अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण राज्याकडून हाच निकाल सर्टिफाय होईल असे दिसते. >> मी घाई घाईत राजकडून हाच निकाल सर्टिफाय होईल असे दिसते असे वाचले. >>> Lol

Freudian slip !

>>बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत स्थान देण्याचे गांधीजींचे प्रयत्न न बघवलेल्या उच्चवर्णीयांनी गांधी हत्या केली<<
>>म. गांधींचे दलित समाजाप्रति असलेले योगदान 'समाजाला मागे नेण्यासच' कारणीभूत ठरले.<<
>>मी घाई घाईत राजकडून हाच निकाल सर्टिफाय होईल असे दिसते असे वाचले.<<
च्यायला, आज तीन धक्के बसले. काय वीकेंडची सुरुवात आहे, व्वा. सुरुवातीचे दोन आश्चर्यजनक (अगदो तोंडात बोटं घालण्याजोगे), आणि तिसरा सुखद (पण स्वप्नवत)... Proud

असो.

गांधींनी वर्णव्यवस्था मोडीत काढण्यासाठी कष्ट घेतले नाहि, हा रोख दिसतोय. याचा परिणाम पुढे दलितांकरता किंवा संपुर्ण समाजाला रिग्रेसिव होण्यात झाला असा दावा असेल तर स्वातंत्र्यानंतर ७०+ वर्षांनंतरहि वर्णव्यवस्था टिकुन राहिली आहे तर त्यात दोष कोणाचा? गांधीजींचाच?..

@राज, तुम्ही कोट केलेल्या वाक्याच्या शब्दरचनेत बदल केला ज्यायोगे मला जे म्हणायचे होते ते स्पष्ट होइल.

फायनली टकर कार्ल्सनने तात्याच्या फ्रॉड क्रायला एविडन्स नसल्याने खोटे आहे म्हणून सांगितले ( तो म्हणला यूएफओ खर्‍या आहेत पण ईलेक्शन फ्रॉड काही खरा नाही Lol येप यू रेड दॅट राईट... टकर डिड से दॅट)
एवढेच नाही तर त्याने सिंडने पॉवेलच्या नावाने बोटे मोडली. Proud
आय मीन.. व्हेन टकर लीव्ह्ज योर साईड... शिट हॅज डेफिनाईटली हिट द फॅन. Rofl

हे म्हणजे अर्णबने रिपब्लिक चॅनलवर 'मोदी तुम्ही खोटे बोलताय' म्हणून जीवाच्या आकांताने ओरडण्यासारखे झाले Lol

>>तुम्ही कोट केलेल्या वाक्याच्या शब्दरचनेत बदल केला ज्यायोगे मला जे म्हणायचे होते ते स्पष्ट होइल.<<
बदल केल्यानंतरहि दलितांकरता तरी ते धोरण रिग्रेसिव कसं, हा प्रश्न उरतो. लेजिस्लेचर मधे दलितांचं प्रमाण वाढवुन सुद्धा?

>>बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत स्थान मिळू नये याबद्दल म. गांधींचे प्रयत्न पूना पॅक्टच्या वेळी जे झाले त्यात डॉक्युमेंटेड आहेत. म.गांधींचा उद्देश तो नसेल पण त्याचे आउटकम नक्कीच बहुजन समाजाचे खच्चीकरण होण्यात झाले. <<
रियली? व्हॉट वाज द एंड रिझल्ट ऑफ पूना पॅक्ट? दलितांना लेजिस्लेशन्मधे रेझरवेशन मिळाले ना? आंबेडकरांच्या अपेक्षा पेक्षा जास्त मिळाले. त्यानंतर आंबेडकर स्वतः गांधीजींना "महात्मा" म्हणु लागले. इझंट धिस इनफ टु पुट ए लिड ऑन द कांट्रावर्सी?..

कालच अरुंधती रॉय यांचे डॉक्टर अँड सेंट हे पुस्तक वाचले.
चांगले आहे का हो ? माझ्या अनायहलेशन ऑफ कास्ट मध्ये प्रस्तावना म्हणून आहे, पण रॉयची प्रस्तावना वाचू नकोस असे मित्रांनी ठासून सांगितल्यामुळे स्किप केली.

