Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अंजली... तुझ्या परवाच्या
अंजली... तुझ्या परवाच्या मिंग्रजीत लिहीलेल्या पोस्टशी १००% सहमत.
राज.. जे मुठभर सेन लोक आहेत त्यांनी आत्ताच आवाज उठ्वला नाही असल्या गोष्टींवर.... तर ही ठिणगी वणवा( म्हणजे सिव्हील वॉर) होण्यात वेळ नाही लागणार.
फारेंड... रुडी व ती कॉन्स्पिररीस्ट लॉयरच नाही तर.. ट्रंप , मिझुरी सेनेटर जॉश हॉली, टेक्सास सेनेटर टेड क्रुझ, फॉक्स न्युज नेटवर्क, एक्स्ट्रिम राइट न्युज नेटवर्क्स लाइक ब्रिटबार्ट, न्युज्मॅक्स, क्विनॉन या सगळ्यांना तु मुर्ख व नुसते कॉन्स्पिरीस्ट समजु नकोस... ते सगळे खुप धुर्त व वेल कॅलक्युलेटेड आहेत.
त्यांच्या या निवडणुक कशी फ्रॉड आहे असा प्रचार करण्याच्या मागची खरी कारणे वेगळीच आहेत.
अश्या कॉन्स्पिरसी थिअरीज पसरवण्यात हे हे सगळे का उत्सुक आहेत?
कारण रिपब्लिकन व कंझरव्हेटिव्ह लिडर्सना हे कळुन चुकले आहे की आता सध्याच्या बदलत्या डेमॉग्राफिक्समुळे... हाउएव्हर माइटीली दे ट्राय.. .. दे कांट लिगली विन द इलेन्शन्स नाउ..( जॉर्जिया सेनेट इलेक्शन इज अ प्राइम एक्झांपल!)... नाउ देअर ओन्ली ऑप्शन इज टु क्रिएट “ मक“ अबाउट द इलेक्शन प्रॉसेस इटसेल्फ ...
याआधी.. इलेक्ट्रोल कॉलेज सिस्टिम याच कारणासाठी केली होती की नुसत्या पॉप्युलर व्होट्समुळे कोणा एका पक्षाला नॅशनल निवडणुक जिंकता येउ नये.. आता तुम्ही बघीतलत तर गेल्या कित्येक दशकात... रिपब्लिकन पार्टी पॉप्युलर व्होट हरुन सुद्धा ...सत्तेवर आली आहे .पण आता त्यांना ती सिस्टिमही तारु शकत नाही हे त्यांना कळुन चुकले.
झालच तर गेली दिडशे वर्ष ... रिपब्लिकन पार्टी... व्होटर सप्रेशनचा आधार घेउन ..निवडणुका जिंकत होती. १९६५ पर्यंत.. ब्लॅक लोकांना मतदानाचा हक्कसुद्धा यांनी दिला नव्हता.. खासकरुन साउथ मधे ...अलाबामा, मिसीसीपी, जॉर्जिया मधे ...अजुनही व्होटर सप्रेशन व व्होटर इंटीमिडेशन सर्रास चालते. पण गेल्या काही वर्षात.. जॉर्जियाची स्टेसी अब्राम्स.. या व्होटर सप्रेशन व इंटिमिडेशनच्या हात धुवुन मागे लागली आहे. या निवडणुकीत तीने सिंगल हँडेडली... जबरदस्त व्होटर रजिस्ट्रेशन करुन, गरीब काळ्या लोकांकडे.. ज्यांच्यांकडे गाड्या नाहीत.. त्यांना
.. मेल इन व्होटींगमधे मदत करुन.. प्लेइंग फिल्ड लेव्हल करुन टाकले जॉर्जियामधे. याधी.. साउथमधे सगळीकडे.. व्होटींग बुथ्स साठी... ३०-३० किंवा ४०-४० माइल्स लांब काळ्या लोकांना जायला लागायचे व गाड्या नसल्यामु़ळे हे गरीब लोक मतदानाला जाउच शकायचे नाहीत!
आणी निवडणुका जिंकायचा रिपब्लिकन पार्टीचा तिसरा हुकमी एक्का म्हणजे... “ जेरीमिअँडरींग“! पण या निवडणुकीत तो एक्काही त्यांच्या उपयोगी आला नाही.
मग आता करायचे काय?
मग अमेरिकेच्या संसदेवर हल्ला करुन ..जे ट्रंपचे विरोधक आहेत त्यांना इंटीमीडेट करुन... किंवा त्यांचा खुन करुन... किंवा मार्शल लॉ जारी करुन.. ट्रंपने स्वतःच कसे अध्यक्ष राहुन अमेरिकेचा डिक्टेटर व्हावे व जे ट्रंपला सपोर्ट करतात त्यांनी हिंसेचा मार्ग पत्करुन.. रेव्होल्युशन घडवुन आणणे ... आणी यासाठी.. व्होटर फ्रॉडनेच डेमॉक्रेटीक पक्षाने ही निवडणुक जिंकली आहे ...अश्या कॉन्स्पिरजीज थिअरीजच्या वावड्या उठवुन लोकांना भडकवयाचे.. हा एकच मार्ग आता सत्तेवर टिकु राहण्यासाठी त्यांच्याकडे उरला आहे.
हायजॅक द पॉवर... युजिंग धिस टॅक्टीक .. इज देअर ओनली ऑप्शन नाउ!
याधी.. साउथमधे सगळीकडे..
याधी.. साउथमधे सगळीकडे.. व्होटींग बुथ्स साठी... ३०-३० किंवा ४०-४० माइल्स लांब काळ्या लोकांना जायला लागायचे व गाड्या नसल्यामु़ळे हे गरीब लोक मतदानाला जाउच शकायचे नाहीत! >> हे वाचून प्रत्येक मतदारासाठी दोन किलोमीटरच्या आत मतदान केंद्र उपलब्ध करून देणारी भारतीय लोकशाही समृद्ध वाटली एकदम!
