Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>
>>
पण याच लॉजिक ने तुम्ही हा पाठ रिपब्लिकन्सनाच जास्त द्यायला हवा ना? डेम्स नी अशी काय युद्धे लादली आहेत गेल्या काही वर्षांत? ओबामाने तरी कोठे नवीन युद्ध केले आठ वर्षांत?
<<
ओबामाने प्रचंड उत्पात केले. पहिल्यांदा काहीही न करता नोबेलचे शांततेचे पारितोषिक पटकावले आणि नंतर लिबिया आणि सिरिया ह्या दोन्ही देशांची वाट लावली. लिबियात बंडखोरांना मोठी रसद पुरवुन गद्दाफीला पदच्युत केले आणि तो देश अराजकात बुडवला. तीच गोष्ट सिरियाची . पण असाद खमक्या निघाला म्हणून टिकला.
रिपब्लिकन युद्धखोर अध्यक्ष असेल तर जरूर त्याविरुद्ध बोला. ट्रंप त्यातला नाही.
>>
इथे युद्ध म्हणजे इराक वॉर-१, इराक वॉर-२, अफगाणिस्तान वगैरे. फुल स्केल इन्वेजन. बाकी मिलिटरी इन्व्हॉल्व्हमेण्ट च्या काड्या सदोदित सुरू असतात. त्या ट्रम्पकाळातही आहेतच. तात्यानेही काही जगातील सर्व अमेरिकन सैन्य परत बोलावलेले नाही.
<<
आपणास वाटत नाही म्हणून हे युद्ध नाही वगैरे मी मानत नाही. हे युद्धच. ज्या देशात हजारो लोक मारले जातात त्यांना हे युद्ध नाही म्हणून फार समाधान वाटत असेल असे मी मानत नाही.
ट्रंपने मोठ्या प्रमाणात सैन्य परत बोलवायला सुरवात केलेली आहे. शांतिदूत ओबामानेही हे धाडस केले नाही.
ट्रंपच्या काळात अशा प्रकारच्या काड्या केल्याचे उदाहरण नाही. असल्यास द्या.
----- सुप्रीम कोर्टात
----- सुप्रीम कोर्टात कॉन्झर्वेटिव मेजॉरिटी भरणे, - ट्रंपला अधिकार होता तो त्याने वापरला-->>> हे जरी खरे असले तरी अशि पद्धत आहे की निवडणुकीच्या काळात पदावर असलेल्या व्यक्तीने नव्या नेमणुका करु नयेत. म्हणुन ट्रुम्पचे वागणे अयोग्य होते. मला असे वाटते की त्याने मी हरलो तरी सुप्रीम कोर्ट बदलेल व कॉन्झर्वेटिव अजेन्डा चालु राहील असे करायचे ठरवुन हा निर्णय घेतला.
>>
>>
रेगन डेमोक्रॅटिक, बुश डेमोक्रॅटिक, मेकेन डेमोक्रॅटिक ... या स्पीडने आज रात्री पर्यंत ग्रॅहम पण डेमोक्रॅटिक होईल. शेंडे तुम्ही लिहित राहिलं पाहिजे.
<<
मेलेला रेगन सुरवातीला डेमो होताच. पण त्याविषयी बोलत नाही. बुश आणि मेकेन ह्यांनी जाहीरपणे आपण बायडनला समर्थन देत असल्याचे जाहीर केले आहे. आपणास ज्ञात नसल्यास गुगल करा. ट्रंपने पारंपारिक रिपब्लिकन पक्षाच्या ज्या संकल्पना होत्या त्या काही प्रमाणात मोडीत काढल्या आहेत. रिनो अर्थात रिपब्लिकन इन नेम ओन्ली अशी एक जातकुळी ट्रंपच्या काळात जन्माला आलेली आहे. असे लोक नावापुढे आर लावत असतील वा नसतील पण मत डेमोक्रॅट लोकांनाच देतात.
