अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>
बायडन यांच्याबर असा वैयक्तिक ( भ्रमिष्ट) हल्ला का? अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, आणि जनतेला त्यांच्यात काही चांगले नेतृत्व गुणा दिसले म्हणून निवडून दिले.
<<
एक म्हण आठवली. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. तसे इथे. बायडन म्हातारा आणि भ्रमिष्ट आहे, त्याचा मेंदू पार्ट टाईम काम करतो ह्याबद्दल पूर्ण सहानुभुती आहे. पण तो देशाच्या सर्वोच्च पदावर नेमला गेला आहे. ट्रंप नको मग दुसरा कुणीही चालेल अगदी कुण्ण्णीही, ह्या भूमिकेतून सगळ्यांनी ट्रंपची एकदिलाने बदनामी करून कसाबसा हा प्राणी राष्ट्राध्यक्षपदी नेमला आहे. भान हरपलेला हा इसम असे निर्णय घेत सुटला आहे की there is no tomorrow असे वाटावे. त्याच्यासाठी टुमॉरो खरोखरच नसेलही पण उरलेल्या बहुतेक देशवासियांकरता तो आहे. भरमसाट घुसखोरांची आयात, उद्योग धंद्यांवर बंदी आणि पॅकेजच्या नावाखाली पैसे छापून ते वाटणे ह्याने अर्थव्यवस्थेची पार वाट लागणार आहे. ट्रंपच्या प्रत्येक धोरणाला १८० कोनात जाणारे विरुद्ध धोरण ह्याचा इतका अतिरेक की अमेरिका फस्ट च्या विरुद्ध म्हणजे अमेरिका लास्ट असे
ह्याचे धोरण! धन्य आहे!

इतके दिवस झाले तरी ह्या माणसाने स्वतंत्र एकट्याने एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. तो काय बोलेल ह्याचा भरवसा नाही हेच त्यामागचे कारण आहे. प्रचारादरम्यान भ्रमिष्टपणा जाणवू नये म्हणून काहीतरी जालीम औषध बायडनला पाजले किंवा टोचले असणार ज्याचा परिणाम ओसरत आहे. आणि मग तो आता काहीच्या काही बोलताना, बरळताना आढळतो.
तुलना हवी असेल तर ट्रंपचे CPAC चे भाषण ऐका आणि बायडनच्या कुठल्याही भाषणाशी तोलून पहा.

तो काय बोलेल ह्याचा भरवसा नाही>>> हे फ्रस्ट्रेशन अगदी फमिलियर वाटतंय Happy
तरी पण इतर कुठल्या भाषणापेक्षा आम्ही ते कॅपिटल वर हल्ला आणि व्हिपी पेन्स ला ठार मारण्याची आज्ञा देणारे धडाकेबाज भाषण खूप वेळा ऐकतो आणि त्याची तुलना करून आताचा प्रेसिडेन्ट त्याच्या जवळपास नाही यासाठी देवाचे आभार मानतो Happy

थोडक्यात काय, दादला मेला तरी चालेल पन सवत रंडकी झाली पाहिजे!
देश जाऊ दे खड्ड्यात पण ट्रम्प ला धडा शिकवायचा आहे! देव करो आणि तुमची इच्छा पुरी होवो!

अहो शेंडेनक्षत्र, तुमच्या पोस्टींग्स वाचुन मी चिमटा काढुन खात्री करुन बघत आहे की मी अमेरिकेतच राहतोय ना!

अमेरिका शेवट काय, दादला मेला तरी सवत रंडकी झाली पाहीजे काय, सबंध मेक्सिकन जनता व्यवस्थित रांग लावुन अमेरिकेत घुसतेय काय! देश खड्ड्यात गेला काय! काय वाट्टेल ते बरळत सुटलाय तुम्ही! तरी बर नेमस्तकांनी असली गलीच्छ भाषा वापरण्याबद्दल काउ यांना वर समज दिली आहे.

