Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
देशाच्या संरक्षणावर खर्च
देशाच्या संरक्षणावर खर्च महत्वाचाच मात्र तो खर्च करताना जो वेस्ट आहे तो कठोर ऑडिट्स करुन कमी करणे हे देखील फार महत्वाचे. पेंटॅगॉन म्हणजे एक खाजगी कंपनी आहे असा विचार करा आणि मग खर्चाचा ताळमेळ लावा. कंत्राटे देतात त्यात किती उधळ माधळ, किती पैसा धरसोड आणि ग्राउंड रिअॅलिटी समजून न घेतल्याने वाया गेला याचा विचार करता एखादी खाजगी कंपनी असती तर टाळे ठोकायची वेळ येती. गंगाजळीत इतकी मोठी तूट असताना फिस्कली कॉन्झरवेटिव असलात तरी जबाबदारीने खर्च हा महत्वाचा भाग सोईस्करपणे विसरुन कसे चालेल? संरक्षण क्षेत्रातल्या फ्लिसिंग ऑफ अमेरीका बद्द्ल तर बोलायलाच नको. बरे इतका खर्च करुन वेटरन्सची परीस्थिती वाईटच आहे . आमचे जवळचे फ्रेंडस वेटरन्सही आहेत त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी कसे झगडावे लागते ते चांगलेच माहित आहे. संरक्षणातला वेस्ट आटोक्यात आणला तर देशातील इतर कल्याणकारी योजनांसाठी नक्कीच पैसे असतील.
चला पहिल्या दिवशी सर्वात
चला पहिल्या दिवशी सर्वात जास्त क्राउड होते की नव्हते याबद्दल वल्गना नाहीत. प्रोग्रेस आहे.
"संरक्षणातला वेस्ट" ह एक
"संरक्षणातला वेस्ट" ह एक अतिशय संवेदनशील आंणि वेगळा प्रश्न आहे. त्यात "वेस्ट" श्ब्दप्रयोग करणे योग्य आहे का इथपासून सुरुवात आहे. एका कंपनीचा विचार केला तर इंग्रजीत ज्याला "सेक्युरिटी" इन शॉर्ट संरक्षण म्हटलं जातं त्यावर कुठली कंपनी किती खर्च करते, करावा आणि का असे अनेक सवाल-जबाब रंगतील पण मला वाटतं सध्याच्या जगात हा विषय जनमानसाच्या दृष्टीने कितीही कुतुहलाचा असला तरी त्यावर अशा फोरमवर चर्चा करावी का हाच मोठा प्रश्न आहे. लागल्यास
>> मात्र तुला सोयीस्कररित्या
>> मात्र तुला सोयीस्कररित्या सिलेक्टिव्हली फिस्कली लिबरल राहायचे आहे. <<
नाहि, फिस्कली/सोशली लिबरल नाहि, थ्रुआउट फिस्कली कंझरवेटिव.. देर एंट नो सच थिंग अॅज फ्री लंच. समबडि ऑट टु पे फॉर इट. आणि गरजुंना, होतकरुंना मदत देण्याबाबत माझी तक्रार अजिबात नाहि. तक्रार आहे ती त्यांना त्याच परिस्थितीत खितपत ठेवणार्या पॉलिसीज बाबत; एकेए डेमक्रॅटिक सोशलिझम...
>>त्यांनी बाकीच्या कमनशीबी लोकांचा विचार करायचा असतो. त्यांना इटर्नली तश्याच परिस्थितीत खितपत पडुन द्यायचे हे कुठल्याही समाजाला शोभत नाही.<<
बिंगो! त्याचकरता फिस्कली कंझरवेटिव असणं गरजेचं आहे. कारण फिस्कली कंझरवेटिव पॉलिसीज बाय वर्चु ऑफ लो टॅक्सेशन बुस्ट इकानमी, एकनामिकल ग्रोथ क्रिएट्स जॉब्स, जॉब्स हेल्प इरॅडिकेट पावर्टी. अशी ती सायक्ल आहे...
