अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाकी मुकुंद म्हणतो ते खरे असले तरी ओबामाला जितका विरोध झाला तितका बायडेनला होणार नाही असे मला तरी वाटते. अमेरिका गेली अनेक वर्षे हीच सिस्टीम राबवत आहे आणि तरीही अनेक चांगल्या गोष्टी मान्य झाल्या आहेत. प्रत्येक वेळेस एका पार्टीची मेजॉरिटी होती असे नाही. प्राचीन काळी मतभेद असलेल्या लोकांबरोबर काम करून कॉमन ग्राउण्ड शोधत. आजकाल सगळे डायरेक्ट देशद्रोही असतात, त्यामुळे माहीत नाही Happy पण तरी बायडेन हे चित्र बदलेल असे होउ शकते.

नाहीतर दोन वर्षांत पुन्हा अजून एक संधी आहे. सिनेटच्या सगळ्या जागा एकदम निवडणुकीकरता ओपन होत नाहीत - १/३ होतात. पण तरी किमान ४-५ डेमोक्रॅट्सनी फ्लिप केल्या तरी बास आहे.

>>त्यांना मतदानाचा हक्क दिला तर ते सगळे डेमोक्रॅट्स्नाच मतदान करायला काय मेंढरे आहेत का?<<
नंद्याशेठ, सँक्च्युअरी सिटिजना खतपाणी देण्यामागचा हेतु टु फोल्ड आहे. १. नविन वोटर बेस बनवणे (फ्लोरिडा, अ‍ॅरिझोना इ. राज्यात प्रयत्न झाले पण ते हाणुन पाडले गेले. हल्लीच टुसान मधे), आणि २. आहे तो वोटर बेस मेंटेन करणे अथवा वाढवणे. गेल्या १०-१५ वर्षातला वोटिंग पॅटर्न नजरेखालुन घातलात तर मी काय म्हणतोय ते लक्षात येईल.

जॉर्जिया सेनेट रेसमधली एक सीट (डेविड पर्डु) शुअर शॉट विन आहे, आणि लॉफलरने जोर लावला तर ती सुद्धा. शिवाय आता ब्रॅड रॅफेन्स्बर्जरने वोटिंग काउंटच्या बाबतीत टाइट ओवरसाइट ठेवणार अशी घोषणा केल्याने चिटींगला वाव नाहि... Wink

मी माझ्या पोस्टमधे.. अमेरिकेत लेजिस्लेशन प्रॉसेस कशी असते याचा एक ढोबळ आढावा घेतला.. अगदी डिटेलमधे लिहायाचे झाल्यास त्याला ग्रंथ पुरायचा नाही... आणी तेवढा मी कॉन्स्टिट्युशनल स्कॉलरही नाही. होपफुली ज्यांना त्याबाबतीत काहीच अंदाज नव्हता.. त्यांच्यासाठी.. एक क्रुड रोडमॅप म्हणुन मी माझे पोस्ट लिहीले होते.

फारेंड... प्राचिन काळी.... Proud

माझ्या मते ...बिंग अ गुड लेजिस्लेटर म्हणजे अस नाही की आपल्याच पक्षाचे हित बघुन .. सदैव अप्पलपोटेपणा दाखवुन ... माझे व माझ्या पक्षाचेच कसे खरे... असे सारखे वागत राहणे.

उलट लोकशाहीत चांगला लेजिस्लेटर कोण तर जो/जी इज क्राफ्टी एनफ टु क्राफ्ट अ कॉमन सेंस.. वेल बॅलंस्ड बिल.. जे दोन्ही पक्षात संवाद( तोही सिव्हिलाइझ्ड संवाद बर का..)घडवुन आणुन दोन्ही पक्षाच्या लोकांचे हितसंबंध जपतो/जपते.

लोकशाहीत असे कॉम्प्रोमाइज असायला हवे. कारण अमेरिका काय किंवा भारत काय.. अश्या मोठ्या देशांमधे.. एकदम सगळी माणसे... होमॉजिनस विचारांची असायला पाहीजेत असा अट्टाहास करणे म्हणजे एकदम क्विक्झॉटिक आहे.