राज, आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघ हवा होता. Anything short of that was not enough. उपोषण करून गांधीजींनी ब्लॅकमेल केले आहे अशी त्यांची भावना होती.

डॉ आंबेकरांनी पूना पॅक्ट बद्दल हे लिहिले आहे.
“There was nothing noble in the fast .It was a foul and filthy act .The fast was not for the benefit for the untouchables. It was against them and was the worst form of coercion against the helpless people to give up the constitutional safeguards of which they had been in possession under Prime Minister’s award and agree to live on the mercy of the Hindus .It was a veiled and wicked act. How can the untouchables regard such a man as honest and sincere? ”

हे त्यांचे स्वत्च्या आवाजातील मत १९५५सालचे.
https://youtu.be/_FNSQcEx02A

पूना पॅक्ट नंतर कर्ट्सी म्हणून त्यांनी गांधीजींचे आभार मानले त्याला डॉ गांधीजींना महत्मा म्हणू लागले असा प्रचार केला जातो. तुमच्या भाषेत याला आल्टरनेटिव्ह फॅक्ट म्हणतात ना

< गांधींबद्दलचा सगळा खरा/खोटा राग फाळणीशी संबंधित होता. >

फॉर द रेकॉर्ड, गांधीहत्येचे प्रयत्न १९३५ पासून सुरू होते, तोवर फाळणीतला फ ही उच्चारला गेला नव्हता.

विकु +१.

यावर नंतर कधीतरी स्वतंत्र चर्चा व्हायला हवी.

आणि हे व्हॉट्स अ‍ॅपीय फॉर्वर्ड नाही. पत्रकारांनी अभ्यासून लिहिलेल्या पुस्तकातलं मत आहे. मुस्लिम द्वेष, फाळणी विरोध हा मुलामा आहे.

---
अमेरिकेपुरते पुरोगामी असलेल्यांनी ट्रंपला जिन्ना ठरवले. मग बायडेन नेहरू का?

ट्रंपची चार वर्षांची कारकीर्द , ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर , निवडणूक आणि निकालानंतरचं कवित्व यांचं कव्हरेज अधूनमधून वाचून मोदींनी जशा भारतीय लोकशाहीतल्या आणि समाजव्यवस्थेतल्या भेगा ( बुजवण्या ऐवजी) रुंद केल्या तोच प्रकार ट्रंपने अमेरिकेत केल्याचं वाटतंय. किंवा ट्र्रंप हे निमित्त.

कॉमी मी त्याबद्दल सविस्तर लिहिन. बाईनी अजेन्दा ठेवून लिहिले आहे. पुस्तक पूर्ण गांधीजींवर आहे, अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट च्या खांद्यावर बन्दूक ठेवून गोळ्या झाडल्या आहेत

ओ मंडळी जरा या पानावरच्या विषयाकडे लक्ष द्या,. विषय "अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०" यावर आहे . भारतीय इतिहास नाही.

ट्रम्प कॅम्पेनचा पेनसिल्व्हेनिया मधला सर्वात मोठा खटला - त्यातील दावा- फेडरल कोर्टाने फेटाळला आहे. जितक्या लोकांच्या मताबद्दल पुरावा दिला गेला होता त्यावरून सगळ्या सात लाख लोकांचे मतदान रद्द करणे चुकीचे होईल, असा निकाल देत. या कॅम्पेनच्या दोन महत्त्वाच्या केसेस पैकी (दुसरी जॉर्जिया मधली) एक सध्या तरी ते हरले आहेत. या केस मधे या कोर्टाच्या निकालाबाबत पेनसिल्वेनियाशी संबंधित "सर्किट कोर्टाकडे" अपील करता येते - ते ट्रम्प कॅम्पेनने लगेच केले आहे. त्यावर कधी निकाल दिला जाईल कल्पना नाही.

हे सर्किट कोर्ट म्हणजे एकूण हायरार्की मधे भारताच्या राज्यातील हायकोर्टासारखे आहे. इथे जो निकाल दिला जाईल त्यावर फक्त सुप्रीम कोर्टात केस येऊ शकते - ती ही जर सुप्रीम कोर्टाने स्वतःहून घेतली तरच. बहुतांश केसेस मधे या कोर्टाचे निकाल हे अंतिम असतात कारण सुप्रीम कोर्ट ते आवर्जून घेइल ही शक्यता खूप कमी असते. पण इथे अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल असल्याने कदाचित घेतले जाईल. पण त्यालाही ठोस पुरावे सादर झाले तरच. अजून तरी ते झालेले नाहीत.