<< जॉर्जियाची स्टेसी अब्राम्स
<< जॉर्जियाची स्टेसी अब्राम्स.. >>
------- सहमत... स्तेसी अब्राम्स च्या कार्याला सलाम. ग्रेट.
<<<
<<<
मग अमेरिकेच्या संसदेवर हल्ला करुन ..जे ट्रंपचे विरोधक आहेत त्यांना इंटीमीडेट करुन... किंवा त्यांचा खुन करुन... किंवा मार्शल लॉ जारी करुन.. ट्रंपने स्वतःच कसे अध्यक्ष राहुन अमेरिकेचा डिक्टेटर व्हावे व जे ट्रंपला सपोर्ट करतात त्यांनी हिंसेचा मार्ग पत्करुन.. रेव्होल्युशन घडवुन आणणे ... आणी यासाठी.. व्होटर फ्रॉडनेच डेमॉक्रेटीक पक्षाने ही निवडणुक जिंकली आहे ...अश्या कॉन्स्पिरजीज थिअरीजच्या वावड्या उठवुन लोकांना भडकवयाचे.. हा एकच मार्ग आता सत्तेवर टिकु राहण्यासाठी त्यांच्याकडे उरला आहे. >>> त्यात काही विशेष नाही हो... इट्स जस्ट मायनर नुसंस....
आत्ताही अनेक देशांत राजकीय
आत्ताही अनेक देशांत राजकीय अस्थिरता, वंशवाद, हिंसाचार या सर्व घटना घडतच आहेत. Somehow अमेरिकेत असं काही घडू शकणारच नाही याला आत्मविश्वास म्हणायचं की ignorance? >>> जिज्ञासा, काही आशादायक घटनांमुळे लोकशाहीची मुळे भक्कम आहेत व असे इम्पॅक्ट ते पचवून पुन्हा उभे राहू शकतील.
- ३ नोव्हेंबरला निवडणूक झाल्यानंतर जो गदारोळ उठवला गेला त्यानंतरही अध्यक्षाच्या निवडीपर्यंत, म्हणजे ६ जानेवारीपर्यंत होणारी प्रत्येक औपचारिक स्टेप नियमानुसारच झाली आहे. त्यात डेमोक्रॅट व रिपब्लिकन्स दोघांचाही सहभाग आहे. ट्रम्प कॅम्पेनच्या कांगाव्याचा कोणताही परिणाम त्यावर झाला नाही. इव्हन कॅपिटॉल बिल्डिंगच्या घटनेनंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा कामकाज सुरू होउन ठरल्याप्रमाणे अध्यक्ष निवडला गेला.
- अनेक राज्यांत - विशेषतः जॉर्जियामधे- गव्हर्नर केम्प व सेक्रेटरी ऑफ स्टेट रॅफेन्सबर्गर हे दोघे रिपब्लिकन्स एका बाजूने ट्रम्प व कॅम्पेनकडून येणारे प्रेशर व दुसर्या बाजून ट्रम्प कल्ट मधल्या कट्टर मतदारांकडून येणारे प्रेशर - दोन्ही सहन करून आपल्या तत्त्वांशी ठाम राहिले. कोठेही त्यांनी प्रोसेस मधे अडथळा येउ दिला नाही. कॅम्पेन व समर्थकांनी केलेले बिनडोक आरोप, रॅण्डम क्लिप्स वगैरे सर्वांना कायदेशीर उत्तरे दिली व त्यातली हवा काढून घेतली. यातले केम्प जे आहेत त्यांची विशेष तारीफ केली पाहिजे. कारण दोनच वर्षांपूर्वी जेव्हा ते जिंकले तेव्हा स्टेसी अब्राम्स व डेमोक्रॅट पार्टीकडून त्यांनी प्रचंड टीका सहन केली होती. त्यांनी ती इलेक्शन वोटर सप्रेशन करून जिंकली असेही आरोप झाले होते. ते खरेखोटे जे काय असेल ते असेल पण केम्पना बरेच मोटिव्हेशन होते ट्रम्प कॅम्पेनला सपोर्ट करून स्वतःचा फायदा करून घेण्याचे. त्यांनी ते केले नाही हे महत्त्वाचे.
- ट्रम्प कॅम्पेनने ६२ केसेस दाखल केल्या. त्यातल्या फक्त एका खटल्यात कॅम्पेनच्या बाजूने निकाल दिला गेला. तो ही अत्यंत मायनर होता. बाकी ६१ खटले त्यांच्याविरूद्ध गेले. पण प्रत्येक अधिकृत दाव्याला ड्यू प्रोसेस दिली गेली. यातले अनेक ट्रम्पविरोधी निर्णय रिपब्लिकन पक्षाने वेळोवेळी नेमलेल्या जजेस ने घेतले. त्यातले काही तर खुद्द ट्रम्पने नेमलेले होते.
- अनेक राज्यांत रिपब्लिकन पार्टीमधे असलेले जजेस, निवडणूक अधिकारी, स्थानिक नेते होते. या सर्वांनी कायद्याच्या बाजूने निर्णय घेतले.
- जसे या खटल्यांत दम नाही, हे लोक नुसतेच बाहेर बडबडतात व कोर्टात काही म्हणत नाहीत हे दिसू लागले तसे रिपब्लिकन व कॉन्झर्वेटिव्ह बाजू घेणारे पेपर्स, वेब साइट्स व ब्लॉगर्स यांनी यापासून फारकत घ्यायला सुरूवात केली. डिसेंबरच्या मध्यापर्यंत यातले बरेच जण उघडपणे सांगू लागले की हे बकवास आहे.
- अगदी ६ जानेवारीला अगदी क्लोज सर्कल्स मधले लोकही शेवटी नाईलाजाने का होईना घटनात्मक रीतीनेच वागले. माइक पेन्स आधीच सांगू शकला असता की तो निर्णय बदलू शकत नाही. पण निदान ६ जानेवारीला म्हंटला.