उदय यांनी बरोब्बर मुद्दा मांडला आहे. ज्यांची डोकी ठिकाणावर आहेत त्यांना बरोबर समजत आहे की सध्या चालु असलेल्या पँडेमिक मधे पहिल्या १०० दिवसात १०० मिलिअन व्हॅक्सिन्स द्यायचे उद्दिष्ट ठेवणारा बायडन भ्रमिष्ट आहे की लोकांना डिसइन्फेक्टंट इंन्जेक्ट्/इंन्जेस्ट करायला सांगणारा जो कोण होता तो भ्रमिष्ट होता!

बायडनला निवडुन देणार्‍या ८० मिलिअन्स अमेरिकन लोकांना तुम्ही शेळ्या म्हणतात. ठिक आहे. पण हे ध्यानात असु द्या की तिच ८० मिलिअन्स लोक तुमच्यासारख्यांना डिप्लोरेबल समजतात!

असामी, इथल्या काही पोस्टींग्स वाचुन मला अजुन काही म्हणी आठवल्या, कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच, चोराच्या उलट्या बोंबा.

भई वाः!...
मुद्द्यांचा प्रतिवाद करता येत नसला तर भाषेवर घसरायचं का? शेळ्या गलिच्छ, पण 'कुत्र्याचे शेपूट, चोराच्या उलट्या' हे शब्दप्रयोग आम्ही यजुर्वेदातले मंत्र समजून घेऊ.
याच धाग्यावर एका माणसाचे आपल्या सख्ख्या मुलीशी संबंध आहेत, या पातळीवर जाऊन चांगली दोन-तीन पाने चर्चा रंगली होती, तेव्हा कुणालाही त्यात काही वाईट दिसले नाही. बरे त्या मुलीचा प्रत्यक्ष राजकारणाशी काही संबंध नाही. आपल्या नात्यातल्या एखाद्या स्त्री बद्दल कोणी 'सभ्य भाषेत' असली चर्चा केली तर कसे वाटेल, याचा सर्वांनी विचार करून पहा. ट्रंप यांना उद्देशून 'तात्या', लिंगपिसाट' असली शेलकी विशेषणे वापरणे हे देखिल ओके होते. फक्त दुसर्‍या बाजूलाच भाषेची बंधने. थोडक्यात त्वाडा कुत्ता टॉमी, सडा कुत्ता कुत्ता.
असो.
****
बाय द वे, 'ट्रंप ने पेन्स ला ठार करण्याची आज्ञा दिलेल्या' त्या भाषणाच्या लिंकच्या अजूनही प्रतीक्षेत आहे.

अहो कसले हे तुमचे घिसेपिटे, तेच तेच डिबंक केलेले निवडणुक कशी फ्रॉड होती , डेमोक्रॅट्स कसे कम्युनिस्ट आहेत व बायडन कसा भ्रमिष्ट आहे हे मुद्दे ? काय कप्पाळ प्रतिवाद करणार असल्या मुद्यांना? वर तुम्हाला कोण किती भ्रमिष्ट आहे याचे जळजळीत उदाहरण देउनही ते तुम्हाला दिसले नाही.

तो तिथे ट्रंप अजुनही तेच तेच कोकलत आहे व तेच शब्दशः तुम्ही इथे उगाळत बसत आहात व त्याचे दळण करत बसला आहात. अमेरिकेतल्या सगळ्या कोर्ट्सनी हे तुमचे तथाकथित मुद्दे कोर्टातुन पार तडिपार केले आहेत. त्यावर तुमचे काय मत?

जाउ दे. शब्दावरुन शब्द वाढत जाउन व त्यातुन विधायक काहीच निष्पन्न होणार नाही असल्या या वादामधे मला मुळीच पडायचे नाही. कंटाळा आला तेच तेच वाचुन. पुढची चार वर्षे हेच मुद्दे तुमच्याकडुन या बीबीवर वाचायला मिळतील याची पुर्ण खात्री असल्यामुळे याबीबीवर यायला माझ्यापुरता तरी अर्थ उरला नाही. तुमचे दळण चालु द्या निवांत. चार वर्षे आहेत तुम्हाला त्यासाठी.