>>
>>
सुप्रीम कोर्टात कॉन्झर्वेटिव मेजॉरिटी भरणे, - ट्रंपला अधिकार होता तो त्याने वापरला-->>> हे जरी खरे असले तरी अशि पद्धत आहे की निवडणुकीच्या काळात पदावर असलेल्या व्यक्तीने नव्या नेमणुका करु नयेत. म्हणुन ट्रुम्पचे वागणे अयोग्य होते. मला असे वाटते की त्याने मी हरलो तरी सुप्रीम कोर्ट बदलेल व कॉन्झर्वेटिव अजेन्डा चालु राहील असे करायचे ठरवुन हा निर्णय घेतला.
>>
कुणी सांगितली अशी पद्धत वगैरे. ट्रंपने जे काही केले ते पूर्ण कायदेसंमत होते. पद्धत, रुढी, परंपरा, संकेत वगैरे म्हणजे कायदे नव्हेत. डेमो मंडळीनी जज नेमण्याच्या पद्धतीत बदल केले जे आता त्यांच्यावर उलटत आहेत.
आपणास वाटत नाही म्हणून हे
आपणास वाटत नाही म्हणून हे युद्ध नाही वगैरे मी मानत नाही. हे युद्धच. >>> मग ब्रॉड व्याख्या धरली तर अजूनही मिलिटरी काड्या सुरूच आहेत की. ट्रम्पने सगळे सैन्य कोठे बोलावून घेतले आहे.
तो ही काश्मीर मधे मध्यस्ती करायला निघालाच होता की.
रिपब्लिकन युद्धखोर अध्यक्ष असेल तर जरूर त्याविरुद्ध बोला. ट्रंप त्यातला नाही. >>> तुम्ही मूळ प्रश्न अजून भलतीकडेच टाकताय. तुम्ही मूळ पोस्ट जी लिहीली त्यात "डेम्स नी धडा घ्यायला हवा" लिहीले होते. त्यात जरा चवीपुरते तरी रिपब्लिकन्स घातले असते तरी तुम्ही काहीतरी मुद्दा लिहीताय अशी शंका आली असती. पण रिपब्लिकन्स नी युद्ध लादले. ट्रम्प ला त्यात इण्टरेस्ट नाही. यातून धडा डेम्स्नी घ्यायचा हे तुमचे अफाट लॉजिक आहे.
ओहायो आणि एन सी फ्लिप होणार
ओहायो आणि एन सी फ्लिप होणार की काय ?
फ्लोरिडा गेलं बहुतेक.
>>
>>
तुम्ही मूळ पोस्ट जी लिहीली त्यात "डेम्स नी धडा घ्यायला हवा" लिहीले होते. त्यात जरा चवीपुरते तरी रिपब्लिकन्स घातले असते तरी तुम्ही काहीतरी मुद्दा लिहीताय अशी शंका आली असती. पण रिपब्लिकन्स नी युद्ध लादले. ट्रम्प ला त्यात इण्टरेस्ट नाही. यातून धडा डेम्स्नी घ्यायचा हे तुमचे अफाट लॉजिक आहे
<<
सध्या इस्लामीस्ट सल्लागार कुठल्या पक्षाच्या अग्रभागी विराजमान आहेत? डेमोक्रॅट पक्षाच्या. त्यामुळे इस्लामी लोकांच्या दाढ्या कुरवाळायला पुढे जाण्याची शक्यता असणारे डेमोक्रॅट आहेत (माझ्या मते).
एकंदरीत जगभर इस्लामी दहशतवाद विरोधी वातावरण आहे. त्यामुळे वोक विचारसारणी नसलेले रिपब्लिकन आपणहून इस्लामीस्ट लोक आपले सल्लागार, विचारवंत म्हणून नेमतील अशी शक्यता कमी. त्यामुळे ज्यांच्याकडून जास्त धोका त्यांच्याकडून सावधानी अपेक्षित असे लॉजिक आहे.
अर्र!! अॅरिझोना गेलं बायडेन
अर्र!! अॅरिझोना गेलं बायडेन ला.
ओके शेण्डे, hold that thought
ओके शेण्डे, hold that thought. पुन्हा बोलू
आज रात्री अजून काही नवीन निकाल येतील असे दिसत नाही. बहुधा उद्याच.
भारतात राइटिस्ट भाजपा हवी पण
भारतात राइटिस्ट भाजपा हवी पण अमेरिकेत लिबरल बायडेन पाहिजे असं वाटणारे लोक निव्वळ अडाणी किंवा निव्वळ स्वार्थी आहेत.