- ६ जानेवारीच्या घटनेनंतर असंख्य रिपब्लिकन्स सुद्धा ट्रमविरोधात गेले आहेत. राहिले आहेत फक्त त्याचे काही कट्टर मतदार जे बरेचसे डिल्यूजन मधे आहेत. त्याने यावेळेस लाइन क्रॉस केली असेच बरेचसे इतर नेते, पक्षाचे डोनर्स वगैरे म्हणत आहेत.
लोकशाही किंवा कोणतीही सिस्टीम एकदम एका दिवसात ढासळत नाही. विविध ठिकाणी जे नियम असतात, चेक्स्/बॅलन्सेस असतात ते छोट्या प्रमाणावर धुडकावून लावले जातात तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम होतो. इतर अनेक देशांत बहुताश तसे चित्र दिसते. त्यामानाने गेल्या दोन महिन्यातील घटनांमधून अमेरिकन सिस्टीमचे व लोकांचे वेगळेपण दिसते.
अजून काही निरीक्षणे - यात
अजून काही निरीक्षणे - यात सुमारे ९० लोकांना अटक झाली आहे. कॉन्जेन्शिया नावाच्या कंपनीचा सीईओ यात होता. त्याला त्या कंपनीने हटवले आहे. अजून अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. पेलोसी च्या खुर्चीवर बसून फोटो काढणारा, तिचे पोडियम घेतलेला - यांचीही ओळख पटली आहे व त्यांनाही अटक झाली आहे.
या सर्वांनी तेथे फोटो व व्हिडीओ काढल्यामुळे बीएलम/अँटिफा ने केले म्हणायलाही जागा ठेवली नाही पब्लिकला (ट्रम्पनेही ठेवली नाहीच ते वेगळे). कारण अनेक जण क्यू अॅनॉन व राइट विंग ऑर्गनायझेशन्सशी संबंधित निघाले आहेत.
ट्विटरने पण हाकललं नुकतच
ट्विटरने पण हाकललं नुकतच कायमचं >>>> या ट्वीटरच्या निर्णयामागे विजया गड्डे यान्चा हात आहे. त्या ट्वीटरच्या लीगल पॉलिसी खात्याच्या मुख्य आहेत. त्यान्च्या हाताखाली ३५० लोक काम करतात.
फारेंड.. तुझे मुद्दे बरोबर
फारेंड.. तुझे मुद्दे बरोबर आहेत... खासकरुन माइक पेन्स, जॉर्जिया गव्हर्नर व जॉर्जिया सेक्रेटरी ऑफ स्टेट रॅफेनस्पर्गर आणी सेनेटर मिट रॉमनी.. यांना क्रेडिट दिले पाहीजे. ते ट्रंपच्या गुंडागर्डीला व धमक्यांना घाबरले नाहीत.
पण त्या दिवशी.. लोकशाहीला काळीमा फासणारा असा दंगा ट्रंप सपोर्टर्सनी केल्यावर, संसदेची तोडफोड व नासधुस केल्यावर.. ५ जणांचे खुन ( त्यात संसदेचा एक पोलिस सुद्धा होता) करुन झाल्यावरसुद्धा... १३५ रिपब्लिकन काँग्रेसमन व १३ रिपब्लिकन सेनेटर्स.. जॉश हॉली व टेड क्रुझ हे त्यांचे म्होरके.. या लोकांनी.. लोकशाही उलथावयाचा .. त्या रात्री परत एकदा प्रयत्न केलाच ना? त्याबद्दल तुझे काय मत आहे? आज १३ सेनेटर्स व १३५ काँग्रेसमन.. लोकशाही उलथावयाचा प्रयत्न करत आहेत... उद्या किती करतील याची खात्री तु देउ शकतोस?
त्या रात्री.. संसदेत.. बायडनच्या विजयावर.. कायदेशिर शिक्कामोर्तब झाले हे खरे आहे...
बट... अॅट व्हॉट कॉस्ट?... तु रॉमनी, लिंडसे ग्रॅहॅम व पेन्सला ट्रंप व्होटर्स कसे वागवत आहेत हे बघत आहेस का? ऐअरपोर्ट व विमानात रॉमनी व लींडसे ग्रॅहॅमला काय हॅरेसमेंट झाली हे नेटवर सगळीकडे.. व्हायरल झाले आहे.. उघड उघड त्यांना जिवेनीशी मारण्याच्या धमक्या.. तेही पब्लिक प्लेसमधे!.. लिंडसे ग्रॅहॅमला सिक्रेट सर्व्हिस एस्कॉर्ट द्यावा लागला!
व्हाइस प्रेसिडेंट पेन्सला तर ट्रंप व्होटर्स किती धमक्या व कसल्या कसल्या शिव्या देत देत आहेत.. इथे लिहीता येणार नाही..
त्या दिवशी .. संसदेमधे... या सगळ्या . तु म्हणतोस त्या.. लोकशाही टिकवून धरणार्या माणसांना.. पेन्ससकट... भुयारातुन.. त्यांचा जिव या जिवघेण्या ट्रंप समर्थकांपासुन वाचवण्यासाठी.. गुप्त ठिकाणी.. पळवुन न्यायला लागले..
नाहीतर प्रचंड मोठा रक्तपात त्या दिवशी अटळ होता... नॅन्सी पलोसीचा खुन करायला तो माणुस.. रायफल घेउन तिच्या रुममधे तिची वाट बघत बसला होता.
आणी हे झाले उघड उघड असा दंगाधोपे करणारे.. पण या माणसाला व त्याच्या विचारांना पाठिंबा देणारे ७५ मिलिअन्स लोक... प्राउड बॉइज.. व्हाइट सुप्रिमिस्ट वगैरे.. घरी बसुन.. पुढचे दंगली धोप्याचे प्लान करत आहेत हे तु विसरु नकोस! ही तर नुसती नांदी व ठिणगी आहे... या धुराखाली फार मोठा विस्तव ऑलरेडी पेटलेला आहे.