मुकुंद, अहो या अशा प्रतिसादांची मजा घ्या की! हसुन हसुन लोटपोट होतोय मी वरचे प्रतिसाद वाचुन! गेली चार वर्षे काय होतं आणि सध्या काय आहे हे लख्खं दिसतंय. पण ते ७४ मिलियन लोकांना दिसणार नाहीच आहे. लोन स्टार ब्लू होताना दिसला तर मजाच आहे की! तेव्हा चालू द्या!

आँ? निवडणूक फ्रॉड असल्याचा दावा मी कधी केला बुवा Uhoh काही क्रॉस कनेक्शन तर लागलेले नाही? इतर कुणी केला असेल तर मला माहित नाही.

माझे जे काही प्रतिसाद आहेत ते मागच्या दोन पानांवर आहेत. जे लिहिले त्याच्या लिंकाही तिथल्या तिथे दिलेल्या आहेत(कुणी मागण्याआधीच). उगीच 'अमक्याने तमक्याला ठार मारण्याचे आदेश दिले' असे सनसनाटी क्लेम करून अंतर्धान झालेलो नाही.

मला इंटरनेटवर कुणाशी हॉर्न लॉक करून बसण्याची आवड नाही. तुम्ही वर माझे नाव घेतलेत म्हणून लिहिले.

लोन स्टार ब्लू होताना दिसला तर मजाच आहे की! तेव्हा चालू द्या! >> गम्मत म्हणजे लोन स्टार १९६०-७० पर्यंत ब्ल्यूच होता ह्याची माहिती कितीजणांना आहे हे देव जाणे Happy

<< थोडक्यात काय, दादला मेला तरी चालेल पन सवत रंडकी झाली पाहिजे!
देश जाऊ दे खड्ड्यात पण ट्रम्प ला धडा शिकवायचा आहे! देव करो आणि तुमची इच्छा पुरी होवो! >>

---- महिलांबद्दल आदर हा केवळ एक दिवसापुरताच नसावा... अशा म्हणींना वापरातून हद्दपार करणे सहज शक्य आहे.

काउ, हॉर्न लॉक न करण्याची तुमची इच्छा आहे हे वाचल्यामुळे मी हे पोस्ट लिहीत आहे. या पोस्टमधे मी जे काही लिहीत आहे ते पटतय का ते बघा. पटवुन घ्याच असा माझा अट्टाहास मुळीच नाही.

हे बघा, आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. हा देश नुसता मोट्ठाच नाही तर अठराशे पग्गड जाती धर्माचे,वेगवेगळ्या अ‍ॅन्सिस्टरीजचे ववेगवेगळ्या देशातुन इमिग्रेशनच्या आधारे येउन इथे बस्तान बसवलेल्या लोकांनी बसवलेला हा देश आहे. जगाच्या पाठीवर अमेरिकेसारखी वैविध्यपुर्ण सोसायटी तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. यातच अमेरिकेचे वेगळेपण व शक्ती आहे. पण तीच गोष्ट हा देश एकसंध विचारसरणीचा होण्यात अडथळा आणतो. पण आपण सगळे एक गोष्ट मान्य करु शकतो की या युनि॑क काँबिनेशनच्या समाजात सगळ्यांमधे एक “ अमेरिकन स्पिरिट “ म्हणुन एक गोष्ट कॉमन आहे. ते “ अमेरिकन स्पिरिट “ नेमके काय आहे ते इथे बरीच वर्षे वास्तव्य करुनच समजते, अजमवता येते.

असा वैविध्यपुर्ण समाज होमॉजिनिअस विचारसरणीचा असायला पाहीजे हा अट्टाहास कोणी करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे असे माझे मत आहे.

असा समाज आयडिअली कसा हवा याबाबत मग मतभेद असणे हे नैसर्गीक आहे.

या अमेरिकन समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचे हितसबंध कसे जपायचे यातही मतभेद असणे हेही मग ओघाने आलेच.

त्यात भर म्हणने अमेरिकेचे द्विपक्षिय राजकारण.

त्यामुळे अमेरिकेत काय होत आलेले आहे की सोसायटी/ समाज कसा असावा याबाबत आपला जो पर्सनल बायस/ मत असते ते या दोन पक्षाच्या विचारसरणीशी अगदी जुळत नसले तरी इन प्रिन्सिपल जर आपली विचारसरणी त्या दोनपैकी एका पक्षाच्या विचारसरणीशी जवळ असेल असेल तर मग इथली लोक त्या पक्षाशी जुडुन जातात.