पण नाही.. सध्या अमेरिकेतच नाही... तर जगभर .. फारेंड वर म्हणाला तसाच ट्रेंड दिसुन येत आहे की... लोकांना दुसर्‍या बाजुचे विचार .. एकदम देशद्रोही.. देशाला संकटाच्या खाइत लोटणारे.. देशाला डबघाइत घेउन जाणारे.... असेच वाटतात.

म्हणुन मग एवढे टोकाचे पोलरायझेशन...

चल रे.. राज.. सोड आता हे पॉलिटिक्स.. उद्या मास्टर्स टुर्नामेंट सुरु होत आहे.. म्हणजे या विकेंडला.. आपल्यासाठी डबल दिवाळी... Happy

सगळ्यांना दिवाळिच्या हार्दिक शुभेच्छा!

लोकशाहीत असे कॉम्प्रोमाइज असायला हवे. कारण अमेरिका काय किंवा भारत काय.. अश्या मोठ्या देशांमधे.. एकदम सगळी माणसे... होमॉजिनस विचारांची असायला पाहीजेत असा अट्टाहास करणे म्हणजे एकदम क्विक्झॉटिक आहे. >>> टोटली. रिपब्लिकन पार्टीत पूर्वी मॅकेन ते बुश ही मोठी रेंज होती, डेम्स मधे हिलरी ते बर्नी अशी असू शकेल.

खुद्द रिपब्लिकन पक्षात सगळे ट्रम्पसमर्थक नाहीत. ७० मिलीयन पैकी अनेक असे आहेत की जे कोणत्याही परिस्थितीत कॉन्झर्वेटिव्ह अजेंडालाच मते देतील. ट्रम्प मान्य नसेल तरी त्याचा पर्याय डेमोक्रॅट्स असतील तर त्यांना ते मान्य नाही. ते ज्या वेबसाइट्स बघतात, जे चॅनेल्स पाहतात त्यातून त्यांना बायडेन्/कमलाची जी इमेज दिसते तीच त्यांच्या दृष्टीने "वास्तव" आहे. त्याला विरोध करणारे चॅनेल्स, लोक त्यांनी कधीच झिडकारून टाकलेले आहेत. ते जेव्हा फेसबुक वर जातात तेव्हा त्यांच्या आधीच्या आवडीनिवडी बघून त्याच टाइपच्या बातम्या, व्हिडीओज त्यांच्या फीडमधे दिसतात. त्यामुळे त्यांच्या विश्वात फक्त तेच वास्तव आहे.

तर स्वघोषित लिबरलांचा मतांच्या/चर्चेच्या बाबतीत आडमुठेपणा त्यापेक्षा भन्नाट आहे. त्यांच्या विरोधी मत दिसले तर दुसर्‍या किंवा तिसर्‍या वाक्याला तुम्हाला रेसिस्ट ठरवून ते मो़कळे होतात. सर्वात इझी ऑफेण्ड होणारा, सर्वात क्रेझी थिअरी असलेला यांच्याशी १००% सहमत असायलाच हवे. एखादी गोष्ट एकदा "रेसिस्ट" आहे असे ठरले की त्याबद्दल इतर कसलीही मते ऐकून घेतली जाणार नाहीत. असला प्रकार असतो.

>>खुद्द रिपब्लिकन पक्षात सगळे ट्रम्पसमर्थक नाहीत. ७० मिलीयन पैकी अनेक असे आहेत की जे कोणत्याही परिस्थितीत कॉन्झर्वेटिव्ह अजेंडालाच मते देतील.<<
या वाक्याशी सहमत, पण...

>> ते ज्या वेबसाइट्स बघतात, जे चॅनेल्स पाहतात त्यातून त्यांना बायडेन्/कमलाची जी इमेज दिसते तीच त्यांच्या दृष्टीने "वास्तव" आहे. <<
या वाक्याशी सहमत नाहि. हे म्हणजे, माझ्या चष्म्यातुन तुम्ही जसे दिसता, अगदि तसेच आहात. जे ऑब्वियस्ली "वास्तव" नाहि...

