अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो जाहीर केले होते. इन फॅक्ट काल सर्किट कोर्टाच्या निकालात तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे - की त्या बर्‍याच गोष्टी (कधीपर्यंत मते स्वीकारली गेली, कधीपर्यंत करेक्ट करू दिली गेली वगैरे) "फेडरल" संदर्भाने रिलेव्हण्ट नाहीत. त्या त्या राज्यातील कोर्टांच्या अखत्यारीत ते विषय येतात.

इव्हन तो "पाठवलेल्या मेल-इन बॅलट्स पेक्षा जास्त बॅलट्स परत आली" - तोच तो "सात लाख मतांचा झोल" वाला दावा चुकीचा आहे. स्नोप वगैरेसारख्या साइटनी तो खोटा आहे सांगितलेलेच आहे पण निवडणुकीच्या आधीच्या अशा काही बातम्या पाहिल्या तरी लक्षात येते.

रूडीचे निवडणुकीनंतरचे वक्तव्य* होते - "अध्यक्ष कोण होणार हे चॅनेल्स ठरवत नाहीत, कोर्ट ठरवते" काल सर्किट कोर्टाच्या निर्णयाचे पहिले वाक्य होते - "ते कोर्ट ठरवत नाही. मतदार ठरवतात" Happy

* ते वक्तव्यही मुळात चुकीचेच होते. इलेक्शन प्रोसेस मधे कोर्टाचा काही संबंध नाही. मतदार, राज्या राज्यातील इलेक्शन बोर्ड्स, इलेक्टर्स आणि शेवटी काँग्रेस - हे लोक ठरवतात.

त्यातही अजून एक गंमत अशी आहे की जिथे ट्रंप जिंकला आहे तिथे काही म्हणजे काहीच 'फ्रॉड' झालेला नाही. तिथे सग्गळी प्रोसेस अगदी कायदेशीर म्हणजे कायदेशीरच झाली आहे. शिवाय ज्या राज्यांमधे डेम्सने फ्रॉड केला आहे तो फक्त आणि फक्त ट्रंप हरला आहे तिथेच केला आहे. त्याच राज्यांमधून रिपब्लिकन सेनेटर्स निवडून आले आहेत तिथे फ्रॉड नाहीच्च झालेला.>>>> अगदी असेच आर्ग्युमेन्ट भारतात निवडणुकानन्तर EVM च्या सन्दर्भात वापरले जाते.

Submitted by दिगोचि on 29 November, 2020 - 06:54

और यह लगा सिक्सर.....

<<<<बाकी निवडणुक आयोगाचे नियम ट्रंप कँपेनला आधी माहित नव्हते का? मेल इन बॅलेटस तीन तारखेनंतर आलेली (पण तीन तारखेचा शिक्का असलेली) वैध धरली जातील हे आधीच प्रत्येक राज्यानं जाहिर केलं होतं ना?>>>>
खुद्द ट्रंपला नाही तरी त्याच्या लोकांना माहित असेलच.
मुद्दा तो नाहीच.
ट्रंपला निवडून देण्यामागे कारणे हीच की आत्तापर्यंत जे कायदे आहेत, परंपरा आहेत त्या सगळ्यात बर्‍याच चुका आहेत असे बर्‍याच लोकांना वाटते. पण तसे बोलण्याची हिंमत फक्त एकट्या ट्रंपकडे होती, म्हणून त्याला निवडून दिले म्हणून त्याला सतत भक्कम पाठिंबा देत ते कार्य करायचा प्रयत्न आहे. आता ट्रंपचे वागणे, बोलणे बर्‍याच रिपब्लिकन लोकांना आधीपासूनच माहित होते. पण End justifies means म्हणून लोकांनी त्याच्या व्यक्तिगत दोषांकडे दुर्लक्ष केले.
पार्टी चे राजकारण वगळता, अत्यंत जुने कायदे पुनः एकदा तपासून ते पुनः नीट करायला पाहिजेत, हे चांगलेच आहे. ट्रंपने सुरुवात केली, जमले नसेल, पण म्हणून ज्यावर विश्वास आहे ते कार्य असे सोडून देता येत नाही. मला स्वतःला डेमोक्रॅट पक्षाचे बरेचसे निर्णय मान्य नाहीत, पण कायदेहि असे करून ठेवले आहेत की त्यातून सुटका नाही. या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेण्यास ट्रंपने सुरुवात केली आहे.