तिकडे ट्रम्प कॅम्पेन लीगल टीम मधे काहीतरी मजेदार सुरू आहे.
जॉर्जिया मधे उद्या (सोमवारी) "बिब्लिकल पुरावा" (प्रचंड मोठा) देणार असे ट्रम्प कॅम्पेनच्या लीगल टीम मधली सिडनी पॉवेल आज म्हंटली. जॉर्जिया मधले मतदान व तेथील गव्हर्नर दोघांविरूद्ध मोठा पुरावा देणार आहे वगैरे वगैरे. पण आजच संध्याकाळी रूडी ज्युलियानीने ती कॅम्पेनच्या लीगल टीम मधे नाही असे जाहीर केले. त्याचा काहीतरी खुलासा नंतर आला आहे की ती वैयक्तिकरीत्या यात काम करत आहे वगैरे पण ती टीम मधे आहे असे त्यात सांगितलेले नाही. परवाच्या मुलाखतीत ती रूडीच्या मागेच उभी होती व बहुधा बोलली सुद्धा. ट्रम्पच्या एका ट्विट मधेही रूडीच्या बरोबरीने तिचा उल्लेख होता. दणदणीत पुरावे देणार म्हंटल्यावर लगेच लीगल टीम मधून तिचे नाव काढल्याने पब्लिकने काय ते समजून घ्यावे असे "फेक" मीडियाबरोबरच फॉक्स वगैरेही म्हणत आहेत Happy

एकूण ट्रम्प कॅम्पेन दोन गोष्टींची बहुधा जाणीवपूर्वक गल्लत करून काहीतरी फायदा होईल का ते बघत आहेतः
१. निवडणुकीत काही चुका - मते गहाळ होणे, त्या त्या राज्यातील अधिकार्‍यांनी मेल-इन मतांबद्दल नियम वाकवणे (मतपत्रिकांमधे सह्या, पत्ते, योग्य पाकीट वापरणे टाइप चुका असतील तर त्या करेक्ट करायला लोकांना नेहमीपेक्षा जास्त कालावधी देणे, किंवा दरवर्षी निवडणूकीच्या जितके दिवस नंतर मतपत्रिका स्वीकारल्या जातात त्यापेक्षा जास्त दिवस यावेळी स्वीकारणे - यातील बर्‍याच गोष्टी करोनामुळे केल्या गेल्या आहेत) व कदाचित काही ठिकाणी फ्रॉडही. अशी काही उदाहरणे असतील. बहुधा नेहमीच असतात. प्रत्येक देशात व प्रत्येक निवडणुकीत.
२. पण या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत की एकूण निवडीवर परिणाम होईल. - याबद्दल ते बरेच बोलले आहेत पण हे सिद्ध होईल असा कोणताही पुरावा आत्तापर्यंत आलेला नाही. बहुतांश केसेस फेटाळल्या गेल्या आहेत (३६ पैकी ३४)

अपडेट बद्दल धन्यवाद, फारेंण्ड. मला ट्रंप आणि त्याचे लोक ह्यांच्या निवडणूक रद्द ठरवण्यासाठी चाललेल्या कायदेशीर लढाया आणि मतदार वृंदांना (इलेक्टोरल काॅलेज, गिरीश कुबेर ह्यांचा शब्द) ट्रंप ह्यांना मतदान करण्यासाठी केलेलं आवाहन ह्याबद्दल येथील म्हणजे मायबोलीवरील ट्रंप समर्थकांच मत जाणुन घ्यायला आवडेल.

