Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>> त्याचा एक अवगुण (किंवा
>>> त्याचा एक अवगुण (किंवा गुण) म्हणजे त्याचा स्पष्टवक्तेपणा. जो त्याच्यात अजुनहि आहे कारण तो करियर पोलिटिशियन नाहि, बिझनेस्मन आहे. वेळोवेळी त्याने व्यक्त केलेली मते स्फोटक आहेत, अजिबात प्रेसिडेंशियल नाहित; दॅट इज जस्ट द वे हि इज वायर्ड.
आणि
>>> मी ट्रंपला लिटरली (बर्याचदा फिगरेटिवली सुद्धा) घेत नाहि.
--- यातलं नेमकं काय? येक पे रेहना: या तो घोडा बोलो - या तो चतुर!
बाकी आपल्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला बोल्सेरोज, मॅरियल बोटलिफ्ट, क्युबन अॅडजस्टमेंट अॅक्ट, ह्या खास निर्वासितांना एका वर्षातच ग्रीन कार्ड मिळत असल्याने रिपब्लिकन पक्षाचा तयार झालेला क्युबन-अमेरिकन बेस, वेट-फूट ड्राय-फूट पॉलिसी इत्यादी गोष्टी माहीत असतीलच.
>>> इतका कसा हा माणूस ट्रंप
>>> इतका कसा हा माणूस ट्रंप भक्त बनला मकेन गेल्यावर?
--- प्रायमरीजची भीती हे बहुतेक मुख्य कारण असावं. प्रायमरीमध्ये मतदान करणारे बहुधा निष्ठावंत, कट्टर लोक असतात. त्यांच्या मर्जीत राहायचं तर असं भक्त होणं भागच आहे. जनरल इलेक्शन काय, साऊथ कॅरोलायनासारख्या राज्यात रिपब्लिकन उमेदवाराला जिंकणं अवघड नाही.
फ्लॉरिडाच्या गव्हर्नरपदाच्या प्रायमरीत, रॉन डिसँटिसने फॉक्स न्यूजवर सतत जाऊन ट्रम्पची आरती गाऊन, कशी बाजी मारली; त्यातून बहुतेक ग्रॅहमने धडा घेतला असावा:
https://www.politico.com/story/2018/08/29/ron-desantis-fox-news-florida-...
सिंगेल. ती पण सिंगेल.
सिंगेल. ती पण सिंगेल.
जब्बरदस्त स्पीच बाकी दोघांचे! पोरखेळ संपून आता अडल्ट्स काम करायला आले असं वाटलं.
It’s time to heal!
Amen!
धन्यवाद नंदन. मेक्स सेन्स.
बाकी डि सँटीस त्याही पुढचा आहे!
ओबामाला नुसतं बघितलं तरी जसं
ओबामाला नुसतं बघितलं तरी जसं मस्त वाटतं, आपल्याच चेहेऱ्यावर एक आनंद/ हसू उमटतं तसं फीलिंग आलं.
पोरखेळ संपेल. अगदी बरोबर बोललात बुवा.
सोडा रे... पुढे चला.
सोडा रे... पुढे चला.
तात्या is yesterday's news, who is going to be completely inconsequential in the time ahead.
ज्यो बायडन , कमला Harris आणि
ज्यो बायडन , कमला Harris आणि सर्व अमेरिकन लोकांचे मनःपूर्वक अभिनंदन !
ओबामाला नुसतं बघितलं तरी जसं मस्त वाटतं, आपल्याच चेहेऱ्यावर एक आनंद/ हसू उमटतं तसं फीलिंग आलं...+1
मलाही झाला , CNBC बघतेयं , खरंच प्रसन्न वाटतेयं.
भूगोल बदलला की विचार बदलतात
भूगोल बदलला की विचार बदलतात हे पाहून टडोपा व्हायची वेळ आली. दोन्ही बाजूंचे दोन चार आयडी सोडले तर बऱ्याच जणांच्या १८०° कोलांट्याउड्या अवर्णनीय, अविस्मरणीय आहेत हो. च्यायला, चक्क RJB बद्दल इतकं ग्वाड बोलणं तेही मलिका ए कांगावा ने म्हणजे हद्द आहे राव. असला ढोंगी, भोंदुपणा घेऊन जगता कसे राव तुम्ही? जाऊद्या. बायडन आल्याने आम्हासारख्या पामारांस अतीव दुःख झालेले आहे अद्यक्ष महोदय. लायकिबाहेर मिळाल्याबद्दल अभिनंदन अमेरिकन भय्येहो
ओबामाला नुसतं बघितलं तरी जसं
ओबामाला नुसतं बघितलं तरी जसं मस्त वाटतं, आपल्याच चेहेऱ्यावर एक आनंद/ हसू उमटतं तसं फीलिंग आलं. >> अगदी अगदी! The whole world has breathed a sigh of relief!