त्यापेक्षा राज, शेंडेनक्षत्र, विजयकुलकर्णी, अमितव इ जास्त सुलझे हुए आणि तत्वनिष्ठ आहेत.
हे मी आधीही लिहीले होते बहुतेक.
ट्रम्प तर येणारच. " दरिद्री, आळशी भारताच्या विकासाससाठी मोदीशहाच पाहिजे" म्हणणार्या अम्रिकन भारतीयांनी भारताच्या भल्यासाठी ट्रम्पलाच निवडावे. बायडन इज प्रो चायना, प्रो पाक.
सामो, तुम्ही केलीआन कॉनवेचा
सामो, तुम्ही केलीआन कॉनवेचा जॉब घेऊ शकता. तुम्ही ट्रम्प समर्थक, नवरा ट्रम्प विरोधी आणि मुलगी कट्टर ट्रम्प विरोधी!!
डे जा वु!
डे जा वु!
निकाल अजुन जाहीर झाला नाही पण बायडनचे जिंकण्याचे चांसेस फार कमी आहेत. मला नाही वाटत मिशिगन व पेनसिल्व्हानिया तो जिंकु शकेल...
बिचारे ( का महामुर्ख?) पोलस्टर्स...
बायडन हरला तर डेमोक्रॅटीक पार्टी हॅज लॉट ऑफ सोल सर्चींग टु डु! बायडनचे वय.. कमला हॅरीस अॅज अ व्हाइस् प्रेसिडेंशिअल कँडिडेट.. नॉट प्रोग्रेसिव्ह इनफ अजेंडा( म्हणजे बर्नी सँडर्स- एलिझाबेथ वॉरेन अजेंडा)... ओव्हरप्लेइंग ब्लॅक् लाइव्ह्स मॅटर इश्यु.. व त्या निमित्ताने आफ्रिकन अमेरिकन लोकांनी केलेल्या दंगली, जाळपोळी, लुटालुट... अशी बरीच कारणे असु शकतात.. इनफ ब्लेम टु गो अराउंड..
मिशिगन, पेनसिल्व्हॅनिया व विस्कॉन्सिन मधले बर्नी सँडर्स डेमोक्रॅटीक व्होटर्स बहुतेक यंदाच्या निवडणुकीतही घरीच बसले.
ट्रंप जिंकला तर खरच मानल पाहीजे त्याला... संपुर्ण पॉवरफुल मिडिया त्याच्या विरुद्ध असुनही तो २ वेळा निवडुन येतो! अमेरिकेत आता मेन स्ट्रिम मिडियाकडे अमेरिकेतली अर्धी जनता... ट्रंप सपोर्टर्स... ढुंकुनही बघत नाही... त्यांच्या द्रुष्टीत... मेन स्ट्रिम मिडिया हॅज लॉस्ट इट्स क्रेडिबिलिटी.... फेक न्युज!
गेल्या २० वर्षात ही बहुतेक चौथी निवडणुक की ज्यात... डेमोक्रॅट्स पॉप्युलर व्होट जिंकुनही .. निवडणुक हरले आहेत. पॉवर ऑफ एलेक्टोरल व्होटींग सिस्टिम!
अस दिसतय की रिपब्लिकन्स सेनेटमधली मेजॉरीटी राखतील... म्हणजे पुढच्या ४ वर्षात अमेरिकेत सगळ्या कोर्टात कंझरव्हेटिव्ह जजेसची नेमणुक मिच मॅकॉनल करु शकतो. तसच लिबरल सुप्रिम कोर्ट जज स्टिफन ब्रायर( वय ८२) जर मेला तर ट्रंपला अजुन एक कंझरव्हेटिव्ह जज सुप्रिम कोर्टासाठी नेमता येइल.
थोडक्यात...ग्रेट इलेक्शन आउटकम फॉर रिपब्लिकन् पार्टी!
Wats app
Wats app
big breaking
Fadnavis rushes to Washington DC to take oath since polls are unclear. Guv Koshiyari to give oath at 4:20 am.