म्हणुन.. वेळीच हे सगळे ओळखले नाही तर ..लोकशाही टिकुन राहील .. ती भक्कम आहे.. या भोळ्या आशावादाने लोकशाही टिकुन राहील असे मांडे मनात खात बसलोत तर .. हा जो लोकशाहीचा प्रयोग आहे.. तो लवकरच इतिहासात जमा होउ शकतो हे लक्षात ठेव.
अमेरिकेचा दुसरा अध्यक्ष... जॉन अॅडॅम्स.. याने २२५ वर्षांपुर्वी..तेव्हाच म्हटले होते...
“ रिमेंबर.. डेमॉक्रेसी नेव्हर लास्ट्स लाँग..इट सुन वेस्ट्स, एक्झॉस्ट्स अँड मर्डर्स इटसेल्फ. देअर वॉज नेव्हर अ डेमॉक्रेसी यट.. दॅट डिड नॉट कमीट स्युसाइड!”
अमेरिकन लोकशाही ही २४४ वर्षे टिकुन राहीली आहे याचा अर्थ असा काढु नकोस की अजुन २४० वर्षे ती अशीच टिकुन राहील.. त्या दिवशी वॉशिंग्टन डी सी ला संसदेवर हल्ला करणारे जे ट्रंप भक्त आले होते ... दे आर ....अँड पिपल हु थिंक लाइक देम.... आर .. क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर फॉर द अमेरिकन डेमॉक्रेसी!
हा जो लोकशाहीचा प्रयोग आहे..
हा जो लोकशाहीचा प्रयोग आहे.. तो लवकरच इतिहासात जमा होउ शकतो हे लक्षात ठेव. >>> नक्कीच. पण गेल्या दोन महिन्यांत जे मला दिसले ते ही मी लिहीले. इतर अनेक देशांत जेव्हा असे प्रकार होतत तेव्हा इतक्या मोठया प्रमाणावर त्याच्या विरोधात तीन पैकी किमान दोन ब्रांचेस मधले लोक उभे राहिलेले इतरत्र दिसतात का याच्याशी तुलना करायला हवी.
क्रूझने यावेळेस ऑब्जेक्शन घेणे १००% चूक आहे. पण ते अशामुळे की एकूण धगधगत असलेले वातावरण त्याला माहीत असूनही त्याने त्याला हातभार लावायचा उद्योग केला म्हणून. नाहीतर निव्वळ ऑब्जेक्शन घेणे हे नवीन नाही. याआधीही घेतली गेलेली आहेत. कोणी आक्षेप घेणे, मग त्याला पुरेसा पाठिंबा असेल तर दोन्ही सभागृहांनी त्यावर चर्चा करणे वगैरे सगळा प्रोसेसचाच भाग आहे. ती यावेळेसही झाली. बाहेर जे झाले ते झाले नसते तर ते निव्वळ पोश्चरिंग ठरले असते.
उद्या पन्नासपेक्षा जास्त सिनेटर्स असे ऑब्जेक्शन घेतील का? माहीत नाही. ही लोकशाही स्लिपरी स्लोप वर आहे, की छोट्या पदांवर असणार्यांनी ठाम राहून ती हे पचवेल - आत्ता काहीच सांगू शकत नाही. मी गेल्या २ महिन्यांत जे उठून दिसले ते सांगितले, इतकेच.
डाऊनप्लेड व्हर्जन ऑफ अमेरिकन
डाऊनप्लेड व्हर्जन ऑफ अमेरिकन हिस्टरी:
१. बॉस्टन मासएकर - वेकप गाय्झ, ओन्ली फाय पीपल डाईड. दे वेअर पेट्रियट्स, बट टफ चॉईस. गेट ओव्हर इट!
२. सिव्हिल वॉर - हे रेसिझम किंवा स्लेव्हरीबद्दल नव्हतं. तुम्ही जर अभ्यास केला (=> यातून आपण याचा अभ्यास केला आहे, असा मनोहारी देखावा उभा करता येतो! :)), तर तुम्हाला कळेल की इट वॉज ऑल अबाऊट स्टेट्स राईट्स अँड कॉटन ट्रेड.
३. वर्ल्ड वॉर १ - नॉट अॅज बिग अॅज वर्ल्ड वॉर २!
४. वर्ल्ड वॉर २ - समव्हॉट ऑफ अ नुसंस!
५. व्हिएतनाम वॉर - दे वर जस्ट क्रिएटिंग सम मक, टू बॅड दे गॉट स्टक इन इट - लिटरली!!
६. वॉटरगेट, इराण-कॉन्ट्रा, इराक वॉर - निक्सन/रेगन/बुश कडून झाली असेल एखादी चूक, त्यात काय विशेष एवढं! नथिंग ऑट ऑफ ऑर्डिनरी!!
-------------------------------------
कॅपिटॉलवर झालेला हल्ला = एका घपलेबाज बिल्डरने, एक बिल्डिंग रिकामी करायला भाडोत्री गुंड पाठवले आणि त्यांनी तोडफोड करून दहशत माजवली. त्यात काय एवढं मोठंसं? अशा गोष्टी होतच असतात!
ट्रंप स्वतःला 'पार्डन' करू
ट्रंप स्वतःला 'पार्डन' करू शकतो का? कॅपिटल बिल्डींगमधे घुसलेल्या लोकांना 'पार्डन' करेल का?
त्याच्यावर फेडरल नाही तर स्टेट संबंधात खटला चालू शकतो का जेणेकरून तो स्वतःला पार्डन करू शकणार नाही.
बाकी रीपब्लिकन नेत्यांचे बदलते रंग मजेशीर आहेत. सरडाही इतक्या पटापट रंग बदलू शकणार नाही. टेड क्रूज आणि जॉश हॉव्ली यांची राजकीय कारकिर्द संपेल का?