देशकल्याणापेक्षा पार्टी मोठी ही घाणेरडी कल्पना जेंव्हा जाईल तेंव्हाच असे विचार पुढे येतील.

आधी पद्धतशीर पणे फ्रॉड झालाच आहे असे दडपून मत तयार केले आहे. अस्तित्वात नसलेला प्रॉब्लेम तयार करून आता टेक्सास नि फ्लोरीडामधले सिनेटर्स ह्यांनी आता ' २००२ निवडणूकीमधला फ्रॉडचा मुद्दा सेंसस, व्होटर्स आयडी फेडरल सिस्टिम बनवून सोडवायला हवा ' ह्यावर सुरूवात केली आहे. व्होटर्स सप्रेशन हा मह्त्वाचा मुद्दा होणार आहे.

अजून एक घरचा आहेर. आणि हा "एडिटर टीम" ने लिहीलेला आहे. कोणा एकाचा ओपिनियन पीस नव्हे.

"Almost nothing the Trump team has alleged has withstood the slightest scrutiny. In particular, it's hard to find much that's remotely true in the president's Twitter feed these days"

("these days"? बहुतांश लोक विचारतील Happy )

"Flawed and dishonest allegations like this pollute the public discourse and mislead good people who make the mistake of believing things said by the president of the United States"

मात्र इथे ट्रम्प ला दोष देताना निर्णयाच्या वेळी निदान आत्तापर्यंत तरी बर्‍याच रिपब्लिकन लोकांनी एकूण प्रोसेस व संकेत पाळले आहेत - हे महत्त्वाचे. जॉर्जियाचे गव्हर्नर व सेक्रेटरी ऑफ स्टेट दोघेही ठामपणे ट्रम्पच्या आरोपांच्या विरोधात आपले काम करत आहेत.

शेवटी काय ठरलं मग? श्वेत भवनावर रक्तवर्णी ध्वज फडकणार की नीलध्वज?

नीरा टंडन ह्या बिडेन ने नॉमिनेट केलेल्या कँडीडेटला तिच्या strong ट्वीटर अ‍ॅक्टिवीटींमूळे जिओपी सिनेट हीअरींग देण्यास काकू करत आहे . Is this hypocrisy or irony !!! Lol

विनायक त्यातले हे वाक्य
It really is remarkable how everyone always fails President Trump in the end. From Jeff Sessions to John Kelly to Mick Mulvaney to General Mattis to William Barr to John Durham to Brian Kemp to Doug Ducey and the list goes on and on, all these people just fail or betray the President, allegedly.

हे सगळे तात्याने नेमलेले असूनही ही वेळ आली ह्यातच सगळे आले. Happy

असंख्य पुरावे आहेत इलेक्शन फ्रॉडचे छाप एका लेखावर एक प्रतिक्रिया होती "पुरावे कोर्टात द्यावे लागतात. पार्किंग लॉट मधे कागद नाचवून काही होत नाही" Happy

काहीतरी करून लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करणे, आपले नाव सतत लोकांसमोर आणणे हा महत्वाचा उद्देश आहे. कितीहि खोटे असले तरी ते बोलायचे, म्हणजे मग सगळेजण त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया करणार, नि आपले नाव पुढे.
तसेहि दोन्ही पक्ष लबाड! स्वच्छ कुणि नाही - कसले ना कसले धंदे करतच असतात.
शेवटी जो, ऐकायला बरे वाटेल असे बोलेल, त्याला मते.
जरी बायडेन राष्ट्राध्यक्ष झाला तरी त्याने निवड्णूकीत खोटेपणा केला इ. आरोप करत रहायचे - म्हणजे लोकांच्या मनात त्याच्याबद्दल संशय निर्माण व्हावा. मग २०२४ मधे त्याचा फायदा होईल.

इथल्या तात्या समर्थकांचे ह्या सगळ्या प्रकाराबद्दल काय मत आहे ह्याची खरच उत्सुकता आहे. काही परीचीत नि मित्रांशी बोललो त्यांनी तोंडावर तरी उद्वेग व्यक्त केला. 'उद्या समजा परत व्होट करायचे असेल तर काय कराल ?' ह्याला सगळ्यांनीच गुळमूळीत उत्तर दिले.