सिडनी पॉवेलची लीगल टीम मधून हकालपट्टी जी ट्रंपसाठीच नवनव्या कॉन्स्पिरसी मिडियामध्ये पेरून ईलेक्शन फ्रॉड्यूलंट असल्याचा किल्ला लढवत होती. Lol
हकालपट्टीचे कारण काय तर म्हणे She was too conspiratorial even for तात्या.... अरे काय खेळ मांडला आहे. Rofl

लोकांची फार चतुर उत्तरे येउ लागली आहेत हा बदल का केला असावा याबद्दलः
- ती ट्रम्प लीगल टीमच्या "सोबत" काम करत आहे, टीमचा भाग म्हणून नव्हे. मग काल कोणी काही विचारलेले नसताना मधेच हा खुलासा करण्याचे काही कारण नव्हते. म्हणजे एखादा लहान मुलगा हात मागे लपवत मी कॅण्डी खाल्ली नाही सांगत येतो तसे झाले.
- डॉमिनियन आता ज्या बदनामीच्या केसेस फाइल करेल. त्या सिडनी च्या विरूद्ध जातील, कॅम्पेनच्या विरूद्ध न जाता. यातही दोन गोच्या आहेत - एकतर यांच्याकडे पुरावे असतील तर असे घाबरायचे काय कारण, आणि सिडनीला त्या केसेस ना तोंड द्यायला वार्‍यावर सोडण्याचेही. दुसरे म्हणजे जे आरोप करायचे ते करून झाले आहेत. त्याबद्दल ते अजूनही कॅम्पेन ला कोर्टात खेचू शकतात. हे आरोप केल्यानंतर तिने टीम सोडली तरी फरक पडत नाही.
- ही फार स्मार्ट मूव्ह आहे. तिला नंतर मोठ्या रोल मधे घ्यायचे आहे. पुन्हा त्याकरता आत्ता मधेच हटवण्याचा काय संबंध.

कट्टर समर्थक सोडले तर इतरांचा अ‍ॅनेलिसीस हा आहे की तिच्या अफाट घोषणा कॅम्पेनला कोर्टात अडचणीत आणू शकतात म्हणून किंवा सीआयए व जॉर्जियाच्या गव्हर्नर चे नाव घेतले म्हणून तिला हटवले गेले. ते जास्त पटण्यासारखे वाटते.

एकूण सध्याच्या स्कोअर नुसार व्हेनेझुएला, स्पेन (!), चीन, एफबीआय, सीआयए, जॉर्जियाचा रिपब्लिकन गव्हर्नर, जीओपी (पक्ष/संघटना) व एकूणच "डीप स्टेट" हे डेमोक्रॅट्सना मदत करत आहेत.

जेना एलिसच्या म्हणण्यानुसार त्यांचा खटला पेनसिल्वेनियाच्या कोर्टाने फेटाळला हे चांगले झाले, म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत लौकर जाता येइल. जर खालच्या कोर्टातच पुरावे देता आलेले नसतील तर सुप्रीम कोर्टात नव्याने उभे करता येतात का वगैरे लीगल बाबी मला माहीत नाहीत. पण सुप्रीम कोर्ट कदाचित जास्त फेवर मधे असेल हे गृहीत धरून हे तिने म्हंटले असावे. पण त्यांना सुप्रीम कोर्टात "जाता" येत नाही - सुप्रीम कोर्टाने केस "घ्यावी" लागते.

आणखी एक मजेदार माहिती - पेनसिल्वेनियामधल्या मतपत्रिकांवरच्या फक्त अध्यक्षाच्या निवडीबद्दल ट्रम्प कॅम्पेन ला आक्षेप आहेत. ज्याला "डाउन बॅलट" म्हणतात त्या- म्हणजे हाउस ऑफ रेप्रेझेण्टेटिव्ह्ज वगैरेच्या निवडीवर नाही. किंबहुना त्यात त्यांना फेरफार नको आहे. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार फ्रॉड करणारे लोक एकाच वेळी इतके बुद्धिमान व बिनडोक आहेत, की बायडेनची निवड करतील पण त्याला कामकाज करता येउ नये म्हणून दोन्ही सभागृहांत रिपब्लिकन मेम्बर्सची संख्या जास्त ठेवतील.

<<<एकूण सध्याच्या स्कोअर नुसार व्हेनेझुएला, स्पेन (!), चीन, एफबीआय, सीआयए, जॉर्जियाचा रिपब्लिकन गव्हर्नर, जीओपी (पक्ष/संघटना) व एकूणच "डीप स्टेट" हे डेमोक्रॅट्सना मदत करत आहेत.>>>
इतकेच काय, प्रत्यक्ष अमेरिकन लोकांनी डेमोक्रॅट्स ना जास्त मते दिली आहेत.

