अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Biden sir pl reduce tuition fees for masters courses. Pretty please.

फिस्कली कंझरवेटिव आणि सोशली लिबरलची सांगड तु कशी घालतोस? > तात्या चे भक्त , आम्हाला "तात्याचे अमके तमके वागणे/बोलणे पटत नाही" म्हणतात नि त्यालाच पाठिंबा देतात हा विरोधाभास समजला की हि सांगड कशी घालता येते ते पण समजेल.

सद्य रिप्ब्लिकन्स नी फिस्कली कंसर्वेटिव्ह असण्याचा दावा करणे ह्या सारखा विनोद नसावा. तात्या ने मोठ्या वल्गना करत केलेल्या टॅक्स कट नि मोठ्या कंपन्यांना दिलेल्या टॅक्स ब्रेक नंतर डेफिसीट (कोव्हीड सुरू होईतो) ओबामाच्या काळच्या रेट नेच वाढतो आहे हा मुद्दा लक्षात घेतला की वर कॉमी न म्हटलय तसे "फिस्कली कंसर्वेटिव्ह म्हणजे गरीब लोकं त्यांच्या चुकीमुळे गरीब आहेत, राहुदेत तशीच. सगळ्यांना फ्री हेल्थकेअर, काय खाऊ आहे का ? " ह्या पली कडे दुसरे काही नाही हे उघड होते.

मार्ज, नाही, भ्रुण सुद्धा जिवंत असते. जिवंत व्यक्ती मारणे पाप असते. त्यामुळे तू तुझ्या शरीराचे काय करायचे याचे सल्ले मी तुला देणार.

क्लार्क, तुला कॅन्सर झाला, त्याचे उपचाराचे पैसे सगळ्यांनी का भरायचे ? मरेनास का तू !

सोशल आणि फिस्कल काँसर्व्हेटिसम किती सुसंगत आहे !

शिवाय अबोर्शन रोखायची आहेत ती फक्त गोऱ्या बायकांची ना? गोरी लोकसंख्या कशी वाढणार त्याशिवाय?
Migrant बायकांची तर गर्भाशय काढून टाकण्याची योजना या लोकांनी राबवली होती ना.

राज.. बर झाल तु हा प्रश्न विचारलास. तुला हा प्रश्न का पडला हे मी नक्की समजतो.

इट्स व्हेरी क्लिअर दॅट...यु हॅव्ह डिसायडेड टु बाय इन्टु.. ( सो अ‍ॅज मेजॉरीटी ऑफ द अमेरिकन पिपल)... अँड फुल्ली इन्व्हेस्टेड युअर पॉलिटिकल थॉट प्रोसेस अँड एनर्जी.... इन ...टु पार्टी.. इदर ऑर.. बायनरी पॉलिटिकल सिस्टिम... इन व्हिच.. देअर इज नो प्लेस ऑन द टेबल.. फॉर पिपल लाइक मी... हु लाइक..होल रेंज ऑफ आयडिआज.. व्हिच.. कॅन स्प्रेड ... इव्हनली...बिटविन द २ एक्स्ट्रिम आयडियलॉजिकल कॉन्सेप्ट्स..

कारण.. अमेरिकेतल्या.. द्विपक्षिय.. बायनरी... इदर..ऑर... पॉलिटिकल सिस्टिममधे... माझ्यासारख्या... इंडिपेंडंट व्होटर्सची ग्रेडेशन/ व्हेरिअस शेड्स असलेली विचारसरणी.. पर्फेक्टली फिट होत नाही.

माझ्यासारख्यांचे .. वर वर परस्परविरोधी.. वाटणार्‍या विचारसरणीच्या लोकांचे विचार... अमेरिकेत जो प्रचलित विचार आहे .. की.. यु हॅव्ह टु बॉक्स युअरसेल्फ इनटु ..वन ऑर द अदर पॉलिटिकल एक्स्ट्रिम आयडिऑलॉजी.....अश्या विचारात गुरफटलेल्या माणसांना.. ऑक्सिमोरॉनच वाटणार! त्यात आश्चर्य नाही.

वर काही जणांनी.. ही वर वर परस्परविरोधी वाटणारी विचारसरणी.. कशी को-एक्झिस्ट होउ शकते याची थोडी उदाहरणे दिलीच आहेत. पण त्याहीपेक्षा खोलात जाउन .. या बाबतीतले माझे विचार मी.. आज रात्री.. जेव्हा फ्री असेन तेव्हा डिटेलमधे सांगायचा प्रयत्न करीन.. आत्ता.. थोडा कामात बिझी आहे.