मला असे वाटते, ट्रंप च्या व्यक्तिगत दोषांमुळे रिपब्लिकन लोकांचा तोटा होतो आहे. जर त्यांना परत निवडून यायचे असेल तर ट्रंप ला हाकला.
बायडेन काय करू शकेल चार वर्षात ते सांगता येत नाही, त्यामुळे खरे तर रिपब्लिकनांना संधि आहे.
जोपर्यंत मेकॉनेल, ग्रॅम, हॅनिटी, कार्ल्सन, आणि तसले लोक जिवंत आहेत तोपर्यंत मी स्वतः रिपब्लिकनांना मत देणार नाही. तश्या त्यांच्या पॉलिसीज बर्‍या आहेत, पण हे लोक नालायक असल्याने चांगली कामे होत नाहीत.

नॅन्सी पलोसी किती मुर्ख आहे हे तिने आज सिद्ध केले..

आपण किती टफ आहोत हे दाखवायच्या नादात व गर्वात राहुन रिपब्लिकन पार्टी, अर्थमंत्री स्टिव्हन मनुचिन व खुद्द प्रेसिडेंट ट्रंप १.८ ट्रिलिअन डॉलर्सचे कोरोना रिलिफ पॅकेज पास करायला तयार असताना ( ज्यात गरिबांना १२०० डॉलर दरडोई मिळणार होते) ही अडेलतट्टुसारखी आडमुठेपणा दाखवुन २.२ ट्रिलिअन्सच्या पॅकेजसाठी अडुन बसली व १.८ ट्रिलिअन डॉलर लाथाडले.

आता निवडणुकीत तिला मतदारांनी थोबाडीत मारल्यावर.... आज फक्त ९०० बिलिअन्सच्या बिलासाठी तयार झाली.( ज्यात गरीबांना .. दरडोई १२०० डॉलर्स नाहीत!)

निवडणुकीच्या आधी .. या रिलिफ बिलासाठी माझ्याकडे लेव्हरेज पॉवर आहे अश्या वल्गना ती करत होती. आता हाउस मेजॉरीटी ऑल्मोस्ट गमावल्यावर.. आज फक्त ९०० बिलिअनवर उतरली.

कुठे १.८ ट्रिलिअन.. कुठे ९०० बिलिअन... काय कमाल आहे तिच्या लिडरशिपची व निगोशिएशन करण्याच्या अकलेची!

मला यावरुन.. एका साइन्फिल्ड एपिसोडची आठवण आली. त्यात जेरीला.. एन बी सी स्टुडिओ...त्याच्या पायलट एपिसोडसाठी १५,००० डॉलर्सची ऑफर देते.. पण जॉर्ज त्याला म्हणतो.. “ यु निड टु निगोशिएट“.. मी तुझ्या वतीने एन बी सी शी “निगोशिएट” करतो.. व तो एन बी सी शी “निगोशिएट” करायला जातो तर हा बाबा जास्त किंमत मागत आहे हे बघुन एन बी सी स्टुडिओ जेरीचा शोच रद्द करतात.. मग जॉर्ज.. गयावया करत.. त्यांच्या पायाशी लोळण घेतो .. व कसाबसा ५००० डॉलर्सवर तो शो बुक करुन येतो... ते ऐकुन जेरी त्याला म्हणतो... अरे “ निगोशिएअशन “ करताना मला वाटले तु जास्त पैश्याची मागणी करणार होतास.. आता तर तु मला आधी जेवढे पैसे मिळणार होते त्याच्या अर्ध्यापेक्षाही कमी पैश्याला तु तयार झालास.. हे कसले तुझे “निगोशिएशन” स्किल? Happy

हा तसलाच काहीसा विनोदी प्रकार झाला... Happy

जॉर्जियाच्या निवडणूक अधिकार्‍याला शिव्या आणि धमक्या मिळताहेत.

रिपब्लिकनचं असं कसं झालं? म्हणजे २०१६ मध्ये ट्रंपशिवाय कोणी नाही आणि अजूनही नाही? किंवा त्याला आवरणारंही कोणी नाही?

नॅन्सी पलोसी चुकली असे आता म्हणू शकता. पण तेंव्हा "मी १.८ ट्रिलिअन डॉलर्सना तयार होणार नाही "असे मे़कॉनलने साफ सांगितले होते कारण त्याच्या कडे तितकी मते नव्हती. मग जे पैसे मिळणारच नव्हते त्याबद्दल लोकांमधे रिपब्लीकन पैसे तयार द्यायला तयार नाहीत असा गवगवा करायचा ही खेळी ती खेळली. ती जमली नाही ते वगळा. आता मागे वळून पाहता , कुणि काहीही म्हणा , जगात काय वाटेल ते झाले तरी आम्ही तात्यालाच मते देणार असे विचार करणारे इतके लोक आहेत हे कुणालाच वाटले नव्हते.

