्रंपने जिओपिच्या प्रायमरीत उडी टाकली. त्यापुर्वि तो डेम्स्/क्लिंटन सपोर्टर होता हे लक्षात घे. ट्रंप व्यवस्थित अभ्यास करुन आल्याने त्याला डिसीतले इशुज, अमेरिकन्/जिओपी मतदारांचे पेनपॉइंट्स, कुठली बटन्स पुश करायची, या सगळ्यांची पक्कि क्ल्पना होती. ती पुढे त्याने अंमलात आणली. आता मुद्दा राहिला रेसिझम्चा. तु ट्रंपचा एक व्यक्ती म्हणुन अभ्यास केलास, प्रेसिडेंट होण्यापुर्वि/होण्यानंतर, तर तो बाय्डन, क्लिंटन जितके रेसिस्ट आहेत तितकाच, कदाचित कमी रेसिस्ट वाटेल. त्याचा एक अवगुण (किंवा गुण) म्हणजे त्याचा स्पष्टवक्तेपणा. जो त्याच्यात अजुनहि आहे कारण तो करियर पोलिटिशियन नाहि, बिझनेस्मन आहे. वेळोवेळी त्याने व्यक्त केलेली मते स्फोटक आहेत, अजिबात प्रेसिडेंशियल नाहित; दॅट इज जस्ट द वे हि इज वायर्ड. जिओपी लिडर्शिपने त्याकडे वारंवार दुर्लक्ष केलंय कारण त्यामुळे फायदा तर दूर, झालेला पर्सिव्ड डॅमेजहि मिनिमल आहे. डेम्स वरचेवर बोंब ठोकतात, हि अमक्याकरता डॉगविसल आहे, ती तमक्याकरता डॉगविसल आहे वगैरे. हा फियर्मॉगरिंग, आणि रेसिझमला खत घालण्याचा प्रकार नाहितर काय आहे...

*नॉट बाय रिड्रॉइंग बाउंड्रीज, बट स्टफिंग इल्लिगल इमिग्रंट्स अँड गिविंग देम ए पाथ टु सिटिझनशिप...

ट्रम्प म्हणजे खोपच्यात घेतलेल्या प्राण्यासारखा आहे.
काय करेल भरवसा नाही.

Pages