वेका,
वेका,
खाजगी कंपनी सिक्युरिटीवर खर्च करते त्या अर्थाने म्हणत नाहीये तर डिफेन्स बजेट मधील जी रक्कम चुकीच्या वापराने वाया जाते, उधळ-माधळ केली जाते, त्या अर्थाने म्हणत आहे. यात चुकीच्या पद्धतीचे बांधकाम ते इक्विपमेंट हरवणे आणि प्रत्यक्ष अॅडमिनिस्ट्रेशन मधील उधळेपणा ते दिलेली काँट्रॅक्ट्स असे बरेच काही येते. यात गोपनीय असे काही नाही. याबाबतची आकडेवारी मेडीआ वेळोवेळी देत असतो.
Ok. Got it Swati2. Thanks
Ok. Got it Swati2. Thanks
राज, माझे या बीबी वरचे
राज, माझे या बीबी वरचे सगळ्यात छोटे पोस्ट!
थोडक्यात, तु अजुन रेगॉनॉमिक्स( ट्रिकल डाउन इकॉनॉमी) वरच अडकला आहेस. कालच्या माझ्या पोस्टमधे मी म्हटल्याप्रमाणे बजेट बॅलंस करायला व रेगॉनॉमिक्सने उभारलेला डेब्टचा डोंगर भुइसपाट करायला.. फिस्कली कंझरव्हेटिव्ह( रिस्पॉन्सिबल म्हण हव तर)/ सोशली लिबरल बिल क्लिंटन यावा लागला हे सत्य आहे! नंबर्स डोंट लाय!
जाउ दे, बस झल पॉलिटिक्स. तिकडे एन एफ एल प्लेऑफ्स रंगात आले आहेत, महोम्स बहुतेक खेळेल अस दिसतय.
>>> नंबर्स डोंट लाय!
>>> नंबर्स डोंट लाय!
--- बिल क्लिंटनने चक्क 'Arithmetic!' हा शब्द काही काळापुरता का होईना लोकप्रिय केला होता, ते आठवलं!
https://www.youtube.com/watch?v=AX3a-2yrQwY
असो, बाकी ह्या Voodoo Economics* च्या कॅन्ससमधल्या अंमलबजावणीच्या प्रयोगांचे परिणाम! -
https://en.wikipedia.org/wiki/Kansas_experiment
यातला निवडक भागः
It was one of the largest income tax cuts in the state's history, which Brownback believed would be a "shot of adrenaline into the heart of the Kansas economy".
The cuts were based on model legislation published by the conservative American Legislative Exchange Council (ALEC), supported by supply-side economist Arthur Laffer, and anti-tax leader Grover Norquist. Brownback compared his tax policies with those of Ronald Reagan, but also described them as "a real live experiment",
However, by 2017 state revenues had fallen by hundreds of millions of dollars, causing spending on roads, bridges, and education to be slashed. With economic growth remaining consistently below average, the Republican Legislature of Kansas voted to roll back the cuts; although Brownback vetoed the repeal, the legislature succeeded in overriding his veto.
(*इति जॉर्ज एच डब्ल्यू बुश, १९८०)
जेंव्हा अमेरिकेची खूप
जेंव्हा अमेरिकेची खूप भरभराट झाली त्या ५०-६० या दशकांमधे टॅक्स आजच्या मानाने प्रचंड जास्त होता, पण तरी भरभराट झाली.
पण
<<<फिस्कली कंझरवेटिव पॉलिसीज बाय वर्चु ऑफ लो टॅक्सेशन बुस्ट इकानमी, एकनामिकल ग्रोथ क्रिएट्स जॉब्स, जॉब्स हेल्प इरॅडिकेट पावर्टी. अशी ती सायक्ल आहे.. >>>>
ही पण चांगली कल्पना आहे.
ते इकॉनॉमी, जॉब्स गेले खड्ड्यात.
पण ज्यांचे टॅक्सेस कमी झाले त्यांनी राजकारण्यांना भरपूर पैसे चारून स्वतःच्या फायद्याचे कायदे करून घेतले. हा एक मोठ्ठाच फायदा आहे.