अँड अ‍ॅज फार अ‍ॅज.. डिबंक्ड.. ७ स्टेप्स ऑफ ख्रुश्चेव्ह... अरे त्यात इतके होल्स आहेत की .. हा जर डिबेट फोरम असला असता तर... माझ्या आठवीतल्या मुलानेसुद्धा.. तो शाळेत जे डिबेट करतो.. त्या डिबेट स्पर्धेत.. त्याच्या चिंधड्या चिंधड्या उडवल्या असत्या. त्यामुळे त्यावरची.. माझी प्रतिक्रिया..डेमॉक्रेट्स् लोकांचे प्रतिनिधित्व करते.. हे हास्यास्पदच नाही.. व तो माझ्या नाही...तर डेमोक्रॅट्स विचारसरणीच्या लोकांच्या बुद्धीचा अपमान आहे.

मुकुंद, सारखे एलिप्सेस न देता आणि देवनागरी लिपीत इंग्रजी न लिहिता पोस्ट लिहिता का प्लीज? ती सिग्नेचर स्टाईल आहे. अत्यंत इरिटेटिंग!
स्क्रोल न करता जंप करायचा माझा अल्गोरिदम गंडतोय अशाने! Proud

>>जेव्हा फ्री असेन तेव्हा डिटेलमधे सांगायचा प्रयत्न करीन.<<
ठिक आहे, वाट बघतो. बाय्दवे, असं म्हणतांत कि '१६च्या निवडणुकित फिकं+सोलि लोकांनी ट्रंपला मतं दिलेली... Proud

>>> तात्या चे भक्त , आम्हाला "तात्याचे अमके तमके वागणे/बोलणे पटत नाही" म्हणतात नि त्यालाच पाठिंबा देतात हा विरोधाभास समजला की हि सांगड कशी घालता येते ते पण समजेल.
सद्य रिप्ब्लिकन्स नी फिस्कली कंसर्वेटिव्ह असण्याचा दावा करणे ह्या सारखा विनोद नसावा

--- लोल, ह्याला एक विशेष प्रकारचा भंपकपणा अंगी बाणवलेला असणं आवश्यक आहे!
जॉर्जियाच्या वॉनाबी सिनेटर केली लेफ्लरचंच उदाहरण घ्या. पोपटपंची तर गव्हर्नमेंट हँडआऊट्सच्या विरोधात; वर paycheck to paycheck जगावं लागल्याच्या लोणकढ्या थापा.

प्रत्यक्षात मात्र ह्या इनसायडर ट्रेडिंग येक्श्पर्ट काकूंनी तब्बल ३.२ मिलियन डॉलर्सहून अधिक फार्म सबसिडीज गेल्या वर्षी पदरात पाडून घेतल्या!

असो, असो - बाकी त्या इंडियानातल्या कॅरिअर एअर कंडिशनिंग कंपनीचं काय झालं म्हणे? भरपूर सवलती, मिलियन्स ऑफ डॉलर्सचे टॅक्स ब्रेक्स पदरात पाडून घेऊन त्यांनी अलीकडेच चीनमध्ये नव्या फॅक्टरीत उत्पादन हलवलं म्हणे!

सो मच विनिंग! Happy

- आधी ट्रम्प तात्यांनी भिंतीकरता मेक्सिको पैसे देईल, अशा थापा मारून लोकांना उल्लू बनवलं.

- अनपेक्षितपणे, प्रेसिडेन्सी + हाऊस + सिनेट हाती येऊनही तात्यांनी याबाबत काहीही हालचाल केली नाही; उलट मेक्सिकोच्या तत्कालीन अध्यक्षांना 'मेक्सिको पैसे देणार नाही' असं जाहीररीत्या सांगू नका अशी फोनवर विनवणी केली.

- मधूनच भिंतीवर सोलर पॅनेल लावून त्यातून पैसे मिळवीन, छापाच्या पुड्याही सोडून झाल्या!

- मग २०१८ मध्ये हाऊस ताब्यातून गेल्यावर, तातोबा जागे झाले! आणि नेहमीप्रमाणे डेमोक्रॅट्स आणि पेलोसीच्या नावाने कांगावा सुरु केला.

- डिसेंबर २०१८ मध्ये याच मुद्द्यावर गव्हर्न्मेंट शटडाऊन झालं, आणि काहीच आठवड्यांत तात्यांवर माघार घेण्याची नामुष्की ओढवली.