तसे डीप स्टेट हे गेली अनेक वर्षे इकडे आहे - गोची अशी आहे की रिपब्लिकन प्रेसिडेंट, त्याचा पित्त्या अ‍ॅटर्नी जनरल नि त्याच्याकडील वकीलांची मोठी फौज हे सर्व त्याबाबतीत पुरावा देण्यास असमर्थ ठरले आहेत, नि कायदा तर म्हणतो पुरावा पाहिजे!
हे बरोबर नाही. एकदा रिपब्लिकन लोकांनी काही म्हंटले तरी कायदा, घटना इ. अडथळे मधे असू नयेत.
जर का सुप्रीम कोर्टात या केसेस नेल्या तरच रिपब्लिकनांच्या बाजूने निकाल लागेल. कारण तिथे नेमण्यात आलेले बरेचसे रिपब्लिकन पक्षाने नेमले आहेत आणि पक्ष म्हंटला म्हणजे त्यांना देश, घटना, कायदे वगैरे काहीहि अडथळे न येता हवा तसा रिपब्लिकन लोकांच्या बाजूने निर्णय देता येईल,
मला रिपब्लिकन पार्टी, ट्रंप यांच्याकडून सतत पत्रे येत आहेत की हा लढा लढण्यासाठी पैशाची गरज आह्रे तर पैसे पाठवा. मला शक्य नाही, पण इथे जे ट्रंपच्या बाजूचे आहेत त्यांनी हजारो डॉलर्स द्यावेत म्हणून इथे लिहितो आहे. म्हणजे पुनः ट्रंप आल्यावर, कायदे, घटना, ट्रॅडिशन सगळे बंद् करून ट्रंप म्हणेल तो कायदा असे सुखाचे दिवस येतील. सगळ्या मेक्सिकन, चिनी, भारतीय लोकांना हाकलून देऊन तो नॉर्वे, इंग्लंड मधल्या लोकांना पैसे देऊन बोलावून घेईल. किती छान ना!

{{{ म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार फ्रॉड करणारे लोक एकाच वेळी इतके बुद्धिमान व बिनडोक आहेत, की बायडेनची निवड करतील पण त्याला कामकाज करता येउ नये म्हणून दोन्ही सभागृहांत रिपब्लिकन मेम्बर्सची संख्या जास्त ठेवतील.

Submitted by फारएण्ड on 24 November, 2020 - 00:34 }}}

काही क्षणांकरिता मला असे वाटून गेले की मी पायस चित्र रसग्रहणाचाच (राजतिलक) धागा वाचत आहे की काय?

ट्रम्पच्या कायदेसल्लागारांना हे का माहित नव्हतं, कि कोर्ट हाकलून लावेल म्हणून ? तरीही इतका दंगा धुडगूस करण्यामागे काय हेतू ?

तरीही इतका दंगा धुडगूस करण्यामागे काय हेतू ?>>>
मुख्य हेतू फक्त दोनच.
एक. त्याच्या सपोर्टर्सच्या मनात निवडणूकीच्या वैधते बद्दल होता येईल तेवढा संभ्रम निर्माण करायचा, जेणेकरून, त्यांच्या मनातली, "मि कधीच हारत नाही" ही इमेज कायम राहील.
दोन. निवडणूक प्रचारा दरम्यान व त्यानंतर होणारा खर्च त्याच्या मुर्ख समर्थकांना आणखी मुर्ख बनवून त्यांच्या खिशातून वसूल करायचा.
साईड हेतू म्हणजे २०२४ मधे स्वत:साठी किंवा मुलीसाठी एक आरोळी दिली की लगेच सगळे वेडे मधे काही झालंच नाही असे गोळा होतील.

वरती मी पेनसिल्वेनियाच्या कोर्टाने ट्रम्प कॅम्पेनची केस फेटाळल्यावर ती केस सर्किट कोर्टाकडे गेली असे लिहीले होते. आज त्यांनीही ती केस फेटाळली आहे. आणि खुद्द ट्रम्पनेच पूर्वी (म्हणजे त्याच्या काळात) नेमलेल्या जजने हा निकाल दिला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट ती केस घेते का यावर पुढचे अवलंबून आहे. सुप्रीम कोर्टाने घेतली नाही तर हा अंतिम निकाल असेल.

