अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रिपब्लिकन पक्षाने ट्रंप ऐवजी दुसरा कोणी उमेदवार दिला असता तर चित्र वेगळे दिसले असते का?>>> तो दुसरा किती प्रभाव टाकू शकला असता त्यावर अवलंबून आहे.
ट्रंपतात्या किल्या द्यायला तयार नाहीत. आता काय eviction करावं लागेल की काय.

बाकी शेंडेनक्षत्र आजिबात दिसले नाहीत. ठीक आहेत ना? (प्रामाणिक प्रश्न आहे).

ट्रम्प इलेक्शन डिफेन्स फंड गोळा करतोय आणि अर्धे पैसे कॅम्पेनची जुनी देणी फेडायला वापरतोय.

लोकांकडून अजूनही पैसे घेणे आणि दुसऱ्या कारणाकरिता वळवणे हे कितपत नैतिक आहे ?

अमेरिकन राजकारण तज्ञांची मते आवडतील.

लोकांकडून अजूनही पैसे घेणे आणि दुसऱ्या कारणाकरिता वळवणे हे कितपत नैतिक आहे ?>>≥>>

तो विचार देणार्यांनी करावा. त्यांना त्रास नसेल किंवा त्यांची हरकत नसेल तर नैतिकता काढणारे बाकीचे कोण??

नक्की आहे. ज्या कारणासाठी पैसे मागितले त्या साठी न वापरणे हे अनैतिक नाही का ?

ते सोडून, इलेक्शन कोणत्याही प्रकारे "डिफेन्ड" होण्याची शक्यता शून्याच्या जवळपास आहे, तेव्हा यासाठी पैसे मागणे, 50% कर्ज फिटवायला वापरता येतात म्हणून , हे कितपत योग्य ?

पैसे एका सीमित वर्गाकडून नाही तर जनते कडून घेत आहे. त्यामुळे जनतेचा भाग म्हणून नैतिकता तपासली जाऊ शकतेच.

<<<नक्की आहे. ज्या कारणासाठी पैसे मागितले त्या साठी न वापरणे हे अनैतिक नाही का ?>>>
अमेरिकेत कसली आली आहे नैतिकता, लाज, लज्जा, सभ्यपणा? त्यातून ट्रंपला तर मुळीच नाही.
नुसते पैसे गोळा करायचे! नि अनेक मूर्ख लोक देतात पण!
थोडीशी जरी अक्कल असती तर ट्रंपला कशाला निवडून दिले असते? इतर कितीतरी चांगले रिपब्लिकन उमेदवार होते.

ट्रम्प 74. रुडी 76. मकॉनल 78. बायडन 77. नॅन्सी 80. डॉ फावची 79.

ही अमेरिकेची निवडणूक आहे का कोथरुड ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीची निवडणूक तेच कळत नाही.

त्यातून ट्रंपला तर मुळीच नाही.>>>>

म्हणून तर Happy Happy

एका बाजूला तो किती वाईट आहे हे सांगायचे आणि वर त्याच्याकडून अपेक्षाही ठेवायच्या... दोन्ही कसे होणार..

तिथवर पोचायला किती काळ जावा लागतो हेच कळते यावरून.

Submitted by साधना on 11 November, 2020 - 06:06

बराक ओबामांचं वय किती होतं २००९ साली?

जिज्ञासा..ध्रुव्ह राठीचा व्हिडिओ .. त्याने सुरुवात चांगली केली. अमेरिकेतल्या निवडणुकीची पद्धत त्याने खुप छान समजवली. त्याने प्रेसिडेंट, हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह व सेनेटर्स कसे निवडले जातात हेही चांगले सांगीतले.

बट ही फेल्ड टु एक्स्प्लेन द लेजिस्लेशन प्रॉसेस इन द हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह चेंबर अँड सेनेट चेंबर ...अँड ही डिड नॉट एक्स्प्लेन द ट्रिमेंडस पॉवर ऑफ सेनेट चेंबर इन दॅट लेजिस्लेशन प्रॉसेस अँड देअर पॉवर इन फेडरल/ सुप्रिम कोर्ट जजेस अपॉइंटमेंट्स.

त्यामुळे साधनाचे प्रश्न व तिला माझ्या पोस्टमधे मी जे काही लिहीले होते त्याबद्दल पडलेले प्रश्न अनुत्तरीतच राहीले असतील.

तर मी माझ्या पोस्टमधे बायडन ठोकळा प्रेसिडेंट का होइल असे म्हटल्याची थोडक्यात कारणे.