अमेरिकेत सध्या जे वारे वाहत आहेत, त्यावरुन डेम्सनी "डेमक्रॅटिक सोशलिझम" ची कास धरली नाहि तर त्यांना पुढे काहि भविष्य नाहि (अशी त्यांची धारणा आहे. त्यामागे काहि स्टडीजचा सहभाग असु शकतो). शिवाय त्यातहि दोन स्पेक्ट्रम आहेत, एक मॉडरेट तर दुसरा टोकाचा - बर्नी सँडर्सचा.

मूळात अमेरिकन (कंझरवेटिव अमेरिकन म्हणुया आर्ग्युमेंटकरता) माणसाला सोशलिझम म्हणजे क्म्युनिझम्ची पहिली पायरी वाटते. अमेरिकेचा आत्तापर्यंतचा प्रवास (प्रगती, इफ यु विल) सोशलिझम/क्म्युनिझम शी फारकत घेतल्याने झालेला आहे. यावर दुमत नसावं. अशा परिस्थितीत डेम्सचा मेन अजेंडा सोशलिझम बेस्ड असेल तर सामान्य माणसाचं कंझरवेटिव मत दृढ व्हायला कोणतंच चॅनल/पेपर बघायची/वाचायची गरज नाहि...

आता डेम्सचा (बाय्डन्/हॅरिस) अजेंडा "डेमक्रॅटिक सोशलिझम" नाहि, असं कोणि म्हणत असेल तर प्रश्नच मिटला... Wink

>>चल रे.. राज.. सोड आता हे पॉलिटिक्स..<<
अरे, मास्टर्स तर प्रायॉरिटी आहेच, पण स्पोर्ट्सबरोबर पॉलिटिक्स मधे इंटरेस्ट न घेणे हे माझ्या करता तरी अनअमेरिकन आहे... Proud

अशा परिस्थितीत डेम्सचा मेन अजेंडा सोशलिझम बेस्ड असेल तर सामान्य माणसाचं कंझरवेटिव मत दृढ व्हायला कोणतंच चॅनल/पेपर बघायची/वाचायची गरज नाहि... >>> होय. ते ही आहेतच. म्हणूनच रिपब्लिकन वोटर्स ही एक रेंज आहे असे म्हणतोय. टोटल ट्रम्प कल्ट, कॉन्झर्वेटिव्ह्ज, अगदी कॉन्झर्वेटिव्ह्ज नसलेले पण सोशॅलिजम नको असलेले, कॉन्झर्वेटिव्ह इमिग्रण्ट्स वगैरे वगैरे.

वरती तो "वास्तव" वाला पॉइण्ट हा आहे की ७ कोटी लोकांनी ट्रम्प ला मत दिले म्हणजे त्यांना तो करतो ते मान्य आहे असे नव्हे. त्यांच्या डोळ्यासमोर असलेली ट्रम्प व बायडेन ची इमेज टीपिकल डेमोक्रॅट फॉलोअर पेक्षा वेगळी आहे. ती बदलण्यात त्यांना इण्टरेस्ट नाही, आणि यांनाही.

मत इकडचं जग तिकडे झालं तरी कोणी बदलत नाही हे अमेरिकन (वैश्विक) सत्य परत एकदा सिद्ध झाले. Happy

लोल अमित.

म्हणूनच चर्चेतून मत बदलले जाउ शकते हे पाहून चकित झालेला टोबी झीग्लर वेस्ट विंग मधे जे बोलतो ते मला सर्व सोशल नेटवर्क्स मधे लागू वाटते:

Toby: “If you don’t mind me asking sir, what changed your mind?”
Willis: “What do you mean?”
Toby: “Well I know it wasn’t expediency, so I was wondering what changed your mind”
Willis: “You did. I thought you made a very strong argument”
Toby: “Well thank you. (chuckles) I am smiling because around here the merits of a particular argument generally take a back seat to political tactics.”