कितीहि झाले तरी कायदे करणार्यांचे एकच ध्येय - भरपूर पैसे देणगीदाखल मिळवायचे नि पुनः निवडून यायची सोय करायची.
या देशात काय नि इतर देशात काय, कुठलेहि कायदे हे सर्वसाधारण जनतेसाठी नसून कायदे करणार्यांच्याच फायद्याचे असतात.
हुषार लोकांना टॅक्स ची काय भीति? त्यांना माहित आहे टॅक्स कसा चुकवायचा.
सगळेच हुषार नसतात, बहुतेक जण इमानदारीने काम करून इमानदारीने टॅक्स भरतात. फक्त दोन दोन तीन तीन नोकर्या करून जास्त पैसे मिळवतात नि मग मजेत रहातात. टॅक्स चा विचारहि मनात नसतो.
बरोबर बोललात नन्द्या.
बरोबर बोललात नन्द्या.
नंदन अरे तु त्या मुर्ख ब्राउनबॅकच नाव काढु नकोस! त्या बावळटाने त्याच्या त्या प्लानने कॅन्सस राज्याचे वाटोळे करुन टाकले. शेवटी त्याच्या त्या प्लानने राज्याला बँकरप्ट केल्यावर त्याच्याच पक्षाच्या माणसांनी त्याला हाकलुन दिले व त्याला कसले तरी अॅम्बॅसेडर ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडम का काहीतरी असले फाल्तु पद देउन त्याची बोळवण केली! अतिशय नालायक( शब्दशः) गव्हर्नर!
आणी ती क्लिंटनची क्लिप, वॉव!
आणी ती क्लिंटनची क्लिप, वॉव! त्याच्यासारखा ओरेटर माझ्या हयातीत मी अजुन तरी पाहीला नाही. नंदन, १९९२ मधले त्याच्यातले व सिनिअर बुशमधले डिबेट कुठे मिळाले तर बघ व इथे टाक! अरे तो असे काही नंबर्स बुशच्या तोंडावर फेकुन मारायचा की विचारु नकोस! त्या बिचार्या बुशला वाटत होत की गेली चार वर्षे अमेरिकेचा प्रेसिडेंट मी होतो की हा?
ही घ्या.. मलाच सापडली ती क्लिप.. ट्रिकल डाउन इकॉनॉमी बद्दल क्लिंटन डिबेटमधे बोलताना. बुश हातातल्या घड्याळयाकडे सारखा बघतोय! हिलेरिअस!
http://content.time.com/time/specials/packages/article/0,28804,1844704_1...
>>बिल क्लिंटन यावा लागला हे
>>बिल क्लिंटन यावा लागला हे सत्य आहे! नंबर्स डोंट लाय!<<
क्लिंटनने बॅलंस्ड बजेट अॅप्रोच ठेउन सरप्लस वाढवला यात दुमत नाहि; पण ते करताना फेनी/फ्रेडिचा जो बबल निर्माण केला त्याचे आफ्टर इफेक्ट्स काय झाले? गव्हर्न्मेंटने सगळ्यांना होमओनर व्हायला मदत केली (विदाउट प्रॉपर रेग्युलेशन्स अँड ओवर्साइट) या लिबरल पॉलिसीवर तुझं मत काय? ती फिस्कली रिस्पॉसिबल होती? शॉर्ट टर्म गेन्स करता लाँग टर्म लॉसेसना पोषक असं वातावरण निर्माण करणे, याला मी तरी गुड प्रॅक्टिस ऑफ फिस्कल रिस्पाँसिबिलिटि म्हणणार नाहि..