अमेरिकेत ऑफ हाउस रिप्रेझेंटेटिव्ह व सेनेट .. असे दोन चेंबर्स असतात.

अमेरिकेत कुठलेही मेजर बिल किंवा पॉलिसी पास व्हायला ते बिल सेनेट चेंबरने पास करावे लागते.तिच गोष्ट फेडरल जजेस ,सुप्रिम कोर्ट जजेस, राजदुत व मिनिस्टर्स नेमणुकीबाबत.. सेनेटर्स ठरवतात की त्या सगळ्यांची नेमणुक करायची किंवा नाही.

हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह चेंबरला तसे फारसे काही महत्व व पॉवर नसते. ते नुसते बिल किंवा पॉलीसी सुचवु शकतात. प्रेसिडेंटही पॉलीसी सुचवु शकतो. पण ते बिल किंवा पॉलीसी मग सेनेट चेंबरमधे जाते. सेनेट चेंबरने ते पास केले तरच ते अमेरिकन प्रेसिडेंटच्या टेबलावर परत सहीसाठी जाते व मगच त्याची अंमलबजावणी होते.

नुसते प्रेसिडेंटने सुचवले किंवा हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह चेंबरने सुचवले म्हणुन कुठलेही बिल किंव पॉलीसी पास होत नाही.

म्हणजे अमेरिकेत खरी पॉवर सेनेट चेंबर्सकडेच असते. थोडक्यात....ते चेंबर....प्रेसिडेंटच्या नाड्या आखडु शकते.

नोव्हेंबर २०१३च्या आधी सेनेटकडे अशी निर्विवाद पॉवर नव्हती. तोपर्यंत सेनेट चेंबरला जर हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह चेंबर किंवा प्रेसिडेंटने केलेले प्रस्ताव/बिले मंजुर करायची असतील किंवा फेडरल जजेस/ सुप्रिम कोर्ट जजेससाठी व मिनिस्टर पदासाठी नॉमिनेट केलेली माणसे जर सिलेक्ट करायची असतील.... तर सेनेट चेंबरमधल्या किमान ६० सेनेटर्सना ( आउट ऑफ टोटल १०० सेनेटर्स) ....त्या प्रस्तावाला, बिलला किंवा नॉमिनेशनला हो म्हणुन मत द्यावे लागत होते.

पण नोव्हेंबर २०१३ मधे अमेरिकन सेनेट रुल्स मधे एक मोट्ठा बदल झाला. तेव्हा डेमॉक्रॅटिक पक्षाचे ५३ सेनेटर्स होते व रिपब्लिकन पक्षाचे ४५ सेनेटर्स होते. ( २ अपक्ष) तेव्हा प्रेसिडेंट ओबामा होता. त्यावेळेला २००८ पासुन नोव्हेंबर २०१३ पर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या सेनेटर्सनी ओबामाला खुप सारे फेडरल जजेस नेमु दिले नाहीत किंवा त्याच्या बर्‍याचश्या मेजर पॉलीसीज पास होउ दिल्या नाहीत. त्यांना एक काळा प्रेसिडेंट निवडुन आला हे खुपच खटकले होते व त्याला पुर्ण निष्प्रभ व ठोकळा प्रेसिडेंट करायचा त्यांनी ओपनली विडाच उचलला होता. २०१३ पर्यंत.. मी वर सांगीतल्याप्रनाणे..तेव्हा कुठलेही बिल पास करायला किंवा कुठलाही फेडरल जज नेमायला ...६० सेनेटर्स हो म्हणायला लागत होते. आणी डेमॉक्रॅट्स सेनेटर्सची संख्या (त्यांच्याकडे मेजॉरीटी जरी असली तरी) त्यावेळेला ५३ च होती. त्यामुळे नोव्हेंबर २०१३ पर्यंत... डेमॉक्रॅटीक पक्षाला कुठल्याही सात रिपब्लिकन सेनेटर्सची मदत .. कुठलेही बिल पास करायला किंवा कुठलेही नॉमिनेशन मंजुर व्हायला .. हवी होती.. ती त्यांना कधीच मिळाली नाही.

त्याला कंटाळुन.. मग तत्कालीन सेनेट मेजॉरीटी लिडर हॅरी रीड यांनी नोव्हेंबर २०१३ मधे नवा नियम केला.. की कुठलीही पॉलीसी पास करायची असेल, बिल पास करायचे असेल, जजेसची नेमणुक किंवा मिनिस्टरची नेमणुक करायची असेल ...तर सेनेटमधे सिंपल मेजॉरीटी असली तरी पुरेशी आहे( १०० सेनेटर्सपैकी फक्त ५१ सेनेटर्सनी हो म्हटले तरी चालेल... ६० सेनेटर्सनी हो म्हणायची जरुरी नाही)

पण डेमॉक्रॅट पक्षाने २०१४ च्या मिडटर्म निवडणुकीत सपाटुन मार खल्ला व सेनेट मधे ते त्यांची मेजॉरीटी गमावुन बसले.