“सोडा रे... पुढे चला...”
“सोडा रे... पुढे चला...”
हायझेनबर्ग .. बरोबर बोललास.
प्रेसिडेंट इलेक्ट बायडन म्हणाला.. तस.. मायबोलिवरचे टेंपरेचर सुद्धा जरा कमी होउ देत.. इट्स नाउ टाइम टु कम टुगेदर अँड हील!
प्रेसीडेंट इलेक्ट बायडनचे अभिनंदन.
राज... तु ट्रंपबद्दल व फ्लोरिडातल्या इमिग्रंट्स बद्दल जी विधाने केली आहेस त्या विधानांमधे खुप विसंगती आहे. परत नीट वाचुन बघ. नंदनने वर दाखवली आहे विसंगती. नंदनचे हेही बरोबर आहे की ट्रंप बिझनसमन आहे.. पॉलिटिशिअन नाही.. हा बचाव खुप जुना झाला. अरे पॉलिटिशिअन नाही तर प्रेसिडेंशिअल रेस मधे कशाला उतरला?
बर.. प्रेसिडेंट म्हणुन निवडुन आल्यावर सुद्धा त्याने प्रेसिडेंट म्हणुन जे डेकोरम व डिगनिटी पाळायची असते.. एक सभ्यता दाखवायची असते.. ती त्याने कधीच दाखवली नाही. नेहमी कंबरेवरच सोडुन डोक्याला लावल्यासारखा ४ वर्षे वागला. स्लिपी जो काय, नास्टी वुमन काय.. सन ऑफ बिचेस काय... डॉक्टर फाउची इडिअट काय .....कोणाला कोणाला म्हणुन नावे ठेवायची त्याने सोडले नाही.. अरे एखाद्या फाल्तु कंपनीचा प्रेसिडेंट पण असली गलिच्छ भाषा वापरणार नाही.. आणी हा तर अमेरिकेसारख्या जगातल्या सगळ्यात पॉवरफुल देशाचा प्रेसिडेंट होता.. त्याने असे वागुन व बोलुन त्या अध्यक्षपदाला अगदी मामुली व क्लासलेस बनवुन टाकले... अरे रात्री २ वाजेपर्यंत.. रोझी ओडॉनल सारख्या फालतु व्यक्तिबरोबर.. ट्विटर फ्रॉड करताना .. तु अमेरिकेचा प्रेसिडेंट आहेस याचे भान पाहीजे ना?
जाउ देत.. या गोष्टी जर दिसत नसल्या किंवा मुद्दामुन दुर्लक्षित करायच्याच.. अस जर ठरवल असेल तर.. कठीण आहे.
व्होट काउंटींग ला व्होटर फ्रॉड म्हण असे त्याला अॅडव्हाइस करणार्या लॉयर्स( रुडी ज्युलिआनी?).. लोकांन्नी कुठुन लॉ डिग्री मिळवली आहे हे बघायला पाहीजे.
राज.. आय डाँट नो अबाउट यु.. पण या सगळ्या गदारोळानंतर.. आय कांट वेट फॉर नेक्स्ट वीक्स स्टार्ट ऑफ मास्टर्स.. अ वेलकम रिलिफ!.....
>>>>मॅरियल बोटलिफ्ट, क्युबन अ
>>>>मॅरियल बोटलिफ्ट, क्युबन अॅडजस्टमेंट अॅक्ट, ह्या खास निर्वासितांना एका वर्षातच ग्रीन कार्ड मिळत असल्याने रिपब्लिकन पक्षाचा तयार झालेला क्युबन-अमेरिकन बेस, वेट-फूट ड्राय-फूट पॉलिसी>>> धन्यवाद. वाचते आहे.
https://www.cnn.com/2017/01/12/politics/us-to-end-wet-foot-dry-foot-poli...