@फा --
@फा --
>>> इतर अनेक देशांत जेव्हा असे प्रकार होतत तेव्हा इतक्या मोठया प्रमाणावर त्याच्या विरोधात तीन पैकी किमान दोन ब्रांचेस मधले लोक उभे राहिलेले इतरत्र दिसतात का याच्याशी तुलना करायला हवी.
--- याच्याशी सहमत आहे. मात्र हेही लक्षात घ्यायला हवं की, फेडरल लेव्हलला - हे चेक्स अँड बॅलन्सेस बर्यापैकी खिळखिळे झालेत. विशेषतः लेजिस्लेटिव्ह (सिनेट, हाऊस).
>>> ही लोकशाही स्लिपरी स्लोप वर आहे, की छोट्या पदांवर असणार्यांनी ठाम राहून ती हे पचवेल - आत्ता काहीच सांगू शकत नाही.
--- एक्झॅक्टली. जॉर्जिया, मिशिगन, विस्कॉन्सिन, अॅरिझोना यांतल्या राज्यस्तरिय रिपब्लिकन अधिकार्यांनी जो थेट राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या भक्तांकडून येणारं साम*-दाम-दंड-भेद (अगदी त्यांना आणि कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना) दडपण झुगारुन आपलं कर्तव्य बजावलं - ते अतिशय कौतुकास्पद आहे.
(*सर्वात विनोदी म्हणजे, ट्रम्पतात्यांनी जॉर्जियाच्या रायन जर्मनीला - I'm sure you're a good lawyer, You have a nice last name म्हणून खुशामत करण्याचा प्रयत्न केला. त्याने अर्थात विनयपूर्वक, तात्यांच्या कॉन्स्पिरसी थिअरीज 'That's Not Accurate, Mr. President' म्हणून फेटाळून लावल्या)
फा, सिस्टीममधले लोक खंबीरपणे
फा, सिस्टीममधले लोक खंबीरपणे सत्याच्या आणि कायद्याच्या बाजूने उभे राहिले ही उत्तमच गोष्ट आहे. पण लोकशाहीचा पाया सिस्टीम पेक्षा देखील सर्वसामान्य जनतेत असलेल्या संतोषावर टिकून राहतो. जेव्हा जनतेत असंतोषाची ठिणगी पडते तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते. It's not like there are no systems in place when a coup happens, it's more like the people are against the system in place. And when people are extremely unhappy (= कायदा न जुमानणे, हिंसाचार) with the system the democracy is at risk.
आता अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस
आता अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस ने पार्लर (Parler) चे होस्टिंग रद्द केले आहे.
ही बरीचशी नवीन अॅप्स क्लाउड होस्टिंग वापरतात. अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट किंवा गूगलचे. या तिन्ही कंपन्यांनी नाकारले तर इतर छोटेमोठे प्लेयर्स आहेत पण त्यांच्या सर्व्हिसेस या तिघांच्या तुलनेत कशा आहेत कल्पना नाही. इतर कोणी टेक चर्चेत फार दिसत नाही. नाहीतर पार्लर वाल्यांना पूर्वी करत तसे मोठे सर्व्हर्स विकत घेउन होस्ट करावे लागेल. किंवा ट्रम्पलाच स्वतःचे क्लाउड होस्टिंग काढावे लागेल.
Parler - म्हणजे म्हणे फ्रेंच मधे "बोलणे". मूळ फ्रेंच उच्चार "पार्ले" असा आहे, तर अमेरिकेत या नेटवर्कचा उच्चार पार्लर असाच केला जातो. हे असे स्पेलिंग का केले ते शोधायला गेलो तर हे समजले.
मुकुंद, सहमत!
मुकुंद, सहमत!
जिज्ञासा +१
ट्रंपच तारणहार असे मानणारे, उघड आणि क्लोझेटमधले व्हाईट पॉवरवाले भरपूर संख्येने आहेत. व्हाईट पॉवरचा गेली १२ वर्षे हळूहळू प्रचार सुरु आहे. कोविडचा बागुलबुवा ट्रंपला पाडण्यासाठी उभा केलाय असे मानणारे आमच्या ओऴ़़खीत बरेच जण होते आणि हे इलेक्शन ढापले असे मानणारेही बर्याच संख्येने आहेत. सोशल मेडीआ आणि नेटवर्कच्या पलिकडे बार्न मधून चालवली जाणारी छोटी रेडीओ स्टेशन्स असतात. ज्यावर प्रचार सुरु असतो. डेमोक्रॅट्स निवडून आले तर तुमचा ४०१के जाईल पासून काहीही सुरु असते. साधी कष्टकरी लोकं यावर विश्वास ठेवतात. आमचे स्टेट रेड आहे. आपल्या इथे सगळे नियमानुसार झाले पण इतर राज्यांत तसे झाले नाही असे मानणारी बरीच मंडळी इथे आहेत.
<<<थेट अमेरिकन प्रेसिडेंट चे
<<<थेट अमेरिकन प्रेसिडेंट चे तोंड बंद करायचे अधिकार डोर्सी वा झुकरबर्ग कडे >>>
थेट प्रेसिडेंट! हा काय भारत वाटला काय?
प्रेसिडेंट असला तरी ट्विटर वगैरे संस्था खाजगी आहेत. त्यांचे अधिकार कमी करण्याचा जोरात प्रयत्न नुकताच करण्यात आला. व्हेटो धुडकाऊन लावण्यात आला! ट्वीटरचे, फेसबूक चे नियम मान्य करीन असे कबूल करायचे नसेल तर येऊ नका ट्वीटर,फेसबूक वर!
ट्रंप नाही तर त्याचे इतर अनेक मित्र आहेत त्याच्या सारखेच लिहिणारे. त्याचा मुलगाच आहे, त्याच नावाचा!
सोशल मिडीआ द्वारे जनमत तयार
सोशल मिडीआ द्वारे जनमत तयार करून खोटी माहिती देउन मोठ्या जन समुहाला भडकावण्याचा प्रयोग अपेक्षे पेक्षा जास्त यशस्वी झाला हे या वरून दिसते आहे. सर्वच देशांत हा धोका वाढतो आहे. अमेरिका जात्यात तर आम्ही सुपात असाच प्रकार आहे.