या केस मधे "कॅम्पेनने कोणतेही मत फेक होते किंवा अपात्र व्यक्तीने दिले होते असा दावा केला नाही" असा, व "बायडेन कॅम्पेन/त्यांची मते व ट्रम्प कॅम्पेन्/त्यांची मते यात कसलाही भेदभाव झाला असल्याचाही आरोप केलेला नाही" असे या न्यायालयाने निकालात लिहीले आहे. हे महत्त्वाचे आहे - न्यायालयाने हे झालेले नाही असा निकाल दिलेला नाही, त्यांनी असे म्हंटले आहे की असे काही मुद्दे आरोपपत्रातच नाहीत!

याचा अर्थ कॅम्पेनचे मुख्य मोटिव्ह हे कोर्टातून काही निकाल आणणे यापेक्षा पब्लिक मधे असे इम्प्रेशन तयार करणे व त्यातून राज्यातील रिपब्लिकन नेत्यांवर दबाव आणणे हे असावे. सध्या त्यासंबंधीच हालचाली सुरू आहेत. त्यांच्या एको चेंबर्स मधे "या निवडणुकीत फ्रॉड झालाय हे सर्वांनाच माहीत आहे" छाप प्रतिक्रिया येतात. म्हणजे ज्युलियानी/ट्रम्प हे म्हणतात, मग फॉक्स वगैरे त्याला प्रसिद्धी देतात आणि फक्त याच बातम्या बघणारे लोक हेच खरे आहे असा समज करून घेतात - अशा पद्धतीने ही "माहिती" निर्माण झाली आहे.

फा यांच्या पोस्टवरून - एकंदरित सगळीकडेच - फॅक्ट काय यापेक्षा नॅरेटिव्ह सेट करणे हेच महत्त्वाचे आहे असे दिसते.

------------
https://www.loksatta.com/anyatha-news/loksatta-anyatha-article-on-fox-ne...

ट्रम्प यांना कोणीतरी विचारलं. या एका वर्षांत नक्की बदललं काय? फॉक्स..हे त्यांचं उत्तर होतं. फॉक्सचे मालक रूपर्ट मर्डॉक यांचा थोरला मुलगा लाशलन मर्डॉक यालाही विचारलं गेलं. तुमचा पहिला क्रमांक आता डळमळीत होणार का? ते म्हणाले : सरकार कोणाचंही येवो. पहिल्या क्रमांकावर आम्हीच असू.

फॉक्सच्या राजकीय वृत्त विभागानं स्पष्ट केलं : निवडणुका, मतमोजणी वगैरे जेव्हा असते, तेव्हा आम्ही ‘कोणाचेही’ नसतो. कल, त्याची शास्त्रीय पाहणी आणि आमचे विश्लेषक यांचंच आम्ही ऐकतो. ते सांगतील ती बातमी. मग कोणाला काहीही वाटो..!
-----------

>>तरीही इतका दंगा धुडगूस करण्यामागे काय हेतू ?<<
माझ्या अंदाजानुसार ट्रंप कँपेन (ट्रंकँ) ची पुढची सगळी मदार सुप्रीम कोर्टावर आहे. सुरुवातीपासुन ट्ंकँ मेलइन फ्रॉडचा मुद्दा लावुन धरत आहे पण सबळ पुरावे सिद्ध करु शकले नाहि. आता पेन्सिल्वेनियाचंच उदाहरण घ्या. इतर अनेक दाव्यांसोबत ट्रंकँनचा एक दावा होता कि इलेक्शन्च्या दिवसा नंतर (नोव्हेंबर ३) आलेली बॅलट्स अवैध धरली जावी. याला कारण नोव्हेंबर ४ पर्यंत ट्रंप पेन्सिल्वेनियात बर्‍यापैकि लीडवर होता; पुढच्या ३-४ दिवसांत मेलइन बॅलट्स इतके आले (साधारण ७ लाख) कि त्यांनी ट्रंपचा लीड वाइप आउट करुन ७० हजारांचा लीड बाय्डनला दिला. ट्रंकँला इथे काहितरी झोल झालेला आहे असं वाटतंय म्हणुन त्यांनी नोव्हेंबर ३ नंतर आलेली बॅलट्स बाद करावी अशी विनंती पेन्सिल्वेनिया हायकोर्टात केली. हायकोर्टाने ती नाकारली आणि स्टेटचा निर्णय ४-४ वोट्सने (आउटराइट नाहि) अबाधित ठेवला. ट्रंकँ सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने दावा स्ट्रेटवे फेटाळला नाहि, पण नोव्हेंबर ३ नंतर आलेल्या बॅलट्स्ची मोजणी वेगळी करण्याचा आदेश दिला...