भारतातच लोकं यासाठी जागतात
भारतातच लोकं यासाठी जागतात असं नै कै. इकडे पण कडवा चौथच सुरू आहे. लोल्स
डेमोक्रॅटस तोंडघशी पडण्याचे
डेमोक्रॅटस तोंडघशी पडण्याचे आसार नजर आ रहे है. (अर्थात पेनसिल्व्हेनिआ, मिशिगन, विस्कॉनसिन आणि टेक्सास अजुनही टसल आहे.) पॉप्युलर व्होटमध्येही बायडन-ट्रंप अगदी तुल्यबळ लढता आहे. अनेक राज्यात, प्रोटेस्टर्स रस्त्यावरती उतरलेले आहेत.
Dems ना कॉंग्रेस पण फार काही
Dems ना कॉंग्रेस पण फार काही स्वीप करता आली नाही. सिनेट बहुतेक रिपब्लिकनच राहील. आता प्रेसिडेंट कोण येणार हे शिल्लक आहे
२००० सारखे होण्याची शक्यता
२००० सारखे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेरमोजणी, परत फेरमोजणी , कोर्ट केस असे महिनाभर चालले होते. त्या वेळी अल गोर ने माघार घेतली होती.
पेनसिल्व्हेनिया, मिशिगन,
पेनसिल्वेनिया, मिशिगन, विस्कांसिन्चा निकाल निर्णायक ठरणार, आणि तिन्हि स्टेट्समधे ट्रंप लीड वर आहे. तिन पैकि दोन स्टेट्स मिळाली तरी ट्रंपकरता पुरेशी आहेत. बाय्डनची उरलीसुरली आशा मेल्इन बॅलटवर आहे, जो ट्रंपच्या मते फ्रॉड आहे. एकुण निकालाची रंगत चढत जाणार आहे...
विस्कॉन्सिनमध्ये आत्ता तरी
विस्कॉन्सिनमध्ये आत्ता तरी किंचीत पॉइन्टने बायडेन आघाडीवरती आहे . पण मिशिगन, पेन्सिल्व्हेनिआ, नॉर्थ कॅरॉलिना, जॉर्जिआ ट्रंप खिशात घालेल बहुतेक. टेक्सासमध्येही केव्हापासून ९९% मोजणी झालेली आहे, १% आप्ली चाललीये चाललीये. तिथेही आत्ता तरी तात्त्या किंचित आघाडीवरती आहेत्त.
लिबरट मीडियाच्या 'अभ्यासू
लिबरट मीडियाच्या 'अभ्यासू निष्कर्षां'पेक्षा त्रिपाठीबुवांसारखे कुडमुडे ज्योतिषी जास्त अॅक्युरेट ठरले तर!...
विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
सीएनएन चे स्टेट लेव्हल,
सीएनएन चे स्टेट लेव्हल, काउण्टी लेव्हल झूम इन झूम आउट बघून कंटाळून झोपलो तेव्हा तात्या बर्याच ठिकाणी लीड करत होता. आता एक दोन ठिकाणी पुन्हा बायडेन वर आला आहे - विस्कॉन्सिन आणि मिशिगन.
काल फॉक्स ने रात्री १२ च्या सुमारास अॅरिझोना फ्लिप झाले म्हणून घोषित केले होते. पण तेथे अजूनही काउन्टिंग चालू आहे असे दिसते. बायडेन लीड करत असला तरी.
ट्रंप जिंकला तर खरच मानल
ट्रंप जिंकला तर खरच मानल पाहीजे त्याला... संपुर्ण पॉवरफुल मिडिया त्याच्या विरुद्ध असुनही तो २ वेळा निवडुन येतो! अमेरिकेत आता मेन स्ट्रिम मिडियाकडे अमेरिकेतली अर्धी जनता... ट्रंप सपोर्टर्स... ढुंकुनही बघत नाही... त्यांच्या द्रुष्टीत... मेन स्ट्रिम मिडिया हॅज लॉस्ट इट्स क्रेडिबिलिटी.... फेक न्युज!
>>> मुकुंद, या वाक्यातच त्याचे उत्तर आहे सध्या अमेरिकेत दोन मोठे एको चेंबर्स आहेत. त्या त्या चेंबर्स मधल्या लोकांना त्यांना जी दिसते ती वस्तुस्थिती आहे असे वाटत असते. यात जो एको चेंबर मोठा आहे तो जिंकेल
फारेंड... बिंगो!