They could have blown the
खुपच इंग्लिश झाले.. या पोस्टमधे..
जिज्ञासा, काही आशादायक
जिज्ञासा, काही आशादायक घटनांमुळे लोकशाहीची मुळे भक्कम आहेत व असे इम्पॅक्ट ते पचवून पुन्हा उभे राहू शकतील. >> अमोल, वॉशिंग्ट्न पोस्ट वर काल आलेला ओप्नियन पोल बघ.
https://www.washingtonpost.com/politics/2021/01/09/most-americans-reject...
डोळे उघडणारे आकडे आहेत. 18 million Trump supporters strongly approve of what the mob did and 24 million see those in the mob as representing people like them. That’s not as robust a condemnation as many Americans would probably like to see.
तेंव्हा हे खरच एव्हढे सोपे प्रकरण आहे असे धरू नकोस. इतरत्र सोड, इथली राजची पोस्ट बघ नि तो कशा प्रकारे ह्या घटनांना बघतो हे लक्षात घे. हे एक उदाहरण बर्याच लोकांना लागू पडणारे आहे. (हि दुर्दैवाची बाब आहे)
असामी +1
असामी +1
सनवजी,
सनवजी,
तुम्ही लिहिलत,
>ती भारतीय झेंडा घेतलेली व्यक्ती मायबोलीकर आहे का हा प्रश्न कुणीतरी विचारला होता.
> तर तो माणूस व्हिन्संट झेवियर आहे, केरळचा आहे. मायबोलीकर नसावा. भारतातल्या काँग्रेसचा समर्थक आहे
यू नेव्हर डिसपॉइंट !
तो माणूस भाजप / विहिंप चा आहे. संस्कृतही बोलतो !
https://www.altnews.in/bjp-or-congress-sympathisers-identifying-the-trum...
ती झेंडा घेतलेली व्यक्ती
ती झेंडा घेतलेली व्यक्ती भाजपची की काँग्रेसची सिंपथायझार आहे याच्याशी मला काही देणेघेणे नाही. भारताचा तिरंगा अशा ठिकाणी वापरणे गैर! हा काही खेळाचा सामना नव्हे तर भारतीय टीमला सपोर्ट दाखवायला तिरंगा न्यायला. देशाचा ध्वज हा त्या देशाचे प्रतिनिधीत्व दाखवतो. अमेरीकेच्या लोकशाहीच्या इतिहासाचा काळा दिवस, आणि अशावेळी निवडणूक उलथवण्यासाठी निदर्शनात सहभागी होताना लोकशाही असलेल्या भारताचा ध्वज वापरणे गैर! भारतीय दूतावास हे सगळे चालवून घेतात हे अजूनच विचित्र.
विकु,
विकु,
पथेटिक केविलवाणी आणि नेहमीप्रमाणे खोटारडी पोस्ट आहे alt news ची. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाही नाही. असो. भारतातल्या या घाणीची चर्चा या धाग्यावर नको.
तसंही, अमेरिकेत ट्रम्प सपोर्टर आणि भारतात मोदीविरोधक, पवार समर्थक वगैरे असलेले काही आयडी याच धाग्यावर आहेत. त्यामुळे असे लोक अस्तित्वातच नसतील टाईप थापा आता कोणी मारू शकत नाही.
भारतीय दूतावास नक्की काय
भारतीय दूतावास नक्की काय करणार यात?
ध्वज (अमेरिकेचा असेल का भारताचा) कुठेही घेऊन जाणे, त्याला प्रेमाने मान देऊन/ आदर देऊन वागवणे की फाडणे, पायदळी तुडवणे, जाळणे हे सगळे फर्स्ट अमेंडमेंट खाली येते. त्या व्यक्तीला फारतर भारतात यापुढे कायमचा प्रवेश बंद त्याचे ओसिआय इ. इमिग्रेशन/ आर्थिक नाकेबंदी करू शकते. जी अवश्य करावीच!
त्या व्यक्तीवर भारतात गुन्हा दाखल केला तर मात्र अमेरिकेने (कुठल्याही अॅडमिनिस्ट्रेशनने) भारताशी अजिबात सहकार्य करू नये आणि फर्स्ट अमेंडमेंटची कास सोडू नये.
घाबरू नका. अमेरिका या
घाबरू नका. अमेरिका या मुद्द्यांवर फर्स्ट अमेंडमेंटची कास सोडणार नाही.
अमेरिका भारताला घाबरणार आहे का?
मुळ्ळीच्च नाही, अज्जिब्बात नाही!
जोपर्यंत भारतात अमेरिकन बोलतात, भारतीय लोक अमेरिकेच्या मालासाठी जीव टाकतात (नि भरपूर पैसा खर्च करतात), जोपर्यंत भारतीय लोक साम दाम यांचा अविरत वापर करून अमेरिकेत यायला मरतात, अमेरिकन कंपन्यांसाठी जिवापाड मेहनत करतात, तोपर्यंत अमेरिकेला भारताची मुळीच भीति नाही.
करून करून काय करणार भारत? जर भारतीय सरकारने अमेरिकेतून माल घेण्याचे बंद केले, तर भारतीय लोक निर्लज्जपणे जास्त पैसे देऊन तोच अमेरिकन माल काही पण मार्गाने विकत घेतील. इथले कुठलेहि भारतीय आपल्या अमेरिकेतील कंपन्यांमधल्या लठ्ठ पगाराच्या नोकर्अॅया सोडणार नाहीत.
भारतीयांना जे वाटते की अमेरिका आपल्य जीवावर चालते, ते म्हणजे रोजी मजुरीवर दगड माती वाहून नेणार्या कामगारांनी "या इमारती आम्हीच बांधल्या" असे म्हणण्यासारखे आहे. पैसे एकाचे, मालकी दुसर्याचीच नि कष्ट मात्र आमचे असे आहे.