मला इथपर्यंत काहीच वावगे वाटत नाही. तुम्ही कुठल्या पक्षाशी अलाइन होता व त्या पक्षाला सपोर्ट करता हे तुमच्या त्या देशातल्या सोसायटीत तुम्हाला आलेल्या वैयक्तिक अनुभवावरुनच तुम्ही ठरवत नाही पण तुम्ही जर त्या देशाच्या समाजाच्या इतिहासाचा अभ्यास केला असेल व त्या इतिहासाच्या तुम्ही केलेल्या इंटरप्रिटेशनमधुन झालेला तुमचा जो पर्सनल बायस झालेला असतो तोही तुम्ही कुठल्या पक्षाला अलाइन होता हे ठरवतो.

पण मग आपण कुठल्या पक्षाला व त्यांच्या पॉलिसीजना सपोर्ट करावा हे ठरवताना हे मात्र लक्षात ठेवले पाहीजे की तुम्ही ज्या पद्धतीने त्या पक्षाला सपोर्ट करण्याच्या निर्णयाला पोहोचलात तसेच समाजातली इतरही माणसे त्यांच्या वैयक्तिक अनुभवातुन व त्यांनी केलेल्या त्याच समाजाच्या इतिहासाच्या अभ्यासातुन झालेल्या त्यांच्या इंटरप्रिटेशन बायसनुसार दुसर्‍या पक्षाला सपोर्ट करण्याच्या निर्णयाला पोहोचले असतात.

हे जर सगळ्यांनी समजुन घेतले तर एक पक्ष दुसर्‍या पक्षाला व एका पक्षाला सपोर्ट करणारी माणसे दुसर्‍या पक्षाला सपोर्ट करणार्‍या माणसांना इतके पाण्यात पाहाणार नाहीत!

लोकशाही सरकरची सुंदरता यातच आहे की ही लोकांनी लोकांसाठी लोकांची बनवलेली राज्यपद्धत आहे. यात समाजातल्या सगळ्याच घटकांना त्यांनाच फक्त जे हवे असच नेहमी होइल अस नाही किंबहुना होउही नये! समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचे हित जपणे हे लोकशाहीत अभिप्रेत असते. गिव्ह अँड टेक हे लोकशाहीत असणे हे लोकशाही टिकवण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. नाहीतर समाजातल्या एकाच घटकाचे हित जपले गेले व दुसरे घटक संपुर्ण दुर्लक्षिले गेले तर तिला लोकशाही म्हणता येइल का?

काउ, राज, शेंडेनक्षत्र तुम्हा सगळ्यांना रिपब्लिकन पार्टीला सपोर्ट करण्याचा पुर्ण हक्क आहे. किंबहुना असा पक्षाला लॉयल सपोर्ट असणे हे लोकशाही मजबुत ठेवण्यासाठी महत्वाचे काम करते. नाहीतर दुसरा पक्ष त्या पक्षाला हवे ते करु शकतो.

पण तसा लॉयल सपोर्ट करताना हे ध्यानात घेतले पाहीजे की डेमॉक्रेटिक पार्टी अमेरिका देश विकायला निघाली आहे किंवा ती पार्टी व त्या पार्टीतले लोक देशद्रोही आहेत असा विचार करण लोकशाही टिकण्यास फार घातक ठरु शकते.

म्हणुन मग अमेरिकन सिस्टिम मधे सेनेट व काँग्रेसमधे निवडुन दिलेल्यांनी बायपार्टिसनशिप दाखवायची असते. एक्झुक्युटिव्ह ब्रांच( प्रेसिडेंट व व्हाइट हाउस) ज्युडिशिअल ब्रांच( कोर्टस व सुप्रिम कोर्ट्स) व लेजिस्लेटिव्ह ब्रांच ( काँग्रेसमेन, सेनेटर्स) या तिन्ही ब्रांचनी रिझनेबल कॉम्प्रोमाइज करुन देश हाकायचा असतो असे घटनाकारांना अभिप्रेत होते. देशाचा गाडा सुरळीत हाकायला हे जरुरीचे असते. माझ्या पक्षाचे आहे ते सगळे खरे/ चांगले व दुसर्‍या पक्षाचे आहे ते सगळे खोटे/वाइट ही जी वृत्ती आहे ती फार घातक वृत्ती आहे.