तात्याचा व्हॉट्सअ‍ॅप अंकल झाला आहे आता टोटल. नेवाडा मधल्या एका हॉस्पिटलबद्दल कोणीतरी काढलेला जुना फोटो रीट्विट केला फेक हॉस्पिटल म्हणून. त्याचा प्रपोगंडा चालवणार्‍या कोणाही सोम्यागोम्याची ट्विट्स थेट प्रेसिडेन्शियल प्रसिद्धी मिळवतात. मग त्याचे लाखो चाह्ते तेच खरे समजतात आणि "पण ट्रम्प, ज्युलियानी यांनी दाखवलेले पुरावे का बघू नयेत" छाप इनोसंट प्रश्न कॉमेण्ट्स मधे विचारतात Happy

नेवाडा वाला प्रकार खरच इरीटेटींग आहे. तो करायला गेला काय नि तात्याने केले काय !

म्विस्कोनिस मधल्या ट्रायल मधल्या विटनेस ची उत्तरे ऐकून ज्युलियानी सुद्धा हतबुद्ध झाला. तो सगळा व्हिडियो बघून कमीत कमी विटनेस ची थोडिही पूर्व तयारी करून आणवे असे कोणालाच वाटले नाही का ?

एक ट्रंप समर्थक म्हणून माझे मत
१. निवडणूकीत बोगस मतदान झाले होते हे नक्की. पण कुंपणच जेव्हा शेत खाते तेव्हा काही उपाय चालत नाही त्यामुळे गैरप्रकार करणार्या लोकांनी पुरावेही नष्ट केले आहेत त्यामुळे कोर्टात सिद्ध होणे नाही. ट्रंप हरला आहे. सगळ्या यंत्रणांनी ट्रंप हरावा म्हणून कंबर कसली होती आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत असे सध्या दिसते आहे. मला कुठलीही आशा दिसत नाही.

२. पुढची ४ वर्षे बायडन पुरते वाटोळे करणार आहे (किंवा त्याची कळसूत्री बाहुली बनवून त्याच्यामागून कुणीतरी). खुल्या सीमा, बेकायदा घुसखोरांची कोडकौतुके, चीनला पुन्हा डोक्यावर बसवणे. इस्लामी मंडळींचे उदात्तीकरण. अतिरेकी पर्यावरणवादी धोरणे जी अर्थव्यवस्थेची वाट लावतील ती सगळी आणि कदाचित त्यात भर घालून आणखी नवी राबवणे हे सुरू होणार आहे. प्रचंड कर लावणार. बायडनचे डोके कितपत ठिकाणावर आहे ह्यविषयी शंका आहे त्यामुळे बहुधा त्याचा आडोसा वापरून सोशलिस्ट विचारांचे अतिडावे लोक सत्त्ता हातात घेणार आणि वाट लावणार. भारताशी संबंध बिघडणार आणि चीन आणि पाकिस्तानची कोडकौतुके सुरू होतील. (हे सगळे अंदाज चूक निघतील अशी एक अंधुक आशा आहे!)

३. कोरोनामुळे ट्रंपद्वेष्ट्या लोकांना एक आयतेच कोलित मिळाले. खरेतर ही एक अपूर्व परिस्थिती होती. पण अकारण ट्रंपवर सगळा दोष देण्यात माध्यमे पुढे होती. त्यामुळे ट्रंपचे मताधिक्य घटले ह्यात शंकाच नाही. पण निवडणुकीतील गैरप्रकारामुळे त्यात आणखी घट झाली आहे. चीनने हा जिवाणू प्रयोगशाळेत निर्माण केला आहे असे म्हटले जाते. ते खरे असेल तर त्यांचे पैसे पुरेपुर वसूल झाले असेच त्यांना वाटत असेल. (ट्रंपने आपल्या मार ला गोच्या घरातील तळघरात असलेल्या प्रयोगशाळेत हा जिवाणू बनवला अशी अफवा काही माध्यमे पसरवत आहेत पण ते बहुधा खरे नसावे!)

४. कदाचित आता सगळ्या ट्रंप प्रशासनातील लोकांना सूडबुद्धीने कुठल्या ना कुठल्या प्रकरणात गोवून अमानुष शिक्षा देण्यात येईल असे वाटते. बघू या. ट्रंपला मते देणार्‍यांच्याही मुसक्या बांधण्याचे आदेश निघाले तर आश्चर्य नाही वाटणार!