- शेवटी मग फेक आणीबाणी जाहीर करून, काँग्रेसने सैन्यासाठी नेमून दिलेले पैसे मग तातडीने भिंतीकडे वळवण्यात आले. (अशा वेळी, भंपक ट्रम्पेटिअर्सना प्रेसिडेन्शियल ओव्हररीच, सेपरेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह ब्रँच इ. गोष्टींचा सोयीस्कर विसर पडतो :))

- मग हे सैन्यासाठी ठेवलेले पैसे, ट्रम्पतात्यांच्या खास मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे वळवण्याची मोहीम सुरु झाली. आर्मी कोअरने रिजेक्ट केलेल्या नॉर्थ डकोटातल्या एका फर्मकडे काँट्र्रॅक्ट द्यावं, म्हणून तात्या हटून बसले. (दुवा: https://www.washingtonpost.com/immigration/he-always-brings-them-up-trum...)

- शिवाय हेही एक!
इथे ओशाळली आयरनी! (दुवा: https://www.businessinsider.com/trump-border-wall-contractors-illegally-...)
Contractors working on Trump's border wall illegally smuggled in armed Mexican guards to protect construction sites, whistleblower complaint says

- इतकं करूनही गेल्या नोव्हेंबरपर्यंत फक्त पं ध रा मैलांची नवी भिंत बांधली गेली होती. बाकी जुन्याच कुंपणाची डागडुजी. हे म्हणजे, NAFTA मध्ये किरकोळ बदल करून जुनाच माल USMCAच्या नवीन वेष्टणात खपवायची ट्रिक!

W.png
(दुवा: https://www.bbc.com/news/world-us-canada-46824649)

- आता फक्त ट्रम्पतात्यांकडून मूर्ख बनून कसं भागेल? म्हणून हे भंपक ट्रम्पेटिअर्स बॅननकडूनही लुटले गेले!
"We Build the Wall" ह्या कँपेनच्या नावाखाली बॅननने $२५ मिलियन डॉलर्स जमा केले आणि त्यातले एका मिलियनहून अधिक आपल्या खिशात घातले. (या बाबतीत, तात्यांचा आदर्श घेण्याजोगा आहे. त्यांनी व्हेटरन्सच्या नावाखाली पैसे गोळा करून घपला करण्याचा प्रयत्न केला).

- आता, आपल्या लाजिरवाण्या कारकीर्दीतले काही तास बाकी उरले असताना ट्रम्पतात्यांनी बॅननला प्रेसिडेन्शियल पार्डन बहाल केलं आहे.

- अजून किती Drain the swamp बोंबलायचंय ते बोंबला! Happy

- त्यातल्या त्यात हाच काय तो काव्यात्म न्याय! Wink
Pink Seesaws Built On U.S. Border Wall Win Prestigious Design Prize (दुवा: https://www.npr.org/2021/01/19/958339302/see-saws-built-on-u-s-border-wa...)

seesaw.jpg

अमित,कसली आली आहे बोडक्याची सिग्नेचर स्टाइल! ३५ वर्षे भारत सोडुन झाली आहेत मला. त्यामुळे बर्‍याच वेळेला लिहीण्याच्या ओघात पटापट मराठी प्रतिशब्द न सापडल्यामुळे व इंग्लिशमधे डोक्यात विचार येत असल्यामुळे मिंग्रजीत लिहीणे सोप्पे जाते एवढेच. शिवाय बर्‍याच वेळेला इंग्लिशमधे जो पंच आहे तसाच पंच असलेला बरोब्बर प्रतिशब्द पटकन आठवत नाही. राहता राहीला एलिप्सेस चा प्रश्न. ते एलिप्सेस जर दोन शब्दातले किंवा दोन वाक्यांमधले बोलतानाचे पॉज म्हणुन तु बघीतलेस तर तेवढे इरिटेटींग वाटणार नाही. तरीही तुझ्या विनंतीला नम्रपणे मान देउन हे पोस्ट लिहायचा प्रयत्न करतोय.

सर्वप्रथम , मी फिस्कली कंझरव्हेटिव्ह आहे असे सांगताना त्याच श्वासात मी सर्वप्रथम “कॉमन सेन्स” फिस्कली रिस्पॉन्सिबल विचारप्रणालीला मानतो हे नमुद करायला हवे. त्यात टॅक्सेस न वाढवता व डेफिसीट न वाढवता बजेट बॅलंस करता येणे हा मह्त्वाचा मुद्दा आहे.