अमेरिकेत गेल्या ३० एक वर्षात ही वृत्ती जास्तच फोफावली आहे. अमेरिकेत बायपार्टिसनशिप इज अ‍ॅज गुड अ‍ॅज डेड! मला वाटत टिप ओनिल हा शेवटचा स्पिकर ऑफ द हाउस होता की ज्याने बायपार्टिसनशिप वापरुन खुप बिले पास केली होती. अमेरिकेत २०१० पासुन तर ज्या पक्षाची मेजॉरिटी आहे त्या पक्षाने दुसर्‍या पक्षाच्या नरड्यात जबरदस्तीने आपले बिल/आपले जजेस उतरवले आहेत.

आपण मायबोलिवरही अमेरिकन सेनेट/काँग्रेसमधे जे एक्स्ट्रिम पार्टिसन पॉलिटिक्स चालले आहे त्याचीच कॉपी करत आहोत याची मला खंत वाटते. इन जनरल मायबोलिचे सभासद खुप जाणकार व सारासार बुद्धीचे आहेत असेच मी समजतो. त्यामुळे जेव्हा एक्स्ट्रिम पार्टिसनशिप मते इथे मांडुन दुसर्‍या पक्षाच्या लोकांना देशद्रोही ठरवणारे/ कमी लेखणारे पोस्ट्स वाचण्यात येते तेव्ह वाइट वाटते.

तेव्हा काउ, मी तुमच्यावर वैयक्तिक टिका करतोय असा गैरसमज मुळीच करुन घेउ नका.पॉलिटिकल विचार जुळले नाहीत तर वैयक्तिक शत्रुत्व मानण्याइतक्या खालच्या दर्ज्याच्या विचारसरणीचा मी मुळीच नाही व तुम्हीही नसाल याची खात्री आहे.

“गम्मत म्हणजे लोन स्टार १९६०-७० पर्यंत ब्ल्यूच होता ह्याची माहिती कितीजणांना आहे हे देव जाणे”

असामी, तुझ्या या वरच्या वाक्यावरुन इथे हे लिहावेसे वाटले.

तु फक्त १ ९६०-७० पर्यंतच्या टेक्ससच्या इतिहासापर्यंतच गेलास.

पण जर कोणी १८२५ ते १८५० च्या काळातला अमेरिका व टेक्ससचा इतिहास अभ्यासला तर त्यांना खुप काही गोष्टींचा उलगडा होइल. तो सगळा इतिहास मी इथे विस्तृतपणे लिहीत नाही. पण जर तुम्ही अमेरिका- मेक्सिको वॉर ऑफ १८४८ व त्या वॉरच्या शेवटी झालेली ग्वडालुपे-हिडाल्गो ट्रिटी याबाबत वाचले तर कळेल की सध्याचा टेक्सस जो पुर्णपणे मेक्सिकोचा भाग होता तोच नाही तर सध्याची न्यु मेक्सिको, अ‍ॅरिझोना व कॅलिफोर्निया ही राज्येही( जी सुद्धा मेक्सिकोचाच भाग होता)अमेरिकेने मेक्सिकोबरोबर युद्ध करुन, मॅनिफेस्ट डेस्टीनी व मन्रो डॉक्ट्राइनच्या नावाखाली कशी अमेरिकेचा परमनंट भाग करुन टाकली!

मॅनिफेस्ट डेस्टिनी व मन्रो डॉक्ट्राइन बद्दल जरुर वाचा. सबंध उत्तर अमेरिका खंड अमेरिकेने कसा व्यापला व तो प्लान यशस्वी होण्यासाठी अमेरिकेने मॅनिफेस्ट डेस्टिनी व मन्रो डॉक्ट्राइन हे कॉन्सेप्ट्स अमेरिकेने कसे वापरले ते तुम्हाला कळेल. ते कॉन्सेप्ट्स वापरुन अमेरिकेने तत्कालिन युरोपिअन महासत्तांना अमेरिकेच्या त्या प्लानमधे ढवळाढवळ व हस्तक्षेप करण्यापासुन एक हात लांब ठेवले.