५. जेव्हा केव्हा एखादा "निरपराध" काळा माणूस पोलिसांकरवी मारला जाईल तेव्हा बीएलएम आणि अँटिफा काय आगी लावतात ते बघणे उद्बोधक ठरेल. आणि तमाम डेमॉक्रॅटिक राज्ये काय प्रतिक्रिया देतात, केंद्र सरकार काय करते तेही. खरोखर हा भस्मासूर आहे का केवळ ट्रंपवर छू करणारा हिंस्र पण आज्ञाधारक कुत्रा आहे ते कळेल.

सध्या २०२४ ची वाट बघणे एवढेच हातात आहे!

१. निवडणूकीत बोगस मतदान झाले होते हे नक्की >> हे एकदम पटले. म्हणजे तात्याला एव्हढीही मते मिळाली ह्यातच बोगस मतदान झाले सिद्ध होतेय. Wink

निवडणूकीत बोगस मतदान झाले होते हे नक्की. >>> इतकी खात्री? कशाच्या जोरावर म्हणे Happy काहीतरी आधार ?
सगळ्या यंत्रणांनी ट्रंप हरावा म्हणून कंबर कसली होती आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत >> ग्रेट! इतकी पावर असून मग हाऊस आणि सिनेट चा ताबाही घ्यावा असे त्या यंत्रणांना वाटले नसावे/ लक्षातच आले नसावे का?
पुढची ४ वर्षे बायडन पुरते वाटोळे करणार आहे (किंवा त्याची कळसूत्री बाहुली बनवून त्याच्यामागून कुणीतरी). खुल्या सीमा, बेकायदा घुसखोरांची कोडकौतुके, चीनला पुन्हा डोक्यावर बसवणे. इस्लामी मंडळींचे उदात्तीकरण. अतिरेकी पर्यावरणवादी धोरणे जी अर्थव्यवस्थेची वाट लावतील ती सगळी आणि कदाचित त्यात भर घालून आणखी नवी राबवणे हे सुरू होणार आहे. प्रचंड कर लावणार. >>>> एवढं सगळं करू शकणार आहे म्हणता बायडेन ? हाउस अन सिनेट मधे मेजॉरिटी नसून पण?
कोरोनामुळे ट्रंपद्वेष्ट्या लोकांना एक आयतेच कोलित मिळाले. खरेतर ही एक अपूर्व परिस्थिती होती. >>>> खरं तर ही ट्रम्प करता पण अपूर्व संधी होती की. बिनडोक वक्तव्ये अन ट्वीट्स ऐवजी फक्त फाउची किंवा एक्ष्सपर्ट्स च्या सल्ल्याने हा क्रायसिस मॅनेज केला असता तर अपूर्व मताधिक्याने आला असता की निवडून.
असो. सिंपल आणि मोस्ट लॉजिकल ट्रुथ तेच जे तुम्हीही लिहिले "ट्रम्प हरला आहे", पिरियड!

कोरोनामुळे ट्रंपद्वेष्ट्या लोकांना एक आयतेच कोलित मिळाले. खरेतर ही एक अपूर्व परिस्थिती होती. पण अकारण ट्रंपवर सगळा दोष देण्यात माध्यमे पुढे होती.

अकारण? अकारण???

We have it totally under control. It’s one person coming in from China, and we have it under control. It’s going to be just fine.”
Looks like by April, you know, in theory, when it gets a little warmer, it miraculously goes away.

शेंडे, एकेक पॉइण्ट बघू. मी ट्रम्प समर्थक नाही. ट्रम्प विरोधक निवडणुकीपर्यंत नव्हतो. पण आता तो जे करतोय ते भयानक डेंजरस आहे. हे केवळ मी नाही असंख्य रिपब्लिकन्स, कॉन्झर्वेटिव्ह्ज, खुद्द त्याने नेमलेले जजेस आणि त्याचे मित्र सुद्धा म्हणत आहेत. त्यामुळे आता नक्कीच विरोधक आहे.