फारेंड... बिंगो!
तु म्हणतो तसे ..स्टेट लेव्हल.. काउंटी लेव्हल.. झुम इन .. झुम आउट.. असा खेळ बघुन बघुन माझी फ्लोरिडा, जॉर्जिया, विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हॅनिया, मिशिगन... वगैरे राज्यातल्या जवळजवळ सगळ्या काउंटीज ची नावे पाठ झाली आहेत... डेड , डिकॅब, अॅलिघनी, वेन,किनोशा.. काय काय एक एक नावे.. (आयला.. माझ्या शेजारच्या काउंटीचे नाव मला कालपर्यंत माहीत नव्हते... आता कुठल्या कुठल्या काउंटीज माहीत झाल्या).. जेपर्डीवर जाउन अॅलेक्स ट्रिबेकला म्हणतो आता.. अमेरिकन स्टेटमधल्या काउंटीजची नावे ....या कॅटॅगरी मधे कुठल्याही काउंटीचे नाव विचार... बझींग वर बझींग करुन...घडा घडा उत्तरे देतो की नाही बघ...
राज म्हणतो त्याप्रमाणे.. मिशिगन व विस्कॉन्सिन.. ठरवेल कोण जिंकेल. ते दोन्ही स्टेट बायडन जिंकला तर त्याला जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलायना व पेनसिल्व्हॅनिया या तिनही राज्यांची जरुरी नाही.
पण काहीही झाले तरी अमेरिकेत डिव्हायडेड सरकार असणार आहे. पोलरायझेशन थोडेसुद्धा कमी झालेले नाही. अमेरिकन लोकांनी डेमोक्रॅट्स जर सेनेट मेजॉरीटी जिंकले तर सुप्रिम कोर्ट पॅकींग करतील या भितीमुळे सेनेट मेजॉरीटी रिपब्लिकन्सनाच परत दिली.
ट्रंप म्हणतोय
ट्रंप म्हणतोय 'पेनसिल्व्हेनियातलं व्होटिंग थांबलं पाहीजे' , मिडीया ते उलटं करुन सांगतेय 'ॲज अपर ट्रंप काऊंटिंग थांबलं पाहीजे"
अरे .... ३ तारखेला, व्होटींग थांबायला नको होतं? या ज्या काउंटीज मधुन जी मेल-इन मतं येतायत ती ३ तरखेनंतर टाकलेलीही तुम्ही घेणार? काही टाईम स्टँप नाही. १० दिवस आपली मतं येतच रहाणार?
हे मिडीया कसं ध चा मा करतं त्याचे उत्तम उदाहरण आहे.
हा 'मा' चा 'ध' आहे.
हा 'मा' चा 'ध' आहे.
३ तारखेपर्यंत पोस्टमार्क
३ तारखेपर्यंत पोस्टमार्क केलेली मते मोजली जातात. अमेरिकेतील इतर प्रोसेसेस प्रमाणे ते कन्सिस्टंट आहे. उदा: टॅक्स रिटर्न्स १५ एप्रिल पर्यंत पोस्टमार्क झालेले हवे असतात. सरकारपर्यंत पोहोचलेले नाही.
या ज्या काउंटीज मधुन जी मेल
या ज्या काउंटीज मधुन जी मेल-इन मतं येतायत ती ३ तरखेनंतर टाकलेलीही तुम्ही घेणार? काही टाईम स्टँप नाही. १० दिवस आपली मतं येतच रहाणार?'
>>
अहो प्रत्येक राज्याचा कायदा आहे त्याप्रमाणे ते मते ग्राह्य धरणार. काही राज्यात ३ तारखेपर्यंत आलेलीच मते ग्राह्य धरावीत असा कायदा आहे तिथे त्याप्रमाणे वागणार, जिथे कायदा म्हणतो की ३ तारखेपर्यंत पोस्टमार्क असलेली मते ग्राह्य धरावीत तिथे तसे. तसेच प्रत्येक राज्यात लष्करातील लोकांच्या मेल इन वोट्स साठी वेगळी सूट आहे.