धन्यवाद, सामो. समंजस आणि अ
धन्यवाद, सामो. समंजस आणि अ-कोत्या प्रतिक्रियेबद्दल आभार!
(आता काही स्वयंघोषित विद्वान 'हॅ:, हे त्तर क्काय मला कध्धीच माहीत होतं!' म्हणण्याची वाट पाहतोय :))
हेही पहा: https://en.wikipedia.org/wiki/Cuban_Adjustment_Act
हे पाहिलं होतं कालhttps:/
हे पाहिलं होतं काल
https://twitter.com/TheTNHoller/status/1325123987215540224
This is better than even a
This is better than even a sitcom
https://slate.com/news-and-politics/2020/11/four-seasons-total-landscapi...
@ सनव - हे तर महालोल आहे!!
@ सनव - हे तर महालोल आहे!!
तथाकथित "बिझनेसमॅन" हाटिलवाल्याला धड एक हाटिलही बुक करता येऊ नये! आणि असल्या ओसाडवाडीत जागा निवडली तीही अॅडल्ट टॉय शॉपजवळची. धन्य!
बिच्चार्या ट्रम्पतात्यांना त्यांचे भक्तच काय पण कॅम्पेनमधले लोकपण लिटरली/फिगरेटिव्हली/सीरियसली घेत नाहीत असं दिसतंय! (ट्रम्पतात्यांचाच तो प्रसिद्ध 'लूझर्स आणि सकर्स' ड्वायलाक आठवला!)
12 वी नापास स्वयं घोषित झाशी
12 वी नापास स्वयं घोषित झाशी ची राणी कंगना म्हणते आहे नवीन अध्यक्ष 1 वर्ष पण टिकणार नाहीत सत्तेत.
>>रिपब्लिकन पक्षाचा तयार
>>रिपब्लिकन पक्षाचा तयार झालेला क्युबन-अमेरिकन बेस, वेट-फूट ड्राय-फूट पॉलिसी इत्यादी गोष्टी माहीत असतीलच.<<
क्युबन अॅडजस्ट्मेंट अॅक्ट आणि त्यात पुढे झालेली अमेंडमेंट वेफुड्राफु योगायोगाने डेम्सच्या काळातच झाली. आणि तो कायदा लेजिस्लेटिव प्रोसेस होउन अंमलात आला आहे. कोल्डवॉर, पोलिटिकल असायलम इ. ची पार्श्वभुमी आहे त्याला. आता यात इल्लिगल इमिग्रंट्स, सँक्च्युअरी सिटीज कुठे आले...
परत एकदा, मुद्दा सँक्च्युअरी सिटीजचा आहे, आणि तुम्ही फ्लोरिडा त्यात घुसवुन (जे सँक्स्च्युअरी स्टेट नाहि) आपलंच घोडं दामटवण्याचा प्रयत्न करत आहात. बाकि इतर कामेंट्समधुन व्यक्त झालेल्या फ्रस्ट्रेशन वर माझा पास. इथे निटपिकिंग करायचं टाळंत होतो पण तुम्हाला आता आरसा दाखवणं जरुरी आहे. एकिकडे लिहिताय, नेमकॉलिंग करण्यात इंटरेस्ट नाहि, आणि त्याच आणि सबसिक्वेंट कामेंट्समधुन काय केलंय ते तपासा...
>>तु ट्रंपबद्दल व
>>तु ट्रंपबद्दल व फ्लोरिडातल्या इमिग्रंट्स बद्दल जी विधाने केली आहेस त्या विधानांमधे खुप विसंगती आहे.<<
कसली विसंगती रे? ट्रंपचा स्पष्टवक्तेपणा म्हणजे पोलिटिकली इन्करेक्ट विधानं करणं, हा आहे. आणि फ्लोरिडात जे इमिग्रेशन कायदेशीर होतंय त्याची बरोबरी तु सँक्च्युअरी सिटिजशी कशी करतोस?
>>राज.. आय डाँट नो अबाउट यु.<<
अॅज ऑल्वेज, गॉल्फ टेक्स प्रेसेडंस ओवर एवरिथिंग एल्स...
>>> आता यात इल्लिगल
>>> आता यात इल्लिगल इमिग्रंट्स, सँक्च्युअरी सिटीज कुठे आले...