हे त्या मि. ओहयो वाल्या लेखात लिहीले, तर राजशेठ मला त्यापेक्षा हाउस ऑफ कार्ड्स (पुन्हा) बघा सांगू लागले. तिकडे मतभेद वेगळ्या रीतीने सोडवले जातात Happy

मतं बदलतात. राजकीय चर्चा ओपन माइंडने वाचून, जे आपल्याला समजत नाही ते जास्त वाचून, विचारून, जे आपल्याला आवडते त्याच्यावर दुसर्या बाजुचे मत ऐकून हळूहउळू आपले मत बदलू शकते. माझा नेता चुकूच शकत नाही, त्यआमुळे प्रश्न विचारायचेच नाही असा विचार असेल तर मग कठीण आहे. चुकला तरी मी चुक मानणार नाही, उलट दुसर्या बाजूवर अजून जहरी, खोटी टीका करीन हे वारंवार दिसतं हल्ली.
असा आडमुठा दृष्टीकोन फक्त राजकारणापुरता मर्यिदित रहात नाही, हळूहळू माणसाचा स्वभावच तसा आडमुठा, चुकीकडे डोळेझाक करणारा, विसंवादी बनत जातो आणि मग त्या व्यक्तीची प्रत्यक्ष जीवनातही प्रगती खुंटते. हे फाॅलोअरने लक्षात घ्यायला हवं. नेत्यांची तर प्रगती सदासर्वदा होतच असते. सत्तेत असले तरी, नसले तरी.

>> उलट लोकशाहीत चांगला लेजिस्लेटर कोण तर जो/जी इज क्राफ्टी एनफ टु क्राफ्ट अ कॉमन सेंस.. वेल बॅलंस्ड बिल.. जे दोन्ही पक्षात संवाद( तोही सिव्हिलाइझ्ड संवाद बर का..)घडवुन आणुन दोन्ही पक्षाच्या लोकांचे हितसंबंध जपतो/जपते.

त्यासाठी त्यांना चांगले मदतनीस देखील द्या (देत नसतील तर) मागे कामाच्या निमित्ताने त्यांना “मदत“ करायची वेळ आली (थोडं फार बजेटिंग किंवा हाय लेवल नंबर्स म्हणूया) तेव्हा त्यांचं आणि आमच्या डिपारमेणकडून गेलेले नंबर्स पाहिले तर चक्कर यायची बाकी होती. असो. हिमनगाच्या टोकाची माहिती ही तर डीसीचा हत्ती हलवताना काय होत असेल.
असो निवडणूका पार पडल्या असतील तर काम पण करूया.
सध्या एक गीत ऐकतेय
If you don’t like it then get the hell out
..........,,,,,, whose gone care it if I don’t
Whose gone change if I don’t.

Good night / Good Morning and yes afternoon too. Happy

Over and under and above the law
My neighbor is in danger
Who does it call?

Happy Happy Happy Happy

मतमोजणी आता तरी पूर्ण झाली का?
अंतिम् निकाल आले का?
ट्रंपतात्यांना मान्य झाले का? (याचं उत्तर सतत बदलत अस ल्याचं कळलं)
रिपब्लिकन्सचं काय?
काही देशांच्या प्रमुखांनी बिडेन यांचं अभिनंदन केलं नव्हतं, असं वाचलं.

फायनली जानेवारीत ट्रंप व्हाइट हाउस स्वतःहून सोडणार की अर्णव गोस्वामीला उचललं तसं उचलावं लागेल?
त्याचा लाइव्ह टेलिकास्ट , वेबकास्ट होईल का?