तर मंडळी, ट्रंकँने सुप्रीम कोर्टात नेलेल्या पेनसिल्वेनियातल्या दाव्यांची आजच्या तारखे पर्यंतची हि परिस्थिती आहे. अशीच काहिशी स्थिती इतर राज्यांची (जॉर्ज्या, मिशिगन, विस्कांसिन, नवाडा, अ‍ॅरिझोना इ.) असणार आहे. तर मी वर म्हणालो तशी ट्रंकँनची मदार आता सुप्रीम कोर्टावर आहे. सुप्रीम कोर्टात जाण्याची एक प्रोसेस असल्याने ट्रंकँ ती प्रोसेस फॉलो करत आहे. खालच्या कोर्टात दिल्या गेलेल्या निर्णयांचं त्यांना काहि सोयर-सूतक नाहि अशी चिन्हं दिसतायंत. (संदर्भः जेना एलिस' फ्रायडे ट्विट - ऑन टु स्कोटस)

वर कोणितरी लिहिलं आहे कि, इलेक्शन काउंट/रिकाउंटच्या दाव्यांतुन काहि निष्पन्न होत नाहि. ह्म्म, २०००ची सगळी गंम्मत त्यांनी मिस केली बहुतेक. यावेळेस हि तसं काहि होइल का? तसाच आउटकम येईल का, असं छातीठोकपणे सांगता येणार नाहि पण गंम्मत मात्र नक्कि येणार. सो गाय्ज, चिल, अँड एंजॉय द शो... Wink

विषयांतर : टवणे सरांनी लिहिलेला प्रतिसाद वाचून अरुंधती रॉय यांचे पुस्तक वाचतोय, संपत आले .
त्यातले बरेचसे पटले, थोडे नाही. पण तरीही मी केलेल्या विधानाला खोटे पाडणारे असे त्यात काहीही नाही.

राज, २००० मध्ये बरेच क्लोज होते. काही शतांश तरी चान्स होता. आज तीन स्टेट्स मधली निवडणूक रद्दबातल होणार थोडीच आहे ? त्यातही बिडेन चांगल्या दणदणीत लीड वर आहे.

इव्हन सुप्रीम कोर्टावर फार मदार नसावी. कारण खालच्या कोर्टातच पुरावे दिलेले नाहीत - इतकेच नव्हे तर आरोपपत्रातही फ्रॉडचे दावे नाहीत. जो खटला आधीच्या कोर्टात लढला गेला तोच फक्त सुप्रीम कोर्टात जाईल. तेथे वेगळी केस नसेल.

सध्या फॉक्स ज्याच्यापुढे हफपोस्ट वाटेल अशी नवीन चॅनेल्स आहेत Happy या दोन क्लिप्स बहुधा न्यूजमॅक्स किंवा ओअ‍ॅन च्या आहेत.

पेनसिल्व्हेनियाचा एक स्टेट सिनेटर त्या राज्यातील लेजिस्लेटर्सनी ट्रम्पला अनुकूल इलेक्टर्स नेमावेत असे सांगत आहे. म्हणजे तेथील निवडणुकीचा निकाल डावलून त्यांनी ट्रम्पला मते द्यावीत असे.
https://www.youtube.com/watch?v=EDdpk5ldZeI

इथे जेना एलिसही तेच सांगत आहे
https://www.youtube.com/watch?v=moSz-QQn5Sc

त्यावरून लेजिस्लेटर्सवर दबाव आणून ट्रम्पच्या पारड्यात पेनस्लिवेनियाची मते टाकायाचा प्लॅन दिसतोय. त्याला रिपब्लिकन पार्टी किती तयार होईल माहीत नाही. ही दोन चॅनेल्स सोडली तर याला फॉक्स व नॅशनल रिव्यू यांनीही महत्त्व दिलेले नाही. ट्रम्प वाल्या एको चेंबर्समधे सर्वांनी यात फ्रॉड झालेलाच आहे हे एकमेकांना ठसवायचे (पण कोर्टात तसे आरोप करायचे नाहीत कारण तेथे पुरावे नाहीत) आणि मग लेजिस्लेटर्सनी निवडणुकीचा निकाल हा खरा निकाल नव्हेच असे सांगून इलेक्टर्स ना ट्रम्पला मते द्यायला सांगायची असे काहीतरी प्रयत्न चाललेले दिसत आहेत.