--- तुमचा मूळ मुद्दा स्ट्रॅटेजिक जेरीमँडरिंगचा होता. क्युबन इल्लिगल इमिग्रंट्सना लगोलग पावन करुन घेणारे आणि वर्षभरात ग्रीन कार्ड कायदे आहेत आणि त्यांचा फायदा रिपब्लिकन पक्षाला मिळाला आहे, हे मी लिहिल्यावर आपण 'अगाध झापड लावलेली दृष्टी' वगैरे तारे तोडलेत. काहीतरी फार महत्त्वाची माहिती देत आहोत, असा आव आणून सध्या तात्या जी पोपटपंची करताहेत - तीच विधानं पुन्हा लिहिलीत ("अमेरिकन प्रेसिडेंट इलेक्ट मिडिया डिक्लेर करत नाहि").
तरी पुढच्या प्रतिसादात मी 'फ्लॉरिडात येणारे निर्वासित आणि अन्यत्र येणारे निर्वासित यांच्यासंबंधीच्या धोरणातल्या फरकाचा अभ्यास करा' असा क्ल्यू दिला होता - पण आपण डाकाचा हेका धरून बसलात.
अजून डाका अस्तित्वात असला तरी तो 'पाथ टू सिटिझनशिप' देत नाही (तो 'ड्रीम अॅक्ट' झाला). त्यामुळे त्याचा मतांवरील परिणाम आणि क्युबन इल्लिगल इमिग्रंट्सच्या राजमार्गाचा थेट परिणाम यांतला फरक स्वयंस्पष्ट आहे.
बाकी करिता माहितीस्तव - Trump says he'll sign order with 'road to citizenship' for DACA recipients
https://thehill.com/homenews/administration/506844-trump-says-hell-sign-...
>>> पण तुम्हाला आता आरसा दाखवणं जरुरी आहे.
--- लोल, आपण हे महान कार्य करण्याची गरज नाही. पण नेमेप्रमाणे स्वयंघोषित उच्चासनावर बसून मोघम ताशेरे मारणं आणि नेमकी उदाहरणं दिल्यावर मुद्दे सोडून पळ काढणं इत्यादी चालू द्या!
नेमकी उदाहरणं दिल्यावर मुद्दे
नेमकी उदाहरणं दिल्यावर मुद्दे सोडून पळ काढणं इत्यादी चालू द्या! >>> हो म्हणजे राज मुद्दे सोडून पळ काढतात हे म्हणणं पोलिटिकली इनकरेक्ट असलं तरी स्पष्टवक्तेपणाचं आहे, त्यामुळे त्यांना ते पटणारच.
>>नेमकी उदाहरणं दिल्यावर
>>नेमकी उदाहरणं दिल्यावर मुद्दे सोडून पळ काढणं इत्यादी चालू द्या!<<
छान, हे सुद्धा तुम्हीच ठरवणार. मूळात फ्लोरिडाचं उदाहरण इथे गैरलागु आहे हे तुमच्या डोक्यात का शिरत नाहि, हे कळायला मार्ग नाहि. पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न करतो -
१. क्युबा मधुन फ्लोरिडात आलेले लोंढे कायदेशीर मार्गाने देशात सामावले गेले आहेत.
२. फ्लोरिडात सॅंक्च्युअरी सिटिज बॅन आहेत.
३. इतर राज्यांत जिथे सँक्च्युअरी सिटिज आहेत, तिथे जो इल्लिगल इमिग्रंट्सना आश्रय दिलेला आहे, तो बेकायदेशीर आहे.
४. #३ मधे उल्लेख केलेल्या इल्लिगल इमिग्रंट्स्ना "पाथ टु सिटिझन्शिप" देण्यामागे डेम्सचा हिडन अजेंडा आहे. हे जेरी मँडरिंगचं नवं रुप. (नॉट बाय रिड्रॉइंग बाउंड्रीज, बट स्टफिंग इल्लिगल इमिग्रंट्स अँड गिविंग देम ए पाथ टु सिटिझनशिप)
५. म्हणुन फ्लोरिडातल्या क्युबन इमिग्रेशनची बरोबरी सँक्च्युअरी स्टेटस सोबत करणं हे मुर्खाच्या नंदनवनात रहाण्या सारखं आहे.