बाय्दवे, लो टॅक्सेसचा ट्रिकल अप इफेक्ट सुद्धा होतो, एकनामिकल ग्रोथ करता. जस्ट अॅन एफवायआय...
https://www.cbsnews.com/news
https://www.cbsnews.com/news/heres-what-really-caused-housing-crisis/
राज मी एकॉनॉमीस्ट नाही
राज मी इकॉनॉमिस्ट नाही त्यामुळे या सगळ्यातले डिटेल्स मला समजवुन सांगता येणार नाहीत पण वर स्वातीने लिंक दिलीच आहे ज्यात म्हटले आहे की तो नुसता फ्रेडी मॅक/ फॅनी मेने केलेला घोळ नव्हता. मी तर त्याच्याही पुढे जाउन असे म्हणेन की २००७-२००८ चा रिअल इस्टेट/ हाउझिंग कोलॅप्सचा घोळ डिरेग्युलेशन मुळे झाला. आणी गव्हर्मेंट डिरेग्युलेशनच्या फेव्हरमधे बहुतेक वेळा रिपब्लिकन पार्टीच असते.
पुढे २००९-१० मधे, परत तसा क्रायसीस होउ नये म्हणुन डॉड-फ्रँक बिल पास झाले व व्होलकर रुल आला. पण मग २०१८ मधे ट्रंप व रिपब्लिकन पार्टीने ते बिल व रुल हे दोन्ही गव्हरमेंट ओव्हररीचच्या नावाखाली डायल्युट करुन टाकले. पण त्या वेळेला बरेच डेमोक्रॅट्सपण रिपब्लिकन्सना सामील झाले.
त्यामुळे नंद्या म्हणाले ते बरोबर आहे. पॉलिटिक्समधे कोणतीच पार्टी नेहमीच बरोबर असते अस नाही. त्यांच्या पॉलिटिकल स्वार्थासाठी ते कधी काय करतील याचा भरवसा नसतो.
जाउ दे, निवडणुक संपली, नविन अध्यक्ष व्हाइट हाउसमधे आला सुद्धा. त्यामुळे आता या बीबीला टाळा लावला तरी चालेल.
या बीबीवर आपण सगळ्यांनी हिरीरीने भाग घेउन पॅशनेटली बर्याच गोष्टी लिहिल्या, बरेच मुद्दे मांडले, भांडलो.
पण आता बाकीच्या अमेरिकेप्रमाणे अध्यक्ष बायडनच्या हे अनसिव्हिल वॉर थांबवुन अमेरिकेत परत एकदा सिव्हिलिटी आणायच्या आवाहनाला मान देउ.
या सगळ्यातुन एक गोष्ट सिद्ध झाली, अमेरिकन लोकशाही ही अभेद्य व बळकट आहे ही जी जगभर कल्पना होती त्या कल्पनेला नक्कीच तडा गेला. लोकशाही, मग ती अमेरिकेतली का होइना, त्याला तडा पडायची नक्कीच शक्यता असते. ट्रंपसारखा लोकशाहीसाठी भस्मासुर ठरु शकेल असा भस्मासुर जगातल्या कुठल्याही लोकशाहीत निर्माण होउ शकतो याचा जगाला साक्षात्कार झाला.
माझा रिपब्लिकन पार्टीला विरोध नाही. त्या पार्टीचे बरेच विचार माझ्या बर्याच विचारांशी जुळतात. पण बरेच नाही. पण त्या पक्षाच्या लोकांनी जेव्हा पक्षाच्या विचारांना लॉयल राहायचे सोडुन जेव्हा ट्रंप व्यक्तीपुजेला वाहुन घेतले व त्याच्या प्रत्येक अक्षम्य चुकांना पाठी घालायला सुरुवात केली ते मला मुळीच पटले नाही.
आणी इलेक्शन नंतरच्या त्याच्या बिझार वागणुकीने मात्र कहरच केला. ६ जानेवारीचे त्याचे लोकशाही उलथवण्यासाठी व त्याच्या सपोर्टर्सना भडकवण्यासाठी केलेले भाषण व त्या भाषणाने अमेरिकन कॉन्ग्रेसमन , सेनेटर्स व खुद्द व्हाइस प्रेसिडेंट पेन्सचा खुन करायला कॅपिटल बिल्डींगवर गेलेला त्याच्या सपोर्टर्सचा रिपब्लिकन पक्षाचा मॉब ,वॉज लाइक अ स्ट्रॉ दॅट ब्रोक द बॅक ऑफ कॅमल फॉर मी!