ट्रंपतात्यांना निकाल मान्य नाहीत. I concede NOTHING असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. जॉर्जिया मधली फेरमोजणीही meaningless आहे असं त्यांचं म्हणणं आहे. I won the Election! आणि I WON THE ELECTION! असं दोनदा त्यांनी ठामपणे Tweet केलं आहे. ALL CAPS मधे केल्याने जास्त ठासून सांगता येतं आणि ट्रंपसमर्थक माना डोलावतात.
बायडनच्या Transition Team ला रिपब्लिकन लोकांकडून कोणतीही मदत, फंड मिळत नाहीये. जर २० जानेवारीपर्यंत थांबावं लागलं तर COVID चा सामना करण्यात अडथळे येतील असं बायडनचं म्हणणं आहे.
White House च्या प्रेस सेक्रेटरीच्या मते "Trump will attend his own inauguration on Jan 20th!"
तात्यांनी अनेक राज्यांमधे लीगल दावे करण्याचे प्रयत्न केले पण ते फोल ठरले. त्यांच्या टीमवरील बरेचसे lawyers सोडून चालले आहेत.

तेव्हा सध्या आहे हे असं आहे. दोन्ही बाजूचे लोक आपलाच माणूस अध्यक्ष होणार यावर ठाम आहेत. Happy

<<<नंद्याशेठ, सँक्च्युअरी सिटिजना खतपाणी देण्यामागचा हेतु टु फोल्ड आहे. १. नविन वोटर बेस बनवणे (फ्लोरिडा, अ‍ॅरिझोना इ. राज्यात प्रयत्न झाले पण ते हाणुन पाडले गेले. हल्लीच टुसान मधे), >>>
अर्थातच. त्यांची मते मिळवण्यासाठी त्यांना नागरिकत्व द्यावे लागेल. मग त्यांना २ डॉ. वर राबवून घेता येणार नाही. मग त्यांनाहि जरा बरे रहाता येईल, ते सोशल सेक्युरिटि देतील, कर भरतील.
शिवाय काय आहे, राजकारण म्हणजे युद्ध झाले आहे आणि युद्धात नि प्रेमात काहीहि चालते.
तर निवडून येण्यासाठी मतदार तयार केले तर बिघडले फक्त विरुद्ध पक्षाचे! आपल्या पक्षाची हुषारी!!
विशेषतः गेल्या कित्येक वर्षात बळजबरीने हवे ते करून घ्यायचे अश्या पद्धतीने हे राजकारण चालते. आपल्या पक्षाने काही केले तरी चालते दुसर्‍या पक्षाचे अवगुण सापडले नाहीत तरी खोटे बोलून, लोकांचा अपमान करून, मने भडकवून मते मिळवायची, बहुमत मिळवायचे नि दादागिरी करायची. दुसर्‍या पक्षाचे ते लबाडीचे, आपले खरे - अनेकदा खोटेपणा सिद्ध झाला तरी आडमुठ्ठेपणा करून खोटे बोलतच रहायचे.
शिवाय सगळ्या सिस्टिम्स कालानुरुप बदलल्या नसल्यामुळे अतिशय कठीण होऊन बसल्या आहेत. कुणालापण नीट विचार करून, आपआपसात समझोता करून मार्ग काढायचा नाही आहे. एका फटक्यात सगळे बदलले पाहिजे अशी इच्छा.
मग नुसत्या घोषणा - मेक्सिको भिंत बांधायचे पैसे देईल, सर्वांना फुकट मेडिकल इन्शुरंस, काहीपण. नि बरेच लोक मत देतात!

जॉर्जियामधे जिओपी इम्प्लोड होतेय. जॉर्जिया चा गव्हर्नर आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट रीपब्लीकन असल्यामुळे, आणि दोघेही तात्या आणि त्यांच्या आजुबाजूच्या सकर्शीतील विदुषकांची तळी उचलण्यास तयार नसल्यामूळे, स्टेट आणि नॅशनल जिओपी ची गळचेपी होतेय. जॉर्जियातले निकाल काहीही करून चेंज होत नाहियेत हे लक्षात आल्यावर आता नॅशनल जिओपी, तात्यांचे खंदे समर्थक, हे जॉर्जियाचा ग व सेऑस्टे यांच्यावर धावून येताहेत. त्या दोघांची रवानगी तुरूंगात करावी अशी मागणी तात्यांचा वकील लिन वुड याने केली आहे. जोर्जिया हरण्याचा घाव जिओपी च्या वर्मी लागणार हे माहिती होतं पण एवढा थयथयाट करतील असं वाटलं नव्हतं विशेषतः स्टेसी एब्र्म्स ला सोर लुजर म्हणणार्याकडून...