बघा आता तरी समजतंय का...
>>> फ्लोरिडातल्या क्युबन
>>> फ्लोरिडातल्या क्युबन इमिग्रेशनची बरोबरी सँक्च्युअरी स्टेटस सोबत करणं
--- बरोबरी शक्यच नाही, कारण क्युबन निर्वासितांना मिळणारी प्रेफरेंशियल ट्रीटमेंट आणि त्याचं फ्लोरिडासारख्या स्विंग स्टेट्समध्ये रिपब्लिकनांना मिळणार्या एकगठ्ठा मतांमध्ये होणारं परिवर्तन ही ऑलरेडी अस्तित्वात असलेली गोष्ट आहे.
व्हिडिओ दिला त्याप्रमाणे ट्रम्पही DACA मार्फत ड्रीमर्सना 'पाथ टू सिटिझनशिप' द्यायला अनुकूल आहे. त्यामुळे हिडन अजेंडा इत्यादी फॉक्स न्यूजी कॉन्स्पिरसी थिअरीजना कितपत महत्त्व द्यायचं, हे सुजाण लोकांनी ठरवावं.
आणि घटकाभर असा 'इव्हिल प्लॅन' आहे असं समजून चाललो तरी तो प्रत्यक्षात यायला कैक वर्षं लागतील - डेमोक्रॅट्स काय किंवा ट्रम्प काय, दोघांच्याही प्लॅनमधली ही तरतूद अनेक बाबींवर अवलंबून आहे आणि इमिग्रेशनच्या रांगेत त्यांना शेवटचा क्रमांक मिळणार आहे - क्युबन निर्वासितांसारखं एका वर्षात ग्रीन कार्ड नाही. या मंडळींना जर मतदानाचा हक्कच नाही तर जेरीमँडरिंगचा प्रश्नच कुठे येतो?
OMG!
OMG!
ती स्लेट ची लिंक अत्यंत विनोदी आहे! हा प्रकार कोणीतरी घोळ केला म्हणून झालाय की कँपेन तिजोरीत पैशाचा खडखडाट झालाय?
@वैद्यबुवा - बहुतेक दोन्ही.
@वैद्यबुवा - बहुतेक दोन्ही. तात्या आणि त्यांची कॅम्पेन शब्दशः आणि लाक्षणिक अर्थाने बँकरप्ट आहेत, यात नवल ते काय?
वास्तविक, कुठलाही अध्यक्ष निवडून आल्यावर लगेचच आपल्या रिइलेक्शनसाठी पैसे गोळा करणं सुरु करत नाही. हा नॉर्म आहे, कायदा नाही. पण तात्यांनी अर्थातच नॉर्म्स वगैरे न जुमानता २०१६ पासूनच रॅलीज आणि अन्य मार्गांनी तिजोरी भरायला सुरुवात केली होती.
इन फॅक्ट, बायडन कॅम्पेन पैशांच्या बाबतीत कधीच कॅच-अप करू शकणार नाही - असा अनेकांचा होरा होता. मात्र स्मॉल-डोनर्स आणि काहीएक धोरण आखून केलेल्या खर्चामुळे तो प्रश्न आला नाही. ह्या तथाकथित "बिझनेसमन"ला मात्र $१ बिलियनहून अधिक रकमेचा नीट विनिमय करता आला नाही.
अधिक माहितीचा दुवा खाली आहे, पण दोन ठळक मुद्दे:
१. तात्यांचा इगो: वॉशिंग्टन डीसी/नॉर्थ व्हर्जिनिया/मेरीलँडचा परिसर घनदाट डेमोक्रॅटिक असल्याने + तिथे जाहिरात करण्याचे दर अधिक असल्याने - तिथे कुणी रिपब्लिकन प्रेसिडेन्शियन कँडिडेट सहसा टीव्ही अॅड्स रन करत नाहीत. पण अर्थात, टीव्ही अॅडिक्ट तात्यांचा इगो कुरवळ्यासाठी तात्यांच्या कॅम्पेनने बायडेनला वॉशिंग्टन डीसीच्या मार्केटमध्ये आऊटस्पेंड केलं:
Some spending choices appear devised, at least in part, to satisfy Mr. Trump himself, including the Super Bowl ads, which were purchased as part of an advertising arms race with Mr. Bloomberg. The two ads on game day cost more than the Trump campaign spent on local television through the end of July in each of four battleground states: Wisconsin ($3.9 million), Michigan ($3.6 million), Iowa ($2 million) and Minnesota ($1.3 million).