ते टीव्हीवर उलगडणारे भयानक द्रुष्य बघुन मला खुप वाईट वाटले. मी स्वतः त्या कॅपिटल बिल्डींग मधे २०११ मधे माझ्या मुलाला, माझ्या २ पुतण्यांना व माझ्या भारतातुन अमेरिकेत व्हिझिटसाठी आलेल्या बहीणीला घेउन गेलो होतो.त्यावेळेला कॅपिटल बिल्डींगच्या टुरमधे ती सर्व हिस्टॉरिक बिल्डींग आम्ही सेनेट चेंबर, हाउस चेंबर च्या गॅलरीत बसुन, व त्या बिल्डींगमधे सगळीकडे फिरुन अनुभवली होती. ज्या बिल्डींगमधे जॉर्ज वॉशींग्टन,जॉन अॅडेम्स, थॉमस जेफरसन पासुन अॅब्रॅहम लिंकन,थिओडोर रुझव्हेल्ट, एफ डी आर, जॉने एफ केनेडी, रोनाल्ड रेगन, बिल क्लिंटन व बराक ओबामा सारखी माणसे वावरुन व त्यांची फेमस भाषणे करुन गेली, जी बिल्डींग की जिथे जगातल्या पहील्या मॉडर्न वर्कींग डेमॉक्रीसीचा जन्म झाला,ती बिल्डींग प्रत्यक्ष बघताना माझ्या अंगावर रोमांच आले होते. त्या डेमॉक्रेसीसाठी पवित्र समजल्या जाण्यार्या बिल्डींगमधे ते ट्रंप सपोर्टर्स नंगानाच व मर्डर्स करताना बघुन, त्या शिंगवाल्या माणसाला सेनेट चेंबरच्या व्हाइस प्रेसिडेंटच्या खुर्चीत बसलेला बघुन,माझ्या पोटात मळमळायला लागले होते.अमेरिकन लोकशाहीचे प्रतिक असलेल्या असल्या पवित्र बिल्डींगची, ट्रंप सपोर्टर्स करत असलेली नासधुस बघताना असे वाटत होते की अक्षरशः ते ट्रंप सपोर्टर्स त्या बिल्डींगवर जणुकाही बलात्कारच करत आहेत. खुप शिसारी येत होती मला ते टीव्हीवर बघताना.
जाउ दे.. होपफुली अमेरिकेच्या भविष्यात असली अतिशय लज्जास्पद गोष्ट व ट्रंपसारखा लज्जास्पद प्रेसिडेंट आपल्याला परत बघायला मिळु नये.
शेंडेनक्षत्र, तुम्ही कुठे असाल तिथे, हा धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद! राज आणी तुम्ही तुमच्या पक्षाच्या उमेदवारासाठी हिरीरीने वकीली केलीत पण तुमचा उमेदवार इतक्या खालच्या थराला येउन वागेल व लोकशाहीसाठी इतका डेंजरस ठरेल हे तुम्हालाही वाटले नसेल.
मुकुंद - तुमच्या पोस्ट
मुकुंद - तुमच्या पोस्ट वाचण्यासारख्या असतात. मी आवर्जुन वाचतो.
जानेवारी ६, बुधवारचा हल्ला अत्यंत चिंताजनक होता. जमावाचे नारे आणि जय्यत तयारी बघुन मन सुन्न झाले. अगदी पेन्स सारखा व्यक्ती पण सुटला नाही. जर पेलोसी, शुमर किंवा अगदी पेन्स समोर आले असते तर काय घडले असते याची कल्पनही करवत नाही.
बायडन- हॅरिस जिंकले, आणि ट्रम्प महाशय पराभूत झाले पण ट्रम्पिझम अस्तित्वात रहाणार आहेच हे नाकारता येणार नाही. या ना त्या स्वरुपांत , कदाचित पहिल्या पेक्षाही उग्र, तो डोके वर काढतच रहाणार.