त्यामुळे झाले काय की रिपब्लिकन पार्टीने मग .. त्यांच्याकडे आता सिंपल मेजॉरीटी आल्यामुळे... ओबामाच्या शेवटच्या २ वर्षात ... ओबामाला..अक्षरशः त्याच्या हातात बेड्या घातल्यासारखे ..व्हाइट हाउसमधे ...एक ठोकळा म्हणुन बसायला भाग पाडले.

म्हणुन मग..ओबामाच्या शेवटच्या २ वर्षात... डेमॉक्रेटीक पक्षाकडे सिंपल मेजॉरीटी सुद्धा नसल्याने.... त्यांचे एकही बिल पास झाले नाही , एकही नॉमिनेशन पास झाले नाही किंवा पॉलीसी पास झाली नाही.

ओबामाने २०१५ मधे सुप्रिम कोर्टासाठी एरिक गारलेंड या एका उत्तम जजला नॉमिनेट केले होते पण २०१६ च्या इलेक्शनपर्यंत ...तब्बल १ वर्ष ...रिपब्लिकन मेजॉरीटी असलेल्या सेनेट चेंबरने ....त्याचे नॉमिनेशन अडकवुन ठेवले. २०१६ मधे रिपब्लिकन पार्टीच्या तिकिटावर जेव्हा ट्रंप अनपेक्षितपणे जिंकुन आला तेव्हा ताबडतोब त्याने त्याच्या पक्षाच्या जजला सुप्रिम कोर्टासाठी नॉमिनेट केले व रिपब्लिकन मेजॉरीटी असलेल्या सेनेट चेंबरने सिंपल मेजॉरीटीचा रुल वापरुन त्याला ताबडतोब सुप्रिम कोर्टात पाठ्वले. तसेच सिंपल सेनेट मेजॉरीटी रुल वापरुन २०१८ मधे त्यांनी अजुन एक रिपब्लिकन जज अमेरिकेच्या सुप्रिम कोर्टात पाठ्वला व नुकतेच इलेक्शनच्या आधी १ आठ्वडा बाकी असताना रिपब्लिकन सेनेट मेजॉरीटीने परत एकदा सिंपल मेजॉरीटी रुल वापरुन अजुन एका रिपब्लिकन जजला सुप्रिम कोर्टात पाठ्वले.

म्हणजे साधना.. तुला कळले असेलच की अमेरिकेत सेनेटमधे ज्या पक्षाची सिंपल मेजॉरीटी असेल ....त्या पक्षाकडे अनलिमिटेड पॉवर असते.

या निवडणुकीत डेमॉक्रेटिक पक्षाचा बायडन जरी जिंकला असला तरी सेनेट रेस मधे सध्या रिपब्लिकन पक्षाचे ५० सेनेटर्स आहेत व डेमॉक्रॅटीक पक्षाचे ४८ सेनेटर्स आहेत. जॉर्जिया राज्यातील २ सेनेटर्स ची निवडणुक जानेवारी १० ला होणार आहे. त्यातली एक जरी रेस रिपब्लिकन पार्टीने जिंकली तर रिपब्लिकन पार्टी परत एकदा सेनेटमधे मेजॉरीटी राखु शकतील व म्हणुन बायडनला प्रेसिडेंसी मिळुनही त्याच्या नाड्या ते आखडतील.. थोडक्यात... ठोकळा प्रेसिडेंट!

आल लक्षात?

मुकुंद, उत्तम माहिती.

तत्कालीन सेनेट मेजॉरीटी लिडर हॅरी रीड यांनी नवा नियम केला..>> याची एकंदरीत प्रोसेस काय?

आल लक्षात?

नवीन Submitted by मुकुंद on 11 November, 2020 - 12:1 आल Happy उत्तम विश्लेषण

मुकुंद, सध्या तरी ट्रंप प्रेसिडेंट म्हणून पुन्हा आला नाही, यात आनंद मानता येईल. तो पुन्हा आला असता तर आणखी काय काय केले असते याची कल्पना करायची.
शिवाय रिपब्लिकन्सना त्याचे सगळे निर्णय सरसकट मान्य होते का?