विशेषतः स्टेसी एब्र्म्स ला सोर लुजर म्हणणार्याकडून...>>> Happy
जॉर्जिया रेड'च' रहाणार याबद्दल रीप्ब्लिकन्स फार ठाम होते.

बायडनचं एक स्पीच थोडं ऐकलं तर he is already talking like a president..Talking about getting things done..Managing covid19..I think now he realizes what a mess he has agreed to sort..But he is already at work with his team.
इतकं इतकं बरं वाटलं. Finally an actual real adult professional in charge.

भरत यांच्या प्रश्नांना ( पहिल्या 4) कोणी उत्तर देईल का प्लिज? इथे काही आईडीनी अगदी निवडणुकीच्या तोंडापर्यंत ट्रम्पच/ तात्याच जिंकणार हे इतक्या वेळा आणि एकदम ठोसपणे लिहिलंय ( काऊंट सोडून दिला शेवटी) , तर तसे अजून होईल का?

नाही हो. एखादं स्टेट चुकून माकून फ्लिप होईल, जॉर्जिया उदा. पण आता २७० च्या खाली येणं अल्मोस्ट अशक्य आहे. तसलं काय होणार नाही. तात्या जाईल स्वतःहून असा अंदाज आहे. मध्ये परिषदेत "इथे (व्हा.हाऊस) आता कोणते ऍडमीनिस्ट्रेशन असेल सांगता येत नाही" असं म्हणलेला.

ओके कॉमि.. पण त्याचं कालच अजून एक ट्विट होतं ना मी जिंकलो ह्या अर्थी. आणि अजून किती मतमोजणी बाकी आहे?

ढोबळपणे या स्टेजेस धरा:
१. मतमोजणी पूर्ण झाली आहे. पण ती "अधिकृत" व्हायला अजून काही दिवस लागतील. जॉर्जिया, पेनसिल्वेनिया वगैरे यावेळच्या निवडणुकीतील महत्त्वाची राज्ये आहेत त्यातील बहुतेकांचे अधिकृत निकाल नोव्हेंबर अखेरीपर्यंत जाहीर होतील. बाकीच्यांचेही येत राहतील पण १४ डिसेंबर पर्यंत सर्वांचे येतील. या स्टेजला फक्त इतके अधिकृत होईल की (उदा:) या दोन राज्यात बायडेन जिंकला, तर फ्लोरिडा मधे ट्रम्प. म्हणजे इथपर्यंत फक्त राज्याराज्यातील निकाल नक्की होतील.
२. १४ डिसेंबर ला "इलेक्टर्स" भेटून त्या त्या राज्यातील मतांप्रमाणे स्वतःची मते जिंकलेल्या उमेदवाराच्या नावे करतील. इथे ते प्रत्येक राज्याला दिलेले इलेक्टर्सचे नंबर्स महत्त्वाचे आहेत. कॅलिफोर्नियाचे ५५ इलेक्टर्स बायडेनला, नॉर्थ कॅरोलीनाचे १५ ट्रम्पला असे मिळत जातील. जो उमेदवार २७० क्रॉस करेल तो अधिकृतरीत्या विजयी होईल.
३. तरीही त्याची अध्यक्ष म्हणून "औपचारिक" निवड ही काँग्रेस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करेल.

आता ही सगळी प्रोसेस इतकी वर्षे जशी झाली आहे तशी होत गेली तर बायडेन अध्यक्ष होईल. मग हे कोठे फिरू शकते?

१. अजून कोठे रिकाउण्ट झाले आणि त्यातून विजयी उमेदवार बदलला. याची शक्यता खूप कमी आहे. स्टॅटिस्टिक्स नुसार.