>>राज मी इकॉनॉमिस्ट नाही <<
>>राज मी इकॉनॉमिस्ट नाही <<
मी सुद्धा नाहि, पण काय झालं आणि कशामुळे झालं यामागची पार्श्वभुमी स्पष्ट असताना ते समजणं कठिण नाहि. ती वर दिलेली लिंक तर फनी आहे, माझा मुद्दा खोडण्याकरता दिली असेल तर. अरे, दोन-तीन लोकांची मतं देउन वर हा पठ्ठ्या शेवटि म्हणतो कि गवर्नमेंट वाजंट द प्रॉब्लेम, इट वाज लॅक ऑफ गवर्नंस, स्पेसिफिकली द फेल्युर टु इंपोज रेग्युलेटोरी प्रोसेस; जे मी सुरुवातीलाच वर लिहिलेलं आहे. आता फेनी/फ्रेडि , इवन हड वर गवर्नंस कोणाचा असतो हे लिहायचं तो साळसुदपणे विसरला आहे...
असो, आता मी सुद्धा थांबणार आहे. आता डेम्स्च्या डोक्यातुन ट्रंपचं भूत उतरलं असावं अशी आशा करतो...
<<आता डेम्स्च्या डोक्यातुन
<<आता डेम्स्च्या डोक्यातुन ट्रंपचं भूत उतरलं असावं अशी आशा करतो...> तुम्हाला रिप्स च्या डोक्यातून असं म्हणायचंय का? चुकून डेम्स लिहीलंय वाटतं....
माझ्या संपर्कात जेव्हढे सामान्य रि सपोर्टर्स आहेत त्या सगळ्यांनी, आणि मोस्ट रि लिडरशिपनी, ६ तारखेला काही झालंच नाही असा समज करून घेतलेला आहे.
<<माझा रिपब्लिकन पार्टीला विरोध नाही. त्या पार्टीचे बरेच विचार माझ्या बर्याच विचारांशी जुळतात. पण बरेच नाही. पण त्या पक्षाच्या लोकांनी जेव्हा पक्षाच्या विचारांना लॉयल राहायचे सोडुन जेव्हा ट्रंप व्यक्तीपुजेला वाहुन घेतले व त्याच्या प्रत्येक अक्षम्य चुकांना पाठी घालायला सुरुवात केली ते मला मुळीच पटले नाही.>> सो टकेकी बात...डेम्स बद्दल कधी फार आत्मियता वाटली नव्हती पण गेल्या चार वर्षात डावीकडे अक्षरश: ढकलले गेलो आहोत...
फ्लॉईड ला मारले तेव्हा
फ्लॉईड ला मारले तेव्हा लक्षावधी डॉलर्सची मालमत्ता लुटली, जाळली, नष्ट केली गेली. अनेक सामान्य नागरिकांच्या नोकर्या गेल्या. घटना जिथे घडली तिथून शेकडो, हजारो मैलावर मालमत्तेची अशी होळी केली. तेव्हा डेमोक्रॅटिक लोक आगलाव्या लोकांना रस्त्यावर उतरा, आणखी काहीतरी विध्वंस करा असे सांगत होते. ते सगळे ठीक होते. मात्र ट्रंप समर्थकांनी केले तर जगबुडी झाल्यासारखा आक्रोश केला. थोडक्यात वॉशिंग्टन डीसी मधले राज्यकर्ते हे सामान्य नागरिकांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत. त्यांना झालेला त्रास म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला. मात्र सामान्य लोकांची दुकाने, धंदे नष्ट करणे हे मात्र वंशवादाविरुद्ध केलेले न्याय्य आणि उचित आंदोलन. ओके. चांगला संदेश आहे.
जाता जाता, बायडन साहेबांनी अमेरिका आणि पाक ह्यांच्यातील सैनिकी संबंध पुन्हा सुदृढ करायची घोषणा केली आहे ह्याचा तमाम भारतीय ट्रंप विरोधकांना अभिमान आणि आनंद वाटेल अशी खात्री आहे! भारतीय उपखंडात आता प्रचंड शांती पसरेल ह्याची खात्रीच बाळगा!
https://www.dawn.com/news/1602541/biden-administration-to-revive-militar...