Another Trump-pleasing expense: more than $1 million in ads aired in the Washington, D.C., media market, a region that is not likely to be competitive in the fall but where the president, a famously voracious television consumer, resides.
२. तात्यांची तुंबडी: मार-आ-लागो आणि वॉशिंग्टन डीसीतलं डब्यात जाणारं हाटिल यांना ट्रम्प प्रेसिडेन्सीचा (रीडः करदात्यांच्या पैशांचा) मोठाच हातभार लागला, हे सर्वज्ञात आहेच. तेव्हा तात्यांनी रिइलेक्शन कँपेनचा उपयोगही करून घेतला नसता, तरच नवल!
Mr. Trump, who once joked he could be the first candidate to make money running for president, has steered, along with the Republican Party, about $4 million into the Trump family businesses since 2019: hundreds of thousands of dollars to Mr. Trump’s club at Mar-a-Lago in Florida, lavish donor retreats at Trump hotels, office space in Trump Tower, and thousands of dollars at the steakhouse in Mr. Trump’s Washington, D.C., hotel.
Many of the specifics of Mr. Trump’s spending are opaque; since 2017, the campaign and the R.N.C. have routed $227 million through a single limited liability company linked to Trump campaign officials. That firm, American Made Media Consultants, has been used to place television and digital ads and was the subject of a recent Federal Election Commission complaint arguing it was used to disguise the final destination of spending, which has included paychecks to Lara Trump and Kimberly Guilfoyle, the partners of Mr. Trump’s two adult sons.
लेखाचा दुवा: https://www.nytimes.com/2020/09/07/us/politics/trump-election-campaign-f...
<<<#३ मधे उल्लेख केलेल्या
<<<#३ मधे उल्लेख केलेल्या इल्लिगल इमिग्रंट्स्ना "पाथ टु सिटिझन्शिप" देण्यामागे डेम्सचा हिडन अजेंडा आहे. हे जेरी मँडरिंगचं नवं रुप. (नॉट बाय रिड्रॉइंग बाउंड्रीज, बट स्टफिंग इल्लिगल इमिग्रंट्स अँड गिविंग देम ए पाथ टु सिटिझनशिप)>>>
कसला डोंबलाचा हिडन अजेंडा!
त्यांना मतदानाचा हक्क दिला तर ते सगळे डेमोक्रॅट्स्नाच मतदान करायला काय मेंढरे आहेत का? DACA मधे इथे जन्मलेली, वाढलेली नि आता तुमच्यापेक्षाहि मोठी झालेली मुले मुली आहेत. त्यांना काय स्वतःचे मत नसते?
त्यांना सोशल सेक्यूरिटी, टॅक्सेस भरावे लागतील ह्यालाच छुपा अजेंड म्हणायचे का? त्यांच्यातील तुमच्यापेक्षाहि हुषार (तुम्ही भारतीय, तुमच्यापेक्षाहि हुषार म्हणजे गोर्या लोकांच्या कितीतरी पटीने हुषार!) लोक जर नासा किंवा लष्कर किंवा इतर सरकारी प्रकल्पात आले तर तोटा आहे का?
लोकांचा उपयोग करून घेण्यावर आहे - ट्रंपला ती कला चांगली अवगत आहे, पण त्याचा उपयोग त्याने देशातील अशांतता माजवण्यात केला.
जर चांगले उपयोग करून घेतले नि सुखी होऊन त्यांनी डेमोक्रॅट्स किंवा रिपब्लिकन कुणालाहि मते दिली तरी काय हरकत आहे?
पन्नास वर्षात एक गोष्ट लक्षात आली - न शिकलेले, कमी अक्कल असलेले गोरे नि एव्हांजेलिकल लोक बाकीच्यांचा कमालीच्या बाहेर द्वेष करतात. आपले नशीब आपण सुशिक्षित लोकांत वावरतो. ट्रंपने नेमकेच हे हेरून त्याचा उपयोग करून घेतला.
नंदन,
नंदन,
रूडी २०२० मधे बोराट च्या स्टंट ला फसतो. हा मनुष्य लॉयर म्हणून व्होटर फ्रॉड लॉसूट मधे मुख्य व्यक्ती आहे ह्यात सगळे आले. म्हणतो.