२. स्टेट इलेक्टर्सनी आपापल्या राज्यातील लोकांचा कल डावलून दुसर्‍याच उमेदवाराला मत दिले तर. म्हणजे जॉर्जिया जरी बायडेनला जास्त मते असली तरी अचानक इलेक्टर्स म्हणले की या इलेक्शन मधे गडबड आहे, आमच्या मतदारांचा मान राखून आम्हाला ट्रमपलाच मत द्यायला हवे वगैरे वगैरे. हे कोठे जास्त शक्य आहे? तर जेथे सध्या रिपब्लिकन सरकारे आहेत व त्यांना कोणत्याही केस मधे ट्रम्पला आणायचे आहे. नुसते रिपब्लिकन आहे म्हणजे असे करतील असे नाही, मग प्रोपोगंडा काहीही असो. अनेक रिपब्लिकन लोक ऑलरेडी बायडेन अध्यक्ष झाला असेच म्हणत आहेत व इव्हन ट्रम्पला सांगत आहेत की आता सोडून दे ("कन्सीड" कर). पण काही नग निघाले असे तर हे होऊ शकते - कारण इलेक्टर्स नी कोणाला मत द्यायचे याबद्दल लेखी कायदा अनेक ठिकाणी नाही. अर्थात याचीही शक्यता खूप कमी आहे कारण अनेक राज्यात त्यांनी असे केले तर त्यांना हटवून दुसरे इलेक्टर्स नेमले जाउ शकतात. आणि अशा लोकांचे एकूण राजकीय करीयर धोक्यात येते. आणि अनेक इलेक्टर्सनी हे केल्याशिवाय निवड बदलणार नाही.

३. समजा सिनेट मधे रिपब्लिकन मेजॉरिटी आली आणि त्यांनी बायडेनला निवडणार नाही असा पवित्रा घेतला - आणि कोठून कोठून कायद्यातून पळवाटा काढून ते लांबवले तर. ही शक्यता नगण्य आहे

४. चौथा ऑप्शन - ट्रम्प कॅम्पेन ने फाइल केलेल्या असंख्य केसेस. उदा: पेनसिल्वेनिया मधे जवळजवळ सात लाख मते त्यांच्या समोर (म्हणजे ते बघू शकतील इतक्या अंतरावर असताना) मोजली गेली नाहीत त्यामुळे ती पुन्हा मोजायला हवीत हा एक खटला, तर मतदानाच्या तारखेनंतर काही मुदती त्या राज्याने वाढवल्या होत्या मतमोजणीला, त्या बेकायदेशीर आहेत असा दुसरा. यात त्याला न्यायालयाकडून किती यश मिळते हा एक भाग, आणि पुन्हा मोजणी झालीच तर त्यातून काही वेगळे निष्पन्न होईल का हा दुसरा. त्यातून ठरेल की प्रत्यक्ष निवडीवर किती परिणाम होईल.

तर साधारण असे आहे. यात काही त्रुटी असू शकतात पण रफली बरोबर आहे. एकूण ट्रम्प कँपेनचा सध्याचा पवित्रा असा आहे, की मोठी राळ उडवून द्यायची, आपल्या समर्थकांना अत्यंत सोपी स्लोगन द्यायची (stop the steal सारखी) व त्यातून हे सगळे सध्या जिवंत ठेवायचे. १० पैकी ७ रिपब्लिकन्स ही निवड्णूक डेमोक्रॅट्सनी चुकीच्या मार्गाने जिंकलेली आहे असे समजतात, यावरून त्याचा इम्पॅक्ट किती आहे ते लक्षात येइल.

आता हळुहळू हे विरत जाउन बायडेन जिंकला आहे हे सर्वजण स्वीकारतील, की या खटल्यांमधून नवीन काहीतरी बाहेर येइल ते पुढच्या काही दिवसांत समजेल. बाकी चॅनेल्स वाले निवड्णुक जाहीर करत नाहीत, राज्ये नंतर करतात वगैरे खरे असले (वरती लिहीलेलेच आहे) पण गेल्या अनेक वर्षांत सगळ्या चॅनेल्स नी एकदा "कॉल" केले की सर्वसाधारणपणे तो उमेदवार जिंकला असे समजून पुढे जायची पद्धत आहे. यावर्षी काही वेगळे नाही.