एवढा खोलात जाउन इतिहास कोण जाणु इच्छित नाही. पण त्याच टेक्सस , अ‍ॅरिझोना, कॅलिफोर्निया बॉर्डरवर “ वॉल“ बांधायच्या विचारांना मात्र लोक हिरीरीने पाठिंबा देतात! Happy

हा इतिहास सांगायचा अर्थ असा काढु नका की मी खुले आम अमेरिका- मेक्सिको बॉर्डर आता उघडी करा अस म्हणत आहे. पण मला हे वाचुन गंमत वाटली की टेक्ससमधली माणसे कॅलिफोर्नियातुन टेक्ससमधे मायग्रेट होणार्‍या अमेरिकन माणसांच्यासुद्धा विरोधात आहेत!

मला हे वाचुन गंमत वाटली की टेक्ससमधली माणसे कॅलिफोर्नियातुन टेक्ससमधे मायग्रेट होणार्‍या अमेरिकन माणसांच्यासुद्धा विरोधात आहेत! >> त्याच पोस्ट वरून मी लिहिले होते हे मुकुंद. पोरीच्या अभ्यासामूळे तू वर दिलेला इतिहास माहित झाला होता. सध्या टेक्सस पर्पल झालेले आहे असे म्हणतात.

>>एवढा खोलात जाउन इतिहास कोण जाणु इच्छित नाही. पण त्याच टेक्सस , अ‍ॅरिझोना, कॅलिफोर्निया बॉर्डरवर “ वॉल“ बांधायच्या विचारांना मात्र लोक हिरीरीने पाठिंबा देतात!<<
मुकुंद, इतिहासात डोकावुन पहाण्याची काहि गरज नाहि. अमेरिका-कॅनडा या दोन देशांमधली सीमा जगातली सर्वात लांब सीमारेषा आहे (चूभूदेघे). तर मग कनेडियन बॉर्डरवर अमेरिका वॉल का बांधत नाहि? याचं उत्तर सगळ्यांनी शोधलं, तर मेक्सिको, मेक्सिकन वॉर इ. बाबत माहिती गोळा करण्याची काहिहि आवश्यकता नाहि. ती माहिती रिडडंट ठरते. असो...

राज कारण उत्तरेकडून येणारे लोक नि दक्षिणेकडून येणारे लोक ह्यांच्या कातडीच्या रंगामधे फरक आहे.

राज, माझा तो इतिहास सांगण्यामागचा उद्देश एवढाच होता की मेक्सिको- युसए सिमेवर भिंत बांधण्यामागे किती आर्यनी आहे! ज्या देशाकडुन प्रदेश बळकावला त्याच देशाच्या लोकांना अमेरिकेत यायला आळा घालायला आता भिंत बांधली जात आहे.

अर्थात फिजिकल भिंत असा इल्लिगल लोकांचा लोंढा थांबवु शकेल का याचे उत्तर भिंतीचा पुरस्कार करणार्‍या सगळ्यांनी प्रामाणिकपणे स्वतःलाच विचारुन पाहा.

दक्षिण सिमेवरुन असे इल्लिगल इमिग्रंट्स येण्याचे एक कारण अमितने वर दिलेच आहे. ड्रग्स!

पण त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे मेक्सिको, होंडुरस, पॅनामा, ग्वाटेमाला वगैरे देशातील गरीबी! हे बहुतेक इल्लिगल लोक स्वतःचे व त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य उन्नत करायला अमेरिकेत यायचा प्रयत्न करतात. त्यांना माहीत आहे की अमेरिकेत आजही शेतातली बॅक ब्रेकींग मजुरीची कामे अमेरिकेतली गरीब माणसे पण करायला तयार नाहीत. झालच तर अमेरिकेत घरांवर छ्परे टाकण्याचे काम करणारी गोरी किंवा काळी माणसे तुला विरळाच सापडतील. तिथे तुला बहुतेक ( इलिगल) मेक्सिकन, होंडुरन अशी तत्सम साउथ बॉर्डरखालुन आलेली माणसेच दिसतील.