आता हे कायदे अनेक वर्षे/दशके/शतके अस्तित्वात आहेत. ट्रम्प देशाचा प्रेसिडेंट असल्याने त्याला ते माहिती असले पाहिजे. पण तरी तो लोकांना भडकवतोय की बेकायदेशीरपणे मतदान होतेय. तो काय म्हणाला काल रात्री की बघा हे लोकं कुठून तरी पोत्यातून लाख दोन लाख मतपत्रिका बाहेर काढतील. पुढे जाऊन तो म्हणाला की खूप मोठ्या प्रमाणावर फ्रॉड होत आहे. आता या विधानांना पुष्टी देणारे एकही उदाहरण नाहिये. पण त्याला माहिती आहे की मेल इन वोटिंगचे काउंटिंग स्वतंत्र होत आहे, शेवटी शेवटी आलेल्या मेल इन वोट्स मोज्ण्यात वेळ जाणार आहे. असे शेवटचे गठ्ठे जेव्हा मोजले जातील व त्यामुळे जर पारडे इकडे-तिकडे झाले तर त्याचे रेम्याडोक्याचे समर्थकांना वाटणार की बघा आमचा नेता म्हणाला होता की फ्रॉड होणार आणि आता झालाच. मग ते दंगा करणार.
लक्षात येतय का ट्रम्प कोणताही पुरावा नसताना काल रात्री तसे का म्हणाला?
युरेनस आणि चंद्र एका राशीत आहेत ना? भले युरेनस कितीही लांब असेल तरी एका राशीत (म्हणजे आपल्याला इथून जवळ जवळ दिसत आहेत कीनई?) आल्याने केव्हडा परिणाम करत आहेत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर.
https://www.foxnews.com
>>>३ तारखेपर्यंत पोस्टमार्क केलेली मते मोजली जातात. अमेरिकेतील इतर प्रोसेसेस प्रमाणे ते कन्सिस्टंट आहे. उदा: टॅक्स रिटर्न्स १५ एप्रिल पर्यंत पोस्टमार्क झालेले हवे असतात. सरकारपर्यंत पोहोचलेले नाही.>>>
https://www.foxnews.com/politics/pennsylvania-mail-in-ballot-postmark-ch...
जर एन्व्हलप्स प्रि-पेड असतील तर युजवली 'टाइमस्टँप' नसतो. आता प्रश्न हा आहे की पोस्टल सर्व्हिसने ती काळजी घेतलेली आहे का की ३ तारखेपर्यंत आलेल्या, प्रत्येक, प्रिपेड एन्व्हलप्सवरतीही टाइमस्टँप आहे?
मग फक्त टाइमस्टँपवाली काऊंट करा. इतर मेल-इन बॅलटस काउंट करु नका.
____________
>>>हा 'मा' चा 'ध' आहे. Rofl>>> हाहाहा
_________
>>>>काल रात्री की बघा हे लोकं कुठून तरी पोत्यातून लाख दोन लाख मतपत्रिका बाहेर काढतील. पुढे जाऊन तो म्हणाला की खूप मोठ्या प्रमाणावर फ्रॉड होत आहे. आता या विधानांना पुष्टी देणारे एकही उदाहरण नाहिये.>>> टवणे सर ती एक 'मत मोजणीवरील' सुपरव्हायझर म्हणतेय मिलिअन व्होटस येणारेत अजुन. तेव्हा ती मते व्हॅलिड असणे महत्वाचे आहे असे जर ट्रंप म्हणत असेल तर त्यात चूकीचे काय?
हो पोस्टल प्रोसेस "लार्जली"
हो पोस्टल प्रोसेस "लार्जली" हे काम बरोबर करेल हे गृहीत धरूनच आहे ते. त्याहीपुढे जाउन एक रफ टाइमलाइन धरून त्यापुढे स्वीकारणेही बंद करू शकतात. त्यात मार्जिन ऑफ एरर कमी असेल.
मेल-इन बॅलट्स पहिल्यांदाच
मेल-इन बॅलट्स पहिल्यांदाच येतायत की काय? इतका अविश्वास दाखवायला काय पुरावा आहे नक्की, की हे लोक घोळ करतायत?
Pages