मुकुंद, छान सविस्तर माहिती दिलीत! जॉर्जिया मध्ये सध्याचे सिनेटर दोन्ही रिपब्लिकन आहेत का? सध्याच्या सिनेटर्सची संख्या शंभरपेक्षा कमी कशी?

<<<<एका बाजूला तो किती वाईट आहे हे सांगायचे आणि वर त्याच्याकडून अपेक्षाही ठेवायच्या... दोन्ही कसे होणार..>>>
अपेक्षा? ट्रंपकडून? उपयोग काय? काहीहि अपेक्षा नाहीत.
माणूस म्हणून त्याच्याबद्दल गेल्या तीस वर्षात जे पाहिले त्यावरून तो एक अत्यंत नालायक माणूस आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचे नाव काढले की डोक्यात सणक जाते.

जिज्ञासा, मुकुंदनी जॉर्जियाचे दोन सिनेटर्स धरलेले नाहीत म्हणून एकूण ९८ सिनेटर्स, जॉर्जियाचे धरल्यास १००. त्यांचा निकाल जानेवारीत लागेल. जॉर्जियाच्या फ्लिप होण्यामागे स्टेसी एब्रामचाही हातभार लागला आहे म्हणतात. ती बराच जोर लावून आहे सिनेटर्सच्या निवडणूकीसाठी. बघूया काय होतंय जानेवारीत. दोन्ही सीटस डेम्सला मिळायला पाहिजेत मात्र.

२०१७ ते २०१९ जानेवारी पर्यंत हाउस सिनेट नि प्रेसिडेन्सी रिपब्लिकन कडे होती. आणला का नवीन हेल्थकेअर प्लान? आठ वर्षे बोंब मारत होते ओबामाकेअरच्या नावाने, त्यापेक्षा नवीन प्लान चा विचार केला असता तर? त्या दोन वर्षात पास करून घेता आला असता.
बांधली का भिंत? नुसत्या वल्गना! जी थोडीफार बांधली त्याचे पैसे दिले का मेक्सिकोने?
उगाच नाही ट्रंपला मते देणार्‍यांना मूर्ख म्हणत!
आणी टॅक्स चे म्हणाल तर डेमोक्रॅट राज्यात रहाणार्‍या माझ्या सारख्यांचे नुकसानच झाले. आम्हाला का म्हणून रिपब्लिकन लोकांचे प्रेम वाटावे? तरी हरकत नव्हती रिपब्लिकन निवडून आले तरी, पण ट्रंप?!
आता इथे कुणाचे उत्पन्न ४००,००० पेक्षा जास्त असेल ते बायडेनच्या नावाने बोंबा मारतील.

मुकुंद, धन्यवाद...

एकूण जगात कुठेही लोककल्याणाच्या नावाखाली निवडून येणारे लोक प्रत्यक्षात स्वकल्याण आणि दुसऱ्याचे अकल्याण हाच एककलमी कार्यक्रम राबवताना दिसतात. गरीब मागासलेल्या देशांचे जाऊ द्याच, त्यांच्यात ती समजच नाही म्हणून सोडून देता येईल. पण प्रगत, पुढारलेल्या देशातही तीच गत.. त्यात जगाचे लीडर म्हणवून घ्यायची हौस असलेले आणि जगाच्या कोपऱ्यातील एखादा देश एका फटक्यात निर्णय घेऊन देशोधडीला लावण्याची क्षमता असलेल्या अमेरिकेतही लोक एकदा निवडून आले की एकत्रितपणे कल्याणकारी कारभार करू शकत नाहीत हे बघून वाईट वाटते.

अमेरिकेत काळ्या लोकांना आजही जी वागणूक मिळते त्याचेही मला आश्चर्य वाटते. ओबामाही काळा प्रेसिडेंट म्हणून त्रास होतो तिथे सामान्यांचे काय? पण तो विषय वेगळा.

अंजली, ओके! एकूण काय बायडेन निवडणूक जिंकले असले तरी किती बदल आणू शकतात हे 10 जानेवारीला स्पष्ट होईल.

जॉर्जियाच्या फ्लिप होण्यामागे स्टेसी एब्रामचाही हातभार लागला आहे म्हणतात. ती बराच जोर लावून आहे सिनेटर्सच्या निवडणूकीसाठी >>> नेफि की प्राइमवर एक डॉक्यु. आहे वोटिंग शी संबंधित. नाव शोधून लिहीतो. त्यात तिची मुलाखत व बरीच माहिती आहे. खूप इण्टरेस्टिंग आहे.

Pages