सोशली लिबरल याखाली मात्र बर्‍याच गोष्टी मोडतात. त्यात वर काही जणांनी मांडलेले गे राइट्स, अ‍ॅबॉर्शन चॉइस व ब्लॅक लाइव्ह्स मॅटर व बर्‍याच इतर सोशल इश्युजच्या बाजुने असायला खुप पैशाचा प्रश्नच येत नाही( प्रचंड मोठ्या एकुण अमेरिकन बजेटच्या तुलनेत)

मग पैशाचा मोट्ठा प्रश्न कुठे येतो? तर

१: सोशल सिक्युरीटी
२: मेडिकेअर व
३:मेडिकेड

या बजेटमधल्या ३ नॉन्डिस्क्रिशनरी एनटायटल्स प्रोग्राम्समधे व बजेटमधल्या बाकीच्या ११ डिस्क्रिशिनरी प्रोग्रॅम्स मधे.

त्यातले नॉनडिस्क्रिशिनरी प्रोग्रॅम्स म्हणजे सोशल सिक्युरीटी , मेडिकेअर व मेडिकेड हे नॉन निगोशिएअबल आहेत.

१९३४-३९ च्या दरम्यान अध्यक्ष एफ डी रुझव्हेल्ट यांनी सोशल सिक्युरीटी ( न्यु डिल) बिल पास करुन अमेरिकन लोकांशी सोशल सिक्युरीटीचा करार केला तर १९६५ मधे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी त्यात मेडिकेअर व मेडिकेड या प्रोग्राम्सची भर घालुन मुळ सोशल सिक्युरीटी करारात भर घातली. या तिनही प्रोग्राम्सला अमेरिकन सरकार बांधील आहे.

आणी मग ११ डिस्क्रिशनरी प्रोग्रॅम्स कुठले? तर ते म्हणजे

१: फुड अँड अ‍ॅग्रिकल्चर
२: ट्रान्स्पोर्टेशन
३: सायंस
४: एनर्जी अँड एन्व्हिरोन्मेंट
५:इंटरनॅशनल अफेअर्स
६: हाउसिंग अँड कम्युनिटी
७: व्हेटरन्स बेनिफिट्स
८: हेल्थ
९: एज्युकेशन
१०: गवर्न्मेंट.
११: डिफेन्स.

आता म्हणशील कॉमन सेंस फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? व ( लिनींग टोवर्ड्स) सोशली लिबरल प्रणालीशी त्याची सांगड कशी घालायची?

तर त्याचे उत्तर बजेट बॅलंस करताना आवक बाजुला टॅक्स रेव्हेन्यु.. (टॅक्सेस न वाढवता) कसा वाढवायचा व जावक बाजुला खर्च कशावर आणी किती करायचा यात दडलेले आहे.

पारंपारीक फिस्कली कंझरव्हेटिव्ह( सो कॉल्ड!) रिपब्लिकन लोकांना सोशल प्रोग्राम्स उदा: मेडिकेड एक्पान्शन, एज्युकेशन हेल्प, चाइल्ड केअर हेल्प, अनएम्प्लॉयमेंट बेनीफिट्स , हेल्थकेअर, एनव्हिरॉन्मेंट वगैरे या प्रोग्राम्समधे काटछाट करायची व त्या प्रोग्राम्सना मोडीत काढायचा यातच रस असतो.

पण डिफेन्स बजेट अवाच्या सव्वा असायला किंवा टॅक्सेस मधे प्रचंड लुपहोल्स असायला यांचा काहीच विरोध नसतो. तसेच त्यांना टॅक्स कट फक्त कॉर्पोरेशन्सना व स्मॉल बिझीनेस यांना देण्यातच रस असतो, मिडल क्लासला नाही. आणी त्या कॉर्पोरेट टॅक्स हेव्हन, लुपहोल्स व काटछाटी साठी मग त्यांना गरीबांसाठी राबवल्या जाणार्‍या योजनांवर गदा आलेली चालते पण त्यांना डिफेंस बजेटवर तर गदा आलेली नको असते.

तर मग फिस्कली कंझरव्हेटिव्ह/ रिस्पॉन्सिबल राहुनही गरीबांच्या जरुरीचे प्रोग्राम्स मग कसे राबवता येतील?

तर त्यासाठी २ गोष्टी होणे महत्वाचे आहे.

१: टॅक्स ओव्हरहॉल
२: डिफेन्स बजेट मधे मॉडरेट कट.

माझ्या मते आता अमेरिकन टॅक्स कोड खरच ओव्हरहॉल करायची वेळ आलेली आहे. वर वर जरी अमेरिकन टॅक्स सिस्टीम प्रोग्रेसिव्ह आहे असे जरी वाटत असले तरी त्यातल्या असंख्य लुपहोल्स मुळे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात श्रिमंतांच्या व कॉर्पोरेशनच्या बाजुने झुकलेली आहे. हे जे सध्याच्या टॅक्स कोडमधे प्रचंड लुपहोल्स आहेत ते जर बंद केले तर टॅक्सेस न वाढवता.. टॅक्स रेव्हेन्यु वाढु शकेल.