बॅनन फॉसी चे डोके उडवून व्हाईट हाऊस मधे लावायला हवे (ही फिगरेटिव्हली केलेले भाष्य नाही हे त्याने स्वत:च स्पष्ट केले आहे) असे म्हणतो.
व्होटर फ्रॉड लॉसूट साठी लागणारे पैसे कमावण्याचे आवाहन मतदात्यांना करण्यात आलेले आहे त्यातला ६०% हिस्सा कँपेनच्या कर्जा चा हिस्सा चुकवण्यात जाणार आहे ही फाईन प्रिंट आहे. ही लोक इतरांच्या करप्शनबद्दल बोलतात , त्यांना व्होट करणारे इतरांना उपदेशाचे डोस देतात - सगळेच गमतीशीर आहे. Just when you think they have reached the bottom, they start to digging.
RJB बद्दल इतकं ग्वाड बोलणं
RJB बद्दल इतकं ग्वाड बोलणं तेही मलिका ए कांगावा ने म्हणजे हद्द आहे राव>>> सहमत. तिला प्रेसिडेन्ट बनायचा चान्स आहे. म्हणुन ती तसे बोलली. बघु या ती या चार वर्शात काय करते ते.
इन जनरल अमेरिकन लोकांचे नव्या
इन जनरल अमेरिकन लोकांचे नव्या राष्ट्राध्यक्क्षाबद्दल काय मत आहे? ट्रम्प गेला यातच आनंद की नवा रा. अमेरिकन रा. असायला हवा तसा आहे याचा आनंद? ट्रम्प आला तेव्हा इतक्या लोकांनी राग व्यक्त करताना वाचले होते की सगळी अमेरिका याच्याविरुद्ध तर याला निवडून दिले कोणी हा प्रश्न पडलेला. यावेळचा रा. पसंतीस उतरलाय असे वाटतेय.
५०-५० आहे. मत दिलेल्यांपैकी
५०-५० आहे. मत दिलेल्यांपैकी जवऴजवळ अर्ध्या लोकांनी ट्रम्प ला व अर्ध्यांनी बायडेनला दिले आहे. दोघांना मिळालेल्या मतांमधे तीन टक्क्यांचा फरक आहे. मागच्या वेळेसही साधारण तसेच होते (दोन पेक्षा कमी टक्क्यांचा फरक, पण हिलरीला जास्त होती).
दोघांना मिळालेल्या मतांमधे
दोघांना मिळालेल्या मतांमधे तीन टक्क्यांचा फरक आहे. मागच्या वेळेसही साधारण तसेच होते>>>
Ok, म्हणजे मागच्या वेळेस जे नाराज होते, ते यावेळेस खुश झाले. त्यांना अजून 4 वर्षे टांगून राहावे लागले नाही
अमेरिकन प्रेसिडेंट निवडपद्धती व नंतर कारभारपद्धती मला थोडीफार कळते असे वाटत होते पण मुकुंद यांची पोस्ट वाचून परत गोंधळ झाला. डेम्स निवडणूका जिंकले तरीही वर्चस्व रेप्सचेच राहणार हे कसे काय कळले नाही. त्यांनी बायडेन ठोकळा प्रेसिडेंट बनून राहणार असे लिहिले.
असे आहे का की सिनेटमधला प्रत्येकजण स्वतंत्रपणे निवडून आलाय, ज्यात रिप्स जास्त आहेत. प्रेसिडेंटही स्वतंत्रपणे निवडून आलाय जो डेम्स आहे. सिनेटमध्ये रिप्स जास्त असल्यामुळे डेम्स प्रेसिडेंटला कुठलाही निर्णय घेता येणार नाही/घेताना अनंत अडचणी येणार? आणि हा त्रास निदान 2 वर्षे राहणार असेही वाचले, म्हणजे ह्या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात?
खूपच मूर्ख किंवा अगदीच बाळबोध प्रश्न आहेत याची कल्पना आहे
साधना, एकदम सोप्या पद्धतीने
साधना, एकदम सोप्या पद्धतीने अमेरिकन निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी धृव राठीचा व्हिडिओ पहा.
https://youtu.be/5W9-MJXvtFI
Pages