अर्थात अनेक रिपब्लिकन्स जरी ट्रम्पच्या विरोधात नसले, तरी हे असले उद्योग करायच्याही विरोधात आहेत. इव्हन पेनसिल्वेनियाचे कोर्ट व सर्किट कोर्ट दोन्हीकडे कॅम्पेनच्या विरोधात निकाल देणारे जज हे रिपब्लिकन लोकांनी अपॉईण्ट केलेले आहेत.

काल ट्रम्पने एक अजब ट्विट केले - बायडेन ने जर हे सिद्ध केले की त्याला मिळालेली सगळी मते लीगल आहेत तर तो अध्यक्ष होउ शकतो. म्हणजे अमेरिकन सिस्टीम मधून जी निवडणूक झाली त्यात काही गोच्या असतील तर ते सिद्ध करायची जबाबदारी ट्रम्प कॅम्पेनची नाही. त्या सिस्टीम मधून निवडून येणार्‍याने सिद्ध करायचे की हे सगळे लीगल आहे Happy

बाय द् वे, २०१६ साली आयोवा रिपब्लिकन प्रायमरीमधे (आयोवा कॉकस) टेड क्रूझकडून हरल्यावर ट्रम्पची रिअ‍ॅक्शन काय होती, एनी गेस?

गेली चार वर्षे ट्रम्पची बाजू लावून धरलेल्या फॉ़क्स व ट्रम्प यांच्यात फॉलआउट सुरू झालाच आहे. अ‍ॅरिझोना बायडेनला कॉल आउट करण्यापासून ते वाढले. आता ट्रम्प नंतर स्वतःचे चॅनेल काढणार म्हणत आहे, त्यामुळे त्यांना स्पर्धाही आली.

अजून एक फॉल आउट कधीतरी होणार. किती वेळ लागतो ते पाहू. ट्रम्प - रूडी.

बायडेन ने जर हे सिद्ध केले की त्याला मिळालेली सगळी मते लीगल आहेत तर तो अध्यक्ष होउ शकतो. म्हणजे अमेरिकन सिस्टीम मधून जी निवडणूक झाली त्यात काही गोच्या असतील तर ते सिद्ध करायची जबाबदारी ट्रम्प कॅम्पेनची नाही. त्या सिस्टीम मधून निवडून येणार्‍याने सिद्ध करायचे की हे सगळे लीगल आहे >>>> आणि त्यातही अजून एक गंमत अशी आहे की जिथे ट्रंप जिंकला आहे तिथे काही म्हणजे काहीच 'फ्रॉड' झालेला नाही. तिथे सग्गळी प्रोसेस अगदी कायदेशीर म्हणजे कायदेशीरच झाली आहे. शिवाय ज्या राज्यांमधे डेम्सने फ्रॉड केला आहे तो फक्त आणि फक्त ट्रंप हरला आहे तिथेच केला आहे. त्याच राज्यांमधून रिपब्लिकन सेनेटर्स निवडून आले आहेत तिथे फ्रॉड नाहीच्च झालेला.

बाकी निवडणुक आयोगाचे नियम ट्रंप कँपेनला आधी माहित नव्हते का? मेल इन बॅलेटस तीन तारखेनंतर आलेली (पण तीन तारखेचा शिक्का असलेली) वैध धरली जातील हे आधीच प्रत्येक राज्यानं जाहिर केलं होतं ना? आणि पोस्टमास्टर जनरलची नेमणूक निवडणुकीच्या आधीच करणे, त्या माणसानं पोस्टाचे रीसोर्सेस कमी करणे, मग लोकांनी बोंबाबोंब केल्यावर तो निर्णय रीव्हर्ट करणे अशा बर्‍याच गंमती जमती करूनही बायडेन जिंकतोच कसा, नाही का? हे सगळं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ट्रंप कँपेनला पराभव होणार हे आधीपासूनच माहित होतं की काय? Wink

स्वतःचा पराभवही डिग्निटीने स्विकारता येत नाही या माणसाला.

Pages