जोपर्यंत असा इल्लिगल (म्हणुन चिप) कामगारांना अमेरिकेत मागणी असेल तोपर्यंत असे दक्षिण सिमेखालुनच्या देशातुन गरीब इल्लिगल लोकांचे लोंढे येतच राहणार.

कॅनडा हा देश G-7 मधला एक आर्थिक द्रुष्ट्या पुढारलेला देश आहे. तिथल्या लोकांना अमेरिकेतल्या फळबागेच्या शेतातले बॅकब्रेकींग काम करायला येण्यात किंवा अमेरिकेतल्या घरांवर छपरे टाकायला इल्लिगली येण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. त्यामुळे अमेरिका- कॅनडा सिमेवर भिंत तर सोडच पण तिथुन अमेरिकेत इल्लिगल घुसखोरी होण्याची भिती अमेरिकेला असण्याचे मुळी कारणच नाही!

हे अगदी एलिमेंटरी लॉजिक तुझ्यासारख्या हुशार माणसाला समजावयला लागत आहे याचे मला खरच आश्चर्य वाटत आहे राज! Happy

आणी आतापर्यंत दोन्ही पक्ष सत्तेवर असताना व त्या पक्षाची मेजॉरीटी असतानाही हा प्रश्न दोन्ही पक्ष सॉल्व्ह करु शकले नाहीत हेही फार इंटरेस्टींग आहे!

कॅनडात युनिवर्सल हेल्थकेअर आहे, युनिवर्सल चाईल्ड केअर आहे, मॅटर्निटी आणि पेरेंटल बेनिफिट्स आहेत, स्टाँग गन लॉज आहेत, लीगल अबॉर्शन आहे आणि या आणि तत्सम अठराव्या शतकातील प्रश्नांवर (?) लिबरल सोडा कॉन्झर्वेटिव्ह्सही भीक घालत नाहीत, इमिग्रेशन रेट अमेरिकेच्या २३% जास्त आहे आणि तरीही जनमत इमिग्रेशन विरोधी नाही तर त्यांना सामावुन घेणारं आहे, लोकसंख्या अमेरिकेपेक्षा ही डायवर्स आहे, लाईफ एक्सपेक्टंसी अमेरिकेपेक्षा जास्त आहे, सरकारवर असलेल्या सिस्टिम्सवर विश्वास आहे ... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेमॉक्रसी काम करते.
कोण कशाला इल्लीगली जाईल अमेरिकेत! Wink

मुकुंद, अगदिच बॅक ब्रेकिंग नाहि पण मेजॉरिटि भारतीय (प्लीज नोट स्किन कलर) आय्टि इंडस्ट्रित कुठल्या लेवलच्या कामाकरता येतात ते बघ. आता काहि चावट कंपन्या कायद्यातल्या लूपहोल्सचा गैरफायदा घेतात, बट दॅट बिसाय्ड्स द पॉइंट. मूळ मुद्दा, भारतीय भुयारं खणुन येत नाहित. बाकि मेक्सिकन लोकांबाबत तु त्या वरच्या पॅरा मधे लिहिलं आहेस ते भारतीयांना सुद्धा चपखल बसतं; पर्फेक्ट अनॅलजी आहे म्हणुन मी ते रिपीट करत नाहि. थोडक्यात, माणुस कसा दिसतो, अथवा दिसायला हवा यावरुन कुठल्याहि देशाचे इमिग्रेशन नियम ठरवले जात नाहित. हा झाला मुद्दा #१.

#२ - इमिग्रेशन हा विषय जरी देशाच्या आर्थिक, सामाजिक फॅब्रिकशी निगडित असला तरिहि त्यावर कंट्रोल असणं हे तितकंच जरुरी आणि जबाबदारीचं काम आहे. अनियंत्रित निर्वासितांचे लोंढे एखाद्या देशाचं कंबरडं मोडु शकतात यावर दुमत नसावं. आता यावर मार्ग काय, तर कायदेशीर मार्गाने लोकांना देशात प्रवेश देणे, आणि अर्थात घुसखोरीला आळा घालणे. यात मात्र, तु म्हणतोस तसा आयरनीचा मुद्दा येउ नये. लढाईतुन असो वा खरेदितुन, हा सगळा प्रदेश आता अमेरिका या नावाने एक सार्वभौम देश म्हणुन ओळखला जातो. उद्या फ्रांस किंवा रशियाने अनुक्रमे लुइझियाना आणि अलास्का मधे आम्हाला बिनबोभाट प्रवेश द्या असं म्हटलं तर बाय्डनकाका ऐकतील का?..