दुसरी गोष्ट.. म्हणजे.. अवाच्या सव्वा डिफेंस बजेट! त्या डिफेन्स बजेटमधे अगदी मामुली जरी काटछाट केली( अमेरिकेच्या सुरक्षतेवर गदा न आणता) तरी कित्येक सोशल प्रोग्राम्स ,फिस्कली रिस्पॉन्सिबल राहुन/ बॅलन्स बजेट ठेउन, राबवता येणे शक्य आहे. या दोन गोष्टी परस्पर विरोधी असण्याची किंवा होण्याचा प्रश्नच त्यामुळे उदभवु शकत नाही.

हे सगळे जर मी टक्केवारी वापरुन इथे सांगीतले तर ही फिस्कली रिस्पॉन्सिबल/ ( लिनिंग टोवर्ड)सोशली लिबरल सांगड समजावुन घ्यायला एमदम सोप्पे जाइल.

आज अमेरिकेच्या बजेट मधे आवक बाजुला टॅक्सेस हा सगळ्यात मोट्ठा भाग आहे. ती आवक टॅक्स ओव्हरहॉलने कशी वाढवता येइल हे मी वर सांगीतलेच आहे.

आणी बजेटच्या जावक बाजुला मी वर सांगीतल्याप्रमाणे २ भाग आहेत

१: नॉनडिस्क्रिशनरी भाग.
२: डिस्क्रिशनरी भाग.

आपण बजेटचा नॉन्डिस्क्रिशिनरी भाग( सोशल सिक्युरीटी, मेडिकेअर व मेडिकेड) जो नॉननिगोशिएअबल आहे तो सोडुन देउयात व बजेटच्या डिस्क्रिशनरी भागावर फक्त लक्ष केंद्रित करुयात.

वर सांगीतल्याप्रमाणे त्या डिस्क्रिशनरी भागात ११ गोष्टी येतात.

त्या ११ गोष्टींमधे जो पैसा खर्च होतो त्यातला जवळजवळ ६० ते ६५ टक्के पैसा फक्त डिफेंसवर खर्च होतो! बाकीच्या १० प्रोग्राम्समधे उरलेले ३५ टक्के पैसे खर्च होतात.

म्हणजे बजेटमधे डिफेंस हा सगळ्यात मोट्ठा पांढरा हत्ती रुममधे बसलेला आहे.

माझ्या मते फिस्कली कंझरव्हेटिव्ह् राहुन व टॅक्स लुपहोल्स बंद करुन डिफेंस बजेट थोडेसे जरी ट्विक केले तर बॅलंस बजेटवर गदा न आणता एज्युकेशन हेल्प, हाउसींग ,हेल्थकेअर अश्या गरीबांना मदत होउ शकणार्‍या योजना सहज राबवता येउ शकतात.

माझ्या मते असा विचार करणारा शेवटचा अमेरिकन प्रेसिडेंट बिल क्लिंटन होता. त्याच्या ८ वर्षाच्या कारकिर्द्रीत त्याने पुर्ण डेफिसीट घालवुन जॉर्ज बुशच्या हातात सरप्लस दिले होते. त्याला म्हणतात फिस्कली रिस्पॉन्सिबल/ सोशली लिबरल Happy

>>Submitted by मुकुंद on 20 January, 2021 - 06:24> छान स्पष्टीकरण!

अमेरीका ग्रेट बनवायच्या बाता, कोविडबाबत खोटी माहिती पसरवणे, शेवटी इलेक्शन उलटवण्यासाठीचा खोटेपणा-पसरवलेले गैरसमज आणि या सगळ्या भूलथापांना बळी पडलेली जनता बघता स्टेम एज्युकेशन , बेसीक इकॉनॉमिक्स आणि सिटीझनशिप या तिन्हीवर खूप काम करावे लागणार आहे. रिपब्लिकन की डेमोक्रॅट या पलिकडे जावून लोकशाहीची खरी चाड असणारा, त्यातल्या चेक्स आणि बॅलन्सचा आदर करणारा, बायपार्टिसनशिप म्हणजे विकनेस असे न समजणारा सुजाण मतदारवर्ग वाढवण्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करत रहायला लागणार आहे. जे झाले तो वेक अप कॉल. आपल्याच पक्षाच्या व्हाईस प्रेसिंडेंटवर हल्ला करु इच्छिणार्‍या जमावाकडे बघुन रिपब्लिकन्स काहीतरी शिकले असवेत अशी आशा आहे. २०२२ दाराशी आहे आणि पराभूत ट्रंप, त्याचे पाठीराखे गप्प बसणार नाहीत हे तर नक्की आहे.