फुल स्केल मिलिटरी वॉरची तयारी
अमेरिकेत फुल स्केल मिलिटरी वॉरची तयारी.. वॉशिंग्टन डी सी मधे १५००० सैनिक हजर झाले आहेत.
तिकडे मिलिअन्स ऑफ ट्रंप सपोर्टर्स इनॉगरेशन डे .. ला... फुल स्केल वॉशिंग्टन डीसी वर आर्म्ड हल्ला करायची तयारी करत आहेत. त्यांचा प्लान व्हाइस प्रेसिडेंट पेन्सला फायरींग स्क्वाड पुढे ठार मारायचा आहे.
आणी दोन्हीकडचे लोक.. आपण लोकशाहीसाठीच लढत आहोत असे मनात समजत आहेत... व्हॉट अॅन आर्यर्नी!
एफ बी आय ने .. इनॉगरेशन डे ला.. नुसत्या वॉशिंग्टन वरच हल्ला होणार अशी वॉर्निंग दिली नसुन तर..५० च्या ५० स्टेट च्या राज्यांच्या राजधान्यांवर ट्रंप सपोर्टर्स आर्म्ड हल्ला करणार आहेत असा इंटेलिजंस ..सगळ्या राज्यांशी शेअर केला आहे.
ही सिव्हिल वॉरची नांदी नाही तर काय आहे?
या धाग्यावर "हे लाइटली घेउ
या धाग्यावर "हे लाइटली घेउ नये" अर्थाच्या पोस्ट लिहीणार्या सर्वांना - >>> टोटली नोटेड! अनेक देशात हे पाहिले आहे की या गोष्टी एकदा खिळखिळ्या होउ लागल्या की पुन्हा पूर्ववत होणे अवघड असते. इथे तेच होईल की इथली व्यवस्था ते होऊ देणार नाही - आत्ता काहीच सांगू शकत नाही.
फक्त हे ७४ मिलीयन लोक रेसिस्ट, बिनडोक किंवा आणखी काही आहेत असे वाटत असतानाच गेल्या दोन महिन्यात याबद्दल प्रचंड वाचताना, बातम्यांत माहिती पाहताना जी याला छेद देणारी उदाहरणे दिसली ती वरती लिहीली.
https://youtu.be/JTfhYyTuT44
https://youtu.be/JTfhYyTuT44
कोणाला जर क्विनॉन म्हणजे काय व ही माणसे/ बायका कशात बिलिव्ह करतात.. तर ही एक तासाची यु ट्युबवर असलेली .. डॉक्युमेंटरी जरुर बघा..
सध्या अमेरिकेत .. ओबामा कसा सेटन आहे ते हिलरी कशी क्रुकेड आहे व जेलमधे गेली पाहीजे, तसच मास्क न घालणे, कोव्हिड-१९ पँडेमिक म्हणजे कसा एक होक्स आहे.. पासुन ते ट्रंप कसा सेव्हिअर आहे व गेल्या आठ्वड्यात जे झाले व पुढच्या आठ्वड्यात जे होणार आहे ते का झाले व का होणार आहे व या लोकांची विचारसरणी काय आहे... हे ही डॉक्युमेंटरी बघुन समजेल.
जिज्ञासा, फारेंड व इतर.. जरुर बघा ही डॉक्युमेंटरी.. सुरुवात .. क्युनॉनने होत नाही.. सुरुवात तो फ्लॅट अर्थ थिअरी बिलिव्ह करणार्यांपासुन करतो... पहीली १५ मिनिटे बघत रहा.. मग तो मस्त सगळे क्विनॉन एक्प्लेन करतो...
हा लेख मुळातून वाचण्याजोगा
हा लेख मुळातून वाचण्याजोगा आहे: https://www.politico.com/news/magazine/2021/01/07/jan-6-was-9-weeks-and-...
On the evening of November 5, the president of the United States addressed the American people from the White House and disgorged a breathtaking litany of lies about the 2020 election. He concluded that the presidency was being stolen from him, warning his supporters, “They’re trying to rig an election and we can’t let that happen.” Feeling a pit in my stomach, I tweeted, “November 5, 2020. A dark day in American history.”
Within moments, my phone flickered to life with text messages, several of them from longtime Republican sources in Washington. Their sentiments were a mix of reassurance and curiosity. President Trump, they said, was just blowing off steam. He was coping in his own weird way with the humiliation of defeat. It was just a bunch of harmless bluster. Why the overreaction? Was I really that worried?
बाथटबमधल्या बेडकावर उकळतं पाणी ओतलं, तर तो लगेच उडी मारून पळून जातो; पण जर थंड पाण्यापासून सुरुवात करून हळूहळू पाण्याचं तपमान वाढवत नेलं, तर बेडकाला ती ऊब सुखासुखी सोडवत नाही - हे उदाहरण आठवलं!
नंदन... मस्त आर्टिकल, शेअर
नंदन... मस्त आर्टिकल, शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
मी सिव्हील वॉरबद्दल उगाच कोकलत नाही... .. मलाही या लेखकासारखेच अनुभव आलेले आहेत व माझ्या ऑब्झरव्हेशन मधे अश्या अनेक व्यक्ती आलेल्या आहेत. आज अमेरिकेत एकंदरीत काय चालले आहे हे बघुन मला नक्की वाटते की सिव्हिल वॉर अटळ आहे.
वरची यु ट्युबवरचीडॉक्युमेंटरी जे बघतील त्यांना कळुन येइल की अमेरिका जरी जगातला एक श्रिमंत, सुशिक्षित, औद्योगिक द्रुष्टीने प्रगत व पुढारलेला देश म्हणुन मानला जात असला तरी अमेरिकेत सगळेच शिकले सवरलेले व हुशार आहेत असे मुळीच नाही.