#३ - कॅनडामार्गे अमेरिकेत कार्यरत असलेली ड्रग्जची सप्लाय चेन किती एफिशियंट आहे ते बर्नीकाका माझ्यापेक्षा व्यवस्थित समजावतील. गेल्या प्रायमरीज मधे त्यांच्या कँपेनचा तो हायलाइट होता... Wink

>> कॅनडा सिमेवर भिंत तर सोडच पण तिथुन अमेरिकेत इल्लिगल घुसखोरी होण्याची भिती अमेरिकेला असण्याचे मुळी कारणच नाही!<<
कारण कनेडियन्स ज्या कामाकरता अमेरिकेत येतात त्याकरता विजा बंधन्कारक आहे. कॅनडाच्या बाबतीत जर आय्टि किंवा इतर स्किल्ड जॉबकरता अस्तित्वात असलेली इमिग्रेशन प्रोसेस ढिली असती तर कनेडियन्स खोर्‍याने इथे आले नसते का? तुला खरोखर वाटतं कि कॅनडात जाणार्‍या इमिग्रंट्सचा फर्स्ट चॉइस अमेरिका नसुन कॅनडा आहे?

>>आणी आतापर्यंत दोन्ही पक्ष सत्तेवर असताना व त्या पक्षाची मेजॉरीटी असतानाही हा प्रश्न दोन्ही पक्ष सॉल्व्ह करु शकले नाहीत हेही फार इंटरेस्टींग आहे!<<
हे वाक्य मात्र सेंसिबल आहे याची नोंद करतो. इमिग्रेशन रिफॉर्म हि काळाची गरज आहे.. नाहि, होती गेल्या ३० वर्षांपासुन. पण ते घोंगडं भिजत का ठेवलं जातंय हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे...

अमेरिकेतले लोक अशी रडगाणी का गातात?
ड्रग डीलर्स मेक्सिकोतून येतात. मग ते काय अमेरिकन लोकान्ना जबरदस्ती ड्रग्स घ्यायला लावतात का? नि एव्हढेच ड्रग्स हवे असतील तर स्वतःच का नाही तयार करत? बरोबर आहे - अक्कलच नाही! आणि सगळे रेपिस्ट मेक्सिकोतून आलेले? अमेरिकन गुन्हे करतच नाही का?
आमच्या नोकर्‍या भारतीय नि चिनी लोक नि मेक्सिकेतून आलेले लोक "घेतात" .
अश्या कश्या "घेतात"? कुणि दिल्याशिवायच? नि देणारे कोण आहेत? त्यांना का नाही दोष देत? कारण हिंमतच नाही. शिवाय पुनः अडचण तीच - हाय टेक नोकर्‍या करायला अक्कल नाही नि बाकीच्या नोकर्‍या करायचा आळस!
नुसती दळभद्री जनता नि देश आहे - घ्या इथल्या मूर्ख लोकान्ना लुबाडून नि पैसे घेऊन चैनीत रहा, फुक्कट राजकारणाच्या गप्पा मारू नका -
कसले डेमोक्रॅट नि कसले रिपब्लिकन! सगळे स्वतःची तुंबडी भरायला बसले आहेत. तेंव्हा आपणहि तेच करावे - संधी मिळेल तिथे पैसे मिळवावे नि चैनीत रहावे.
उगाच राजकारण्यांपायी स्वतःमधे दुरावा आणू नका.

सामर्थ्यशाली देशाचे सामर्थ्यशाली अध्यक्ष.
कमळाबाईना लवकरच अध्यक्षपदाची शप्पथ घ्यायला लागणार बहुतेक Proud

Pages