जो बैंगण चे लेटेस्ट मुक्ताफळ
जो बैंगण चे लेटेस्ट मुक्ताफळ
https://m.tiktok.com/v/6931358721528352005.html
( आम्ही डेमुकरॅट या मागासांचे तारणहार आहोत हे कित्ती बरंय ना )
Joe Biden on Twitter Oct 30,
Joe Biden on Twitter Oct 30, 2020
I'm going to shut down the virus.
CNBC JAN 22 2021
Biden says nothing can change the trajectory of the Covid pandemic over the next several months
खी: खी: खी: हे हो काय बैंगणबुवा! तुमची जादूची कांडी ना हो फिरवणार होतात? शेवटी गंडवलनीत आम्हाला
Biden Lied, Americans Died.
कोका कोला कंपनीचे सो कॉल्ड
कोका कोला कंपनीचे सो कॉल्ड 'डायव्हर्सिटी ट्रेनिंग' - टु बी लेस व्हाईट इज टु बी लेस इग्नॉरन्ट, लेस ओफेन्सिव्ह, लेस ऑप्रेसिव्ह'
रिव्हर्स रेसिझमचा इजै असो!
मला वाटते कोकने याहीपुढे जाऊन गोर्या एम्प्लॉयीजची सावली इतरांवर पडू नये म्हणून त्यांच्यासाठी सेपरेट एन्ट्रन्स बांधावे, आणि त्यांना गळ्यात मडके बांधण्याची सक्ती करावी, म्हणजे समतेचा सूर्य उगवलाच म्हणून समजा!
म्हणून सांगतोय सगळ्यानी
म्हणून सांगतोय सगळ्यानी भारतात या.
हर हर मोदी
घर घर मोदी
हमारे प्यारे मोदीजी
म्हणून सांगतोय सगळ्यानी
म्हणून सांगतोय सगळ्यानी भारतात या.
हर हर मोदी
घर घर मोदी
हमारे प्यारे मोदीजी
नवीन Submitted by बोकलत on 25 February, 2021 - 19:01
+१
भारतात या अच्छे दिन आले आहेत.
जो आजोबांनी सिरियावर बॉम्ब
जो आजोबांनी सिरियावर बॉम्ब हल्ले केले आहेत. हे म्हणे इराणने पाठवलेले मिलिटंट आहेत ज्यांच्यावर हल्ले केले गेले आहेत. एकंदरीत सिरियाच्या असादला पदच्युत करुन तुर्की आणि आयसिसला अच्छे दिन दाखवणार आहेत आजोबा! आजोबांना आपण कुठल्या देशावर कुठली शस्त्रे डागत आहोत ह्याविषयी कितपत कळते आहे त्याबद्दल शंकाच आहे. त्यांचा शिखंडी करुन त्यांच्या नावाने कुणी तिसराच हे कारभार करत आहे असे वाटाते.
ट्रंपने इस्रायल आणि सौदी, इस्रायल आणि अमिरात, इस्रायल आणि सुदान अशा देशांना एकत्र आणले. जे केवळ अशक्य आहे असे जग मानत होते ते युद्ध न करता करुन दाखवले. पण ट्रंपला शिव्या देण्याची फ्याशन असल्यामुळे ह्यातल्या कुठल्याही घटनेचे कौतुक झाले नाही. उलट जर सांगितले तर ह्यात ट्रंपचा काहीच कसा संबंध नाही हेच उच्चरवाने सांगितले गेले.
असो. चार वर्षे ट्रंपने एकही युद्ध सुरु केले नाही हे कदाचित आता जास्त जाणवेल.
तरी जो आजोबांना नोबेल शांतता पुरस्कार मिळू शकेल. पॉलिटिकली करेक्ट, वोक जगात काहीही शक्य आहे!
जाता जाता: अनेक डेमोक्रॅटिक नेते असा आग्रह करत आहेत की जो आजोबांनी आण्विक अस्त्रे डागण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवू नये! ते खूप धोक्याचे आहे! वा! मती भ्रष्ट झालेला अध्यक्ष नेमला आहे आणि आता ह्या उलट्या बोंबा. म्हातारबाबाने अनवधानाने भलते बटण दाबू नये. जिल बाई त्यांना वेळेत थांबवतील अशी आशा करु नाहीतर नको ती आतषबाजी बघायला मिळायची!