Ok. Here it is. The great coronation.
मला पेन्सला तिथे बघून खूप छान वाटतंय. चला उशिरा का होईना तो सुधारतोय असं वाटलं.

नंदन आणि मुकुंद वरच्या पोस्ट आवडल्या. भारी पेशंस भारी आहे बाबा तुमच्यात! >> +१. फक्त् तुम्ही वेळ फुकट घालवता आहात असे नमूद करायला आवडेल. "पण डिफेन्स बजेट अवाच्या सव्वा असायला किंवा टॅक्सेस मधे प्रचंड लुपहोल्स असायला यांचा काहीच विरोध नसतो. तसेच त्यांना टॅक्स कट फक्त कॉर्पोरेशन्सना व स्मॉल बिझीनेस यांना देण्यातच रस असतो, मिडल क्लासला नाही. आणी त्या कॉर्पोरेट टॅक्स हेव्हन, लुपहोल्स व काटछाटी साठी मग त्यांना गरीबांसाठी राबवल्या जाणार्‍या योजनांवर गदा आलेली चालते पण त्यांना डिफेंस बजेटवर तर गदा आलेली नको असते. " हा भाग मी गेली तेवीस वर्षे ऐकत आलो आहे.

@ असामी: गीतापठणाची हुक्की येते अधूनमधून!

त्या निमित्ताने काही दत्तोबा कदम* छापाची विद्वत्तापूर्ण वक्तव्यंही वाचायला मिळतात! Happy
[*"आता ही अमेरिकेची आणी रशियेची मजा बघा पुढल्या सहा महिन्यात. आता अनुयुद्ध टाळन्याचा येकच उपाय!]

@मुकुंद - उत्तम पोस्ट!
ओबामाने स्थापन केलेली 'pandemic response team' बरखास्त करून ट्रम्पने नॉन-डिस्क्रिशनरी बजेटमधून किती पैसे वाचवले, हे आपण सारे जाणतोच!

दत्तोबा Biggrin
तीच तर मजाए!
व्यासोच्छिष्टं जगत्‌ सर्वम् सारखं आता पुलंचं झालंय.

jo-aala.jpg

जो आला तो रमला,
आणि व्हीपी त्याची कमला

- अशी मंगलाष्टकांच्या-मधले-नातेवाईक-काव्य तोडीची यमकजुळवणी चालून जावी.

आजचा क्षण दिसण्यात नॅन्सीचा वाटाही खूप मोठा आहे. जेव्हा सगळे डेम्स 'सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति' मोडमध्ये गेले होते तेव्हा ही 80 वर्षाची बाई मात्र तात्याच्या उद्धटपणाला व्यवस्थित उत्तर देत होती. स्टेट ऑफ द युनियनला तिने धमाल आणली होती. किती condescending वागणूक दिली तात्याला. Somehow she doesn't get enough credit!

@ सनवः

>>> Somehow she doesn't get enough credit!
--- सहमत आहे. विशेषतः जॉन बेनर आणि पॉल रायनला ज्या तर्‍हेने फ्रिंज इलिमेंट्सपुढे नमावं लागलं, ते पाहून अधिकच.

सनव +१.
तात्याच्या समोर हात करुन टाळ्या वाजवणे, स्टेट ऑफ द युनियनला भाषण टराटरा फाडणे... ती एकटीच तात्याला समजेल अशा भाषेत उत्तरे द्यायची, आणि ती भाषा त्याला बरोब्बर समजायची! Proud
चला एकदाचं गंगेत घोडं न्हालं!

ती एकटीच तात्याला समजेल अशा भाषेत उत्तरे द्यायची, आणि ती भाषा त्याला बरोब्बर समजायची! Proud

हो ना! तिला एकटीलाच घाबरायचा तो Proud
आता परवा पण हल्ल्याच्या वेळी तिलाच टार्गेट केलेलं त्या लोकांनी. तिच्या ऑफिसमध्ये घुसले. एखादी व्यक्ती अशा घटनेने हादरून गेली असती.पण ही इतकी खमकी की तशा परिस्थितीत रात्रभर काँग्रेस चालवून रिझल्ट सर्टीफाय करून घेतला.

<<आता मायबोलिपण तुम्हाला टॅब्लॉइड करुन टाकायची आहे का? >>
छे, छे! मी कसला मायबोली बदलणार? ती आधीपासून तशीच आहे. राजकारणावर भांडणे म्हणजे काही गंभीर झाले का?