थँक्स फारएन्ड , दुसरा मुद्दा रोचक आहे असे होऊ शकते? म्हणजे अशी काही हिस्ट्री आहे का? अजून एक म्हणजे ह्या न्यायाधीश निवडणुका एवढया महत्वाच्या का? आणि जुडीशरी ही पक्षास/ त्यांच्या विचारसरणीशी बांधील आहे का?

नाही माझ्या (अल्पशा ई) माहितीत नजीकच्या भूतकाळात तरी इलेक्टर्सनी असे काही केलेले नाही.

न्यायाधीशांची निवड - सुप्रीम कोर्टाची म्हणत आहात का? ती प्र-चं-ड महत्त्वाची असते कारण एकदा निवडलेल्या न्यायाधीशाला परत बोलावणे जवळजवळ अशक्य आहे, अमेरिकन सिस्टीमनुसार. म्हणजे एखाद्या कट्टर विचारसरणीच्या न्यायाधीशाला जर निवडून दिले गेले तर त्याचे परिणाम दूरगामी होउ शकतात. आणि पुढे निवडून आलेल्या लोकांना सुप्रीम कोर्टाचे निकाल सहजासहजी बदलता येत नाहीत.

मात्र इथे हे आवर्जून नोंदवायला हवे, की न्यायाधीशाची वैयक्तिक मते जरी परिणाम करत असली तरी जितके चित्र उभे केले जाते तितके ते नसावे. शेवटी त्यांनाही लीगल प्रोसेस, प्रीसीड्ण्ट्स वगैरे पाहूनच निकाल द्यावे लागतात. जॉन रॉबर्ट्स हा एक जज रिपब्लिकन्/कॉन्झर्वेटिव्हज नी निवडलेला, बुश च्या काळात. पण त्याने एक दोन महत्त्वाच्या केसेस मधे जे निकाल दिले (म्हणजे निकालात निर्णायकरीत्या त्याचे मत दिले) ते त्याच्या कॉन्झर्वेटिव्ह विचाराने नव्हते, तर लीगल प्रीसीडंटप्रमाने होते. सर्वात अलिकडचे उदाहरण म्हणजे लुइजियानामधल्या अ‍ॅबॉर्शन सेन्टर्स व हॉस्पिटलशी संबंधित असण्याबद्दलचा निकाल. किंवा डाका संबंधित निकाल - इल्लिगल इमिग्रण्टच्या इथे जन्मलेल्या मुलांसंबंधी.

घटनेत काही संदिग्ध क्लॉजेस आहेत, किंवा अठराव्या शतकात लिहील्या गेलेल्या गोष्टी सध्याच्या काळात कशा लागू होतात याबद्दल इण्टरप्रिटेशन मधे खूप फरक असू शकतो. तेथे कॉन्झर्वेटिव्ह किंवा लिबरल मत असलेला जज तो अर्थ वेगळा लावू शकतो. त्याने फरक पडू शकतो.

पण उदाहरणे बघायला गेलो तर नक्की किती आहेत माहीत नाही. माझा तेवढा अभ्यास नाही.

बापरे पण हे असे काही असेल तर घातक नाही का? कारण आपल्या इथली सुप्रीम कोर्टाची जजमेंट खरेच वाचण्यासारखी असतात.

मलाही इतकी सखोल माहिती नाही. गर्भपात, गे मॅरेज वगैरेच्या बाबतीत त्यामुळेच इण्टरप्रिटेशन मधे मतभेद आहेत. पण इथेही अनेकदा पक्ष/विचार विरहित निकाल दिले गेले आहेत - लुइजियानाचा निकाल हे अगदी अलिकडचे उदाहरण आहे.

Pages