निवडणुकीतील गैरप्रकार
जगात एकही अशी निवडणूक नसेल ज्यात काही फ्रॉड, काही चुका होत नसतील. अमेरिकेतील आधीच्या प्रत्येक निवडणुकीत हे झाले असेल. त्यापेक्षा आता काही वेगळे झाले आहे असे मानायला काहीही ठाम पुरावा अजून पुढे आलेला नाही. गैरप्रकाराची उदाहरणे निकालावर परिणाम करतील इतकी मोठी आहेत असेही कोठे दिसलेले नाही. खुद्द कॅम्पेनने कोणत्याही मेजर केस मधे गैरप्रकार झाल्याचा आरोप कोर्टात केलेला नाही. आरोपपत्रातच दावा नाही. जे सगळे नाट्य चालले आहे ते बाहेर चालले आहे. फॉक्स, न्यूजमॅक्स मधे, पार्किंग लॉट्स मधे. जेथे असायला हवे तेथे खटले केवळ तांत्रिक गोष्टींवर आहेत आणि ते ही बहुतांश फेटाळले गेले आहेत.

ट्रम्पने टोटल फ्रॉड म्हणून जाहीर करायचे, त्याच्या इनेब्लर्सनी ते आणखी मेगाफोन मधून ओरडायचे, फॉक्स, न्यूजमॅक्स व तशाच इतर नेटवर्क्सनी तेच चर्चेत राहील असे करायचे. ते सोडून दुसरे काही न बघणार्‍या पब्लिकनेही मग समजूत करून घ्यायची की काहीतरी मोठा गफला आहे. असला प्रकार चालू आहे. ३५ केस मधल्या बहुसंख्य केसेसमधे काहीही निष्पन्न झालेले नाही. आरोपपत्रातच दावा नसेल तर निकालात कोठून येणार. फेवरेबल नेटवर्क्स वरून तेच तेच ओरडत राहायचे पण कोर्टात काहीही द्यायचे नाही असाच पॅटर्न सुरू आहे. सिडनी पॉवेलचे बाँबशेल्स, बिब्लिकल खटले वगैरे फुसके निघाले आहेत.

आज एक महिना झाला. हे लोक नुसतेच ओरडत आणि लोकांना उसकावत आहेत. त्यांच्याकडे काहीही पुरावे नाहीत. दर दोन दिवसांनी असा आव आणतात की आता सगळ्यांचे बिंग फुटणार आहे. नंतर काही निघाले नाही की दुसरा एखादा रॅण्डम डेटा पॉइण्ट उचलून पुन्हा सुरू होते.

त्यामुळे आता नक्कीच विरोधक आहे. >> देरसे आये पर दुरुस्त आये Happy

फा वरच्या सगळ्या पुराणात एक मह्त्वाचे राहिले ते म्हणजे फ्लिन (कूप बद्दल आहे), बॅनन, (अजून एक लॉयर होता त्याचे नाव आठवत नाही) अशा काही तात्याच्या समर्थकांनी तात्याच्या समर्थकआंनी हातात शस्त्रे घ्यागळे/ अमक्याचे गळे कापावे अशा प्रकारची भाषा सुरू केली आहे. त्यात्याच्या पाठीराख्यांमधे ट्रिगर हॅपी लोकांचा तुटवडा नाही.

>>अशा काही तात्याच्या समर्थकांनी तात्याच्या समर्थकआंनी हातात शस्त्रे घ्यागळे/ अमक्याचे गळे कापावे अशा प्रकारची भाषा सुरू केली आहे. त्यात्याच्या पाठीराख्यांमधे ट्रिगर हॅपी लोकांचा तुटवडा नाही.<<
म्हणजे एओसी सारखी भाषा, असं म्हणायचंय काय तुला? वे बॅक, शी ऑल्रेडि स्ट्रार्टेड इन्स्टिगेटिंग इमोशनल फुल्स... Wink

म्हणजे एओसी सारखी भाषा, असं म्हणायचंय काय तुला? वे बॅक, शी ऑल्रेडि स्ट्रार्टेड इन्स्टिगेटिंग इमोशनल फुल्स.. >>

Is anyone archiving these Trump sycophants for when they try to downplay or deny their complicity in the future? I foresee decent probability of many deleted Tweets, writings, photos in the future
Lol at the “party of personal responsibility” being upset at the idea of being responsible for their behavior over last four years

एओसी ने गळा कापायची भाषा केली आहे ? आणि समजा केली असली तर ह्यांनी केलेले समर्थनीय होते होय ? एक्दा बॅनन चे पोस्ट वाचून घेच तू

अजून एक लॉयर होता त्याचे नाव आठवत नाही >> स्टीव्ह बॅनन? >> नाही अजून दुसरा आहे कँपेन शी किंवा ह्या व्होटर फ्रॉड वाल्या खटल्यांशी संबंधित आहे.

Pages