एकमेकांची उणी दुणी काढणे, तेच तेच मुद्दे उगाळणे, इकडचे तिकडचे वाचून तेच लिहिणे हे पूर्वीपासून चालूच आहे. माझा हातभार अगदी नगण्य.
मी तर अनेक वर्षे ओरडून सांगत होतो की अरे कुणी मायबोलीवर चांगले घेऊन वेगळे करा, आपापल्या प्रतिनिधिंना पाठवा - कुणि काही केल्याचे समजले नाही. मग उगाच इथे येऊन भांडत बसण्यापेक्षा जरा मौजमजा, विनोद करून मनोरंजन तरी करा.
म्हणून त्यापेक्षा टॅब्लॉईड बरे - करमणूक तरी होते.
त्याबाबतीत हातभार लावायला मी तयार आहे. पूर्वी कित्येक वर्षे केले इथे.

>>... त्याला म्हणतात फिस्कली रिस्पॉन्सिबल/ सोशली लिबरल.<<
या पोस्टमधे तु गाडी फिस्कल कंझरवेटिव वरुन फिस्कल रिस्पाँसिबिलिटि वर वळवली आहेस; विच आर टु डिफरंट अ‍ॅनिमल्स... Happy

क्लिंटनने फिस्कली रिस्पाँसिबल (डिसिप्लिन्ड म्हणुया हवं तर) राहुन (बॅलंस्ड बजेट) सरप्लस आणला, पण त्याने टॅक्सेस वाढवले मग त्यात फिस्कल कंझरवेटिवनेस कुठुन आला? शिवाय त्याने फेडरल स्पेंडींग्जवर (वेलफेर) सुद्धा बंधनं लादलेली, सो हि वाज नॉट लिबरल इदर. एनिवे, मुद्दा हा आहे कि फिस्कली कंझरवेटिव, आणि सोशली लिबरल पॉलिसीज एकत्र नांदत नाहित. बघ पटतंय का ते...

आता पांढरा हत्ती. दुसर्‍या महायुद्धानंतरचा अमेरिकेचा ईतिहास पडताळलास, तर अमेरिका डिफेंसवर इतके पैसे का खर्च करते याचा उलगडा होईल. १९६० साला पासुनच्या आकड्यांचा हा तक्ताच बघ. आणि डिफेंस स्पेंडिंगच्या निव्वळ आकड्यावर जाउ नकोस, ते जीडिपीच्या किती प्रमाणात आहे ते बघ; ते महत्वाचं आहे. शिवाय बजेट कट कुठे करणार, इंटरनॅशनल पुलिसिंग करणं ऑलरेडि कमी झालंय, बाकि देशांत स्ट्रटिजिक इंटरेस्ट्स आहेत. त्यावर पाणी सोडुन पैसे लिबरल कॉजकरता वळवावे, असं म्हणतोस?..

नॅन्सी आज्जी खमक्या आहेत. तात्याला पुरून उरली. शेवटी इटालियन रक्त आहे. Wink कमलाबाईपण कमी नाहीत.

Migrant बायकांची तर गर्भाशय काढून टाकण्याची योजना या लोकांनी राबवली होती ना.

Submitted by सनव on 20 January, 2021 - 01:03

का बरं? Migrant पुरुषांची नसबंदी करणं जास्त संयुक्तिक आहे ना?

“या पोस्टमधे तु गाडी फिस्कल कंझरवेटिव वरुन फिस्कल रिस्पाँसिबिलिटि वर वळवली आहेस; विच आर टु डिफरंट अ‍ॅनिमल्स... Happy”

नॉट रिअली..

तु फिस्कल कंझरव्हेटिव्हचा अर्थ तुझ्या सोयीप्रमाणे नॅरो काढतोस. त्या नॅरो पट्ट्यात तुला फक्त सोशल प्रोग्राम्सच चॉपिंग ब्लॉकवर हवे आहेत. तुला फिस्कली कंझरव्हेटिव्ह फक्त तुला नावडत्या असलेल्या सोशल प्रोग्राम्सबाबतच राहायचे आहे. आवडत्या असलेल्या प्रोग्राम्स बाबत( त्यात टॅक्स लुपहोल्स हेही आले बर का!) मात्र तुला सोयीस्कररित्या सिलेक्टिव्हली फिस्कली लिबरल राहायचे आहे. याला हिपोक्रिटिकल नाही म्हणायचे तर कशाला ?