अमेरिकेत खुप मोठा वर्ग.. फक्त बारावीच पास झालेला आहे.. (आणी कॉलेज शिकलेले असतील.. तरी जेमतेम बॅचलर किंवा असोशिएट डिग्रीच फक्त त्यांच्याकडे आहे)... यातली खुप लोक इव्हॅन्जिलिकल ख्रिश्चन लोक आहेत ( जे बायबलमधे जे लिहीले आहे... ते.. ही लोक... लिटरली खरे मानतात.. जसे... पृथ्वी सपाट आहे, पृथ्वी जगाच्या सेंटरला आहे वगैरे वगैरे)..
हा मोठा वर्ग अमेरिकेत श्रमजिवी कामे करतो . ही लोक...बहुतेक पे चेक टु पे चेक जिवन जगत असतात. त्यातले बरेच... मॅन्युफॅक्चरींग जॉब्स किंवा मायनींग जॉब्स करत असतात... खर म्हणजे ..करत होते... गेल्या ५० वर्षात.. कार मार्केट जपानने खाउन टाकल्यामुळे व सटर फटर मॅन्युफॅक्चरींग चायनाने गिळंक्रुत केल्याने.. व आय टी जॉब्स भारतातल्या व इतर देशातुन आलेल्या सुशिक्षित लोकांनी कॅप्चर केल्यामुळे.. या वर्गाचे जॉब मार्केट कोरडे झाले आहे व या वर्गाचे वेतन व जिवनमान खुप खाली आले आहे.
हा सर्व डिसएंचांटेड वर्ग.. बदलत्या काळानुसार जास्त शिक्षण घेउन.. काळाला रेलेव्हंट राहण्याऐवजी.. आपल्याला मागे सोडुन.. बाकीची अमेरिका पुढे निघुन चालली आहे.. या रागात आहे.
अश्या वर्गाला मग.. ट्रंपसारख्या कॉन आर्टिस्टने .. आय अॅम गोइंग टु मेक अमेरिका ग्रेट अगेन असे आमीष दाखवुन आपल्या जाळ्यात ओढले.
अश्या लोकांमधे आपल्या सरकारने आपल्यासाठी काही केले नाही ही भावना आहे.. चायनामधे मॅन्युफॅक्च्गरींग जॉब्स गेल्यामुळे प्रत्येक अमेरिकन सरकारने... चायनाविरोधी.. धोरण राबवावे व आय टी जॉब्स— उच्चशिक्षित जॉब्स.. बाहेरुन आलेल्या उच्चशिक्षित इमिग्रंट्सना गेल्यामुळे.. प्रत्येक सरकारने.. अँटी इमिग्रेशन धोरण राबवावे ..असेच या वर्गाला वाटते.
पण झाले काय.. ९० च्या दशकात बिल क्लिंटनने नाफ्टा अॅग्रीमेंट पास केले व ओबामाने २०१६ मधे ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप अॅग्रीमेंट पास केले .. या दोन्ही अॅग्रीमेंट मधे या वर्गाला अजुनच राग आला की डेमोक्रॅट सरकार यांची काळजी न करता चायना ,मेक्सिको, कॅनडा अश्या बाहेरच्या देशांना जॉब्स मिळवुन देत आहेत.
त्यांची ही दुखरी नस ट्रंपने बरोबर ओळखली व २०१७ मधे ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप त्याने रद्द केली व तोच कसा चायनाविरुद्ध टफ उभा राहु शकतो असे त्याने या वर्गाला पटवुन दिले आहे..
बायडन जर आला तर तो चायनाचे प्यादे म्हणुन वागेल, अमेरिकेच्या सर्व बॉर्डर्स.. ...इमिग्रंट्स साठी खुले आम उघडुन.. . बायडन त्यांना सगळे जॉब्स देउन टाकुन... अमेरिकेतल्या.. त्याच्या स्वतःच्याच देशातल्या.. या वर्गाला .. बायडन...भिकेला लावेल... असा बागुलबुवा ट्रंपने या वर्गापुढे उभा केला आहे.
याच वर्गातली अशी फायनॅन्शिअली व शैक्षणिक द्रुष्ट्या मागासलेली लोक.. .. रिलिजिअसली कन्झरव्हेटिव्ह.. इव्हॅजिलिकल ख्रिश्चन लोक..मग क्विनॉन सारख्या ग्रुपमधे सहज सामील होतात व त्यांच्या क्विक्झॉटिक विचारांमधे सहज बिलिव्ह करतात. त्यांना त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सचे कारण बाहेर.. “ कशात तरी “ आहे.. त्यांच्यात नाही.. असच नेहमी वाटत असते. देअर प्रॉब्लेम्स आर नॉट बिकॉज ऑफ देअर इनॅबीलीटी टु अॅडॅप्ट टु द चेंजिंग टाइम्स.. बट बिकॉज ऑफ लिबरल डेमॉक्रॅट्स पॉलिसीज.. व्हिच फेव्हर अदर नेशन्स रादर दॅन देम!
म्हणुन मग ट्रंपच मग कसा त्यांचा तारणहार आहे व तोच त्यांचे“ ग्रेट अगेन“ बनायचे स्वप्न पुर्ण करणार आहे.. व डेमोक्रॅट्स कसे त्याच्यापासुन निवडणुक.. व्होटर फ्रॉड करुन.. स्टिल करत आहेत.. व तसे झाले तर अमेरिका..( म्हणजे हा वर्ग)... ग्रेट होण्यापासुन वंचित होइल...अश्या कॉन्स्पिरसी थापांवर ते डोळे झाकुन विश्वास ठेवतात.
पण या वर्गाला माहीत नाही की कॉन आर्टीस्ट, नार्सिसीस्ट ट्रंप.. फक्त त्याच्या स्वतःच्या “ ट्रंप ऑर्गनायझेशनला” ...ग्रेट अगेन बनवायला प्रेसिडेंट झाला आहे/ होता.
नंदन...बाय द वे... सिंक्लेअर लुइसचे “ इट कांट हॅपन हिअर“.. लायब्ररीतुन मागवले आहे.
Pages