यात गंमतीचा भाग असा कि
यात गंमतीचा भाग असा कि ट्रंपने '१७ मधे सिरियावर एयर्स्ट्राइक केले होते. त्यावेळेस जेन साकि यांनी केलेल्या इन्फेमस ट्विटवर इल्हान ओमारची कालची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.
आर वी जस्ट गेटिंग स्टार्टेड डिलिवरिंग पोएटिक जस्टिस...
पण १५ फेब्रुवारिला अमेरिकन
पण १५ फेब्रुवारिला अमेरिकन नागरीकान्वर।हल्ले केले त ना त्या ग्रुपनी!
हा बायडेन ने कोन्ग्रेसला विश्वासात घेतले नाही. ते चुकले.
उठता बसता पर्यावरण, वातावरण
उठता बसता पर्यावरण, वातावरण बदल, येऊ घातलेली जगबुडी ह्या गोष्टींची जपमाळ ओढणारे लोक आणि त्यांचे नेते असल्या मोहिमा चालवून, हजारो सैनिक इकडून तिकडे पाठवून, डझनावारी महागाडी विमाने उडवून त्यातल्या टनावारी स्फोटकांचा स्फोट करुन पर्यावरणाला मदत करत आहेत का?
अमेरिका जेव्हा जेव्हा मध्यपूर्वेत ढवळाढवळ करते तेव्हा तिथल्या डामाडौल परिस्थितीला आणखी वाईट करुन टाकते असा इतिहास आहे. ह्या महामूर्ख म्हातार्याला भ्रमिष्टपणामुळे हे आठवत नसेल. पण निदान त्याच्या सल्लागारांची अक्कल कुठे पेंड खायला गेली आहे?
भारतात कमळद्वेषी असणारे
भारतात कमळद्वेषी असणारे अमेरिकेत कमलभक्त आहेत.
अरे, २०२० निवडणुका संपल्या.
अरे, २०२० निवडणुका संपल्या. आता हा धागा बंद करून टाका.
वाटल्यास दुसरा उघडा. यावर बायडेनला शिव्या.
गंमतच आहे - जो निवडून आला त्याला शिव्या. स्वतः काही करायचे नाही.
साधी गोष्ट आहे - राजकारण हा वेगळाच खेळ आहे, श्रीमंत लोकांचा. फक्त निवडून येणे, सत्तेच्या जोरावर स्वतःचा फायदा करून येणे हेच त्यांचे काम. ऊगाच जगात कुठे काय केले, झाले, सामान्य माणसाचे काय, गरिबी, ड्रग्स, बेकायदेशीरपणे घुसणार्या लोकांचे काय करायचे हे असले प्रश्न आपल्याला पडतात. आपण हा खेळ खेळत नसतो.
आपण रेडियोवर कॉमेन्ट्री ऐकून तावातावाने चर्चा करतो - कोहलीने आश्विन ऐवजी शर्माला गोलंदाजी द्यायला पाहिजे होती - पिच स्पिनला चांगले नाही हे त्याला कळलेच नाही!
>>गंमतच आहे - जो निवडून आला
>>गंमतच आहे - जो निवडून आला त्याला शिव्या. स्वतः काही करायचे नाही.
जोने जे मुद्दे मांडून निवडणूक जिंकली ते धाब्यावर बसवताना दिसतो आहे. जो निवडून आला आहे. त्याच्या हातात सत्ता आहे. जबाबदारी आहे. त्याने वाट लावली तर शिव्या देणारच. मग काय ओव्या गायच्या काय त्याच्या?
एक मतदार म्हणून राज्यकर्त्यांच्या धोरणावर लक्ष ठेवणे हे कर्तव्य आहे. निदान एक मत इतका तरी आपला निवडणूकीत सहभाग असतो. हे विसरू नये.
Pages