उलट मी म्हणत आहे की फिस्कली कंझरव्हेटिव्ह( माझे शब्द नीट वाच, म्हणजे बॅलंस बजेट असणे महत्वाचे! तेही कर न वाढवता! ) असणे नक्कीच शक्य आहे जर का तुम्ही बजेटच्या प्रत्येक भागाकडे बघुन कुठल्या भागात पर्सेंटेज वाइज कमीतकमी कपात करुन आपण सोशली रिस्पॉन्सिबल प्रोग्राम्स राबवु शकतो हे बघीतले तर! आणी मी वर दाखवुनही दिले आहे की डिफेन्सच्या मानाने आपण सोशल प्रोग्राम्स्वर किती कमी खर्च करत आहे.

अमेरिकेच्या सगळ्या युद्धांचा इतिहास लक्षात घेउनही व डिफेन्सचे महत्व ओळखुनही मी म्हणेन की आपल्याच देशातले पॉव्हर्टी, सगळ्यांसाठी अ‍ॅफर्डेबल हाउसींग, अ‍ॅफर्डेबल एज्युकेशन,अ‍ॅफरर्डेबल हेल्थ केअर हे प्रॉबलेम्स टॅकल न करता जगाचे पोलीस बनायची व नको तिथे काड्या घालायची मुळीच जरुरी नाही. “ नको तिथे” हे वाचायचे प्लिज विसरु नकोस.

आणी सगळ्या जगाचे पोलीस कश्यासाठी बनायचे! तर आतापर्यंत असे अ‍ॅर्ग्युमेंट असे आहे की अमेरिका इज अ बिकन ऑफ डेमॉक्रेसी फॉर द वर्ल्ड! आणी ती डेमॉक्रेसी इथे अमेरिकेतच न सांभाळता सगळ्या जगभर त्याचा प्रसार झाला पाहीजे.

पण ज्या वर दिलेल्या कारणासाठी अमेरिकन डिफेन्स एवढा खोर्‍याने पैसा खर्च करत आहे ते करुनही स्वतः च्याच देशात ६ तारखेला ( व गेल्या ४ वर्षात) अमेरिकेतल्या लोकशाहीचा जो काय तमाशा झाला त्याने अमेरिकेची मान जगभर उंचावली आहे असे तुला खरच वाटते?

त्याउलट त्या मुर्ख लोकांना व त्यांच्यासारख्या मिलिअन्स ऑफ लोकांना जर व्यवस्थित शिक्षणाची संधी मिळाली असती तर त्या लोकांचे एनलायटमेंट तरी झाले असते व मग क्विनॉन आणी तत्सम बेअकली ऑर्गनायझेशन्सच्या नादी लागुन एकापेक्षा एक क्विक्झॉटिक कॉन्स्पिरसी थिअरीजच्या बळी पडुन सगळ्या जगापुढे त्यांनी असे अमेरिकेचे हसे तरी केले नसते!

आमेरिकेच्या रगेड इंडिव्हिज्युअलिझम मधे मानणारा मी पण एक आहे पण राज, प्रत्येकाला तो ट्रेट वापरुन आयुष्यात यश मिळेलच असे नाही. काही काही वेळेला परिस्थिती तुम्हाला यशस्वी व्हायची संधीच देत नाही किंवा तुमच्या प्रय्त्नाला यश येत नाही. अश्या वेळेला एक सोसायटी म्हणुन ज्या लोकांनी यश प्राप्त केले आहे त्यांनी बाकीच्या कमनशीबी लोकांचा विचार करायचा असतो. त्यांना इटर्नली तश्याच परिस्थितीत खितपत पडुन द्यायचे हे कुठल्याही समाजाला शोभत नाही.

याचा अर्थ असा नव्हे की त्या सगळ्यांना कायमचे हँड आउट द्यायचे. पण त्यांना अ‍ॅफर्डेबल हाउसींग, अ‍ॅफर्डेबल हेल्थ व अ‍ॅफर्डेबल एज्युकेशन मधे जरा थोडी मदत केली व त्यांच्या पायावर उभे राहायला मदत केली तर ६ तारखेला लोकशाहीच्या नावाखाली जो काय तमाशा झाला होता तसा तमाशा अमेरिकेत परत न होण्यास नक्कीच हातभार लागेल.

जाउ दे राज, नंद्या म्हणतात ते बरोबर आहे. तु , मी आणी असामी फुटबॉल बीबीवर इथल्यापेक्षा जास्त इंटरेस्टींग चर्चा करु. Proud

स्वाती, तुझ्या सकाळच्या पोस्टला १००% अनुमोदन! वेल सेड!

प्रेसिडेंट बायडन यांना पुढच्या चार वर्षांसाठी शुभेच्छा!

Pages